STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

चिंतन

चिंतन

1 min
193

एक डिसेंबर 2023...!

चिंतन...(१२२)

करवीर निवासिनी श्री.महालक्ष्मी चे मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो तर रविराज स्मित हास्य करीत अतिशय शीतल होऊन मला आशीर्वाद देत होते.म्हंटले देवा आज इतके प्रेमळ,शीतल कसे काय?

म्हणाले बाळा तुझा आज वाढदिवस म्हणून तुला भावेल आशा शीतल चंद्राच्या रुपात तुला भेटण्यास आलो.अनेक अनेक शुभ आशीर्वाद..!अंगावर काटा आला.वाटले किती मोठे हे हृदय,माया आणि औदार्य.मनःपूर्वक नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला.खूप बरे वाटले.

गुरू कोणीही असो गुरू गुरुच असतो.सदैव मायेची छाया प्रदान करतो.त्याच्या छायेत आपले जीवन खुलते,फुलते आणि बहरते.

आले रवी भेटण्यास मला

चंद्रासम शीतल होऊनी

आशीर्वाद कृपेचा दिला

मायेने कवेत कवटाळूनी...

घे तेज ऊर्जा सारी तुला

हृदयस्थ माया जाणोनि

हो यशस्वी जीवनी सदा

उज्वल उन्नत्त यश संपादूनी....

म्हणाले,उग्रता उष्णता गिळूनी

आलो तुला भेटण्यास

माय कृपेचा चिरंतन

आशीर्वाद तुला प्रेमे देण्यास....!

धन्य ती माया,धन्य ते प्रेम

चुकत नाही कधी नेम

नित्त्य येणे, जाणे चाले निरंतर

लोपविण्या हृदयीचे स्नेहांतर....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action