चार भिंती
चार भिंती
चार भिंतींच्या पलीकडे जायचं आहे कारण चार भिंतींच्या आत खूप भीती वाटायला लागली आहे. इतकी भिती कधी चार भिंतींच्या पलीकडे वाटत नाही, आणि कधी वाटली पण नाही. माहिती नाही, चार भिंतींच्या आत भीती का वाटायला लागली आहे ते. स्वातंत्र्य म्हणजे काय हे चार भिंतींच्या आत असताना कळतं, समजतं. व्यवस्थित काहीतरी घडावं असे जर वाटत असेल तर आधी व्यवस्थित वागायला हवं मग नक्कीच काहीतरी व्यवस्थित, चांगले घडेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.वाटतं कधीकधी चार भिंतींच्या पलीकडचं सुख अनुभवायला पाहिजे पण कधी ते नशिबातच नसतं. खूप वाईट वाटतं स्वतःचं स्वतःलाच.
चार भिंतींच्या पलीकडे खूप काही शिकायला मिळतं पण चार भिंतींच्या आत काहीच शिकायला मिळत नाही किती दुर्दैवी गोष्ट आहे. खूप सारे प्रश्न अनुत्तरित आहेत. पण कोण देणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरे. किती वेळ, किती दिवस राहायचं या चार भिंतींच्या आत. असं वाटतयं आपल्याला कोणीतरी कोंडून ठेवलयं या चार भिंतींच्या आत. मला नेहमी वाटतं, स्वतःला चार भिंतींच्या पलीकडे जावं, स्वतःला पहावं, निरखावं, सुधारावं, स्वतःच स्वतःला समजावं पण. प्रत्येकवेळेस चार भिंतींच्या आतच का राहायचं हा प्रश्न पडतो नेहमी. चार भिंतींच्यापलीकडे जाऊन काहीतरी करायला हवं स्वतःसाठी कारण आपण चार भिंतींच्या पलीकडे जाऊन काहीच केलं नाही तर तर मग लोक आपल्यावर ओरखडे ओढायला कमी करणार नाहीत. पण कुठे कोणी आपल्याला स्वातंत्र्य दिलयं चार भिंतींच्यापलीकडे जाण्याचं. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. कोण चार भिंतींच्या आत सुख शोधत असतं, तर कोण चार भिंतींच्या पलीकडे सुख शोधत असतं, शोधण्याचा प्रयत्न करत असतं. पण मी चार भिंतीच्या पलीकडे सुख शोधणारी आहे.
चार भिंतींच्या पलीकडे खूप छान वाटतं. कारण चार भिंतींच्या पलीकडे खूप मोकळं मोकळं वाटतं, कोणतचं दडपण वाटत नाही मनाला. चार भिंतींच्या आत असताना सतत बोल ऐकायला येत असतात कानावर, हे करू नकोस, ते करू नकोस. इथे जा, तिथे सांगू नकोस. या शब्दाची इतकी चीड येते पण, त्याहुन जास्त चीड हे शब्द बोलणाऱ्याची येते. पण कधी स्वतःला एक्स्प्रेस करू शकले नाही आणि करू शकत नाही कारण फक्त एकच परिस्थिती. पण मला आशा आहे कधीतरी परिस्थिती माझ्यासोबत असेन आणि स्वतः नक्की एक्स्प्रेस करेन. मग त्यावेळेस मात्र सारेचजण बघत राहतील, गप्प बसतील.... 😅😇
