त्वरित अंमल बजावणी...!
त्वरित अंमल बजावणी...!
अकरा डिसेंबर 2023...!
त्वरित अंमलबजावणी.…!
करवीर निवासिनी श्री . महालक्ष्मी मंदिरात दर्शनास गेलो,नेहमी प्रमाणे महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि महाद्वारी येऊन पुन्हा नमस्कार केला.पण फोटो पॉईंट म्हणून दर्शन पायरीचा वापर होत असल्याने म्हणावे तसे महाद्वारातून दर्शनाचा लाभ झाला नाही.
बरेचजण लांबूनच महालक्ष्मीचे मुख दर्शन घेतात अगदी महाद्वार रोड वरून.पण या फोटो पॉईंट मुळे निराशा झाली आणि वाटले थोडी सुधारणा झाली पाहिजे.
असा विचार मनात येताच, सरळ देवस्थान कमिटी ऑफिस गाठले आणि संबंधित अधिकारी वर्गास तशी सूचना दिली,आणि तो फोटो पॉईंट रद्द करण्याची विनंती केली.आणि काय आश्चर्य तात्काळ तिथल्या ऑफिसरने तो पॉईंट बंद करून त्वरित विनंतीची अंमल बजावणी केली.
करवीर निवासिनी श्री.महालक्ष्मी दर्शनातला एक अडथळा आज अकरा डिसेंबर 2023 पासून कायम स्वरूपी नाहीसा झाला....आणि मनास खूप बरे वाटले...!
थ्रू पास....!
अडसर सारे दूर होऊनी
थ्रू पास दृष्टी आली तुझ्या चरणी
जसे तुझ्या कृपेने वसते बाई
नारळात ग गोड गोड पाणी...
आता नाही अडचण दर्शनात तुझ्या
लागते लीलया तव चरणी वर्णी
हीच माया तुझी वाटते मज
असावी तुझीच ही करणी...
तृप्त होतो नितदिन मी
घेऊनी डोळे भरुनी दर्शन तुझे
असेच अतूट अखंड राहू दे ग
नाते जगावेगळे तुझे माझे....!
