धनु कोष्ठक - ९
धनु कोष्ठक - ९
23.29
“हे कोस्त्याचे नोट्स आहे, झेन्या. हे ते आहे, जे तो मृत्युच्या काही दिवसांपूर्वी लिहीत होता. ह्यांना कुणीही पहिलेलं नाहीये, फक्त मला सोडून. कुणीही वाचलेलं नाहीये, फक्त मी वाचलंय. ह्यांच्या अस्तित्वाबद्दल कुणी कल्पनाही नाही करू शकंत. माझा नवरासुद्धा. माहीत नाही की मला डिटेक्टिवला दाखवायला पाहिजे होतं किंवा नाही, कदाचित मी चांगलंच केलं, की नाही दाखवलं, तपासांत ह्यांची काही मदत नसती झाली, पुन्हां प्रश्न हासुद्धां आहे, की त्यांनी कुठून सुरुवात केली असती.”
हिरवी नोट-बुक, पारदर्शी प्लास्टिकच्या कवरमधे, अजूनपर्यंत तिच्या हातातंच आहे.
“तो माझ्यापासून ही लपवायचा,” मरीना सांगत राहते, “तरी मी बघितलं होतं, की तो काहीतरी लिहितोय, पण माझ्या डोक्यांत सुद्धा येऊं शकंत नव्हतं की ते काय आहे. मला वाटायचं, की ऑफिसबद्दल आहे. मला फक्त येवढं नाही कळलं, की तो हाताने कां लिहितोय, आपण सगळेच ब-याच काळापासून रेघोट्या ओढंत नसतो, तूसुद्धां तर हाताने नाही लिहीत? आणि तो बहुधा कम्प्यूटरवर बसलेला असायचा. आणि अचानक झालं – असं.”
मरीनाला वाटतं की तो काहीतरी म्हणेल, पण कपितोनव चुपंच राहतो, म्हणून ती पुढे सांगते:
“हा एकदम विशिष्ठ लेख आहे.”
“मैथेमैटिक्सशी संबंधित काहीतरी?” कपितोनव विचारतो.
“हो, ह्यांत आहे, तुमच्या ब्यूस्टेबद्दल, पण फार जास्त नाही, त्याबद्दल आहे, जे तुम्हीं लोक तिथे करायचे...खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दल, जसं, तुमच्या त्या ... ‘मीट’च्या समोस्यांबद्दल...”
“कोणच्या समोस्यांबद्दल?”
“मासेभरलेल्या, तुला आत्ता आठवंतसुद्धां नाहीये. तुम्हीं लोक तिथे काहीतरी करायचे, काही कैल्कुलेशन्स, डिस्ट्रिब्यूशन्स, तुला जास्त चांगलं माहितीये. मलातर तुमच्या ह्या मैथेमेटिकल-स्टैटिस्टिक्सबद्दल काही माहीत नाहीये...ह्यांत आहे त्या...फैक्टोरियल कॉन्ट्रास्ट्स आणि अश्याच कोणच्यातरी वस्तूबद्दल...माहितीये, हे खूप कठीण नोट्स आहेत, पण मला तोंडपाठ आहेत.”
“म्हणजे, त्यांत कैल्कुलेशन्स आहेत?”
“तू काय म्हणालास?”
“त्यांत काय फॉर्मुले आहे?’
“फॉर्मुले कशाला? काही फॉर्मुले-बिर्मुले नाहीयेत. फक्त शब्द आहेत. जीवनाबद्दल. पण बिल्कुल, मानवी नाहीयेत. किंवा, कदाचित, मानवी असतील, पण मूखिन सारखे नाहीयेत. तो वेगळ्याच प्रकाराचा होता, अगदी वेगळ्याच प्रकाराचा. प्रेमळ, उत्साही, खूप बुद्धिमान. तो विद्रूप नव्हता, हो ना? मी बाह्य रंग-रूपाबद्दल सांगत नाहीये.”
कपितोनवला गप्प राहणंच ठीक वाटतं.
“तो कोणाचा हेवा करंत नव्हता, तुझातर हेवा नाही करायचा?”
“माझा?”
“मी ह्याचबद्दल म्हणतेय. किंवा सगळ्यांच्या डोक्यांत असंच होत असतं? मी माझ्या नव-याबरोबर राहते, तो चांगला आहे, पण, त्याच्या डोक्यांत सैतानंच जाने काय चाललंय? किंवा, तुझ्या, मलातर माहीतंच नाहीये, की तुझ्या डोक्यांत काय चाललंय. जसं, तुला सगळं ‘वाटतं’. कदाचित तू शांत ‘सनकी’ आहेस, आणि मला हे माहीतंच नाहीये. माझं फक्त स्वतःबद्दल विशेष मत असू शकतं. माझ्या डोक्यांत सगळं व्यवस्थित आहे. बस, ह्याच गोष्टीची सगळ्यांत जास्त भीती वाटते. कदाचित मी नॉर्मल नसेन?”
“तू अगदी नॉर्मल आहेस. आणि तुला शांत करण्यासाठी मी तुझ्यासमोर स्वीकार करतो, की माझ्या डोक्यांतपण सगळं व्यवस्थित आहे. जर माझ्या डोक्यांत काही समस्या आहे, तर...फक्त ही, की मला झोप नाही येत...”
“मी तुला वोलोकोर्डिन देईन, एक लहानशी बाटली, फक्त आठवण देशील.”
“ठीक आहे, थैन्क्यू, आठवण करून देईन. आणि, तुमच्याकडे टैक्सी कशी बोलावतांत?”
“अगदी सोपं आहे. थोडं थांब, पण जर असं आहे, तर हे आणखीनंच वाईट आहे. जर असं आहे, जर आपण सगळे नॉर्मल आहोत, तर मग what the hell is this? असं त्याच्याबरोबरंच कां झालं? हे काय आहे?”
“मरीनच्का, मला कळंत नाहीये, की तू कशाबद्दल बोलतेयस?”
“तू हे वाचायला सूरुवात करशील, त्या आधी मी तुला सांगून ठेवते. ह्या नोट्समधे बरेचसे अंतरंग वर्णन आहेत. विशेषकरून माझ्याबद्दल, पण पानं तर फाडता येणार नाहीत? मला लाजिरवाणं वाटतंय. हे वाचणारा तू पहिला आणि शेवटचा असशील. मला सोडलं तर.”
“मरीना, तुझी इच्छा आहे का, की मी हे वाचावं?”
“हो, नक्कीच, मला खरंच असं वाटतं. जर तुला आवडत असेल तर, मी कधीही प्रबल आवेगाचं नाटक नाही केलं, ह्या बाबतीत त्याने गडबड केलीये. तुला ह्यासाठी सांगतेय, की तू चुकीचा निष्कर्ष नको काढू. आवेगाची स्थिति नेहमीच असेल, असं नव्हतं, असं अजिबात नव्हतं, पण ह्यांत, सैतान घेऊन जावो, नाटक कशाला? आणि जेव्हां मी हातांत खिळे काढायचा हातोडा घेऊन उभी होते, त्याने मला चांगलंच घाबरवलं, आणि त्याचे ओठ, खरंच, खूपंच थंड होते.”
“म्हणजे असं... मी ते नाही वाचणार.”
“तू वाचशील. हॉटेलचा पत्ता काय आहे?”
ती टैक्सी बोलावते – ‘सगळ्यांत स्वस्त आणि वेगवान.’ “वाचशील, वाचशील...मी बरेचदां विचार करते, की आपल्यांतील संबंध कधी बिस्त-यापर्यंत कां नाही पोहोचले. माहीत नाही?”
“कदाचित अश्यासाठी...कारण, की कदाचित, आपण मित्र आहोत.”
“पास! उत्तर कबूल आहे. तू हे शेवटपर्यंत वाचशील आणि, जर तुला वाटलं तर मला काही सांगशील. पण, फक्त, जर वाटलं तर. कदाचित, माझ्या डोक्यापर्यंत जे पोहोचंत नाहीये, ते तुला समजेल. कदाचित, तुला एखादी अशी गोष्ट माहीत असेल, जी मला माहीत नाहीये, शेवटी, तुम्हीं दोघांनी बरोबर काम केलं होतं, तुमचे कॉमन फ्रेण्ड्स आहेत. जे...थोडक्यांत, मी तुला विनंती करते, की हे वाच. सांगून ठेवते, की सुरुवातीला वाचणं कठीण जाईल, पण मग...मग सोपं वाटेल. मी हे तुला मुद्दाम सांगतेय, ज्याने तू घाबरून जाऊं नये. नाहीतर दोन-चार पानं वाचून फेकून देशील. आणि, ह्या गोष्टीनेपण घाबरू नकोस, की हे हाताने लिहिलेलं आहे...त्याचं अक्षर खूप छान आहे. हे बघ.”
ती नोटबुकचं मधूनंच एक पान उघडून दाखवते, आणि तिला हातांतून दूर न करता, आपल्या भूतपूर्व नव-याच्या हाताने लिहिलेली दोन पानं दाखवते.
“मी कशाची वाट बघतोय? मूखिनच्या बायकोशी – ह्या एका विचारानेसुद्धां...” कपितोनोव उजव्या पानाची सगळ्यांत वरची ओळ वाचतो. हे तो कोणाबद्दल लिहितोय? आपल्या स्वतःबद्दल? पण आश्चर्य दुस-याच गोष्टीचं होतंय :
“मला माहीत नव्हतं की तो सुलेखक होता.”
“जास्त तारीफपण नको करायला.”
“पण, आम्ही सगळेतर असं लिहितो, जसे कोंबंडीच्या पंजाच्या खुणा असतात.”
“तुला असं वाटतं का, की हे अक्षर त्याचं नाहीये?” मरीना गंभीरतेने विचारते.
कपितोनवला कळंत नाही की काय म्हणावं.
“टैक्सी गेटवर आहे,” ऑपरेटर सूचना देतो.
“तर, असं आहे,” मरीना म्हणते. “आणि, आता मला वचन दे. पहिली गोष्ट : तू ही सम्पूर्ण वाचशील. दुसरी गोष्ट: उद्या परंत करशील.”
“स्पष्टंच आहे, उद्या. परवा तर मी परंत चाललोय.”
मरीना नोटबुकमधे स्वतःचं विज़िटिंग कार्ड ठेवते. ते निरोप घेतात. त्यांनी दारावर एकमेकाचं चुम्बन घेतलं.
आठवड्याचा हा दिवस होता – शनिवार, जो ह्याच क्षणाला संपंत होता : कपितोनव बाहेर निघतो, त्याच्या हातांत मूखिनच्या नोटबुकचं पाकिट आहे, आणि अशा प्रकारे येऊन ठेपतो,
रविवार.
00.06
इथलं पीटरबुर्ग बिल्कुल पीटरबुर्गी नाहीये, काहीतरी एक टिपिकल वस्तू डोळ्यांत गडतेय, - कपितोनवला ती फिल्म आवडंत नाहीये, जिला कारच्या खिडक्यांतून दाखवतांत आहे.
टैक्सी ड्राइवरने हवामानाबद्दल फुकंटची बडबड सुरू केली, ह्याबद्दल की रस्त्यांवर रीगेंट14 शिंपडतात आणि लोकांचा काही मान-सम्मानंच नाहीये, आणि साधारणपणे, एक तर लोकांना मारून टाकताहेत, किंवा त्यांना महागडे औषधं घ्यायला भाग पाडताहेत, - तो पट्कन माहीत करून घेतो की पैसेन्जर मॉस्कोचा आहे, आणि लगेच सांगून टाकतो, की मॉस्कोंततर तो कोणत्याही परिस्थितींत राहणार नाही, जरी तिथे, कदाचित, रस्त्यांची बर्फ जास्त चांगल्या प्रकारे साफ करतांत.
आह, तर असं आहे : पैसेन्जर – भूतपूर्व पीटर्बुर्गवासी आहे.
“तर, मग, कंटाळवाणं तर नाही होत?”
दोन तासांपूर्वी हेच विचारलं होतं.
कपितोनवने म्हटलं की त्याला लहानपणापासून पीटरमधे असा बर्फ पडल्याचं आठवंत नाहीये.
“मागच्या हिवाळ्यांतसुद्धा कमी नव्हता,” आपल्या शहराबद्दल गर्वाचा अनुभव करंत ड्राइवर उत्तर देतो.
“मागच्या हिवाळ्यांत मी इथे नव्हतो आलो.”
“अरे, उगीचंच. येऊंपण शकले असता. मस्त असते हवामान. यायला पाहिजे होतं, न येण्यांत काही अर्थ आहे? तुम्हीं येत चला.”
विचित्र गोष्ट आहे : कपितोनवला असं वाटतं की त्याला भूतकाळांत बोलावताहेत. पण, कां नाही? आमंत्रणतर नेहमी भविष्यकाळासाठीच असतं, हे बरोबर आहे, पण ह्या आमंत्रणांमधे जास्त करून फक्त अलंकारिकंच असतात, तेवढ्याच यशस्वीपणाने भूतकाळांत आमंत्रित कां करूं नये?
ह्या दरम्यान ड्राइवर कपितोनवला शहराच्या टैक्सी-उद्योगाच्या यशाबद्दल सांगतो. काही काळ पीटरबुर्गच्या रस्त्यांवर जाण्यायेण्यासाठी शेयर्ड टैक्सी ‘बोम्बिल’चा गवगवा होता (जी आपणहूनंच बोम्बलली), जिचं संचालन लोकांचे समूह करायचे, आणि आता लोक, आधीसारखेच, टेलिफोन करून घरी टैक्सी बोलावतांत, स्वस्त, वेगवान आणि आरामशीर.”
“वाह, फेब्रुवारीचा महिना सुरू झालाय, आणि तुमच्याकडे अजूनही चौकावर क्रिसमस ट्री आहे.”
“हे नव्या वर्षाचं नाहीये.”
“असं कसं नाहीये नव्या वर्षाचं? अगदी पूर्ण माळांनी लगडलंय!”
ड्राइवरला कळंत नाही, की ह्याचं काय उत्तर द्यायचं, म्हणून त्याच्या डोक्यांत जी पहिली गोष्ट येते ती सांगून टाकतो:
“दिवसातर ‘जाम’ लागलेला असतो. फक्त रात्रीचं चालवूं शकतो.”
कपितोनवला पार्क केलेल्या गाड्यांच्या ऐवजी बर्फाच्या मोठ्या-मोठ्या टेकड्या बघण्यांत मजा वाटतेय, पण त्याला आणखीनही काहीतरी पहायचंय. ड्राइवर बरोबर आहे: कपितोनवला पीटरबुर्गची आठवण येत असते. आणि, जर कार एक-दोन घंट्यासाठी – तीन घंट्यासाठी भाड्यावर घेतली, रात्री नेवाच्या तटांवर, नेव्स्की प्रॉस्पेक्टवर, जुन्या कोलोम्नावर...तर किती खर्च येईल?...सुमारे दोन हजार?
“दोन हजारांत तर मी एकदम आत्ता, ह्या क्षणी, तैयार आहे,” ड्राइवर म्हणतो.
“मी तयार नाहीये,” कपितोनव म्हणतो.
“बरं, असं करूं या,” ड्राइवर म्हणतो. “मी ऑपरेटरला फोन करून देईन, सांगून देईन की गाडी बिघडलीय, हे सोपं आहे.”
“नाही, थैन्क्स, काम आहे.”
“रात्री – काम? कामतर मला आहे. तुम्हांला काय काम आहे? नंतर नाही होणार. आज मी नेवावरून येत होतो, तिथे बर्फ कापायचं मशीन जात होतं, पाण्यावर वाफेची भिंत तयार झाली होती...महालांपेक्षाही उंच! काय सुरेख होतं! आणि, ती एका ठिकाणी उभी नाही राहात, तर नेवावर तरंगतेय आणि गोल-गोल फिरतेय, पण फारचं लवकर तरंगतेय, थोडीशी टक्कर लागली की पूर्णची पूर्ण खाडींत!...तर? नाहीतर हे काय फिरणं झालं? तीनशे रुबल्स...खिडकीतून बघण्यासारखं काहीच नाहीये...”
“पुन्हां केव्हांतरी,” कपितोनव म्हणतो.
वाद घालण्यासारखं काहीच नाहीये – हा शहराचा सर्वोत्तम भाग नाहीये.
“पुन्हां केव्हांतरी – तर तुम्हीं माझ्याशिवाय जाल.”
0.33
तिस-या मजल्यावर सगळे झोपले नाहीयेत, ह्याबद्दल कपितोनवला लिफ्टमधून बाहेर पडल्याबरोबर कळतं. हल्ल्याचं स्त्रोत कॉरीडोरच्या दुस-या दाराच्या मागे आहे: सहयोगी पीत आहेत. उजवीकडे लॉबी-कॉर्नर आहे – कपितोनव निघून गेला असता, जर डोळ्याच्या कोप-यातूंन बंद टी.वी.च्या समोर खुर्चींत बसलेल्या एका माणसाला बघितलं नसतं. हा झोपलाय कां? की त्यापेक्षांही वाईट काहीतरी आहे? बेहाल, चेह-यावर वेदनेचे लक्षण, डोळे न उघडता तो म्हणतोय:
“तुम्हांला काय वाटतं की स्वादिष्ट आहे, पौष्टिक आहे?”
‘माझा शेजारी आहे.,’ कपितोनवला अंदाज येतो.
“तुम्हीं कशाबद्दल बोलताय?”
“मी काळाबद्दल बोलतोय. वर्तमान काळाबद्दल. बकवास, बकवास, बकवास.”
तर हा आहे कपितोनवचा शेजारी – काळ-भक्षक, त्याने अंदाज लावला.
“कदाचित, तुम्हांला डॉक्टरकडे जायला हवं?”
“आणि कदाचित, तुम्हांला डॉक्टरकडे जायला हवं?”
“ओह, माफ करा.”
कपितोनव कॉरीडोरमधून आपल्या खोलीकडे जातोय, पण तेवढ्यांत दार उघडतं:
“मास्टर, हे तुम्हीं आहांत? या, प्रकाशांत तुमचं स्वागत आहे!”
आणि एक अज्ञात, घातक शक्ति कपितोनवला तिकडे घेऊन जाते.
टेबल, खाण्या-पिण्याच्या वस्तू, ब्रेड, फरशीवर विखुरलेले पत्ते.
हा हाइपर-पत्तेबाजांचा, हाइपर-सट्टेबाजांचा क्लब आहे – सगळं कळलं, की कुठे फसला होता.
पलंगावर पाय वर करून एक खूप आनन्दी मुलगी बसली आहे. कपितोनवला खूप आश्चर्य होतं – ही तीच मुलगी आहे, जिला त्याने संध्याकाळी स्टेजवर बघितलंय.
नाही, थैन्क्स, तो वोद्का नाही पीत. नाही, थैन्क्स, त्याला अजून काम करायचंय. हो, असंच आहे, रात्री काम करणार आहे. नाही, अंकांवर नाही, एका लेखावर. ठीक आहे, - जर इथे सगळे असेच प्रतीकवादी आहेत, तर प्रतीकात्मकरूपाने ‘हो’. प्रोटोकोल. आपल्या सामूहिक सफलतेसाठी आणि तब्येतीसाठी!
ते मागणी करतांत की त्याने आपला ‘कमाल’ दाखवावा.
“तान्कावर प्रयोग करा.”
“तान् त्याच्यासाठी कोणचातरी अंक मनांत धर, तो दाखवेल.”
“खरंच, हो? त्यांत काय आहे, मी धरूं शकते. आणि काय, तो ओळखेल?”
कपितोनव जोडायला, वजा करायला सांगतो. हे खूप सोपं आहे: तिचा अंक आहे 23.
तान्या ओरडते, ‘ब्रेव्हो’. तिच्यावर कोणीच विश्वास नाही करंत, सगळे ओरडतांत की ती कपितोनवसाठी खोटं बोलतेय, तिने दुसराच अंक धरला होता. कपितोनव तिथून जायचा प्रयत्न करतो, त्याला सोडंत नाही. तेवढ्यांत कळलं की अजूनपर्यंत सार्डीनचा15 डबा उघडलेलांच नाहीये. तात्यानाला ड्यूटी-ऑफिसरकडे कैन-ओपनर आणायला पाठवतांत. ती पलंगाच्या एका बाजूने उडी मारून चुपचाप चालली जाते.
कपितोनव जायचा प्रयत्न करतो, त्याला पुन्हां थांबवून घेतात.
बो-या सैप, हाइपर-चीट, ‘सेका’16 खेळायला सांगतो. कपितोनवला जायचंय.
“तो आपल्याला कमी लेखतो!”
“ठीक आहे, ‘फूल’17 – वन-टू-वन.”
बो-या सैप पत्त्यांची गड्डी पिसतो, कपितोनवला कापायला देतो, वाटतो.
“तुम्हीं ट्रम्प काय निवडणार?”
“चौकट,” कपितोनव म्हणतो.
गड्डीच्या खाली चौकटची छक्की पडलेली होती.
कपितोनवच्या हातांत फक्त ट्रम्पचेच पत्ते आहेत – चौकटच्या नहल्यापासून इक्क्यापर्यंत.
हरणेतर अशक्यंच होतं, पण त्याला माहीत होतं की तो हरेल, नाहीतर काही अर्थच नाहीये. आणि, आता कुणी दुसरांच ओरडतो : “खोटारडा! खोटारडा!” – आणि तो कपितोनवच्या बाहीतून दुसरा इक्का काढतो, हापण चौकटचाच इक्का आहे, पण ह्या गड्डीतला नाही. “खरंच खोटारडा आहे!” – आणि बरेंच हात त्याच्या दिशेने येतांत आणि कपितोनवच्या बाह्यांतून, कॉलरच्या खालून, खिश्यातून चौकटचे इक्केच इक्के काढतांत...तो प्रतिकार करायचा प्रयत्न करतो.
“कैण्डल स्टैण्डने मारणं पण कमीच शिक्षा आहे त्याच्यासाठी!”
त्याला जायचंय – जाऊ नाही देत. खेळ पूर्ण करायचा!
कपितोनव पूर्ण खेळ खेळला.
कपितोनव हरला.
एक आवाज ऐकूं येतो:
“आणि कशावर पैज लावली होती?”
आणि दुसरा शेरा मारतो:
“मोबाइल फोनवर!”
आणि तिसरा:
“अमर आत्म्यावर!”
“ठीक आहे,” कपितोनव उठतो. “मी तुमच्या कलेचा सम्मान करतो.”
पण तेवढ्यांत एकाने मनांत कोणचीतरी संख्या धरली – ती ओळखावी लागेल.
“दहा जोडा,” भुवया उंचावून कपितोनव म्हणतो.
“स्वतःच जोडून घे,” संख्या धरणारा त्याला म्हणतो.
“ठीक आहे, तर मग माझ्याशिवायंच खेळून घ्या.”
“अरे जोडून घे नं! तुला दुःख होतंय कां?” चीट्स-उस्ताद संख्या धरणा-याला ओरडून सांगतात.
“बरं, बरं, जोडले.”
“सात वजा करा.”
“मला काही दुःख नाही, वजा केले.”
“50.”
“60.”
“चूक.”
“चूक म्हणजे काय? मी काय खोटं बोलतोय?”
“50,” कपितोनव गंभीरतेने पुन्हां म्हणतो.
“मी म्हटलं 60! सिद्ध करा की 50 आहे.”
“50, आणि बनवा-बनवी करायची काही गरंज नाहीये.”
कपितोनव जायचा प्रयत्न करतो, आणि तो कपितोनवची कॉलर धरण्याचा प्रयत्न करतोय.
कपितोनव त्याच्या हातांवर मारू लागतो. कपितोनव रागांत आला. कन्स्ट्रक्शन-ब्रिगेडमधे त्याचं टोपणनाव होतं साइको-मैथेमेटिशियन.
तो टेबलापासून दूर उसळला, खुर्ची उचलली, खुर्ची फिरवूं लागला – गंभीरतेने आपला उद्देश्य प्रदर्शित करू लागला.
“तर?”
हात तर लावून बघा!
तो हल्ल्याचं उत्तर द्यायला तयार आहे. फक्त जेव्हां रक्त बघतो, तेव्हांच सहन करूं शकंत नाही – अंधारी येते. हाइपर-चीट्स “शांति! शांति!” ओरडतात, - त्यालासुद्धां शांत करायचा प्रयत्न करतात आणि कपितोनवलासुद्धा.
“खबरदार, काच फोडशील!”
“इथून निघून जा, तुम्हीं आमच्या परंपरेचे नाही!”
तो मूखिनच्या नोटबुकचं पाकिट उचलतो, जे जमिनीवर पडलं होतं, आणि बाहेर निघून जातो. त्याच्या आंत सगळंच खदबदतंय, आणि हात जणु खुर्चीचा पाय मुरगळतोय.
कॉरीडोरमधे तात्यानावर आदळतो, जी कैन-ओपनर घेऊन येत आहे.
“तुम्हीं तर एक्ट्रेस आहांत! तुम्हीं चमत्काराबद्द्ल सांगत होता! तुम्हीं इथे कश्या? पळा, पळून जा!...”
“मी? एक्ट्रेस? काय, पापाजी, रंगांत आले कां? झाकण सरकलंय का?”
खरंच चूक झाली होती. आणखी कुणी समजला होता – सुरुवातीलाच. स्टेजवर कुणी दुसरी होती.
पण संख्या त्याने अगदी बरोबर ओळखली होती. ह्यांत काही शंकाच नाहीये.
पण संख्या त्याने अगदी बरोबर ओळखली होती. ह्यांत काही शंकाच नाहीये.

