Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

3  

Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

सावित्री ज्योती

सावित्री ज्योती

4 mins
239


एक जानेवारीला भीमा कोरेगाव, च्या विजयी स्तंभास भेट दिली. दुसर्या दिवशी पुण्यात भरलेल्या तीसरया विद्रोही साहीत्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा अविस्मरणीय योग म्हणजे ,आदल्या दिवशी मनात, साठवलेल्या शौर्य स्तंभाची प्रेरणा जिवंत जागविणारा म्हणले तर वावगे ठरणार नाही. क्रांतीचा,एल्गार जागविणारा, आक्रोश,विद्रोह,ऊर्मी,राग, विचार, साहीत्य, कला ,इ.जाणिवेची धगधगती मशाल,मनामनात चेतविणारे,भारलेले सभागृह, विचाराला कृतीची जोड देऊन,तळमळीने कार्य करणारा युवा वर्ग,सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक, विचारवंत, लेखक कवी,विविध चळवळीतुन समाजाभिमुख काम करणारी धडाडीची मानसं..... साहीत्य क्षेत्रातील मान्यवर,निरनिराळ्या प्रांतातून, क्षेत्रातून आलेल्या समाजबांधवांचा मेळावा काल परमपूज्य डाॅकटर,बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात भरला.मला त्या ठीकाणी जाण्याची संधी,मिळाली ती, केवळ''वेअर इज भीडेवाडा, या लघुपटाच्या टिमचे महत्व पुर्ण घटक असलेल्या माननिय अमोल घाटविसावे, बाबासाहेब कदम, यांच्या सहकार्यातून, निमित्त होते,माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या माध्यान्ह या स्वकथनाला "नाठाळाच्या माथी हानू काठी,हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्थातच पुरस्कार निवड समितीतील सर्वच सदस्यांचे महत्व माझ्या दृष्टीने महत्वाचे.हा दिवस माझ्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस ठरावा, असाच! त्याविषयी लिहीणं म्हणजे कुणाविषयी आभार प्रदर्शन नककीच नाही, जे वाटले,दिसले ,अनुभवले ते शब्दांच्या पलीकडले.. एकाद्या,चळवळी,विषयी विद्रोह व धडपडी विषयी लिहीणं सोपं आहे,मात्र प्रत्यक्षात चळवळ जिवंत ठेवणे,विचार, जगणं आणि जिद्दीने धडपडत समाजाला आपली दखल घ्यायला भाग पाडणे,हे वाटत तितकं सोप नक्कीच नाही. विद्रोहीच्या मंचावर विद्रोह जगणारी,युवा पीढी पाहुन खर्या अर्थाने हादरवून सोडणं,काय असतं हे ''वेअर इज भीडेवाडा? या लघुपटानं मला तरी दाखवून दिले आपला समाज आपण, कोणत्या परिस्थितीत जगतोय ?आपल्याला नक्की काय करायचेय?करावे लागेल?माझ्या जगण्याचा केंद्रबिंदू, समाजजागृती करणे हा असेल तर ,मला अजुनही खुप आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हे या मुलांनी मला दाखवून दिले या सगळ्यांची मेहनत,जिद्द, परीक्षण, परीश्रम, तळमळ, अभ्यास, ध्यास,स्वप्न धावपळ,सगळ नुसते भरभरून ओंथबुन आलेले! मुख्यतः हदयमानव अशोक या युवकाची प्रतिभा, आपल्या नावाला सार्थ असा,तिथल्या उपस्थित प्रत्येकाच्या हदयाला भीडली. मंचावरील अभ्यासू मान्यवर, मोठमोठी दिग्गज मंडळीच्या हस्ते पार पडलेला पुरस्कार, सोहळा,काळीज कोंदन ही काव्य मैफील,गाजविणारया,तरूण मुलमुलींनी दाखवून दिले की उत्कृष्ट अनुभवी,साहीत्याला वयाचे बंधन नाही, चंद्र सुर्य प्रियकर,प्रेयसी च्या डोळ्यात रमण्याच्या वयातली ही पोर अन्याय, समतेचा, क्रांतीचा विचारांचे स्वप्न डोळ्यात पहातात, मासिक पाळीसारखा संवेदनशील विचार मांडून स्त्री च्या वेदनांना मुक्त करताना दिसतात,तेव्हा मन भरून येते.भीडेवाडा या लघुपटातून दाखविलेले वास्तव मनाला चटका लावुन जाते. आपण या समाजाचा एक घटक आहोत आपल्याला या साठी काय करता येइल?कींवा आपण आजवर काहीच कसे केले नाही? अशी खंत, विचार,लघुपट, पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आल्यावाचून रहाणार नाही.खरोखरच वास्तवापासून इतके अनभिज्ञ कसे राहीलो की, आपण कधी विचारच केला नाही आजवर, नक्की कुठे चुकलं का?का,राहीले वंचित आजही देशातील मुलींचे पहीले ज्ञानपीठ !असे अनेक प्रश्न मनात येतात.आज बर्याच अंशी,स्त्री खर्या अर्थाने मुक्त जीवन जगत आहे अर्थातच काही अपवाद सोडले तर, प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांचे अलौकिक योगदान दिसते. चुलत,मुल आणि नवरा,सासर यामध्ये गुरफटलेली, त्याहीपलीकडे सामाजिक जाचक बंधनात राहुन कोमेजलेले, महिलांचे जीवन आज एकविसाव्या शतकातसुदधा, पहातो आपण मग अठराव्या शतकात काय अवस्था असेल याची कल्पना सुद्धा सहन शक्तीच्या पलिकडची.स्वताला धर्म व जातीचे ठेकेदार समजणाऱ्या सो कोल्ड पंडीतानी,स्त्री ची गणना सदैव शूद्राती शूद्र,दुय्यम स्थानावर केली तिला चुलत,मुल व भोगवस्तू बनवून ठेवले, अशा पांखडी परखड, जहाल समाजाचा सावित्री, ज्योती ने सडेतोड विरोध केला सामाजिक कौटुंबिक विरोध पत्करून सर्वच जाती धर्मातील स्त्रीयासांठी देशातील पहीली शाळा सुरू केली.ब्राम्हणांचा रोष पत्करून दगड माती,शेनाचा मारा सोसुन सावित्रीबाई,नी,मुलींचे शिक्षण सुरू ठेवले त्यांच्या ठाम निर्धार, पतीवरील विश्वास व एक विचाराने समतेची वाट दाखवली त्या काळातील जाचक,खोलवर, रूजलेल्या जातीभेदाचा असह्य विचार करून,अस्पृश्य समाजातील मुंलीसाठीही अनेक शाळा सुरू केल्या पुण्यातील बुधवार पेठेत, तात्यासाहेब भीडे या सद्गृहस्थाने आपला वाडा ज्योतिबांना त्यांच्या ज्ञानमंदीरासाठी खुला करून दिला. आणि एक जानेवारी 1848चीअद्भुत, असाधारण इतिहासाची,नोंद झाली. देशातील पहीली मुलींची शाळा! ती फक्त शाळा नव्हती, ती एक चपराक होती बंड होते,विचार होता.स्त्री, मुक्तीचा, पीडयानपीडयांच्या गुलामगीरीतून बाहेर पडण्याचा मार्ग, स्त्री शिक्षणाचा पाया होता. ज्या बळाआजवर कोट्यवधी लेकी सुना,समाजावर अधिराज्य, करीत आहेत स्त्री मुक्तींची मजबुत इमारत ऊभी आहे. पंरतु ज्या ठीकाणी स्त्री मुक्तीचे बीज रोवले ते ठीकाणच आजवर वंचित राहीले इतके, की भीडेवाडा काय,आहे?कुठे आहे?अजुनही कित्येक लोकांना माहीती नाही,खरंतर विविध क्षेत्रातील मोठमोठी पदे भोगत असलेल्या स्त्रीयांना सुद्धा,मोडकळीस आलेला,धुळीने धुसर झालेला, भीडेवाडा,जो परमपूज्य सावित्रीबाई ज्योतीच्या स्पर्शाने पावन झालाय,जिथुन,महिलांच्या,मानुस बनण्याचे मार्ग सुरू झाला अशा भीडेवाडयाबददल माहीती नसावे,कींवा मग माहीती असुनही काहीही घेणे नसते,दगडांच्या, मंदीरात आठवणीने जातात. ज्ञानमंदीराकडे पाठ करतात,अशा विचारांचा निषेध करायला हवा. बलात्कार, अत्याचार याविरुद्ध आवाज उठविणारया, महीलासांठी झगडणारया अनेक स्त्रिया समाजात आहेत त्यांनी कदाचीत वेळोवेळी आवाज, ऊठवले असतीलही पंरतु म्हणावे तसे यश, ठोस पावले उचलली नाहीत इथल्या व्यवस्थेने.आज या तरूण मुलांनी त्याही पुढे एक पाऊल एक पाऊल टाकले. आणि समाजमनावर,पगडा असलेल्या अत्यंत प्रभावशाली, माध्यमाद्वारे भीडेवाडयाची पावणेदोन शतकाची जुनीच, तीच गाथा,आक्रोश, नव्याने जिवंत केली.अतिशय तळमळीतुन ही सत्य कलाकृती साकारली त्या मागचे कष्ट, व अनंत अडचणी झेलुन लघुपट पुर्ण केला साऊ, तुला ग !सलामी ......हे गीत ऐकतांना अंगावर रोमांच,ऊभे राहुन डोळ्यातले अश्रू थांबेनात..........त्या क्षणी खर तर मला माझीच लाज वाटली की मी काय केले?आजवर हा प्रश्न,किमान उच्चशिक्षित,उच्च पदस्थ, स्वतंत्र विचाराने जगणार्या स्त्रीने,तरी स्वतःला विचारायला हवा. या युवावर्गाने केलेला प्रयत्न त्यांची तळमळ, धडपड पाहुन तरी आपण जागे व्हायलाच हवे सर्वच समाजातील स्त्रीयांवर सावित्रीबाई फुंलेचे अनंत ऊपकार आहेत याची जाणिव व्हायला हवी. एका विशिष्ट समाजातील चौकटीत अशा महामानवांना बांधुन ठेवायचे चळवळ, लढा,मोर्चा, चर्चा, यांच्याशी आमचा संबंध काय?असले निर्लज्ज विचार मनात बाळगून हात वर करायचे सोडा आता तरी जागे व्हा! महामानवांच्या बलिदानान, त्यागातुन मिळालेल,स्वातंत्र,सुविधा, फायदा मात्र,उपभोगत जगायचे हे हिन कृत्य मानते मी. "वेअर ईज भीडेवाडा?ने आत्मपरीक्षण माझे मलाच करायला प्रवृत्त केले.या संपुर्ण टिमला व त्यांच्या विद्रोही जगण्याला मानाचा मुजरा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract