Anjali Bhalshankar

Action Fantasy Others

3  

Anjali Bhalshankar

Action Fantasy Others

पुण्याची ओढ......

पुण्याची ओढ......

9 mins
202


    शेवटी एकदाचे पुणे स्टेशनला पोहोचलो! स्टेशन च्या प्रांगणात जिथ तिथ माणसांच्या प्रचंड रांगा नजर जाईल तिथवर प्रचंड मानवी लोंढे त्यासोबत सामानाचे सुद्धा तितकेच. इतर वेळी,प्रचंड गदारोळ,आवाज समुदायाने कानावर आदळत होता.रीक्षा वांल्यापासुन,हमाला पर्यंत आणि चहा,विकणाऱ्या पासुन ट्रेन च्या कंप्युटराईज,अनाऊन्समेंट पर्यंत, च्या एकत्रीत आवाजात माणसाच्या आपापसातील बोलण्याचे आवाज गुढ वाटत होते ऐकु तर काहीच स्पष्ट येतच नाही ऊलट एकत्रीत रीत्या कानावर आदळत असलेले ध्वनी मुळे,एका वेगळ्याच जगाची अनुभूती येत होती जसे की स्टेशन च्या आत प्रवेश केलयावर दिसणारे हे जग बाहेरील जगापासून पुर्ण अलिप्त असावे,या दुनियेचा व आता,काही मिनिटांपूर्वी आपण मुख्य रस्त्यावरं रीक्षातुन ऊतरून स्टेशन परीसरात आलो त्याचा काहीही संबंध नाही एरव्ही मी हे सगळेच छान निरीक्षण करून ऐंजोय केले असते, परंतु माझे मन अजिबातच स्थिर न्हवते,कसे असेल,? मागचे कित्येक दिवस विचित्र स्वप्न पडत सोबत उजवी पापणी अधुन मधुन प्रचंड फडफडत होती गेले महीनाभर हे सुरू होते आणि माझा आधिचा अनुभवावरून हे,वाईट संकेत होते माझ्यासाठी कोणि म्हणेल माझ्या सारखी नास्तिक व्यक्ती असे मानते कशी पंरतु अगदी प्रमाणिक सांगते हे माझ्या अगोदरचा अनुभवाचे, सत्य आहे.मन अजिबातच स्थिर न्हवते मी इतक्या लांबवर प्रवासाला चाललेय...कदाचित तिकडेच...... काही झाले....तर....तर अनोपची कीती दमछाक होइल सगळे निस्तरायला दूसरे आहे तरी कोण?त्यालाच ऊगाच त्रास.मिलींद नागपुरात असतानाच गेला.तेव्हा अनोपची किती धावपळ झाली होती होय!हेच तर खरे कारण होते अस्वस्थ होण्याचे गेले तीन दिवस राहुल सोनल समोर होते मिलींद च्या आठवणी दाटून आल्या होत्या त्याला सांगितले होते नको जाऊस दूर नागपूरला जाऊ नकोस काहीही न ऐकता कामासाठी म्हणून गेला तो कायमचाच.......आठवडाभरापूर्वी अनुप ऑफीसच्या कामानिमित्त गोव्याला गेला होता फोनवरून संपर्क आहे तरीही मनात प्रचंड भीती बसलेली असल्याने तणावातच होते मी अनुपही आज येतो ऊद्या येतो करीत नेमका मी जायच्या दिवशी सकाळी गोव्यातून निघाला तेवढे एक बरे झाले निदिन साडेपाचच्या ट्रेन ने माझ्या निघण्यापूर्वी कोलहापूर पर्यंत आलेला असेल तेव्हढेच मनाला समाधान होते ट्रेन हलली तेव्हा हा खरेच कोल्हापूर पर्यंत आला ....मी जरा निश्चित झाले ट्रेन च्या रिझर्व सीटवर पडल्या पडल्या मी अनुप लवकर घरी पोहचावा याच विचारात असल्याने प्रवासाचा रोमांच अनुभवता आलाच नाही मनातली धाकधूक, ती महिन्याभरापासुनची विचित्र स्वप्न....उडणारी उजवी पापणी...... आणी दूर दूर.......ट्रेनच्या वेगासरशी जाणार माझ घर ...माझी माणस...माझी शहर... याचांच विचार डोक्यात घुमतोय बाजुला राहुलचे बोबडे बोल मनाला उभारी देत होते ट्रेन नगर स्टेशन वर आली नी सोबत अनोपचा स्माईलीसह मॅसेज झोप आता मी घरी पोहोचलोय खुप दमलोय,पोहचल्यावर काॅल कर..हुंम ...एक दीर्घ सुटकेचा निःश्वास सोडला......घर सोडल्यापासून जाणवणारी अस्वस्थता संपून मी निश्चित पणे ट्रेनच्या सीटवर लहानग्या राहुलला कुशीत घेऊन झोपेच्या अधीन झाले.प्रवास माझ्या तब्येतीला झेपणारा नाही तरीही मी नागपूरला चालले आहे. निमित्त सोनलच्या भावाचे लग्न आहे.खरे तर मी लग्नाला जाण्यासाठी मुळीच उत्सुक नाही तसेही मी कोणत्याही कार्यक्रमात सहसा जात नाही.इकडे जाण्याचे कारण फार वेगळे आहे पहीले तर प्रवास!तोही ट्रेन चा प्रवास मला नेहमीच आवडतो फार लांब पल्ल्याचा प्रवास तर फारच आवडतो पंरतु तब्येतीच्या कारणास्तव अलिकडे शक्य नाही तरीही मी जात आहे त्यामागे कारण आहे राहुल. साडेतीन महिन्याचा गर्भ आईच्या म्हणजेच, सोनलच्या पोटात असताना ज्याला न पाहता कायमचा सोडुन गेला तोच मिंलीदचा मुलगा राहुल! त्याच्यासाठी मी नागपूरला जात आहे.तोच तर निमित्त होता.शारीरिक दुबळे पणाला मानसिक आधार देणारा तोच तर होता माझ्या प्रीय भावाची जिवंत एकुलती निशाणी राहुल !...................मध्यान्हच्या ऊन्हात गच्चीवर, घातलेल्या अनेक गाद्यापैकी एका गादीवर मी निवांत बैठक मांडलीय साधारण पंधरा सोळा तासाचा सलग प्रवास करून शरीर शीणले आहे मी कुठे आहे हे मलाही नीटस माहीती नाही अमरावती नागपुर मार्गावरील एका लहानशा खेडयात मी आलेय निमित्त आहे लग्न तेही नात्यातले वगैरे नाही तर माझ्या आयुष्यातील सुटलेल्या नात्याच्या धाग्याचा एक दूवा जिच्याकडे आहे अशी सोनल तीच्यासह लग्नाला मी आले आहे सोनल मला हट्टाने घेऊन आली आहे अगदी दोन महीन्या पूर्वीच तीने ट्रेन चे रिझर्वेशन करून ठेवले आहे असे बजावले तुम्हाला सोबत यावेच लागेल असा हट्ट धरला खर तर मी स्पष्ट पणे नकार देऊच शकत होते परंतु तिच्यासोबत येण्याचा माझा उद्देश व हेतु निराळा होता निमित्त होते राहुल मिंलीदचा मुलगा राहुल त्याच्या साठीच तर मी इथवर आले ना शारीरीक क्षमता व मानसिक तयारी,नसतानाही मी आले.........................सकाळचे सात वाजले असावेत. अजूनही मी अंथरूणात पडुन आहे. अजुबाजुला गादयावर लोळत पडलेल्या इतर अर्थात लग्नाचे वऱ्हाडातील बायकांचे,बोलणे,गप्पागोष्टी,हसणे खिदळणे विनोद सुरू आहेत.शक्यतो एकु येऊ नये म्हणून चेहेऱ्यावर घट्ट पांघरून घेतलेय तरीही आवाज कानावर आदळतोय.व्यत्ययामुळे काहीतरी लिहीण्याच्या प्रयत्नात अडथळा येतोय म्हणून गच्चीवर जाऊन बसावे पंरतु प्रचंड गारठा धुरकट वातावरण म्हणजे अजुनही सुर्याचा पत्ता नाही.उन्ह जराही जाणवत नव्हते बाहेर आलेले घरात पांघरूनात पडून राहण्याशिवाय पर्याय नाही. बापरे!कुठे आहे मी?हजारो मैल दुर माझ्या माणसांपासून घरापासून पुण्यापासून नागपूर अमरावती मार्गावरील शिवनगाव नामक एका छोट्याशा खेड्यात. पक्क्या व सुबक घरातल्या हॉलमधे घातलेल्या अनेक गाद्यापैकी एका गादीवर मी लोळत पडलीये,कालच या घरचं लग्न पार पडले गेले काही दिवस लग्नाच्या तयारीत व्यस्त असलेले कुटुंब आज जरा कुठे आरामात निर्धास्त झाले असावे.म्हणूनच कालपर्यंतची गडबड लगबग आज मंदावली.पाणी अजुनही आलेले नाही असे बोल,कानी पडले,कदाचित् म्हणूनच,जो,तो आहे तीथे शांतपणे पडुडलाय कींवा बसला आहे.शेवटी पाण्याशिवाय माणसाला पर्याय आहे का?आठ वाजले एव्हड्या उशिरापर्यंत मी आघोळ करू शकत नाही.नाहीतर.. पुण्यात या वेळेस,सकाळची सर्व कामे आवरून जाॅगरस पार्क मध्ये अभ्यास करीत असते एव्हाना इथे.....? रात्र भर छान पैकी झोप घेऊन नेहमीच्या म्हणजे पुण्यातल्या सवयीनुसार पाच वाजताच जाग आली मग कसली झोप येणार? करण्यासाठी काहीही नाही पाहुण्यांच्या तेही सोनल च्या दूरच्या नातेवाईकांच्या घरात आहे मी.त्यात घरातील माणसांपैकी ही,कोणिही अजुन ऊठलेले नाही. मी तर इथे पाहुणी आहे उठुन काही करावे हे औपचारिकता सोडून वागणे ठरेल. त्यामुळेच पडून राहण्याशिवाय पर्याय नाही.मोबाईल वर काहीतरी टाईप करावे म्हणून लीहायला घेतले. खर तर आताच पुण्याची जाम ओढ लागलीय माझे घर ,शहर माणसांकडे ,ऊठाव ...सरळ भुर्रकन ऊडुन क्षणात आपल्या घरी जावं..म्हणत मनाने मी पुणे गाठले .......कीती हा !ऊतावळेपणा,स्वतःशीच हसले मी मनात.ऊद्या तर मी निघेन की, इकडून आज शुक्रवार मागच्याच आठवड्यात रविवारी पुणे नागपुर ट्रेनने आम्ही म्हणजे मी,सोनल राहुल आणि तीची लहान मुलगी ,आईवडील आणि तिच्या आत्याचा मुलगा असे पाच सात जण आलो इकडे.येणे तसे मला परवडण्यासारखे न्हवते,तरीही मी आले सोनलने तिकीट काढले असले तरीही इतर खर्च बराच झाला माझा जो माझ्या अटोक्यात नव्हता.ठीक आहे आता त्याविषयी विचार करून काय होणार..शांत राहण्याशिवाय पर्याय नाही.पुण्यात गेल्यावर सारा खर्च भरून काढावा लागेल...............परतीचा प्रवास होय!माझा पुण्याकडे परतण्याचा प्रवास !पुण्याला,मी माझ्या घरी जातेय हीच परमोच्च गोष्ट आहे सकाळचा,कोवळेपण,अंगावर रोमांच आणणारा गार वारा, हिरवीगार शेतं खिडकीतुन वर, मोकळ नीळ आभाळ आमच्याच, सोबत दूरवर धावणारे... नीळसर पांढरट...ढग...लहान लहान होत जाणारी....मोठाली...घर...झाडं...... ओहोळ,शेतातील,शेततळी, पिकांच्या रांगा संत्री,बोर,पेरू,चिकन च्या बागा हरबारा,तुरीचे पक्व होणारे,डहाळे,दुरून दिसणाऱ्या पाण्याच्या उंच टाक्या..कारखान्याचे, धुराडे,कडुलिंबासह, विविध प्रकारची ओळीने,ऊभी झाडे,घरे, दुरवर आमच्या ट्रेनच्या मागे धाऊन दमुन,दिसेनाशी होणारी आभाळ मात्र थकत नाही ट्रेनच्या खिडकीतुन नजर जाईल तिथवर आभाळच,आभाळ,नीळशार,लखख,मोकळ, मुक्त मोकाट,अफाट भव्य आभाळ!आभाळभर पसरलेल सकाळचं कोवळ ऊन त्याच्या कुशित अगदी हळुवार पणे पहुडलेल्या,वेली, हिरवीगार शेत,वाऱ्यावर डोलत जणु,एकमेकांशी संवाद साधत आहेत.सृष्टीने असा नितांत सुंदर जीवनाच्या,चैतन्याचा सारीपाट मांडलाय.तेजोमयी,सूर्य नैसर्गिक, नियमानुसार जीवनाला दररोज प्रमाणे जागृत करतोय.सृजणाला जाग आलीयं.हिरवागार हरबारा, तुर,कपाशीच्या पीकाला उन्हाचा तजेला अधिकच खुलवत आहे. डोळ्याना,सुखावुन थंडगार,विसावा देतो.काचीगोडा_पुर्णा एक्स्प्रेस नामक ट्रेन मधुन माझा प्रवास सुरू आहे एनवेळी, म्हणजे पुण्यावरून येताना जसे आदल्या दिवशी तत्काल मध्ये रिझर्वेशन मिळाले तसे इथुन म्हणजे अमरावतीतून न मिळाल्यामुळे पुण्याला जाण्याच्या,प्रवासाची, दिशा व वेळ बदलली, आम्ही अमरावतीहुन,पुर्णा या ठीकाणी जाणार आहोत तिथुन पुण्यासाठीचे रिझर्वेशन आहे वेटींग वरचे.तरीही जावे तर लागणारच आहे.मागच्या रविवारी मी सोडले,जराशा नाखुशीतच..... राहुलच्या बर्थडे दिवशी ऑक्टोबर, महिन्यातच सोनलने, ताई तुम्हाला, मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी, गावाला यायचेय बर का!मी रिझर्वेशन केले आहे,तुम्हाला माझ्यासोबत गावाला यायचेच आहे बस!असे बजावले होते.खरंतर माझे नेहमीप्रमाणे,नाही हेच उत्तर होते.त्यानंतरही तीने तीनचार वेळेस घरी येऊन आठवन करून दिली मग ठरवल संधी आलीच आहे प्रवासाच्या संधीचे सोने करूया.पुणे_ नागपुर ट्रेन ने,साधारणतः पंधरा तास,व पुढे खाजगी वहानाने तीन तासाचा,येणे जाणे मिळुन तीस पस्तीस तासाचा तोही ट्रेनचा प्रवास माझ्या सारख्या भटकंतीची आवड असणार्या व्यक्तीसाठी पर्वणीच होती. तिथल्या मुक्कामाचे चारपाच दिवसात,नवे ठीकाण, माणसे चालीरीती, रहाणीमान, विशेषतः लग्न विधी इ.च्या अनुभवाने,माझ्या ज्ञानात, माहीतीत भर पडणार होती.नवी जागा, माणसं, गाव खेड्याचे,जीवन,जवळुन पहाता येईल मुख्य महत्वाचे म्हणजे लिहीणयासाठी नवे काही सापडतय का?असा विचारही होताच! मी तयारीला लागले नव्या कपड्यांपासून बॅग चप्पल, अनेक वस्तुची खरेदी झाली नी जायचा दिवस उगवला,आधी नमुद केल्या प्रमाणे,ऐनवेळेस रिझर्वेशन रद्द झाल्याने,तत्काल मध्ये काढावे लागले त्यासाठी,आदल्या दिवशी पहाटेच पुणे स्टेशनला,जाऊन, टोकण,घेणे,मग अकारां वाजता,टोकन दाखवुन जर नंबर जवळपास असेल तर तिकीटे मिळेल,वगैरे सोपस्कार पार पाडण्यासाठी सोनलचे वडील, सोबत असलेला आतेभाऊ यांनी पार पाडले,आदल्या रात्री ताकिट कन्फर्म होईल की नाही या द्विधा मनस्थितीत निद्रीस्त आम्ही निद्रीस्त झालो.इ.इ येताना च्या आठवणी मनातल्या मनात जागवत माझा परतीचा प्रवास सुरू होता .......... .......................कडक उन्हाच्या ऊष्ण झळा, पाठीला चटके देत आहेत एका प्लॅटफॉर्म वरून दुसर्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठीचा मधल्या पॅसेज च्या एक त्यातली त्यात स्वच्छ कोपरा पाहुन आम्ही जेवण उरकले. वर्तमान पत्राचे अंथरून आणि बॅगेची, ऊशी, करून सारेजण चक्क तीथेच लंवडले,सकाळी सातची ट्रेन म्हणून पाच वाजताच ऊठलो होतो आम्ही. राहुल,व सोनलची, लहानगी सुद्धा!!ज्या घरी यजमानांच्या विनंती वरूनच मुक्कामी थांबलो होतो,त्या यजमान बाईंनी जबरदस्तीने मुलाच्या लग्नाची,कॅसेट पहायला लावली होय!जबरदस्तीने त्यांच्या, छप्पन इच एल इ डी वर ,जो, जिथे बिछाना टाकला त्या हाॅल मध्यल्या भींतीवर लावला होता,मोठ्या आवाजात सुरू केली.टीव्हीवरची,व दुसरी, त्या, यजमान बाईच्या स्क्रीन वर दिसणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची, कार्यक्रमाची, पैसा मानपान खर्च इ.ई.सविस्तर माहीती असा दृकश्राव्य कार्यक्रम रात्री दोन पर्यंत सुरू राहीला.हे सोनलने सांगितले,सकाळी नेहमीच्या पुण्यातल्या सवयीनुसार मी तर अकरालाच झोपी गेले अर्थात खुप प्रयत्नानंतर चेहेरयावर गच्च पांघरून घेऊन बराच वेळ कान डोळे झाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला मग कुठे झोप आली.त्या दोन प्लॅटफॉर्मला जोडणारया पॅसेज च्या एका कोपऱ्यात वर्तमान पत्राचे अंथरून आणि बॅगेची ऊशी करून,पहुडलेली मी, भर हिवाळ्यात, प्रवास, दगदग, भुक तहान वाॅशरूम ची अडवणुक सकाळची अर्धवट झोप,पहाटेच्या साडेपाच वाजता यजमानांच्या बाथरूम मध्यील नळाखाली टाकीच्या,थंडगार पाण्याने केलेली अंघोळ,ऑटो रिक्षाचा, घरापासुन,अर्थातच सोनलचे,मुळ गाव,निंभोरा,पासून अमरावती शहरातील स्टेशन पर्यंतचा प्रवास,तेथुन सात वाजताच्या नांदेड-कुचीगोडा एक्स्प्रेसने,एक वाजता पुर्णा येथे ऊतरलो.पुढची पुण्याची ट्रेन, म्हणजे नांदेड_ पणजी पुण्याहून जाणारी, चार वाजता असल्याने तीन तास शांतपणे वेळ घालविणे याशिवाय आमच्या हाती होते तरी काय?मी वर्तमान पत्रावर पडल्या पडल्या अंतर्मनातील सर्व मनचक्षुतुन पहात होते.सारा घटनाक्रम एकेक करून समोर तरळत होता.उन्हाचे चटके असह्य झाल्याने विचारांची तंद्री भंगली मला इथले इथेच सोडून पूणे गाठायचाय बस!चार वाचता ट्रेन आली की झाले,वेळेत ट्रेन आली नांदेड पुणे नाही तर नांदेड मुंबई गर्दीने खचाखच भरलेली, त्यात रिझर्वेशन वेटींग वरच आता काय करणार?कसेतरी सामान्य डब्यात जागा मिळेल तिथे बसलो आम्ही सारे जण मनमाड ला बरीच खाली झाली गाडी मग जरासे आखडलेले शरीर अगदीच ऐसपैस,नाही तरी थोडेफार मोळळे वाटले रात्रीचा प्रवास बाहेर चहुकडे फक्त काळोख, बाजुने जाणार्या ट्रेनचा अधुन मधुन कर्कश आवाज,झोपलेले, अर्धवट झोपेत असलेले,बसल्याबसल्या डुलकी घेणारे प्रवासी दचकुन बावचळून इकडे तिकडे पहात तेव्हा त्या परीस्थितीतही मला हसु आवरत नव्हते.सुपरफास्ट असल्याने ठराविक स्टेशनात गाडी थांबत होती त्या रात्रीच्या गारठलेल्या थंडीतही ,चहा वडापाव ,पाणी, व इतर त्या त्या गावाचे स्पेशल खाद्य पदार्थ विकणारे विक्रेते खिडकीबाहेरून किंवा आत येऊन घेण्यासाठी विनवणी करीत ,आलुबोंडा,समोसे,कढी वडा,दालवडा,भज्यांचे विविध प्रकार नागपुर स्टेशन पासुन पाहीले,वडापाव मात्र सगळीकडे दिसला, वडापाव च्या ऐवजी पाव वडा असे ऊलटे संबोधन ऐकले अर्थात ते तेथील स्थानिकांच्या दृष्टीने बरोबरच असणार ....एकेक स्टेशन घेत गाडी नगरला पोहोचली आणि मनातच आनंदाच्या ऊकळया फुटल्या शेवटी मी पुण्यात प्रवेश करतीये काहीच तासात घरात असेन किती बर वाटतय थंडगार वाऱ्याचा झोत शरीराला स्पर्शून गेलाय जणू मी जराशी खिडकीची काच वर केली छोट्याशा फटीतूनही गार वाऱ्याचा झोत भपकन अंगावर आला. लोनी काळभोर,हडपसर क्रोस केले नी काही मिनिटांत स्टेशनला लागेल असे वाटणारी गाडी चक्क मध्येच अडमुठया हट्टी पोरीसारखी गपकन थांबली, पाच दहा पंधरा,वीस मिनिटे झाली तरी जागवरून हलायचे नाव घेईना गाडी एक्स्प्रेसला वाट करून देण्यासाठी थांबली होती तर जवळपास पाऊन तासाने दुरूनच कर्कश्श आवाज आला काही क्षणातच कानावर धडधड धुडुक धड असा प्रचंड ध्वनी आदळला कितीतरी वेळ प्रवाशांनी दोन्ही कानावर हात ठेवले खिडकी ऊघडायची सोय नाही अगदी जवळुन पासिंग करीत ही महामाया निघुन गेली हे कळले,ते आमच्या ट्रेनने हलकयाशा हेलकावयाने पुढच्या काही मिनिटातच स्टेशनवर आलो तोच जातानाचा मानवी लोढा धक्काबुक्की, प्रचंड आवाज गोधळ गर्दीचे विचारूच नका कसेतरी स्टेशन च्या बाहेर आलो. सोनलची पौडगावची बस लागलेलीच होती सकाळचे सहा वाजलेले तेव्हड्यातही इकडे चल घरी म्हणले पंरतु अशा परीस्थितीत तीने तिच्या घरी जाणेच योग्य होते मी फोर्स न करता संभाळुन जा फोन कर....इतके बोलुन डेक्कन च्या बसमध्ये चढले अलका काॅरनर ला ऊतरून रीक्षा धरली थेट माझे घर गाठले..माझ्या पुण्यातले माझे घर...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action