मनातला फोल्डर
मनातला फोल्डर
ज्याप्रकारे तुम्ही मोबाईलमधून कोणतीही गोष्ट डिलीट करता परत तीच गोष्ट तुम्हाला कोणत्याही फोल्डरमध्ये मिळत नाही, सापडत नाही. त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या मनातून कोणतीही गोष्ट डिलीट केली तर ती गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाच्या कोणत्याही फोल्डरमध्ये मिळणार नाही, सापडणारपण नाही.
त्यामुळे मनातून काही डिलीट करताना विचार करा. वाईट गोष्टींचा मात्र विचार नका करू की डिलीट करू की नको करू. वाईट आठवणी, वाईट व्यक्ती, वाईट दिवस... या गोष्टींना क्षणाचाही विलंब न लावता त्या गोष्टी मनातून डिलीट करून टाका. तुमचं आयुष्य आणखीन चांगलं होऊन जाईल.