STORYMIRROR

Shila Ambhure

Children

3  

Shila Ambhure

Children

सांताक्लॉज

सांताक्लॉज

1 min
523


आला आला आला

सांताक्लॉज आला

मुलांचा लाडका

सांताक्लॉज आला।।धृ।।


लाल वेष त्याचा

टोपी लालेलाल

असा संता बाबा

पाहिला मी काल

पोतडीत भेटी

घेऊनिया आला ।।1।।


मऊ शुभ्र दाढी

डोळे किलकिले

बुटकासा बांधा

पोट सुटलेले

शरीराचा तोल

सावरीत आला।।2।।


नाताळ सणाला

मुलांच्या ओढीने

गाडी सजविली

हरणांच्या जोडीने

बर्फाळ सडक

तुडवित आला।।3।।


चांगल्या मुलांना

भेटवस्तू देण्या

गोड गोड पापे

त्यांचे खूप घेण्या

नाताळच्या राती

लपुनिया आला।।4।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children