...म्हणून आपण आहोत
...म्हणून आपण आहोत
रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीकडे एकच प्रार्थना करायला हवी की, माझं मन कधी विचलित होऊ देऊ नका आणि माझ्याकडून जी सेवा करून घेत आहात त्यात कधी खंड पडू देऊ नका. जी सेवा माझ्याकडून करुन घेत आहात ती नि:स्वार्थी भावनेने, प्रामाणिकपणे होऊ दे. माझ्याकडून नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घाला. माझ्या मनात कोणाविषयी राग नको, तिरस्कार नको, सर्वांशी प्रेमाने राहण्याची, वागण्याची बुद्धी द्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण वाईट करायला लागतो तेव्हा कळत नाही काय करायचं ते, मग स्वामी महाराजांचे शब्द आठवतात, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." मग असं वाटतं स्वामी महाराज सांगताहेत बाळा मी आहेच. तुझ्या शब्दांनी दिला तुला वेगळा आरसा तू स्वतःला पाहावं म्हणून, या शब्दांनी शिकवलं तुला कसं जगायचं ते. आणि मग सगळं काही झाल्यावर शेवटी वाटतं स्वामी महाराज आहेत म्हणून आपण आहोत...
