Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

अस्तित्व माझे माझ्या हाती...!

अस्तित्व माझे माझ्या हाती...!

2 mins
218


बारा नोव्हेंबर 2023...!

चिंतन...(११६)

अस्तित्व माझे माझ्या हाती....!

अस्तित्व माझे माझ्या हाती...! म्हंटल्यावर लगेच मन आपल्या जीवनातील मिळविलेल्या नावाची,गाजवलेल्या कर्तृत्वाची बेरीज वजाबकी करू मोकळे होते.वाटते सर्व काही आहे आणि लगेच वाटते काहीच नाही...कधी कधी वाटते खूप काही केले आणि कधी कधी वाटते बरेच करायचे आहे किंव्हा बरेच राहून गेले.

मानवी मन एकदा इकडे ,एकदा तिकडे होते आणि जाणवते ती अतृप्तता ,असमाधान,आशा वगैरे वगैरे..

आज तसेच काहीसे अनुभवण्यास मिळाले आणि वाटले . खरोखरच 'अतित्व माझे माझ्या हाती' याची खात्री पटली.

नित्यनियमा प्रमाणे,महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि तिथल्याच बाकड्यावर बैठक मारली. मागून आठ साडे आठच्या दरम्यानचे ऊन्ह पाठीवर पडत होते आणि माझ्या पडणाऱ्या सावलीवर माझी नजर पडली. गुडघ्यावर ठेवलेला हात थोडा हलला आणि पटकन नजरेने मानवी चेहऱ्याची आकृती हेरली.थोडी हाताची हलचक करून कुतूहलापोटी निरीक्षण केले आणि जणू हृदयस्थ अस्तित्व माझे त्या हाताच्या मुठीत सामावल्याचे जाणवले. डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले.मनगटात दम असेल तर,वज्र मूठ,धमक इत्यादी विचार रुजी घालू लागले. मी म्हणेल ती पूर्व इथवर प्रवास झाला.अहं ब्रम्हास्मी ला तो प्रवास थांबला.आत्मविश्वास दुणावला आणि एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली. वाटले महादेवांनाही हे अपेक्षित असावे.जणू आशीर्वाद मिळाल्याचे समाधान लाभले.

मी माझ्यातील बळ सारे

मनगटात एकवटले

एक नवेच दुकान कर्तृत्वाचे

जणू मुठीत माझ्या नटले...

प्रभात समयी पाठीवरी

हात रविराजाचा पडला

वाटले सावलीत माझ्या त्याने

चमत्कार करून दाखविला...

चेतना जागवूनी त्याने

ऊर्जा उरात माझ्या भरली

महादेवांच्या कृपेनेच वाटते

ही किमया लीलया घडली...

आता नाही चिंता काळजी

नाही उरली तमा कसली

माझ्या मनगटात मजला

लख्ख कर्तृत्वाची उन्नत्त प्रतिमा दिसली...

पटले माझे मलाच सारे

अस्तित्व माझे माझ्या हाती आहे

मी म्हणेन ती पूर्व दिशा यापुढे

घडविण्याचे बळ अंतरी मी पाहे...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action