नशीब...
नशीब...
1 min
491
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
भेटणाऱ्या चांगल्या-वाईट परिस्थितीबरोबर
आयुष्य जगताना, जगायला हिंमत हवी,
हिंमतीसोबत धैर्य हवं, धैर्यासोबत
सहनशीलता हवी सहनशीलतेसोबत,
आपल्या माणसांवर विश्वास हवा
विश्वासासोबत, प्रेम आणि आपुलकी हवी
प्रेम आणि आपुलकीसोबत,
समजूतदारपणा हवा,
समजूतदारपणासोबत, प्रामाणिकपणा
हवा, प्रामाणिकपणासोबत निस्वार्थ
भावना हवी, निस्वार्थ भावनेसोबत,
एक सुंदर स्वप्न हवं, एका सुंदर
स्वप्नासोबत कष्ट हवेत आणि
या कष्टासोबत नशीब हवं.
