Anjali Bhalshankar

Abstract Tragedy Inspirational

2  

Anjali Bhalshankar

Abstract Tragedy Inspirational

वस्तीतले वास्तव

वस्तीतले वास्तव

4 mins
79


झोपडपट्टीत तरूण मुलमुली संघटना चालवतात. कामगार कष्टकरी यांच्या न्याय हक्कांसाठी मोर्चा अंदोलन शिबीर चर्चा प्रश्न,कंप्युटर क्लास यासारखे उपक्रम राबवतात. अगदी सुरवातीपासुन ती सर्वजण माझ्या संपर्कात आहेत.त्यांच्या बर्याचशा उपक्रमात मी शक्य तेव्हा सहभाग घेते बरेचदा माझे लेख वाचुन, त्याविषयी, किंवा संघटनेची पुढची नवी धोरण कार्यक्रमां विषयी डिबेट घेतो आम्ही प्रत्येकाच्या वेळेनुसार दोन दिवसापूर्वी अशीच संघटनेचा एक मुलगा दूपारी घरी आला नुकतीच मी एक फेसबूक पोस्टवर प्रतिक्रीया दिली होती चार ओळीत मात्र अर्थपुर्ण व लोकांना आवडली असावी तीनशेच्या आसपास लाईक आले होते त्यावरचं आमची चर्चा सुरू असताना अनुप माझा भाऊ आला खरंतर त्याला आमच्या बोलण्यात कींवा सामाजिक, विषयात रस नाही हे मला ठाऊक आहे.नाकासमोर चालणारा चाकरमानी झालाय तो कुटुंब,ऑफीस यापलिकडे त्याचे जग नाही. तरीही माझ्या सांगण्यावरून तो शांतपणे दहापंधरा मिनिटे आमचे बोलणे ऐकले चर्चा आता लहान मुलांवरचे संस्कार ह्या विषयाकडे सरकली वस्तीत बरेच लोक अगदी घरासमोरचे सुद्धा वीज चोरून वापरतात,आजुबाजु च्या घरामध्ये रेंटवर सुद्धा देतात, पाचशे रूपये महिना घेतात ती फुकटची,चोरीची कमाई. आम्ही एकदोन महीने लाईटबील थकवले की मीटर काढून न्यायला घरी येतात बाजुच्या चोराविषयी सांगायची सोय नाही अर्ज द्या, तुम्ही ऑफीसला येऊन, केस होईल,असे सांगत महावितरणचे कर्मचारी हात वर करतात.आम्ही हे पहातो पाहुन शांत रहातो चोरीला समर्थन देतोय याची टोचणी आपल्याच मनाला भीडते चोरी करणारयाला काहीच वाटत नाही .त्यापेक्षा या सार्या भानगडी करण्याची आपल्याला काय गरज, आपण,आपल बील वेळेनुसार भरायचं विषय संपवायचा, हे अनुप चे मला सांगणे.कोणि भांडले तर वाद आटोपशीर घ्यायचे आपली बाजु खरी, सत्य असली तरीही आपणच धीरानं घ्यायचे हे ही अनुप सांगत असतो.संघटनेचा मुलगा बोलला, ते चोरी करतात त्यात त्यांच्या परीस्थितीचा दोष आहे त्यांचा नाही चोरी करण्यामागे त्यांची गरीबी व एकुणच कामगारांचे शोषण, पिळवणूक ,व भांडवलदार जबाबदार आहेत.आपण प्रश्नाचा विचार मुळापासुन करायला हवा ते गरीब का राहीले हा खरा प्रश्न आहे.गरीबी ही चोरी करायला प्रवृत्त करते. वीजचोरांचे समर्थन करणार का मग तु. मी त्याला विचारले,चोरीचे नाही,पंरतु त्यामागच्या परीस्थितीला दोष देइन मी.तो , म्हणाला.इतका वेळ शांत बसलेला अनुप, अगोदर माझ्याकडे व अमन कडे, पहात म्हणाला मग संस्काराचे काय?वस्तीतल्या लोकांना व त्यांच्यामार्फत त्यांच्या मुलांना संस्कार शिस्त, माहीती असायला हवे की नको,जर बापच वर्षानुवर्ष वीज चोरून वापरतोय अशा, बापाची मुलं कोणत्या वळणा मध्ये वाढतील?उद्या तीपण चोरी करायला शिकली तर नवल काय!अमन असेल वीसेक वर्ष वय हुषार अभ्यासु मलगा. शांत पणे अनुप चे बोलणे एकू लागला. अनुप पुढे म्हणाला,आम्ही सुद्धा गरीबीत वाढलो अजूनही परीस्थितीत फारसा बदल नाही आमचेही वडील कष्टकरी कामगार होते. त्यांनी कींवा आमच्या आईने कधीही कसलीही छोटीशीही चोरी केलेली आठवत नाही. सहाजिकच आमचीही हिम्मत झाली नाही.होणारही नाही.घरच्या गरीबीतुन आम्हाला चोरी करण्याची शिकवण कधीही मिळाली नाही.आणि संस्काराचे, म्हणशील तर खरे लहानपणीचे,संस्कार म्हणतात ते संघ शाखेत झालेले आहेत आमच्यावर माझा मोठा भाऊ नी मी शाखेत जायचो रोज.होय !आर एस एस च्या शाखेत, आम्ही घडलो. वस्तीत राहुन नव्हत समजले. आईवडिलांना नमस्कार करायचा,असतो इथपासुन वह्या पुस्तकांची ,गुरूची पुजा,शुभंकरोती पासुन राष्ट्रगीत म्हणण्यापर्यंत आम्ही शाखेत शिकलो. चांगली वागणुक स्वच्छ रहाणे, शिस्त यांसह व्यायाम,खेळ गाणी शाखेमुळे शिकता आले. एकूणच काय कोणाचे संघाविषयी, काय मत आहे याच्याशी मला घेणं नाही, मात्र चांगले संस्कार शाखेने दिले. थोडक्यात काय शाखेमुळे आयुष्य घडले.अनुप भरभरून बोलत होता शाखेतले लहानपणीचे दिवस.मिलिंदने,माझ्या पाठचा भाऊ,पहील्यांदा हात धरून शाखेत नेलेला दिवस, सुद्धा त्याला आठवत होता .खरतरं अनुप आता खुप मागे लहानपणी च्या शाखेत जाऊन पोहोचला होता.मी त्याचे बोलणे मध्येच तोडत बोलले होय रे !अमन हे मात्र अगदी बरोबर बोलतोय माझा भाऊ आमच्यावर खरोखर शाखेचे संस्कार होते एकेकाळी. माझे दोन्ही भाऊ त्यांच्या मुळे आम्ही घरातले सारेच, दोघ जेव्हा घरी येऊन शाखेत,शिकवलेल सार रीपिट करायचे तेव्हा नकळत आम्हावर ते विचार रूजलेत. त्यामुळे आम्ही जरी याच वस्तीत, जन्मलो,वाढलो,मोठे झालो,जगलो मात्र चोरी, व्यभिचार अज्ञान, गलिच्छ भाषा ,एकुनच भोवतालच्या अशा परिस्थितीतून आम्ही स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आलो, करीत आहोत, यामध्ये जेवढा आमच्या आईवडिलांचा वाटा आहे तितकाच महत्वाचा संघ शाखेचा आहे ही गोष्ट मलाही मान्य आहे होय!अनुपने ही पुन्हा दुजोरा दिला.मग तुम्ही स्वतःला वस्तीचा भाग मानित नाही का?अमन बोलला,नाही तसे अजिबातच नाही अनुप बोलला, आम्ही कधीही वसतीपासुन वेगळे समजत नाही, एक गोष्ट पक्की आहे, इथे मी स्वतःचे कितीही प्रमाणिक प्रेझेंटेशन दिले तरीही, माझ्या मागे कोणिही ऊभे रहाणार नाही.आपल्याला काहीतरी समाजासाठी करायचे, असेल तर शंभर माणसांचे पाठबळावर आपण एक लाख लोकांपर्यंत आपले विचार नेऊ शकतो,मी या वस्तीत जन्मलो मला माहीती आहे, कमीत कमी तीन चार पीढया हे असचं रहाणार आहे.हे असेच आहे. या लोकांना तुम्ही बदलायला गेलात तर हे तुम्हाला एकट पाडतील, टोमणे, मारतील, वेडे, कींवा अतीशहाणे, ठरवतील, माझ्याकडे पहात म्हणाला, जशी आज माझ्या बहीणीची अवस्था आहे.वीस वर्ष झाले वस्तीत मुलांना फुकट शिकवते तिथपर्यंत ठीक आहे मात्र हे लोक देवदेव करतात, अंधश्रद्धा पाळतात,प्राण्यांचे बळी देतात त्याविषयी हीने काही बोलायचे नसते. नाहीतर हे लोक टारगेट करतात.अशा लोकांसाठी तुम्हाला काही चांगल करता आले, तर आनंदच आहे मला,असे म्हणून अनुप, ऊठला. मला, ऊशिर होतोय मी निघतो..... ...ताई! तुमचे व तुमच्या भावाचे विचार सारखेच आहेत. हो, पाहील ना, अमन, माझ्यापेक्षा दहा वर्षानी लहान आहे हा भाऊ, मात्र त्याच्याकडून मी बरचं काही शिकते अजुनही!तुम्ही लोक संघटना चालवता. वस्तीत आता अलीकडेच, रहायला आलात, किंवा तुमच्या पैकी अनेक जण अनेक,पुर्वी वस्त्यांमध्ये राहीले असतील, जवळपास सर्व वस्त्यांची स्थिती थोड्याफार फरकाने सारखीच.इथले लोक, त्यांची अवस्था, राहणीमान परीस्थिती अनुभवली ही असेल तुम्ही, लोकांनी,पंरतु आम्ही, अनुप काय, नी मी काय,आम्ही तर या वस्तीत जन्मलो.इथचं मोठे झालो. वाढलो इथुन स्वताला कधीही वेगळ समजलो नाही.समजणार सुद्धा नाही. तसे असते तर माझ्या वस्तीतील जीवनावर आत्मचरित्र लिहीले असते का ?मी अमन!अरे तुम्ही लोक आग लागली म्हणून ती विझविण्या साठी धडपडताय.परंतु आम्ही तर प्रत्यक्ष त्या अगीत होरपळलोय, अजूनही होरपळत आहोत. त्याच्या वेदना दूरून विझवायचा प्रयत्न करण्याऱ्यांना थोड्याच जाणवणार आहेत............मी बोलत होते.... अमन शांतपणे ऐकत होता.अगदी स्थिर.....धीरगंभीर........


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract