STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

कृष्ण भेटला पाहिजे..!

कृष्ण भेटला पाहिजे..!

1 min
135

नऊ सप्टेंबर 2023...!

कृष्ण भेटला पाहिजे...!

कृष्ण भेटला पाहिजे या अनुषंगाने छोटा लेख वाचनात आला,बरे वाटले आणि कुतूहल ही वाटले.कोणी लिहिले माहीत नाही पण कोणीतरी आपल्या नावावर तो लेख दामटून टाकला.आनंद ही झाला आणि खंत ही वाटली.आनंद या साठी की चौर्य हे कृष्णाच्या लोणी चोरण्यावरून अनुकरण केले असावे,चला ठीक झाले तेव्हढा अंश तरी कृष्णाचा घेतला.चांगले वाईट हा नंतरचा भाग आणि खंत यासाठी की इतर हजारो गुण सोडून नेमके इतकेच कसे काय याला जमले?देव जाणे.त्या निमित्ताने साहित्य चोरी झाली पण तितके वाचन होणे घडले हेबही नाही थोडके.. आणि खरोखरच वाटले कृष्ण खरोखरच भेटला पाहिजे...!

कृष्ण भेटला पाहिजे....!

कृष्ण भेटला पाहिजे

त्याला घट्ट मिठी मारली पाहिजे

हृदयात डांबले पाहिजे

अंतरात जाणले पाहिजे...

सर्व नात्यांनी युक्त असा

सखा मित्र बंधू लाभला पाहिजे

नात्या पलीकडचे नाते

कृष्णाशी जडले पाहिजे...

हर्ष मनीचा त्याला

क्षणात समजला पाहिजे

वेदना अंतरीची त्याने

नकळत जाणली पाहिजे...

सौख्याची प्रचिती येण्या

जीवनात कृष्ण असला पाहिजे

जीवन सार्थकी लागण्यास

कृष्ण खरोखरच भेटला पाहिजे....

मग वाटते कधीतरी

आपण कृष्ण झाले पाहिजे

कृष्ण भेटण्याची तृषा (तहान)

एकट्याची तरी भागविली पाहिजे....


Rate this content
Log in

Similar marathi story from Action