चिंतन...!
चिंतन...!
दृष्टीस पडणे, नजर टाकणे, आवर्जून पाहणे, वाचनात येणे, आपणहून वाचणे, लक्ष देणे, लक्ष देऊन पाहणे ही सर्व बिरुद किंव्हा लक्षण ही जागृत मनाची जाण, ग्वाही किंव्हा खात्री आहे. जी जीवन उज्वल, उन्नत्त, सौख समृद्धीने परिपूर्ण होण्यास प्रेरक आणि आवश्यक अशी गोष्ट आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे कुतूहलाने किंव्हा आत्मीयतेने स्टेटस पाहणे,दुसऱ्यांचे विचार जाणून घेणे ,समजून घेणे ,हे अत्यन्त
आवश्यक असे शुभकार्य म्हणण्यास काही हरकत नाही.या मुळेच बऱ्याच चांगल्या गोष्टींची मनात मुहूर्त मेढ रोवली जाते आणि जीवन बहरून येते,सार्थकी लागते आणि कृथार्थ होते.
सौख्य, समाधान,शांतीचे दान पदरात पडते हे नक्की,यात शंका नाही.