Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

माझे जग

माझे जग

1 min
219


चिंतन ...(११८)

आवडते काल्पनिक जग....

माझे जग...

काल्पनिक जगाची सफर निरनिराळ्या पद्धतीने,निरनिराळ्या कल्पनेने,निरनिराळ्या थरांवर झाली पण माझा पिंडच असा की कोणतीच कल्पना मला भावली नाही ,पचली नाही,रुचली नाही किंव्हा आवडलीही नाही .न आवडण्याचे कोणते कारणही नाही आणि न आवडण्या सारखे त्या काल्पनिक जगतात होते असेही नाही.

खरे सांगायचे तर ,दुसऱ्याने केलेल्या कल्पनेचे जग मला आवडेलच कशाला..?म्हणून मीच माझ्या आवडीचे काल्पनिक जग पाहिले आणि ते मला खूप आवडले.

माझ्या आवडत्या जगात जसे मनमुराद आनंद आहे,सुख आहे,समाधान आहे,शांती आहे, समृद्धी आहे,ऐशोआराम आहे,तसेच प्रत्येक गोष्टीचा कस लागावा यासाठी सचोटी आहे,श्रम आहे,स्पर्धा आहे,हुरहूर आहे आणि त्याच बरोबर प्रत्येक गोष्टीची किंमत कळण्यासाठी त्या अनुषंगाने येणारी निराशा आहे,आशा आहे किंबहुना माझ्या काल्पनिक जगात फक्त आणि फक्त योग्य आणि योग्यच गोष्टी आहेत, द्वेष,मत्सर, दंभ,कपट असले दुर्गुण मात्र नाहीत.जग जसे सुख अनुभवेलं तसे ते दुःख ही अनुभवेल पण त्यात खंत चिंता मात्र औषधालाही असणार नाही..म्हणून मला माझ्याच कल्पनेतले जग आवडते..किंव्हा थोडक्यात

सांगायचे झाले तर...

जग असावे इतके सुंदर

जीथे देखणे असेल बंदर

दुःख होता अंदर

बाहेर पडता जंतरमंतर

होईल आपदा छु मंतर

जीवनात दुःखामधले सरेल अंतर

सुखाचे होतील सारे मंजर

हास्य खुलेलं गाली

नसेल दुःखास वाली

सुख होईल सुख देवा

कोणासही जणू वाटेल हेवा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action