धनु कोष्ठक - ८
धनु कोष्ठक - ८
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
22.55
“बस!” खुर्चीतून उठायच्या त्याच्या प्रयत्नाला विरोध करंत मरीना म्हणते.
“तुला घाई नाहीये. रात्री आमच्याकडे थांब. आमच्याकडे एक खोली रिकामी आहे.”
“मी त्याचा अपमान केला कां?”
“नाही. त्याला खरंच लवकर उठावं लागत. तो भारद्वाज पक्षी आहे. हे तर आपण आहोत घुबंड.”
“थिओडोर नसल्यामुळे वातावरण जास्त शांत, मोकळं झालं.
कपितोनव रात्री थांबायला नाही म्हणतो.
“रात्रभर फ्लैटमधे हिंडत राहीन, भुतासारखा. कशाला?”
मरीना विचारते:
“तुला तो नाही आवडला?”
“कां नाही आवडलां? बिल्कुल आवडला.”
“मी अगदी ठीक आहे, तू काही विचार नको करूंस,” मरीना म्हणते.
“मी बघतोय, विचार नाही करंत.”
“नाही, खरंच, आमच्यांत सगळं अगदी नॉर्मल आहे,” आणि पुढे म्हणते, “मूखिनपण ‘बोरिंग’ होता.”
“मरीन, मी विचारलं नाही...मला आत्तापर्यंत कळलं नाही की मूखिन बद्दल शेवटी काय झालं...तपास आणि बाकी सगळं...”
“काहीच नाही. ‘केस’ बंद करून टाकली. उत्तरांपेक्षा प्रश्नंच जास्त होते. काही दिवसांपूर्वीपर्यंत मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव ठेवायचा विचार करंत होते. आता तसं नाही वाटंत. पण ज्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये, ती ही आहे, की तो ‘तोच’ होता.”
“तेव्हां, अंत्य संस्काराच्या वेळेस मी खूप निरर्थक बोलंत होतो, तू माफ करशील.”
“कोणाच्या लक्षांत राहतंय.”
“नीनाच्या लक्षांत होतं.”
“नीनोच्का...बघतोयंस नं, आपल्यासोबत कसं सगळं एकसारखं होतं. मी त्या वेळेस येऊंच नाही शकले, ह्या गोष्टीसाठी तू मला माफ़ कर.”
आन्काबद्दलसुद्धां विचारलं.
“तुझ्याकडे फोटो आहे कां?”
त्याच्याकडे आहे – मोबाइलमधे.
“ओय, सुन्दर! ओय, प्रिन्सेस!...मला तिची त्यावेळची आठवण आहे. हवा भरलेल्या मगरीबरोबर. ती मला ‘मलीना आन्ती’ म्हणायची.”
“ती मगर तूच तर तिला दिली होती...”
“ओह, हो.”
“ती ‘साउथ’मधे त्याला सोडायचीच नाही.”
“मुलांसाठी!” मरीना प्याला उचलते.
प्याले किणकिणले.
प्यायल्यानंतर कपितोनव म्हणतो:
“आमच्याकडे कुठेतरी काहीतरी चांगलं नाही होत आहे.”
“आमच्याकडे...काय बिल्कुलंच चांगलं नाहीये?”
“ओह, नाही, माझ्यांत आणि तिच्यांत – तिच्यांत आणि माझ्यांत, तिच्याबरोबर माझे...”
“प्रॉब्लेम्स?”
“नेहमी भांडंत असतो. ती मला, कदाचित, तानाशाह समजते. मी काहीही विचारलं तरी ते जसं तिच्या स्वातंत्र्याचं, स्वाधीनतेचं, प्रभुसत्तेचं हनन असतं. मी तर काहीही विचारणंच सोडून दिलंय. दुस-या बाजूने बघतां, मी कां नाही विचारू शकंत? मी, काय – बाहेरचा माणूस आहे? ती स्वतःच तानाशाह आहे!...तिला माझ्या प्रत्येक गोष्टीची चीड वाटते, अगदी प्रत्येक गोष्टीची. नाही: रागाने वेडी होते. ‘मला ह्या गोष्टीचा राग येतो!’ – असं म्हणते.”
‘ऐक, तुझी कोणची गोष्ट तिला राग आणंत असेल?”
“अगं, प्रत्येक गोष्ट! मी जोडे चढवायचं शूहार्न हुकला कां लटकावत नाही. मी लवकर-लवकर कां खातो. समोर हजर असलेल्या लोकांबद्दल मी ‘तो मुलगा’ किंवा ‘ती मुलगी’ कां म्हणतो. टी-बैग्स कां वापरतो. मी इतका तटस्थ कां असतो...प्रत्येक माणसाबद्दल, प्रत्येक वस्तूबद्दल...तिला, उदाहरणार्थ, हे आवडंत नाही की ज्या बाईशी मी तिची ओळख करविण्याचा निर्णय घेतला होता, ती काळा चष्मा कां काढंत नाही. ती मला असं नाही सांगंत, की आवडंत नाही, पण मला तर अनुभव होतो नं, बघतो नं...जसं एखाद्या माणसाकडे काळा चष्मा न काढण्याचं काही कारण असूंच शकंत नाही. कारणं तर असू शकतात. आणि, तिला ह्याच्याशी करायचं काय आहे?”
“खरं आहे, तिला ह्याच्याशी काहीही करायचं नाहीये, पण कारण काय आहे?”
“आता तूसुद्धां. कारण की तिचे दोन्हीं डोळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, एक – गडद भुरा, दुसरा – निळा.”
“तिला हे माहीत आहे कां?”
“कसं नसणार, जर ते तिचे डोळे आहेत?”
“नाही, मी मुलीबद्दल विचारतेय.”
“आणि, तिला माहीत असायलांच पाहिजे कां? असल्या गोष्टी मी समजावूं कां? तू हे ‘सीरियसली’ म्हणतेयंस का, मरीना?”
“कदाचित, समजावयाला नको...पण तू अश्या प्रकारे सांगतो आहेस...”
“टी-बैग्स विकंत घेतो...सांगितलं...लवकर-लवकर खातो...हो...मी वेगळ्या स्वभावाचा कां नाही झालो, झालो तर असा...आपल्या उणीवांशी झगडंत का नाही...”
“ऐक, माझा विश्वास नाही बसंत! ती इतकी डोकं-खाऊ आहे कां?”
“डोकं-खाऊ तर मी आहे! परिभाषेनुसार! ती मलांच डोकं-खाऊ समजते! माहितीये, तिला माझी लाज वाटते. तिला असं वाटतं की ती एका अपयशी माणसाची मुलगी आहे.”
“तिने असं म्हटलं कां?”
“नाही, मला स्वतःच माहीत आहे. मला माहितीये की ती असा विचार करते.”
“कदाचित तू स्वतःच असा विचार करतो – स्वतःबद्दल?”
“मी असा विचार कां करेन? मी ह्याबद्दल कधी विचारसुद्धां करंत नाही. माझी फक्त येवढीच इच्छा आहे, की तिने अपयशी न व्हावं. पण सगळं तिकडेच जातंय.”
“कुणीकडे जातेय? ती अठरा वर्षाची आहे.”
“एका आठवड्यानंतर एकोणीसची होईल. नाही, मरीना. तू तिला ओळखंत नाहीस, तिने स्वतःला अयशस्वी बनवण्याचा प्रोग्राम ‘सेट’ केलेला आहे – जीवनांत अयशस्वी व्हायचा. युनिवर्सिटी – तिला त्यांत प्रवेश मिळाला नाही – सोडतेय, आणि इथेपण मी हतबल आहे. जवळ-जवळ सोडलीच आहे.”
“असं कां?”
“मला सतावण्यासाठी. ती प्रत्येक काम मला सतावण्यासाठीच करते.”
“म्हणजे, तिच्या जीवनांत तुला महत्वपूर्ण स्थान आहे.”
“हो – कारण की मी तिला जगायला ‘डिस्टर्ब’ करतो.”
“तू ‘डिस्टर्ब’ नको करू.”
“पण मी कुठे ‘डिस्टर्ब’ करतो? कोणत्या गोष्टींत?”
“मला कसं माहीत की कोणत्या गोष्टींत? कदाचित तू तिला आपल्या ‘कंटाळवाणेपणाच्या’ कवेंत घेतलं असेल? नक्कीच, घेतलंच आहे!...तुम्हीं सगळे लोक असेच आहांत! ...तिचा काय ‘कुणी’ आहे?”
“चांगला प्रश्न आहे. मला वाटतं की, कुणी आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, तो लग्न झालेला आहे.”
“ ‘वाटतं’, ‘माझ्या माहितीप्रमाणे’...”
“ती मला काही सांगतंच तर नाही. बस, नुसती हसते. मी काय – विरुद्ध आहे? जगायचंतर तिला आहे. एक गोष्ट मी स्वीकार करू शकंत नाही – अनिश्चितता. तिला माहितीये की मला अनिश्चितता सहन नाही होत, पण मुद्दाम...मला वाटतं की मुद्दामंच...”
“मला समजलं नाही, तुम्ही एकत्र राहताय ना? की ती वेगळी राहते?”
“वेगळ राहण्याच्या तुलनेंत, एकत्रंच जास्त आहोत.”
“तर वेगळे झाले असते, वाटणी केली असती. काही प्रॉब्लेम आहे?”
“काही प्रॉब्लेम नाहीये...बस, हे होईल कसं? कुणालातरी हे करावं लागेल...”
‘स्वाभाविक आहे. आणि तो मुलगा? तो कोण आहे?”
“तो कोण आहे? तो ठीक आहे. जास्त वाईट गोष्ट – काहीतरी दुसरीच आहे. मला असं वाटतं, तो, सौम्य शब्दांत म्हणायचं झालं तर तो, अर्धवट, गोंधळलेला आहे. एक न एक दिवस अश्या बिनडोक माणसाला बायको घरातून काढूनंच टाकेल, आणि तेव्हां माझी मुलगी त्याच्याबरोबर राहू शकेल...”
“कदाचित, तू ईर्ष्या करतो?”
“प्लीज़, माफ कर.”
“म्हणजे, वडिलांच्या दृष्टिकोणातूंन?”
“मरीना, तू काय म्हणतेस? ती तरुण आहे. ती प्रेम करते. तिच्याकडे तिची स्वतंत्र खोली आहे. मी सहन करणा-यांपैकी आहे. मी तानाशाह नाहीये. पण, कदाचित, माझं स्वतःचंसुद्धा काही मत असेल. जे, प्रकट करण्याची घाई मी नाही करणार. तिलासुद्धां माहीत आहे, की मी काय विचार करतो. आणि मग...मरीना, मला वाटतं की नीनाच्या मृत्यूसाठी ती मला जवाबदार मानते.”
“पण तुझा तर काही दोष नाहीये.”
“पण मला वाटतं की ती मला आपल्या मम्मीच्या, माझ्या बायकोच्या, मृत्युसाठी जवाबदार मानते...”
“तुला तर बरंच काही वाटंत असतं! ती काय विचार करतेय, हे तुला कसं कळू शकतं?! ऐक, तू फक्त आत्मकेंद्रित आहेस. तू तरुण बाप आहे आणि म्हाता-या खोडासारखा विचार करतोस...”
“ ‘तरुण बाप’,” कपितोनव हसू लागतो.
“तर काय, तरुण नाहीये?”
“हुँ, थैन्क्यू.”
“हरकत नाही. एक गोष्ट मला समजंत नाही, तू तर मनोवैज्ञानिक आहेस.”
“मी, मनोवैज्ञानिक?”
“संख्या ओळखतोस, आणि मनोवैज्ञानिक नाहीये?”
“फक्त दोन अंकांच्या.”
“आणि मनोवैज्ञानिक नाहीयेस?”
“हे मनोविज्ञान नाहीये.”
“तर काय आहे? अंकगणित?”
“काही अंक-बिंकगणित नाहीये.”
“मग काय आहे? टेलिपैथी?”
“माहीत नाही काय आहे. बस, माझ्याने ते होऊन जातं. पण कसं – माहीत नाही.”
“पण, मग तुला माहीत असायला पाहिजे, की दुसरे लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात. आणि तुला काहीही माहीत नाहीये, तुला फक्त ‘वाटतं’. विचित्र गोष्ट आहे. मलातर असं वाटतं, की ती प्रत्येक गोष्ट, जी तुला ‘वाटते’, ती तुझीच कल्पना असते.”
“मी पीटरला येणार नव्हतो, कॉन्फ्रेन्सचं आमंत्रण होतं माझ्याकडे, पण मी ठरवलं होतं की नाही जाणार, पण नंतर, लेव टॉल्स्टॉयसारखं – कालच्या प्रकारानंतर...निघून गेलो. दार धडाम् बंद केलं.”
“त्याने दार धडाम् बंद नव्हतं केलं. काल झालं काय होतं?”
“काल आम्हीं भांडलो, मी थुंकलो आणि निघून गेलो. म्हणजे, आम्हीं भांडलो नाही. तिने, बस, मला पाठवून दिलं.”
“कॉन्फ्रेन्सला?”
“असंच म्हणू शकतो.”
“अभिनंदन. मला वाटतं, की तुम्हीं दोघं अगदी एकमेकाच्या लायकीचेच आहांत.”
“मी तिला म्हटलं, की नीना गेल्यानंतर, ती नीनाची नक्कल करायला लागलीये. आणि, असं करायला नको – स्वर्गवासी आईची नक्कल करणं. मी असं म्हटलं, आणि तिने मला पाठवून दिलं. माझ्या मते, हे ठीक नाहीये.”
“असं म्हणायला नको होतं.”
“पाठवायलासुद्धा नको होतं.”
मरीना खांदे उचकावते.
“माझ्या ‘ह्याला’ म्हणी फेकायला खूप आवडतं. त्याने म्हटलं असतं : प्रत्येका कॉटेजचे आपापले खुळखुळे असतांत.”
“छान, चल, कॉटेजसाठी. तुझी कित्ती छान आहे, आणि खुळखुळ्यांसाठी नाही पिणार.”
प्याल्यांची किणकिण होते.
“माहीत नाही, हे सगळं तुला कां सांगतोय. स्वतःबद्दल मी कोणालाच सांगत नसतो. पण, नाही, आज ट्रेनमधे शेजारीण-पैसेन्जरला सांगितलं.”
“काही हरकत नाही – कोणालाच नाही सांगत, फक्त जुनी मैत्रीण आणि ट्रेनमधल्या शेजारिणीलाच सांगतोस.”
“तिचा मुलगा मन्दबुद्धि आहे. तो मोठांच आहे. बरोबरंच जात होतो. तिला त्याला एडमिरैल्टीचं लहानसं जहाज दाखवायचं होतं.”
“म्हणजे, त्या मुलालासुद्धां सांगितलं?”
“तसं, हो. पण तो ऐकंत नव्हता.”
“आणि तुझी मुलगी तुझ्या योग्यतेबद्दल काय म्हणते?”
“तुला असं वाटतं का की मी फक्त आपल्या योग्यतेचंच प्रदर्शन करंत बसतो? तिला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. शांतपणे बघते. मी त्यांच्यापैकी नाही, जे तिला चकित करूं शकतात. जर मी पाण्यावरसुद्धां चालंत असतो, जसा जमिनीवर चालतो, तर हे सुद्धां तिने शांतपणेच बघितलं असतं...”
“पण, जाऊ द्या, पाण्यावरतर तू चालणार नाहीस, तर तुझ्या पाण्यावर चालण्याला तिने कसं बघितलं असतं – ही, पुन्हां कल्पनेचीच गोष्ट आहे, बस.”
“हो, आत्ताच कल्पनेबद्दल नाटक दाखवंत होते.”
“तू म्हटलं होतं, की स्पर्म्सबद्दल.”
“मला समजंत नाहीये, की ते कश्याबद्दल होतं. ऐक, मरीन, तुला काय खरंच टेलिपैथींत विश्वास आहे?”
“टेलिपैथींत कां?”
“तू मला टेलिपैथीबद्दल विचारलं होतं.”
“माहितीये ना, मी, तसा, पट्कन विश्वास करते. मी प्रत्येक गोष्टीवर विश्वास करूं शकते,” मरीना उत्तर देते आणि, कपितोनव चुपचापंच राहतो, पुढे म्हणते – हळूंच: “मी कोष्ठकांवरसुद्धां विश्वास करू शकते, धनु-कोष्ठकांवर.”
“कश्यावर विश्वास करतेस?”
“हो, बस, आपापले खुळखुळे...”
दोघंही चूप आहेत.
“तू काहीतरी म्हटलं, पण मला समजलं नाही.”
“बघ, मी ना तर ट्रेनमधे पैसेंजर्सला भेटले होते, ना ही कोण्या मंदबुद्धीला, ज्यांना अत्यंत वैयक्तिक गोष्टी सांगू शकले असते. पण फक्त तुला. आणखी कुणाला नाही सांगू शकंत. मी आत्तांपर्यंत ह्याबद्दल कोणाशीच बोललेले नाहीये. अगदी कोण्णाशीच नाही.”
“कशाबद्दल?”
ती प्यालातली वाइन संपवते, मिठाची बाटली टेबलावरंच इकडे तिकडे करते आणि सरळ कपितोनवच्या डोळ्यांत बघते.
“जर मी काही चूक बोलेन, तर दुरुस्त करशील,” मरीना म्हणते. “मैथ्समधे धनु-कोष्ठकांचा उपयोग केला जातो, हो ना? म्हणजे, अशा प्रकारचे,” – बोटांनी हवेत बनवून दाखवते. “चौकोनी-कोष्ठक नाही. त्यांचा प्रयोग लैब्नित्ज़ने13 केला होता. मी बरोबर सांगतेय?”
“लैब्नित्ज़बद्दल मला जास्त माहिती नाहीये. कदाचित, त्यानेपण केला असेल. कां नाहीं.”
“त्यानेच, अगदी त्यानेच. मला उत्सुकता वाटली. मला सांग, त्यांचा काय उपयोग आहे.”
“तुला हे तर माहितीये की मैथ्समधे धनु-कोष्ठकांचा प्रयोग कुणी केला होता, आणि हे नाही माहीत की कां?”
“मी तर त्यांच्या प्रयोग नाही करंत. मला फक्त इतकंच नको सांगू की ते शाळेच्या पाठ्यक्रमांत आहेत.”
“पण तुला त्यांची गरज कां पडली?”
“बस, असंच.”
“असंच? जर असं आहे, तर म्हणजे...कोष्ठक, म्हणतेस...मैथ्समधे कोष्ठकांची आवश्यकता कां असते? ज्याने की आपल्या आत काहीतरी ठेवता यावे, बंद करता यावे. आधी ठेवतात लघु-कोष्ठकांत, आणि, ते, जे लघु-कोष्ठकांत बंद आहे, त्याला चौकोनी कोष्ठकांत ठेवतात, आणि ते, जे चौकोनी कोष्ठकांत ठेवलंय, त्याला ठेवतात धनु-कोष्ठकांत. काटेकोरपणे सांगायचं तर, कोष्ठकाचा प्रकार आत ठेवण्याची, सुरक्षिततेची पातळी दर्शवतो.”
“काय ‘सुरक्षितता’ - असा कोणता शब्द आहे कां?”
“ ‘सुरक्षितता’,” कपितोनव आपलं म्हणणं चालू ठेवतो. “धनु-कोष्ठक तिस-या पातळीची सुरक्षितता प्रकट करतात.”
“आणि चौथी पातळी कोण दर्शवतं? आणि पाचवी? आणि सहावी?”
“त्याच्या पुढेसुद्धां धनु-कोष्ठक लावूं शकतो, पण बहुधा तिथपर्यंत जायची गरंज नाही पडंत.”
“का नाही पडंत?”
“अश्यासाठी नाही पडंत. अशासाठी, की आपल्याला सुसंबद्धता आवडते. स्पष्ट संक्षिप्तता.”
“खात्री नाही वाटंत,” मरीना म्हणते.
“कशाची?” कपितोनवला कळंत नाही.
“साधारणपणे, ते सुरक्षा करतात. मलापण असंच वाटंत होतं, जसं तू सांगितलंस.”
“मी काय म्हटलं? कोणाची सुरक्षा करतांत?”
“आणि तू फार चांगलं समजावलंस : सुरक्षितता.”
“मरीनच्का, आपण कशाबद्दल बोलतोय?”
“दोन मिनिट थांब, प्लीज़? मी आत्ता तुझ्यासाठी काहीतरी आणते.”
मरीना दारामागे जाते. कपितोनव तुकड्यांनी एक चौकट बनवतो. असं वाटतंय की तिने शिडी ठेवली आणि पोटमजल्यावर चढतेय.