Prashant Shinde

Classics

3  

Prashant Shinde

Classics

एकवीस तोफांची सलामी...!

एकवीस तोफांची सलामी...!

1 min
163


दहा नोव्हेंबर 2023....!

एकवीस तोफांची सलामी...!

आज धनत्रयोदशी,नित्त्य नियमाप्रमाणे प्राथर्विधी आटोपून, पूजा अर्चाकरून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि माघारी फिरलो.येता येता थोडा उशीर झाला आणि वाटतेतच मग साहेब डोक्यावर आल्याचे जाणवले ,तरीपण पटकन फोटो काढला.

पूर्वी दिवाळी खूप लवकर सुरू व्हायची.त्यात डोक्यावर दिवाळी सुट्टीतला अभ्यास असायचा,घरची काम असायची, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या सानिध्यात गावाकडे दिवाळी गजबजायची.आता शहरी बंद दाराच्या संस्कृतीची दिवाळी, थोडी कोरडी कोरडी,नाटकी,दिखाव्याची सुकी सुकी जाणवते.

घरी आल्यावर थोडा नाष्टा चहा घेऊन, प्रभात फेरीसाठी बाहेर पडलो. वाटेत नमस्कार, happy diwali ऐकण्यास मिळाले. तोंड ओळखीच्या आणि वहिवाट नसलेल्या लोकांच्या शुभेच्छा मिळाल्या.सहज मोजदाद मनात केली आणि क्रीडांगणावर आलो. ऐकूण एकवीस जणांच्या शुभेच्छा मिळाल्या छाती फुलून आली म्हंटले आपण इतके पॉप्युलर ...!,अरे वा...!, आज तर जणू एकवीस तोफांची सलामीच मिळाली....!

पूर्वेला पाहिले, तो कुतूहलाने माझ्या कडे पहात होता. मनात म्हंटले तुझ्या कडे सगळे पहातात म्हणून एवढा भाव खाऊन, लाजून ढगाआड होण्याची काही गरज नाही. मलापण कोणीतरी पहातात हेही काही कमी नाही.

तुझ्या दर्शनाने बाबा

होततात धन्य सारे

म्हणून नखरे उगाच

तू करतोस न्यारे न्यारे....

आज लाल,उद्या पांढरा

रंग निरनिराळे तू घेऊन येतो

कधी कधी रुसून स्वतःवर

ढगाआड बराच वेळ जातो...

आज टिपले तुला

वाटले दीपोत्सव तू साजरा केला

अभा ढगांची भोवती पाहुनी

अचंबित जीव माझा झाला...

एक नाही, एकवीस तोफांची सलामी

आज मजला बघ मिळाली

तुला सांगण्यासाठी देवा 

नतमस्तक होऊनी मान माझी वळली...

तुलाही शुभेच्छा देतो देवा

तुझीही दिवाळी होऊ दे बाबा साजरी

नभंगणातील दोस्त मंडळी येऊ देत 

सलामी देण्या पाहुनी तुझी अभा गोजिरी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics