Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

दिवा लागला

दिवा लागला

1 min
185


दिवा लागला...!

दिवा लागला,दिवा लावला,दिवे लावले,पणती लावली, पणती पेटवली,पणती प्रज्वलित केली, दिवा प्रज्वलित केला किती वेगवेगळे शब्द आणि किती वेगवेगळ्या संज्ञा. प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे.प्रभात समयी सहज जाता जाता तो रविराज आकाशी तेजस्वी प्रसन्न चित्ते प्रज्वलित होऊन प्रकाशमान होताना खुओ नवल वाटले आणि कुतूहला पोटी त्याची छबी टिपली. मनास खूप प्रसन्न वाटले.एक दीप प्रज्वलित झाल्याचे समाधान लाभले.एकाकी इलेक्ट्रिक दिव्याचा डांब बरेच दिवस उराशी खंत बाळगून उभा होता.आतल्या आत झुरत होता.आज तो नकळत प्रज्वलित झाला,प्रकाशमान झाला.नवचैतन्य अंगी संचारले.एक दिवा पेटवल्याचे सौख्य उरात दाटूनआले आणि हृदयस्थ सौख्य दुणावले.

चौफेर तुझी अभा फाकता

आसमंत प्रकाशले तुझ्या तेजाने

अंगी बळ दहा हत्तीचे घेऊनी

डांब उभा पुन्हा राहिला नेटाने..

कित्येक दिसांची मरगळ जाऊन

अंगी उर्मी भरली जोमाने

तुझीच किमया सारी देवा

घडते क्षणोक्षणी नित्त्यनेमाने..

डोक्यावरी तुला घेऊनी बघ

धन्य वाटते एकाकी या डांबाला

ऐटीत म्हणतो आलो कामी मी

नभास वेगळी झळाळी देण्याला..

कर्तृत्वाचा दीप पेटता

अर्थ लाभतो जीवनाला

चौफेर अभा फाकता यशाची

योग्य मोल मिळते आपल्या कष्टाला..



Rate this content
Log in

Similar marathi story from Action