Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

पहिला डाव भुताचा..!

पहिला डाव भुताचा..!

1 min
156


लहानपणी यश, अपयशाने मुले नाराज व्हायची मग वडीलधारी अनुभवी मंडळी समजूत काढायची.अरे यश अपयश जीवनाचा भाग आहे,पुन्हा प्रयत्न कर म्हणायची,पहिला डाव भुताचा म्हणून सोडून दे म्हणायची आणि हसवायची आणि पुन्हा सारे सुरळीत पार पडायचे.आज उतार वयात पहिला डाव भुताचा म्हणजे काय याची यशस्वी जीवन जगताना प्रचीती येते.असे अनेक भुताचे डाव पार पडत पडत एक यशस्वी जीवन आकारास येते आणि उज्वल उन्नत्त यशस्वी जीवन घडते हे पटते. म्हणून पहिले अपयश पचविण्याची शक्ती ही उद्याच्या यशाची गुरुकिल्ली आणि खात्री असते हे नेहमी ध्यानात ठेवून जीवन जगायचे असते.काही तरी चांगले देण्याची त्या ईश्वराची इच्छा असते आणि ते चांगले उपभोगण्याची क्षमता प्राप्त होण्यासाठीची मजबुती किंव्हा मानसिकता तयार व्हावी म्हणून आजचे अपयश परमेश्वर प्रदान करीत असतो हे समजून घेणे महत्वाचे असते.म्हणून पहिला डाव भुताचा म्हणून सोडून देऊन परत चालत रहायचे ,यश आपली वाट पहात असते.त्या यशाचे स्वागत तेवढ्याच ताकदीने करायचे असते यालाच जीवन म्हणतात...!

पहिला डाव भुताचा म्हणून सोडून दिल्याने त्यागाची महती यश पदरी पडता कळते आणि जीवन उज्वल ,उन्नत्त आणि यशस्वी होते.

स्वगत...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action