Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

3  

Anjali Bhalshankar

Abstract Action Inspirational

क्रांतीज्योती

क्रांतीज्योती

3 mins
235


आज एका कार्यक्रमा निमित्त महात्मा ज्योतीराव फुले संस्कृतिक भवन येथे जाण्याचा योग आला.पुर्वी कधीतरी बहीणीकडे, हडपसरला जाताना या परिसरातून जाणे होई आज वाट वाकडी करून फातिमा,    नगरला वळले. वानवडी येथील,महानगरपालिकेच्या, उद्यानाला लागुन असलेले हे प्रशस्त सभागृह आहे मुख्य फाटकातुन आत गेल्यावर ऐसपैस असा बाहेरील बाजूचा परिसर न्याहाळताना इमारतींच्या प्रवेशद्वारा वर असलेला महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा लक्ष वेधतो.तसे महात्मा फुले असोत किंवा इतर सर्व महामानव ज्यांनी या देशासाठी समाजासाठी अहोरात्र कष्ट ऊपसले क्रांतीचे विचार रुजवून नव्या पुरोगामी समाजाचे निर्मितीला योगदान दिले त्या प्रत्येकाचे आपण जन्मभर ॠणी आहोत. पुतळ्याकडे पाहुन मी आदर भावाने मनस्वी वंदन करणे सहाजिकच.तळमजल्यावरील पॅसेजमध्ये प्रवेश करताना लक्ष वेधले समोरच्या भींतीवरील तैलचित्राने. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले विविध समाज कार्याची माहिती देणारे चित्र.संपूर्ण पॅसेज मध्ये नीरव शांतता व तितकीच स्वच्छता मनाला प्रसन्न करीत होती थांबून चित्राचे बारकाईने निरीक्षण केले.मनापासुन आदराने सावित्री ज्योतीच्या तैलचित्र रेखाटनावर प्रेमादराने हात फिरवताना ज्योती सावित्रीशी हितगुज साधल्याचा आभास मनात घेऊन मी बाजुच्या पायऱ्यांवरून पहील्या मजल्यावरील प्रचंड मुख्य सभागृहात प्रवेश केला उजवीकडील सुसज्ज भव्य व्यासपीठ वरील भागावर ठळक अक्षरात कोरलेल्या "ग्रंथ वाचताना मनी शोध करा देऊ नका थारा वैर भावा" संदेशाने लक्ष वेधले ,संदेशाचा अर्थ समजुन घेण्याचा प्रयत्न केला पाचशे लोक अगदी ऐसपैस बसतील अशा सुसज्ज खुर्च्यांच्या रागांनी भरलेले सभागृह साफ स्वच्छ हवेशीर, सभागृहाची बाल्कनी सुद्धा,छान ऐसपैस खुप दिवसानंतर मी इतक्या सुसज्ज ठिकाणी आले याचा आनंद होता. खरंतर महामानवांच्या स्मृती जतन केलेले प्रत्येक ठिकाण पवित्र असते.अतिशय आनंदाने मी कार्यक्रम सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पहात खुर्चीवर स्थानापन्न झाले दहा मिनिटांत कार्यक्रमाला सुरवात झाली ती व्यासपीठाच्या कोपऱ्यात मांडुन ठेवलेल्या सरस्वती नावाच्या, विद्येची देवी म्हणून रूजवलेल्या काल्पनिक स्त्रीच्या तसबीर पुजनाने,नाही! यात आश्चर्य वाटण्यासारखे किंवा नवे काहीही नाही.जे अगदी इ.पहीली पासून,मध्येच अर्धवट शिक्षण सोडून देईपर्यंत पाहात आले. पुढेही,नगण्य, दुर्मिळ अपवाद वगळता शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक ठिकाणी हेच दृष्य अगदी अन्यण साधारण महत्वाचे खरे तर सरस्वतीची तथाकथित तसबीरीचे पुजन केल्याशिवाय कार्यक्रमाची सुरुवातच होत नाही. लहानपणी हे सहज वाटे अगदी काही वर्षापुर्वी सुद्धा! परंतु आता मात्र चिड येते, स्वतःच्या अज्ञानाची,अंधश्रद्ध वृत्तीची. खूप उशीर झालाय खऱ्या गोष्टी समजायला हव्यात. अभ्यास कमी आहे आपला. समाजासह आपणही बहुतांशी अज्ञानात जगतोय याची खंत वाटतेय.व्यथित झालेले,मनाचा त्रागा वाढतो.हे ही, समजतेय,की समाज व्यवस्थेत शेकडो वर्ष वैचारीक दृष्ट्या सखोल रूजलेविल्या गोष्टीचे इतक्या सहजी थोडेच उत्थापन होणार आहे मला माहीती आहे हे सोप नाही तर खुपच अवघड आहे. अश्यकय मात्र नाही.हजारो वर्षांपासून चालत आलेल्या दांभिक पंरपरा व त्याला अनुसरून लोकांच्या जगण्यात उतरलेल्या सवयीनुसार जिथे तिथे शैक्षणिक क्षेत्रात शिरलेल्या या सरस्वती बांईचे मजबुत स्थान जोपर्यंत,लोकांच्या,समाजातील, शिक्षणातुन,शाळामधुन, विचारांतुन,व अज्ञानी,अडाणी,अशिक्षित,लोकांच्या मेंदुत रुजवणे पांखडी,रूढीवादी शातीर मेंदूचे लोक बंद करणार नाहीत तोवर हे सरस्वतीचे स्थान शाबुत राहील हे निश्चित.मी ज्या सभागृहात बसलेय ते एका अशा महान विभुतींच्या नावे आहे ज्यांनी आजन्म दैववाद,भोंदूगिरी खोट्या पंरपरांना छेद दिला समाजाला नव्या दिशेने मानसाला मानुस बनण्याच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.दांभिकता,अज्ञान, खोटे धर्मग्रंथ, वेद पुराणातील,चुकीचे अमानवीय नियम नाकारले. काल्पनिक देव देवतांना खोट्या कथां पुराण वेद यांची चिरफाड करून खरा धर्म व मानसाला माणूस म्हणून जगण्याची दिशा दिली. जोवर अस्पृष्य अज्ञानी समाज, शिक्षित होणार नाही,चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे,तोवर,गुलामगीरीचा ऊदधार नाही असे निक्षुन सांगितले. आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षित करून मुलींसाठी देशातली पहीली शाळा सुरू केली हे त्या काळातील परखड धरम व्यवस्थेच्या विरूद्ध बंड होते त्या माऊलीने षंढ,मनुवादी, रूढी वादी लोकांनी मारलेले शेन दगड मातीचे घाव सोसुनही आपले कार्य सुरू ठेवले जीवनभर आपल्या पतीला साथ दिली मुलींना स्त्रीयांना जगण्याच्या, शिक्षणाच्या,प्रवाहात आणले अशा थोर महान सावित्रीमाईंचे प्रेरणा स्थान राहीलेले,क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांच्या नावाच्या सभागृहातील व्यासपीठावर,देखील सरस्वती नावाच्या कपोल कल्पित,स्त्री चे पुजन होत आहे हे पाहुन, परिसरात आल्यावर जो आनंद झाला होता तो क्षणात कुठेतरी हरवुन गेला. काल्पनिक,चुकीच्या गोष्टीला वास्तव समजणे कधी सोडणार हा समाज? या समाजातील सुशिक्षित स्त्रियांना तरी ज्यांची खरीखुरी प्रेरणा त्यागमूर्ती सावित्रीबाई जाण नको का? किमान शिकलेल्या बायांनी तरी भान ठेवायला हवे. निक्षुन,पटवुन द्यायला हवे की आमची जन्म दिलेली माता व दुसरी ऊदधारक बनलेली  सावित्रीमातेचे पुजन प्रत्येक शैक्षणिक व्यासपीठावर व्हायलाच हवे .मनाला न पटणारी खटकणारी ही गोष्ट शैक्षणिक क्षेत्रात सतत पहावी लागते. शैक्षणिक क्षेत्राची दारे खुली केली.सावित्री ज्योतीने अपार मेहनत, त्याग, परखड वृत्ती, विचार, सत्यशोधन,मिथके सोडून सदैव तथ्याचा अंगीकार केला समस्त स्त्री जातीसाठी जीवनभर कार्य केले.फक्त नाव देऊन काय साध्य झाले मग कृतीतही विचार रूजायला हवेत.सभागृहे कितीक बनतील.केवळ स्मृती स्थळे घडवुन चालणार नाही महामानवांनी दिलले विचार सदैव स्मृतीत व कृतीत अमलात यायला हवेत.खिन्न मनाने मी अर्धवट कार्यक्रम सोडून निघुन आले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract