तिनं न वाचलेलं प्रेमपत्र ...
तिनं न वाचलेलं प्रेमपत्र ...
प्रेमाची भाषा पशु पक्षांनाहि समजते मग तुला तर न समजण्याचा प्रश्नच उदभवत नाही. रात्री जागून किती जीव ओतून तुझ्यासाठी .. तुझ्याविषयी लिहलेलं होतं ग... तू खरंच वाचावयास हवं होतं ... होकार , नकार काहीही असो. तुझा खेळकर वृत्तीनं महान छातीवर दगड ठेवून म्हण पण ते वास्तव मी स्वीकारलं असत हसत- हसत स्वीकारलं असत असं मी म्हणणार नाही कारण मी अगोदर स्वतः शी प्रामाणिक आहे भावनांची कदर करणे मला माहितेय. तुझ्यासारखं मला नाहीच वागत आलं कधी ... ओठात एक पोटात वेगळं कास जमत की तुला हे सगळं .. कि फक्त तसं दाखवतेस ...माझं प्रेम भावना काय आहे हे तर समजून घायची होतीस. भलेही तुझा नकार असेल.. कदाचित होकारही... पण फक्त ''राहू दे ...'' एवढंच म्हणणं जरा अतीच होतं ग .. काय माझं प्रेमपत्र न वाचताच तुझी हि प्रतिक्रिया म्हणजे ... समोरच्याची बाजू ऐकून न घेता त्याला गुन्हेगार ठरवून शिक्षा केल्यासारखी नाही का ग वाटत ? तू अशी का वागलीस हे माझ्या आकलनापलिकडच होतं सारं ..मी सरांना सांगेन हा असंही म्हणालीस ..मग मी तुझा पिच्छा कारण सोडून दिल. त्यादिवसापासुन तुला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तुझ्याशी अबोला धरला .राहू दे राहू दे संपलं सारं. संजान माझा योग्य होतं कि नाही तूच सांग ? पण नाही तू तुझाच खार करून दाखवणार ना ? तुझी त्यानंतरची वागणूकही खटकणारीच ...
परीक्षेचे ते दिवस होते तू झिडकारलं मला असं समजून मी केव्ह कोलमडून गेलो होतो माहितेय ... मला काय करावं तेच सुचत नव्हतं ... परीक्षेची घंटा झाली मी यांत्रिकपणाने हॉलमध्ये तर गेलो तर तुझाही सीटनंबर त्याच हॉलमध्ये आला योगायोगाने ...आठवत तुला मी फक्त विषन्न मनाने किती तरी वेळ तसाच बसून होतो तो इतिहासाचा पेपर काहीही लिहावंसं वाटत नव्हतं .. हातापायात तर त्राणच उरलं नव्हतं . मी ढीम्म न लिहता बसलेला पाहून... सायंटिस्ट कसला शोध लावताय ... कागद काळा करणार आहात कि नाही ? म्हटलं सगळे मुले जोरात हसली फक्त तू सोडून ... तू दुःखी जाणवत होतीस तुझ्या चेहऱ्यावरील हास्य गायब झालं होतं .. तू असं वागयवयास नको होतं असं वाटलं असावा नाही तर ... नंतरही या विषयावर बोलता आलं असत आपण ते प्रेमपत्र जवळ घेऊन ठेवावयास हवं हतो असा विचार करत असेल बहुदा ... मी भानावर येतं तुझ्याकडे नजर गेली तर तू हि माझ्यासारखीच भांबावलेली .. दुःखी मला जाणवली ... तोपर्यंत अर्धा अधिक तसं वेळ निघून गेला असेल मग मी प्रेमाचं इतिहास बाजूला ठेवून परीक्षेचा इतिहासाचा पेपर लिहायला घेतला खरा पण.. कसा बसा एक दीड तसं लिहला पण मन था-यावर नसल्यावर कसलं काय ओर्फेक्त होतं... जे व्हायचं तेच झालं... तो पेपर अर्धवट सोडून सरांकडे देत मी हौलबाहेर पडताना सारं बोललेच माझ्या जखमेवर मीठ चोळण्या
साठी काय झाला पेपर लिहून सारा इतिहास मूळ पुन्हा हसली पण ती फक्त पाहत राहिली मी बाहेर पडेपर्यंत ... पेपर सुटल्यानंतर मी स्टॅण्डवर बसची वाट पाहत बसलो . मनाची घालमेल , जीव द्यावासा वाटत होता . तेवढयात गावातील मित्रांनी गावाकडे जाण्यासाठी तीन सीटची रिक्षा आणून उभी केली त्यात चक्क ती होती. माझी तळपायाची आग मस्तकाला गेली ती अपराध्यागत मला जाणवली. तीच प्रेम नव्हतं माझ्यावर तर मग तिरस्कार का नव्हता तिच्या चेहऱ्यावर. मी काम आहे म्हणून त्यांना टाळलं ..
दुसऱ्यादिवशी तर त्याहूनही कठीण प्रसंग... माझी परीक्षा घेणाराच ठरला. मी ठरवून टाकलं होतं आता नाही तिची सोबत नको, आठवणीही नको. आपण भलं आपलं काम भलं... पण कसलं काय.. मी यावरून निघणार तेवढ्यात तिची आजी आली आणि आईला म्हणाली .. आज तिला तिचा मामा सोबत नाही तेव्हा त्याला म्हणावं ती तुझ्यासोबत घेऊन जा आणि घेऊन ये सांभाळून तिला... मी हे शब्द ऐकले आणि तसाच लगबगीन पॅड न घेताच निघालो म्हटलं मित्रांना सांगून नंतर घेऊन ये म्हणू असं ठरवून गावातून तिच्या घरासमोरून न जाता आडवाटेने शेतातून निघालो... एकटाच. नकोच ती झंझट असं समजून. तर ती मागून झपाझप पावलं टाकत मागून हाक मारू लागली. मी न ऐकल्यासारखं करीत तसाच चालत राहिलो. पण अक्षरशः पळत येऊन तिनं जवळ येत म्हटलं काल जे घडलं ते खरंच सॉरी.. मलाही तिचा प्रचंड राग आला होता मी रागाच्या भरात काय काय बोललो ते सगळं आठवत नाही पण... तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला असेल असं मला वाटतं नाही. कारण ती माझ्यासोबत एक शबधि न बोलता चालत राहिली स्टॉप येईपर्यंत... मी इतका काठो याअगोदर कधीही झालो नसेल पण त्यावेळी झालो. होतो हे मात्र खात्रीने सांगता येईल. झालं वाटलं एवढं सगळं आपण तिला झिडकारलं म्हणजे ब्याद टळेल. पण ती म्हणजे ना जगातलं आठवं आश्चर्य गिनीजबुकातून... त्यानंतर मी मात्र तिला टाळत गेलो तिच्याशी अबोला धरला तो कायमचाच... तिने अनेकवेळा माझ्याशी बोलण्याचा प्रयन्त केला पण मी ठरवलं होतं नाही म्हणे नाहीच ठेवायचं तिच्याशी संबध कसल्याच प्रकारचा... अन ती गेली एक दिवस... नंतर काही दिवसांनी मित्राकडून कळलं तीच लग्न अचानक ठरलं आणि एकदिवसात ती सौभागयकांक्षणीही झाली. अशी हि अधुरी प्रेम कहाणी ... पण तिने न वाचलेलं प्रेमपत्रंही तिच्या प्रेमासारखं... अनाकलनीय, संभ्रमित .. कुजल असेल एखाद्या कोनाड्यात पडलेल्या कुजक्या संदुकात .. पण तिच्याविषयीच्या त्या नाजूक भावना. तीच पाहिलं वाहील प्रेम मी नाही विसरू शकलो कधी... तिच्या स्नेहासिकत सानिध्यात घालवलेल्या क्षणाना... तिच्या प्रेमळ. लोभस... स्पर्शाना... तिच्या जीवघेण्या आठवणींना तिने न वाचलेल्या प्रेमपत्रालाही अन तिलाही...