Anjali Bhalshankar

Classics

3  

Anjali Bhalshankar

Classics

अल्लड पाऊस

अल्लड पाऊस

3 mins
141


'ऊशिरा का होईना पाऊस जरा जरासा.....सुरू झाला आणि दरवर्षी प्रमाणे आभासी दुनियेतील अनेक साहीत्यिक व्यासपीठावरून पावसाविषयी लिहीण्याचे अवाहन करण्यात आले. हे बरयं! मला फारचं गंमतीदार वाटते जेव्हा मी या अवाहनांचा विचार करते जसे पहा पावसाळ्यात जिकडे तिकडे मान्सून सेल जसे लागलेले असतात तसेच हे पावसाळी साहीत्य सेल आहेत काय असा विचार मनात येतो ईथे शब्दांचा कस लागतो, म.कधी कल्पनेच्या पंखांनी अलगद भरारी घ्यावी तर कधी वास्तवाची विविधरंगी विवेचने करावी फ्लॅशबॅक मधील आठवणी अनुभव व भोवतालचे वातावरण कागदावर उतरते.कधी पावसात भिजण्यासाठी अगदी ठरवुन केलेल्या निसर्ग रम्य प्रवासाचे वर्णन तर कधी लख्ख तयार होऊन बाहेर पडताक्षणी अचानक आलेल्या पावसामुळे आपल्या दिनचर्येचा झालेला विस्कोट संततधार,चिखल,ओलावा, साठलेले पाणी,कोंदट हवा ,गारव्याने व भरून आलेला ताप सर्दी व रखडलेली कामे.......असेच काहीसे पावसाशी शहाणे? झाल्यावरचे नाते.बालपणीचा पावसाच्या आठवणी. पावसाळ्यातील शाळेचे दिवस. घराबाहेर पडताना लख्ख असलेल्या आभाळात अनपेक्षित दाटून आलेले ढग.पावसाळ्यातील एक दिवस..रात्र वगैर.......अचानक आलेल्या पावसाने फसलेले नियोजन किंवा मग भरून आलेल्या काळेकुट्ट आभाळात साठलेले पाणी मग जेव्हा रिमझिम सरींच्या रूपात जमीनीवर बरसते तेव्हा अगदी ऐनवेळेस मस्त पावसात बाहेर फिरायला जाण्याचा बेत,नाहीतर कीमान घरातच मस्त गरमागरम पक्वान्नाचा अस्वाद घेतआरामात लोळणारे जीव अशा अनेक गोष्टींवर मनसोक्त लेखन करता येते. पण पावसावर लिहीण्याची खरी मजा पावसात भिजल्या शिवाय कशी येणार ?बाहेर पावसाचा एकेक थेंब तसेच वहिवर अक्षरांनी ऊमटत रहावे अखंड......बाहेरचा पाऊस डोळ्यांच्या वाटेने मनात प्रवेश करतो मग हळुवार अलवार कागदावर ओघळत रहातो शब्दांचा गोड पाऊस बरसताना नकळतच त्याचा खारट अश्रूंशी मिलाफ केव्हा झाला ते समजतच नाही .......आपण लिहीतो लिहीतचं रहातो.......पाऊस थांबतो.लिहीणे थांबत नाही. दिर्घ जीवणपटाच्या सोसलेल्या अनुभवलेल्या कित्येक पावसाळ्यांचा वादळी दाहक आठवणींच्या पावसाने आपण चिंब भिजलेले असतो............

  सध्या पाऊस बालपणात आहे अगदीच अल्लड चकवा देणारा लहरी भरगच्च ढग भरून येतात वाटतं आता धो धो कोसळेल पण हा रिमझिम बरसतो शांतपणे काहीच क्षण मग थांबतो पुन्हा पुन्हा तेच.....बाहेर पडावे की नाही?पुन्हा पुन्हा आकाशात पाहुन ठरविणारे अनेक चाकरमानी जीव कारण गाडीतून,अलिशान घरातुन निघुन पाॅश सर्व सुविधायुक्त ओफीसात बसुन काम करणे व गाडी रेनकोट छत्री तत्सम साधने सार्यांच्याच वाट्याला येत नसतात मात्र पोट व पोटाची भुक सौरभौम असते. तसेच भिजण्याची तर्‍हा कोणी हजारो रूपये खर्च करून मुद्दाम हुन पावसात भिजायला जातील तर कोणाला पैसा कमावण्यासाठी भिजणयाशिवाय पर्याय नसतो कसा हा पाऊस?नाही!असा कसा हा विरोधाभास?........................


शाळेत असताना कधीही रेनकोट छत्री मिळाली नाही पंरतु एका हाताने छातीशी धरलेले दप्तर दुसर्या हाताने स्लीपर सावरत डांबरी रस्ता सोडून एस पी च्या मोकळ्या मैदानातील गुडघाभर चिखलातून निसरड्या वाटेने मोकाट बेफीकीर चालणे व मग तेच चिखलात माखलेले पाय धुवायला मुद्दामहून साठलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या पावसाळ्यात हे ऊदयोग अनेकांनी केले असतील तो काळ आठवला की आजही पावसात चालताना छत्री बंद होते तेव्हा छत्री घेऊन देण्याची आईवडिलांची ऐपत न्हवती पण अशा ऊनाड भाबडया बालपणावर लाखो छत्र्या, रेनकोट कुर्बान.......असे आता वाटते. जीवनात व्यवहार शिरला की मनुष्य कित्येक छत्र्या विकत घेऊ शकेल पण....ती चिखलातली वाट......तो भरगच्च पाऊस.....साठलेली डबकी....... वर्गातच बांईची नजर चुकवुन एकुलत्या वहितली पाने सर्रास पणे फाडून बनविलेल्या छोट्या छोट्या होड्या, जागोजागी साठलेल्या डबकयात सोडून लावलेल्या पैजा............नखशिखांत भिजलेले शरीर आणि गणवेशावर जागोजागी चिखलांच्या गोळयांचे व्रण लालभडक डाग. हे सारे वैभव आहे पावसाने लहानपणी गरिबीच्या पदरात टाकलेले अलौकिक मौलिक दान कोणत्याही दौलतीने तोलता न येणारे.पंरतु ही निसर्गाचे देणे लुटत घरी पोहोचल्यावर "दाग अच्छे है"वगैरे असलं काही नाही तर पाठीत चार दोन फटके आणि वर अगोदर शाळेचा ड्रेस धुवुन टाक मगच खायला मिळेल अशी तंबी देणारी आई आणि सुकला नसल्याने रंगीत कपडे घालून शाळेत गेल्यामुळे दुसर्या दिवशी बाई अशी दुहेरी धुलाई व्हायचीच ते सगळेच भारी ते परतुन येणार नाही .फिरून ते दिवसही येणे नाही पण.........मग काय! लहान लहान मुलासंहीत पावसात जाऊन भिजायचे! मुद्दामहून! परंतु....... तो पाऊस निराळाच...तो लहानपणीचा पाऊस आपल्याच सोबत वाढला व्यवहारी भावनाशून्य विरक्त कणखर कठोर विवेकहीन अहंकारी बेगडी कृत्रीम विचारी अंहंपणाच्या कोषात गुरफटला का?त्या निरागस आठवणी बनून ऊरलाय फकत.बालपण पुन्हा येणे नाही तो पाऊसही पुन्हा येणे नाही कारण, पाऊस तसाच आभाळातुन बरसत असला तरी ते आभाळ एकसंध राहीले नाही वयानुसार आपापले आभाळ निवडले. पीढयान पिढ्या...... तो तसाच बरसतोय, मुक्त.... बेफाम...सौम्य तर कधी रुद्रावतार कधी शांत तर कधी स्वैर आंहाकार घणघोर रौद्र .........पंरतु प्रत्येक पीढीचा निराळा पाऊस जसे आजचा पाऊस कालची आठवण........तसा ऊदयाचा पाऊस आजची आठवण..........देत राहील आकाशातून पाऊस बरसत राहील कायमचा....आणि मनुष्य सापेक्ष,आठवणींचा ठेवा ही स्मरत राहील ही श्रृखला अखंड राहील .......आणि पाऊस तर चिरंजीवी होय ना! ........अंजली भालशंकर ."पाऊस वेचताना"काव्यसंग्रह, "मध्यान्ह", मुठेच्या काठावरून....."कोणे एके काळी करोनाच्या सानिध्यात"


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics