Smita Phadatare

Action

1.8  

Smita Phadatare

Action

आयुष्य असो किंवा मग व्यक्ती..

आयुष्य असो किंवा मग व्यक्ती..

2 mins
345


आयुष्यात सगळे लोक भेटतात म्हणजे सगळ्या प्रकारचे, जस की स्वार्थी, फक्त काम करून घेणारे, फक्त काम होण्यासाठी गोड बोलणारे आणि एखादयाशी टाईमपास करण्यासाठी मग त्याची अखंड जिंदगी बरबाद का होईना? पण आपण हे आणि असंच करायचं हे ठरवलेलं असतं, त्या व्यक्तीने. कोणीतरी असं म्हटलंय, मैं पसंत तो बहुत हुं सबको लेकिन उनकी मुझे जरूरत होती है तब.. 

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा घटक बनते. त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो पण, त्या व्यक्तीचा सहवास आपल्या नशिबातच नसतो. कधी ते मिळणारच नसतं तर मग ते आपल्या वाटेत तरी का येतं? मला काय बोलायचे आहे, काय सांगायचे आहे, हे समजत असताना त्या व्यक्तींने न समजल्यासारखं का वागावं.आपली काहीही चूक नसताना, ती व्यक्ती  सारखं सारखं स्वतःहुन म्हणते, आपल्यात कोणत्याही प्रकारच कॉन्टॅक्ट नको, मेसेजेस नकोत, भेटणं नको. पण परत कधी समोरासमोर भेटल्यानंतर काय बोलायचे हे त्या व्यक्तीने ठरवलं असलं तरी का बोलायचे नाही हे पण का ठरवतो? पण भेटल्यानंतर विचारणार काय झालं, काय झालं हे त्या व्यक्तीला माहीत असूनही परत परत हेच का विचारायचं असतं? माहिती नाही.

मग वाटतं...आयुष्य असो किंवा व्यक्ती काहीच कळत नाही कसं वागावं त्याच्याशी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नसतो, अनपेक्षित घडत असतं सतत, काय करायचं हे सुचत नसतं. त्या व्यक्तीकडून आपण स्वतः दुखावला जातो, किंबहुना जात असतो पण मी त्या व्यक्तीला कळतच नसतं किंवा त्या व्यक्तीला समजूनच घ्यायचं नसतं. ती व्यक्ती तशी नसतेच हे आपल्याला पक्कं माहीत असतं. मग ती व्यक्ती तसं का वागते याचा अंदाजच बांधता येत नाही. मग काय होत असतं हे सांगण्यासाठी योग्य ती व्यक्ती भेटत नाही. मग मात्र स्वःताच स्वतः साठी स्वतःशी बोलायचं, सांगायचं, शेअर करायचा आणि स्वतःला प्रगती करण्यात भरपूर वेळ द्यायचा जेणेकरून आपल्या कडे कोणाची वाईट नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये. वाटतं कधी कधी आयुष्य हे त्या सनई चौघडे या चित्रपटातील गाण्यासारखं आहे. किती सुंदर आहे ते गाणं..आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे... 


ट्रेन येतात, ट्रन जातात, तसंच माणसं येतात, माणसं जातात, काही माणसं थांबतात, काही माणसं थांबत नाहीत. जी थांबतात ती आपली असतात, जी थांबत नाहीत, ती आपल्यासाठी आलेलीच नसतात. खूप थकलोय आज कळतंय की, खूप थकलोय. माहिती नाही. पण माणसं ओळखण्यात चुक झाली म्हणून थकलोय का असं ही वाटतं कधी कधी? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action