Anjali Bhalshankar

Others

2  

Anjali Bhalshankar

Others

प्रसवधर्मीनी !

प्रसवधर्मीनी !

4 mins
47


आठ मार्च!चाकोरीबद्ध आयुष्य जगणार्या, बिनदिक्कत बिनधास्त वागणारया,कुटुंब परीवार सासर माहेरच्या चौकटीतली स्वतःची फ्रेम सदैव टवटवीत ठेवून जीवन,जगण्याची,कला साधत नाती सांधत आयुष्याचे एकेक पाऊल टाकणाऱ्या,पावलोपावली संघर्ष करणार्या, तर कुठे बिनधास्त राजेशाही थाटात वाटचाल करणार्या सतत काहीतरी मिळविण्याचा ध्यास घेतलेल्या,इतरांच्या सुखासाठी सदैव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सतत त्याग करणार्या,जन्म घेण्या अगोदरच,बरेचदा गर्भावस्थेत असल्या पासुन क्षणाक्षणाला बदलत जाणारी जीवनाची गणित कींवा जन्म द्यायचा की नको?या विवंचनेत असलेल्या एका स्त्रीलाच तिच्या ऊदरात नको असलेल्या दुसर्या स्त्रीचा गर्भ.भयाण आहे ना!परंतु सत्य आहे.आणखी आणखीनच भयाण जीवन जगणार्या प्रत्येक स्त्रीला जागतिक महीला दिनाच्या शुभेच्छा.

या दुनियेने स्त्रीला एकीकडे प्रसंवधर्मीनी,जननी, सर्वशक्तिमान, निर्मिती,आणि अशा बर्याच अलवार अलंकारानी गौरविले दुसरीकडे कधी नजरेने,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे,वैचारीक,शारीरीक तर कधी मानसिकतेच्या सर्व कसोट्यांवर तिच्या अब्रूचे वाभाडे काढायला जरासुद्धा कसुर केली नाही ती स्त्री आहे तिचे सारेच अटोपशीर अदबशीर मर्यादेत असायला हवे, आणि तसेच दिसायला हवे, अशा पुरुषी अहंकारांने स्त्रीची मर्यादा नजरांनी,विचारांनी,वासनेने, कृती, करणी, कथनी,च्या बेड्यांनी घटट बांधली आहे त्या तोडणारी स्त्री पुरुष सत्ताक व्यवस्थेचा सहनशक्तीचा अंत असतो कारण मर्यादा पुरूषोत्तमां च्या विचारांच्या मर्यादा हिनं दर्जाच्या आहेत.एक स्त्रीची हिम्मत गगनाला गवसणी घालण्याची जितकी असु शकते, तितकीच तिच्या वाटेला जाणारयाला पाताळात गाडणयाची ताकद सुद्धा ती बाळगुन असते.तिला संरक्षण देण्याची भाषा,व कायदे,नियम करणारयांसाठी ऊर बडविणाऱ्या समाजाने अगोदर स्वताला प्रश्न विचारावे आपण,आपली जन्मदात्री आई व बहीण मुलगी सोडली तर कीती परक्या स्त्रीया मध्ये मध्ये आई, बहीण,मुलगी पहातो. ती शिकली पाहीजे,बिनधास्त राहीली पाहीजे स्वतंत्र विचाराने जगली पाहीजे,समाजाच्या जाचक अटी नियमातून बाहेर पडली पाहीजे मुक्त,झाली पाहीजे, स्वैर, स्वच्छंद जगली पाहीजे, हे सगळेच मान्य करतात मग आपली पत्नी, मुलगी, बहीण, आई कुण्या परक्या पुरूषासोबत सहजच,का होईना,जरा जास्त वेळ, बोलताना पाहिल्यास,काही क्षणभर तरी मनं कलुषित ,विचलित होत नाही असे कीती पुरूष आहेत?दुसर्या परक्या स्त्रीने जी काय क्रांती करावयाची ती करावी, आपल्या घरात मात्र संस्कार व विचारांच्या मर्यादेतच बाईने असायला हवे ना!हे कितपत योग्य आहे.कर्तव्य,जबाबदारी, कायम स्त्रीने पाळायची,आपल्या चारित्र्या पासुन ((पत्नीचे कर्तव्य म्हणून मग शारीरिक गरजेच्या नावावर,पतीने दररोज करीत असलेला बलात्कार का असेना))चरितार्थापर्यंत सर्व गोष्टीची जाणिव, आठवण, सतत स्त्रीलाच करून का दिली जाते. म्हणे, जागतिक महीला दिवस महीला, स्त्री, जननी, निर्माती आदी अंत, प्रसव धर्मीनी आणिक अशा अनेकविध स्वरूपात स्त्री ला गौरविले एक दिवस की झाले का? पंरतु स्त्रीला खरोखरच हवा तसा सन्मान मिळतोय का?या समाजातील कीती लोकांनी खऱ्या मनाने पुरूष सत्ताक कींवा पितृसत्ताक पद्धती नाकारली आहे कीती पुरूष स्त्रीयांचा खर्या अर्थाने आदर सन्मान करतात मनुस्मृतीत तर स्त्रीला शूद्राती शूद्र गणले गेलेय स्त्री ही दासी व भोगवस्तू म्हणून हिनविले आहे स्त्रीला लग्ना अगोदर वडील,भावाच्या दास्यात मग पतीचे व शेवटी पुत्राचे दास, म्हणून रहाणे कर्तव्य सांगितले आहे आणि सनातानी लोक अशा मनुस्मृतीचा ऊदो ऊदो करण्यात गुंतले आहेत एकविसाव्या शतकात जग पृथ्वी सोडून इतर ग्रहावर रहाण्याच्या तयारीत असतानाच आपल्या देशात आजही हजारो स्त्रीया बलात्कार हत्या, घरगुती हिंसाचार लैंगिक अत्याचार मानसिक व शारीरिक कुंचबनेत जगताना पहातो आपण, न्याय न्यायालये धर्म जातीची गुलाम आहेत राजकारणी सत्तेत मत्त आहेत बलात्कार करणार्यांना सन्मानाने शिक्षा माफ करणारी भिकार व्यवस्था इथ नांदत आहे.धर्माचे ठेकेदार तेव्हा कुठे जातात जेव्हा बलात्काराला जातीचे रंग देऊन न्यायाच्या नाटकी रंगात स्त्रीच्या भावनांचा पुन्हा पुन्हा चिरफाड करून बाजार मांडतात या देशात मग बलात्कार हत्या होऊन आयुष्य संपल्यावर मुलीला निर्भया म्हणायचे मेल्यावर ती निर्भया होते जिवंत पणी भयग्रस्त जगते हे कुठली दांभिक व्यवस्था? कसले कायदे म्हणे, महीला दीन कोणी ठरवला महीला दिन तीला एक दिवस, हक्क समान आधिकार, मुक्त जगण्याचा आभाळ देणारे तुम्ही कोण आहात?जीने या जगात आणले ,तुम्हाला जन्म द्यायचा की नाही हा आधिकार निसर्गाने तिला बहाल केला तिचे दिवस ठरविणारे तुम्ही कोण?अधिकार देणारे तुम्ही कोण?बाप भाऊ,मग पती आणि पुत्राच्या बंधनात तीने जगायचे का?स्त्री मुक्तीची मुकताफळ ऊधळत आम्ही खुप मोठ काहीतरी करीत आहोत असला आव कशासाठी ऊलट स्त्रीनेच ठरविले पुरूषाला जन्म द्यायचाच नाही तर समस्त सृष्टीचे संतुलन बिघडायला क्षणभरही लागणार नाही अशा जग निर्माती साठी हक्क कायदे करण्याची वेळच का आली हजारो वर्ष कोणी तिला जखडून ठेवलेय हा कसला समाज आहे जिथे, स्त्री याचांच वापर व व्यापार सुद्धा चालतो स्वतःची आई बहीण पत्नी मुलगी ,हीच नजर दुसर्या स्त्रीयांच्या बाबतीत ठेऊन योग्य मान सन्मान देणारे कीती पुरुष असतात भोवताली? एक पुरुष या समाजात एकट्याने जेव्हडा बिनधास्त राहू जगू शकतो, वाटेल तेव्हा वाटेल तिकडे वाटेल तसे हिंडू फिरू शकतो वावरू शकतो स्वतंत्र पणे हवे तसे जीवन जगू शकतो तेव्हढेच स्त्री ला स्वतंत्र आहे का?बाई ला बिनधास्त पहाण्याची क्षमता व मानसिकता कमकुवत विचारांच्या कसोट्यांवर कशी ऊतरणार कींवा मग परक्या स्त्रीच्या बाबतीत स्वीकारार्ह पंरतु आपल्या घरातल्या स्त्रीयांच्या चौकटी कधीही मोडायला नकोत या वृत्तीचे लोक तावातावानं स्त्री मुक्तीची भाषण का देत असतात ?सध्याच्या काळात स्त्री संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी जितक्या प्रगल्भ पणे सांभाळते तितक्याच ताकदीने बाहेरील जबाबदारया पेलते घर कुटुंब नोकरी, सांभाळताना कुठेही कमतरता रहाणार नाही याची काळजी तडफेने घेते मात्र तिच्या धावपळीत तिला खर्या अर्थाने साथ सोबत मिळते का तिच्या कर्तुत्वाला योग्य न्याय देतो का हा समाज स्त्री दास्याच्या मानसिक गुलामीच्या संस्कारात वाढलेले पुरूषी अंहकार स्त्रीचे पालकत्व,अधिकार मनस्वी मान्य करतात का? पती भाऊ बापाच्या छायेतच पहाणे, रहाणे,याहुन एकट्याने समर्थपणे रहाणाऱ्या महीलेला नीस्वार्थ ,निरोगी मनाने नजरेने पहाणे किती लोकांना रूचते, कसलाही किंतु पंरतु न ठेवता कीती पुरूष स्वच्छ मनाने पहातात ही सुद्धा मोठ्या प्रश्नांची मोठी शोकांतिका आहे असो !तरीही समस्त महीलांना जागतिक महीला दिनाच्या मनापासुन शुभेच्छा


Rate this content
Log in