आयुष्यात..?
आयुष्यात..?
आयुष्यात प्रत्येक वळणावर जेव्हां आपण वाईट ठरायला लागतो तेव्हा आपण फक्त सबुरीनं, घ्यावं धीरानं घ्यायचं. जेव्हा आपलं बोलून काही चालतच नाही, नसतं तेव्हा शांत राहून चालवायचं मग मात्र सगळं चालायला लागतं. आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपण इतके घाबरतो, इतकी भीती वाटते की तेवढे आपण आपल्या बापाला पण घाबरत नाही ती व्यक्ती जेव्हा आजूबाजूला नसते तेव्हा अगदी मनमोकळे वाटत जेवढं कम्फर्टेबल वाटतं त्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल वाटायला लागतं खूप वाटतं नेहमी आपण असंच जगायला हवं पण ते नियतीला मान्य नसतं आणि ते मान्य करणारी आजूबाजूची परिस्थिती ते मान्यत्व बदलाला तयार नसते.
किती भीषण आहे ना? पण हेच वास्तव आहे, हीच वस्तुस्थिती आहे.आयुष्यात खूप शिकावं असं वाटतं खूप शिकायचं असतं खूप काही करायचं असतं पण करता येत नाही ते फक्त आपण घाबरतो ना ते त्या व्यक्तीमुळे आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की आपल्याला मान्य करायचं नाही म्हटलं तरी आपल्याला दाबले जाऊन मान्य करायला भाग पाडले जातात मान्य करण्याशिवाय पर्यायच नसतो. खूपदा अस मी स्वतः म्हणते खुप थकायला होतं जेव्हा सारेजणच खोटं-खोटं करायला लागतात तेव्हा पण आणि आपल्याकडे बोलण्यासारखं खूप असतात पण ऐकणारा कोणी सापडत नाही तेव्हा पण आता मात्र असं म्हणावं लागेल आयुष्यात खूप वाईट वाटतं जेव्हा आपल्याकडे बोलण्यासारखं खूप असतं पण ऐकणारा कोण सापडत नाही तेव्हा सगळं काही सहन करण्याच्या पलिकडे जात असतं .थोडक्यात काय आपण नुसतेच धरायला जातो इतक्यात सारं निसटत जातं हा
तातून. समजून घ्यायला कोण तयार नसतो, आणि समजुन सांगायला कोणी सापडत नाही. आयुष्यात दिवस येत असतात....आपण फक्त स्वतःला तयार ठेवायचं असतं. आपल्याला सांभाळून घेणारे समजून घेणार कोणीच सापडत नाही. मुळातच कोणी नसतं अवतीभवती पण आपण मात्र डोळ्यात तेल घालून शोधत असतो कोणी सापडतं का? पण आपण मात्र आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांभाळून घ्यायचं समजून घ्यायचं कोणीतरी असं म्हटलं होतं, आयुष्यात काही व्यक्ती कधी भेटलीच नसतील तर खूप बरं झाला असतं आणि काही व्यक्ती जरा लवकर भेटली असती तर खूप बर झालं असतं.
आयुष्यात एखाद्या व्यक्तीला सारं काही माहिती असतं अगदी बालपणापासून ते शाळा-कॉलेजच्या घटनांपर्यंतचा प्रवास पण इतर लोकांना असं काही Behave करतात की असं काही मला माहितीच नाही. पुढे असेही म्हणायचं असतं कोण आहे रे ती? मग मात्र खूप मोठा प्रश्न पडतो. आपण खूपदा म्हणतो की, आता या व्यक्तीला काय झालं. काल परवापर्यंत खूप चांगली होती आपल्या मनात चुकूनही येत नसतं की आपण दुखावलं तर नाही ना त्या व्यक्तीला चुकूनच काय सहज सुद्धा येत नाही असं मनात, कारण आपण कधी दुखावलं नसतो नव्हतो त्या व्यक्तीला तर त्या व्यक्तींकडून आपण दुखावले गेलेले असतो बोलणारा असतो ना त्याला पक्कं माहित असतं आपण हे काय बोलतोय पण त्याला मुद्दामच बोलायचं असत, हे सुद्धा समोरच्या व्यक्तीला आणि आपल्याला हे कळून चुकलेलं असतं.
Life is a very hard challenge. Accept it. That's the spirit of life. Celebrate it, enjoy it❤