Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

प्रश्नांत....!

प्रश्नांत....!

2 mins
190


अकरा नोव्हेंबर 2023.…!

चिंतन...(११५)

काल धनत्रयोदशी,बऱ्याच आठवणींचा परिपोष झाला.आपल्या कडे म्हणजे बेळगाव,कोल्हापूर, सातारा,सांगली,कराड किंबहुना अख्खा महाराष्ट्र किंव्हा सर्व हिंदुस्थान म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. थोड्या बहुत फरकाने घरोघरी मातीच्या चुलींचाच अनुभव पाहण्यास मिळतो.सण वार आले की आप्तांची वर्दळ वाढते दोन तीन तास मस्त मजेत जातात आणि मग पोटोबा झाला की हळू हळू एक एक करीत इतिहासाची पाने चाळली जातात.मी ,तू, आम्ही, तुम्ही, आपण,आपले मग सुरू होते.आणि रंगांचा बेरंग होण्याकडे कधी गाडी सरकते कळत नाही.ही सर्व नाट्य कृती निस्वार्था कडून स्वार्थाकडे केंव्हा पोहचते हे ही समजत नाही.असो हे असेच आनंदात विरजण घालण्याचे कार्य परस्पर पार पडते. कडू गोड आठवणी पुन्हा गोळा होतात आणि सणवार संपतात.

यातून जाणवणारी एक गोष्ट म्हणजे या कालावधीत कोणालाच आरश्या समोर उभे राहून पहावे वाटत नाही.आधी पासूनच सारे मेकअप करून तयार होऊन असल्याचे जाणवते.

मग वाटते प्रत्येकाने क्षणभर का होईना आपण दुसऱ्याच्या ठिकाणी असतो आणि दुसरा आपल्या ठिकाणी असता तर त्याने काय विचार केला असता. असा विचार जर मनात आला तर आपोआप सारे प्रश्नच मार्गी लागतात आणि प्रश्नांचा प्रश्नच उरत नाही.उरतो तो फक्त निखळ आनंद...!किती सोपे आहे हे.विचार करून प्रयत्न करायला तरी तशी काही हरकत नसावी..म्हणून म्हणावे वाटते...

प्रश्नांत झाला....!


प्रश्नांत झाला बाबा

तुझा मी होता आणि

माझा तू होता

बोलता बोलता...

नजर तुझी मजला

आरश्यासम भासली

माझीच प्रतिमा पाहुनी

माझी मलाच लाज वाटली...

तू होऊनी मी

एकदाच रे पाहिले

प्रश्नांचे प्रश्न पण बघ

कोठच्या कोठे पळाले...

स्नेह पुन्हा वृद्धिंगत 

आपोआप झाला

प्रश्नांचा अंत होता

सूर जुळून आला...

चिंतनात समजले मजला

प्रश्न जोपासणेच पाप आहे

मी चे अस्तित्व नष्ट होता अजूनही

आपलेपणाची जाणं शाबूत आहे...

प्रश्नोत्तरांची कशाला

भरवावी उगाच पाठशाळा

फुलूवू चला पुन्हा पुन्हा

सणावारी स्नेहाचा महामेळा...

सोडून सारे कालचे

नवी सुरुवात हो पुन्हा करावी

आनंदाची वाट जीवनाची

आनंदेच नित्य पुन्हा सारावी....!

अनेक शुभेच्छा..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action