Anjali Bhalshankar

Action Fantasy Inspirational

3  

Anjali Bhalshankar

Action Fantasy Inspirational

नवे वर्ष नवे पर्व

नवे वर्ष नवे पर्व

3 mins
175


पुन्हा एका नव्या वर्षाची,अर्थातच नव्या पर्वाची सुरवात, म्हणूया,क्षण, तास, दिवस,आठवडे,महीने,वर्ष ही तर वरवरची, मानवाने आपल्या सोइसाठी ठरविलेली गणिती कालमापनं, त्या पलीकडे पहाण्याचा दृष्टीकोन मानसाने ठेवायला हवा. युगानुयुगे सरली असतील, या पृथ्वीतलावर कित्येक जीव आले,व काळाच्या ओघात गुडुप झाले.जात धर्म, लहान,मोठा,गरीब श्रीमंत,उच्च, नीच,राजा ,रंक, शासक,प्रजा,काळा गोरा,खालचा ,वरचा, कुलीन,साधारण, असे कोणिही यातुन विमुक्त नाही.सृष्टीच्या असाधारण,आश्चर्याने थक्क करणारा अलिखित,नियमआहे. ज्याला कोणिही आजवर बदलु शकले नाही. मी,मी करणारे,अभेद्य सम्राट ,पृथ्वीच्या पलीकडे जग जिंकण्याची वल्गना करणारा,असो वा सर्वसामान्य सार्यानाच कालचक्रात च्या गतीनुसारच, मार्ग क्रमण करावे लागते. कोरा मेंदू घेऊन मनुष्य जन्म घेतो.सामाजिकततेनुसार त्याचे जीवन घडते धर्म,रूढी ,पंरपरा,भोवतालीची परीस्थिती, जीवनपद्धती हळु हळु त्याच्या पालन पोशना नुसार अनेक गोष्टी मानवाच्या मेंदूवर परीणाम करीत जातातं .वय वाढत रहाते सामाजिक वातावरणात माणुस स्वतःला गुंतवून पुढे मार्गक्रमण करीत रहातो,मनुष्य कुटुंब,समाज यामध्ये ,रमतो अगदी एकरूप, विलिन झाला तरीही, प्रत्येक जीवाचे आपले स्वतंत्र वेगळे मुकत अस्तित्व असते,जे त्याच्या मृत्युनंतरच संपुष्टात येते.मानुस जगताना अनेक नियमांशी बांधलेला असतो.आईच्या गर्भावस्थेतून सुरू झालेला मानवरूपी विनाशी देहाचा प्रवास एका,दिर्घ स्थित्यंतरातून, वेगवेगळ्या मानसिक शारीरीक सामाजिक बदलातुन पुढे पुढे सरकत असतो.अर्थात सृष्टीच्या शाश्वताचि गती सोबत घेऊन जात असते मानवाला. आपण मात्र बेगडी कृत्रीम जगात स्वतःला अडकवुन मिनीटामिनिटाच्या, हिशोबात स्वताला बांधुन धावत असतो.परंतु खरचं आपण धावतो का ?की काळ आपल्याला ओढुन नेतोय हा विचार सुद्धा व्हायला हवा. नाही ऊठलो एकदिवस लवकर आपण, तरीही सुर्य ऊगवणार आहे, पक्षी गाणार आहेत,जग ऊठणार आहे,सकाळ होणारच आहे.अर्थातच या जगात आपल्या वाचुन कोणाचेही काहीही अडणार नसते.शेवटी प्रत्येकाचे अस्तित्व वेगळे, जो तो आल्या वाटेने जाणार एकटाच!मग का ?जगावं माणसानं अहंकारात फुटकळ,जांतीच्या स्वाभिमानात, निसर्गात माणव पक्षी,प्राणी,वनस्पती,च्या निरनिराळ्या,प्रजाती निर्माण झाल्या मग कसला जात धर्म,पंथ ऊच नीच, हे काय आहे ?सांर्याची राख तर होणारच आहे पक्षी प्राणी वनस्पती तारे सुदधा मृत होतात.मग माणसाला कसला अटटाहास!जमविणयाची, मिळविण्याची,धडपड,अधिकार, हुकुमतीची इर्षा, अमुक जातीचा ठेंभा,मिरवत, शेवटी कूठवर घेऊन जाईल आपल्याला हे सारं, हाही विचार व्हायला हवा निसर्ग नियमानुसार जन्म मिळत असतो आपण ठरवुन इथे नाहीच, आलेलो, तसे झाले असते तर मातीत देह विसावला नसता शेवटी. काही गोष्टी आपल्या हाती आहेत, काही अवाक्या पलीकडच्या. नाही!थांबवू शकत आपण सोडून जाणार्या आपल्या प्रिय माणसांना, परंतु सोबत असताना वेळ तर नककी देऊ शकतो.सुख प्रेम जिव्हाळा मायेचा ओलावा द्यायला वेगळ, अस काय कराव लागत !प्रेम हेच जगाचं मानसांच नात्यांचे,प्रतीक आहे प्रेमाने सारेच नाही ,तरी बरेचशा गोष्टी साध्य होतात. दोन शब्द, हळुवार स्पर्श,विश्वास,ह्या खुप साधारण गोष्टी मात्र मोठेच काम करून जातात. येतात खुप कठीन,प्रसंग येतात. द्विधा मनस्थितीत,नेणारे,कधी कठोर तर कधी हळवे मन दूखावणारे,माणसं दुरावणारे क्षणांचा सामना करावा लागतो. सारयातुन अलवार पणे,संयमाने सावरायला हवे .कधी भावना तर कधी कर्तव्याला झुकते माप देत जावे लागेल. हार मानुन थांबुन, चालणार नाही कारण पुन्हा तेच, काळ कोणासाठीही थांबत नाही आपल्यावाचून कोणाचेही अडत नाही.शेवटी वरवरणं तरी गणितीय नियमानुसारच आपल्याला धावावे लागेल शेवटचे सत्य पुढ्यात येईस्तोवर तर आपण आपल्या हाती आहोत आपली माणसं आपली नाती, समाज आपल्या सोबत आहे. तीच तर जगणयाची ताकद आहे. मनाची ऊभारी,सुख,दुःख,कटू गोड अनुभवाने भरलेला जीवनप्रवास शेवटी भौतिक निर्देशित आहे या भोवतालच्या जीवनात हरवुन जावे कधी कधी मग साजिरे होतात क्षणं आनंद देणारे दुःख ,झाले, गेले हळवे प्रसंग विसरायला मोलाचे योगदान देतात.मनातल्या कप्प्यात सुखांची बेरीज वाढवुन वेदनामयी आठवणीची वजावट करतात.बाकी पुढे तर सरकावेच लागेल हो!ना!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action