Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

जागतिक मानसिक आरोग्य दिन..!

जागतिक मानसिक आरोग्य दिन..!

2 mins
118


दहा ऑक्टोबर 2023....!

वल्ड मेंटल हेल्थ डे... म्हणजे थोडक्यात मराठी मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन.आता मानसिकता म्हणजे स्वभाव,विचार करण्याची पद्धत आणि आजूबाजूचे संबंधित अथवा संबंध नसलेले पण आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे विचारी पोषक ,बाधक वातावरण इत्यादी इत्यादी.थोडक्यात अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या जीवनातला अगदी सुखाचा काळ आठवायचा आणि त्या सुखद कालानुरूप आपली जीवन शैली जोपासायची म्हणजे आपोआप आपले मानसिक आरोग्य ठीकठाक राहते आणि त्याच बरोबर शारीरिक स्वास्थ्य पण टिकून राहते म्हणण्यास काही हरकत नाही.म्हणजे आपले कौमार्य अवस्थेतील जीवन.बिनधास्थ आणि अवखळ.कोणतीही गोष्ट मनास लावून न घेता मस्त मजेत जीवन जगणे इतकेच .आपण सुखी तर जग सुखी या साध्या विचाराने आनंदात जीवन जगणे म्हणजे आपले मानसिक आरोग्य आपोआप जपले जाते आणि आपण आरोग्य संपन्न जीवनाचा मनमुराद आनंद जीवन जगण्याचा घेऊ शकतो, सुखी राहू शकतो. कोणताही गोष्टीचा बाऊ न करणे आणि आंनदी राहणे हीच या दिवसाची सर्वांना आनंदमयी मनःपूर्वक शुभ कामना...!

हसा खिदळा मनमुराद बागडा

नको कोणता मनात आकडा

जीवन रथाचा धावू दे छकडा

नको कोणता विचार वाकडा...

खावे प्यावे वेळच्या वेळी

नको पोटास काही अवेळी

उत्साहाचे भरते येऊ द्यावे सकाळी

रवी येता दारी जीवन फुलविण्या होऊन माळी...

थोडा व्यायाम आरोग्याचा

असू द्यावा नित्य नेमाचा

आळस बाबांनो सांगा काय कामाचा

पुरतो सदा ऊर्जा होऊनी क्षण घामाचा...

प्राणशक्ती मजबूत करण्या

कास धरूया योगाभ्यासाची

ध्यानधारणा,प्राणायाम नित्य करुनि

निगा राखुया मानसिक आरोग्याची....

बाला संगे बाल होऊनी

जीवन रांगडे जगू हलके फुलके

मानसिक आरोग्याची सदृढता जोपासता

जीवन सुरेख सरेल हसत खेळत सुखे सुखे...

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या

अनेक अनेक आंनदी उत्साही चैतन्यमयी शुभेच्छा...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action