Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - ६

धनु कोष्ठक - ६

9 mins
159


19.55 


हॉलमधे येऊन ‘तलाव’ कपितोनोवला निरोप द्यायची घाई नाहीं करंत. तो त्याला रिसेप्शन डेस्कपर्यंत नेतो. त्याला कळतं की ईवेन्ट्स-आर्किटेक्ट परंत आलेला नाहीये. 

“एक सेकण्ड,” ‘तलाव’ म्हणतो आणि टेलिफोनचं रिसीव्हर उचलतो. “ओलेच्का, मी इथे खाली आहे, एव्गेनी गेनादेविच कपितोनवबरोबर, त्यांना झोपेची प्रॉब्लम झालेली आहे, आणि त्यांच्या भिंतीच्या पलिकडचा शेजारी – तुला माहितीये, की कोण आहे. दुसरी गोष्ट अशी, की आपल्या आर्किटेक्टने अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. तर, एव्गेनी गेनादेविचला आर्किटेक्टच्या खोलींत, जी त्याच्या खालच्या मजल्यावर आहे, शिफ्ट करणं शक्य आहे का?...ओह, कां...जर आर्किटेक्ट आला, तर त्याला कसंतरी समजावून देशील...हं? हे काय इतकं कठीण आहे?...” तो नाराजीने काही अडचणींबद्दल ऐकतो, मग म्हणतो:

“पण आपण एव्गेनी गेनादेविचला ह्या सगळ्या त्रासाच्या ऐवजांत कमींत कमी ट्रेनने नाही, पण विमानानेतर मॉस्कोला पाठवूंच शकतो?...आणि रिज़र्व फण्ड, ओल्या?...नाही, माझं तात्पर्य काळ्या बॉक्सशी आहे..तू बघ तर खरं...नाही डियर, आधी तू बघ, आणि मग सांग की रिकामा आहे...हो, आत्ता, ह्याच क्षणी.”

त्याने रिसीव्हर बाजूला केला.

“ दिलगीर आहे, की काळ-भक्षक आणि ईवेन्ट्स-आर्किटेक्ट एकाच मजल्यावर नाही राहू शकंत. पण मला वाटतं, की तुम्हांला विमानाची भीति नाहीं वाटंत?”

त्यांनी हस्तांदोलन केलं. ‘तलाव’ बाहेर निघून गेला.


20.01

रिसेप्शन डेस्कच्या वरचा इलेक्ट्रोनिक बोर्ड 20.01 दाखवतोय. कपितोनव हे समजण्याचा प्रयत्न करतो की ‘तलाव’ला अस्वस्थ्य शेजा-याबद्दल कसं कळलं? खोलींत परंत जाऊन ओकारीचा आवाज कपितोनवला खरोखरंच ऐकायचा नाहीये. तसा ही टाईम – बस, इंटरवल होण्यातंच आहे. आणि जर खरोखरंच इंटरवल झाला असेल तर?”

दुस-या मजल्यावर जाताना त्याची खात्री होते की, की त्याचा अंदाज बरोबर होता : इंटरवल आहे.

हॉलची दारं उघडी आहेत, काही रिकामटेकडे लोक एक्वेरियमच्या मासोळ्या आणि भिंतींवर टांगलेले फोटो बघंत हॉलमधे फिरताहेत.

जास्त विचार न करतां कपितोनव हॉलमधे घुसतो.

कपितोनवला वाटलं होतं, की हा तथाकथित ‘बिग’ हॉल खरंच मोठा असेल – तो मोठा अश्यासाठीपण वाटंत होता की कॉन्फ्रेन्सचे बहुतांश डेलिगेट्स ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आलेले नाहीयेत.

कपितोनव शेवटच्या ओळींत कोप-यावर बसतो, इथून त्याला फक्त इकडे-तिकडे बसलेल्या दर्शकांचे डोकेच दिसताहेत. चेहरे तर तो फक्त त्यांचेच बघू शकतो, जे कोप-यातल्या दारातूंन आत येताहेत, - शिवाय, त्याने ब्रोश्यूरमधे दिलेल्या फोटोंना पण इतकं लक्षपूर्वक बघितलं नव्हतं, की आत येत असलेल्या लोकांपैकी एखाद्याला तरी ओळखू शकेल. पण, कां : हा राहिला माइक्रोमैजिशियन अस्त्रोव, तोच, फोटोंत ज्याच्या हास्याचा त्याच्याच धृष्ठ नजरेने बट्ट्याबोळ करून टाकला होता. आता अस्त्रोवच्या चेह-यावर शांति आणि निडरता होती. आणि तसंही, ते हॉलमधे निर्विकार चेह-यानेच प्रवेश करतांत. एक तर उच्च कोटीच्या कलेशी भेट चालू ठेवण्यासाठी स्वतःला तयार करंत असतात, किंवा, आधीच्या अंकाने भाव विभोर तरी झालेले असतांत.

सगळे बसून गेले, आणि लाइट्स बंद होतात.

स्टेजवर आहेत दोन तरुण माणसं, ज्यांनी नक्कीच अठराव्या शतकातील पोषाक नाही घातलाय. मुलगा खुर्चीवर बसून हॉलकडे बघतोय, आणि मुलगी त्याच्या मागे उभी राहून कात्रीचा आवाज करतेय, हे दर्शवंत की केस कापून झालेयंत.

तिने पांढरे गोळे असलेला आखूड निळा स्कर्ट, फुटबॉल जर्सी घातलीय, आणि पाय – अनवाणी आहेत. आणि मुलाने काय घातलंय, इकडे कपितोनव लक्ष नाही देत – काहीतरी भुरा स्पोर्ट्स-शर्ट आहे.

ती म्हणते:

“काही हरकत नाही. खूपंच छान आहे. घाबरू नको, मी थोडं-थोडं. आता तू तसांच आहे, जसा एका महिन्यापूर्वी होता...तर, तुला आठवतंय, जेव्हां...”

तो म्हणतो:

“जर पारिभाषिक शब्दावलीला चिकटून राहिलं, तर म्हणता येईल, की आज आपला ‘मधु-मास’ पूर्ण झालांय.

ती :

“वेड्यासारखं नाव आहे. आणि काहीही पूर्ण होत नसतं...”

गळ्याला गुंडाळलेल्या टॉवेलातून त्याला मुक्त करंत ती म्हणते:

“जा, आरशांत बघून घे.”

तो उत्तर देतो:

“गरंज नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास आहे.”

“बाथरूममधे जा,” ती म्हणते, “आळस नको करू, आरशांत बघून घे.”

“जाऊन काय टपकंत असलेली छत बघू? आज हे बघण्याचा दिवस नाहीये, की छतांतून पाणी कसं टपकतंय...”

तरीही तो उठून एकीकडे जातो, हे दाखवण्यासाठी की स्वतःला आरशांत बघण्यासाठी बाथरूममधे गेला आहे. येवढ्यांत मुलगी जुन्या टेलिफोनवर नंबर फिरवते आणि प्लम्बरला बोलावते.

कोणीच गात नाही.

हे तर ऑपेरासारख नाहीये.  

“प्ल-अ--म्ब-अ-र” तो जसा बाथरूममधून आवाज देतो. – “हा शब्द आपल्याला किती बोरिंग वाटतो, पण तू ऐक, तो महान वाटतो, एकदम शानदार. प्ल-अ--म्ब-अ-र!”

मुलगी त्याला म्हणते:

“कधी-कधी मला असं वाटतं...की आपण सम्पूर्णपणे आत्मनिर्भर नाहीये...जणु आपण कोणत्यातरी अजबंच दुनियेतले आहोंत, ज्याची कल्पना कुणीतरी केली होती...”

कपितोनव ठरवतो, की हा आधुनिक ऑपेरा आहे. नाटकाच्या तत्वांसहित. आता ते गायला सुरुवात करतील.

“मला ह्या आत्मनिर्भरतेबद्दल काही माहीत नाहीये,” विचारांत मग्न होऊन नायक म्हणतो, “पण आपण खरंच बरोब्बर प्रमाणांत कल्पना केलेले आहोंत. तू माझी कल्पना करतेस, मी – तुझी, आपल्या दोघांची – समज, ग्रीशा, ज्याची कल्पना केली होती आस्याने... आपण सगळे एक दुस-याची कल्पना करतो, एकमेकांची रचना करतो. हे नैसर्गिक आहे. आपण, स्पष्ट आहे, की आहोंत, पण महत्वाची गोष्ट ही नाहीये, की आपण कसे आहोत, तर ही आहे, की आपण एकमेकांना कसं बघतो, एकमेकांची कशी कल्पना करतो...”

“आणि, परिणाम हा निघतो, की तू कोण्या प्लम्बरच्या कल्पनेचा परिणाम आहे.”

आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी कपितोनव इकडे तिकडे नजर टाकतो, हे विसरून की तो शेवटच्या ओळींत आहे.

ह्या दरम्यान कलाकार स्टेजवर प्रेमाबद्दल बोलूं लागतात. ती विचारते:

“असं कां असतं, की जेव्हां आपण प्रेम करतो, तेव्हां ‘एडवेन्चरस’ वाटतं?”

तो समजावतो, की ते काम, जे त्याने केलं होतं, (म्हणजे, पहिल्या अंकात), बिल्कुल एडवेन्चर नव्हंत. ह्यावर ती म्हणते :

“कधी कधी मी स्वतःची बैंक-रॉबरच्या रूपांत कल्पना करते. सान्ताक्लाज़चा मास्क घालून घुसून जाते : सगळे उभे राहा!...हा दरोडा पडतोय!...ज्याला सांगितलंय, तो पडूनंच राहील!...कोणीही आपल्या जागेवरून हलू नका!”

मग तोपण ओरडतो, जणु तोसुद्धा खेळांत सामील झालांय:

“हात डोक्याचा मागे!...कोणीही हालायचं नाही!...स्विचवरून हात काढ, तुझ्या आईला, वेडी कुठली!...”

स्टेजवर कुठलही स्विच-विच नाहीये.

जरी कपितोनवला दर्शकांचे चेहरे दिसंत नाहीये, तरी त्याला समजतंय की ते बेचैन नाही होत आहेत. त्यांनी पहिला अंक बघितलाय, पण कपितोनवला ह्याचा काहीच अत्ता-पत्ता नाहीये. कदाचित ते आता गाणं पण गातील आणि केलिओस्त्रीसुद्धां प्रकट होईल.

आता स्टेजवर एक तिसरा, मोठ्या वयाचा माणूस प्रकट होतो – स्पष्ट आहे, की तो केलिओस्त्री नाहीये. त्याच्या हातांत चेस-बोर्ड आहे, तो प्रत्यक्षांत विचार करतोय:

“स्ट्राँग मूव. ह्याचं उत्तर शोधावं लागेल...”

ती:

“संगीतकार, महाशय!”

तो तिची चूक दुरुस्त करतो:

“संगीत-निर्देशक.”

“संगीत-निर्देशक, महाशय, मी तुमचे केस कापू का?”

पुढे होत असलेल्या वार्तालापावरून कपितोनवला कळतं, की संगीत-निर्देशक ह्या तरुण जोडप्याच्या घरांत राहतोय, कारण की त्याची किल्ली हरवलीय. आणि आता तो, माहीत नाही कां गार्डनकडे चालला जातो.

कपितोनव आपल्याच ओळींत दोन जागा सरकतो आणि समोर वाकून सगळ्यांत जवळच्या दर्शकाला विचारतो:

“हा ऑपेरातर नाहीये?”

तो उत्तर देतो:

“बैलेसुद्धां नाहीये.”

कपितोनव खुर्चीच्या पाठीला टेकतो. अच्छा-अच्छा.

“माझ्या मनांत त्या सगळ्यांच्या प्रति खूप आदराची भावना असते, ज्यांच्या किल्ल्या हरवतात,” नायिका म्हणते. “मी आपल्या वडिलांना विसरूं लागले आहे, मी सात वर्षांची होते, जेव्हां ते बुडून गेले होते. आणि, मम्मा बरोबर माझे...ऊँ...माहीत नाही, आमच्या संबंधाना काय नाव देऊ...आदर्श. बस, आदर्श प्रकाराचे संबंध आहेत. कधी कधी तर मला भीतिसुद्धां वाटते, की माझ्यांत आणि तिच्यांत सगळं किती छान आहे...”

“असं कमीच असतं...आणि किल्ल्यांचं काय?”

कपितोनव डोळे बंद करतो, कारण की नायिका काहीतरी इतिहास सांगणार आहे, आणि तिचा आवाज सुखद, धीर देत असल्यासारखा होता.

“मला तर, खरं म्हणजे, ह्या जगांत असायलाच नको होतं. माझा जन्म तर संयोगानेच झालाय. जर माझे पप्पा अगदी बरोब्बर वेळेवर भल्या लोकांसोबत वोद्का पीत नसते आणि जर त्यांच्या किल्ल्या हरवल्या नसत्या, च्-च्, तर अंजेलिनच्का ह्या जगांत नसती...काही लोक नशेंत असल्यामुळे गर्भांत येतात, पण मला नशेंत असल्यामुळे मम्माच्या गर्भांत सुरक्षित राहू दिलं. आपल्या जन्मासाठी मी पप्पांच्या नश्याची आभारी आहे. आणि किल्ल्या हरवल्यामुळे.”

“काय उखाण्यांत बोलतेय...” तिचा जोडीदार म्हणतो, जणु तो कपितोनवच्याच मनांत नकळंत आलेल्या विचाराची पुनरावृत्ति करतोय.

पुढची गोष्ट कपितोनव डोळे मिटून ऐकतो:

“नको होते मी त्यांना, हेच गूढ आहे. म्हणजे व्यक्तिगत रूपांत मी नाही, तर मुलंच नको होती त्यांना...माझ्या बाबतीत सगळं नॉर्मलंच होतं...जेव्हां मी जन्मले होते. पण तेव्हां, मम्मा क्लिनिकमधे पडलेली होती, माझ्यापासून मुक्त व्हायला. आणि पप्पाकडे घरी मित्र आले आणि त्यांने वोद्का प्यायला सुरुवात केली. मग कोणीतरी विचारलं : तुझी अल्योना कुठे आहे, काय कामावर गेलीये? पप्पाने सांगून टाकलं की कोणच्या कामासाठी गेलीये. हॉस्पिटलमधे आहे – एबॉर्शन करायचंय. मित्र म्हणाले, तिला हॉस्पिटलमधे पाठवून तू मूर्खपणा केलास, मुलं होऊं दे, म्हणाले. तुला कशाला पाहिजे एबॉर्शन?…वेड लागलंय कां? मुलं – जीवनाचा प्रकाश असतात, मुलं – चांगली गोष्ट आहे!...तिला लगेच घरी आण, मूर्खा!...ते म्हणाले, पठ्ठ्यांनो, उशीर झालांय, म्हणाले, गाडी तर निघून गेली. काही उशीर-बिशीर नाही झाला, पट्ठ्या. टैक्सी घे आणि निघून जा!...नाही, म्हणाले, उशीर झाला, आधीच जायला हवं होतं. चला, अल्योनाच्या तब्येतीसाठी पिऊँ या, आणि तुम्हां सगळ्यांसाठी, आणि पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांच्या सुखासाठी, आणि त्यांच्यासाठी, जे समुद्रांत आहेत...आणि जे समुद्रांत नाहीये...म्हणजे, त्यांने जेवढी वोद्का होती, तेवढी सगळी पिऊन टाकली, मित्र घरी जाऊं लागले, तो दारावर त्यांना निरोप देऊं लागला, बरोबर जाणार होता, पण त्याला समजलं की त्याच्याकडे किल्ल्यांच नाहीयेत. हरवल्यांत. म्हणाला, अल्योनाकडे तिच्या किल्ल्यांसाठी जावं लागेल, नाहीतर, किल्ल्यांशिवाय कसं...अंकल झोरा घरी थांबले, ड्यूटीवर, आणि अंकल पेत्या आणि माझे पप्पा टैक्सी करून निघाले क्लिनिकला. क्लिनिकमधे पोहोचले, मम्माला खाली बोलावलं, ती चक्क क्लिनिकच्याच गाउनमधे खाली आली. काय झालं, काय भानगड आहे? ते नशेंत होते, बहकले होते, काही नाही झालं, किल्ल्या हरवल्यांत, तुझ्या किल्ल्या दे. पण मग त्यांने नजरेनेच एकमेकाला इशारा केला : हे असतं नशीब. ठीक आहे, प्रोग्राम बदललाय, आम्हीं तुला घ्यायला आलोय. हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. ती जशी होती, तशीच तिला उचलून टैक्सीत टाकलं. जर, थोडा वेळ जरी थांबले असते, तर उशीर झाला असता. बस, हीच कहाणी आहे. तिला घरी आणलं. आणि दुस-या दिवशी माझे पप्पा क्लिनिकमधे गेले तिचं सामान आणायला, पूर्ण शुद्धींत. आणि हो, किल्ल्या दुस-या कोटांत सापडल्या.”

“मम्माने सांगितलं,” जोडीदार जणु कपितोनच्या मनांतलीच गोष्ट नायिकेला विचारतो.

“मला – मम्माने, आणि तिला – अंकल झोरा आणि अंकल पेत्याने, आणि माझ्या पप्पानेपण...खोटं नाही बोलूं दिलं. जेव्हां मी सतरा वर्षांची झाले तेव्हां तिने माझ्या जन्माचं गूढ सांगून टाकलं. भावविह्वल होऊन. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय जीवनाची कल्पनासुद्धां करूं शकंत नाही, पोरी. खरं म्हणजे तुला जन्मदिवस साजरा नको करायला, तर एबॉर्शन पासून सुटकेचा दिवस साजरा केला पाहिजे. जीव वाचण्याचा. हे केव्हां झालं होतं : एप्रिलच्या शेवटी, वसन्त ऋतूंत. हा, बस, चमत्कारंच आहे, की मी आहे.”

“ग्रेट.”

“मी पण हाच विचार करते, ग्रेट.”

‘हरकत नाही, हरकत नाही, वाईट गोष्ट नाहीये’, कपितोनव विचार करतो, त्याला जाणीव होते की तो अजून झोपला नाहीये, आणि मुश्किलीनेच झोपू शकेल, पण, तरीही, तो पूर्वीप्रमाणेच डोळे मिटून ऐकंत राहतो.

“ऐक...चमत्काराबद्दल,” नायक म्हणतो आणि अचानक वाढत्या उत्साहाने सांगू लागतो. “मी कधी कधी आपल्या जन्माबद्दल विचार करतो – अंगावर जश्या मुंग्या चालू लागतात!...बापाला तरुणपणांतच चाकू खुपसला होता, आजोबा युद्धावर होते, डोकं जखमी झालं होतं...आणि, प्रत्येक पूर्वजाला, कदाचित, असंच काही-काही झालेलं होतं...पण मी दुस-याच गोष्टीबद्दल, अश्या परिस्थितीबद्दल, जी जीवनाशी संबंधित नव्हती...बस! आणि ते शंभर करोड आहेत. सगळे कोणच्यातरी लक्ष्याकडे जाताहेत. पण लक्ष्य प्राप्त करतो, फक्त एकुलता एक!...”

“तू कशाबद्दल बोलतोयंस?”

“स्पर्म्सबद्दल.”

कपितोनवने डोळे उघडले.

नवीन काहीच नाहीये. स्टेजवर दोन व्यक्ती आहेत. ते बोलताहेत.

तो पुढे म्हणतो:

“आणि फक्त ह्याच निश्चित स्पर्ममुळे जन्म घेतो, खास मी. कुणी आणखी नाही, पण फक्त मी! जर कोणी पुढे निघाला असता, शंभर करोडमधला कुणीही, तर माझा ‘डबल’ असता, म्हणजे, माझा भाऊ, त्याच वंश परम्परेचा...जसं जुळा – तसाच, जसा मी आहे, पण मी नाही!...”

“जर कुणी दुसरा तुझ्यापुढे निघाला असता, आणि तू तू नसता? तुला विश्वास आहे का, की तू नाही?”

“दुसरा, एंजेलीना, दुसरा! माझी गोष्ट ऐक. एक विशिष्ठ माणूस आपल्या स्वरूपासाठी एका विशिष्ठ स्पर्मचा आभारी असतो. समज, गर्भधारणातर कोणत्याही परिस्थितीत होऊनंच जाते, पण ह्या गोष्टीची संभावना कितपत आहे, की तो गर्भ माझाच आहे – तसा नाही, जसा मी आहे, तर फक्त मी?...खूपंच कमी संभावना असते!...अण्डाणुबद्दल मी काहीच बोलणार नाही...ह्या उद्देश्याने, की माझा निर्माण व्हावा, फक्त माझा, जो आत्ता तुझ्यासमोर उभा राहून हातवारे करतोय, दोन विशिष्ठ सेल्सला, सूक्ष्म...अत्यंत सूक्ष्म सेल्सला एक व्हावं लागतं...फक्त त्याच दोघांना, अन्य कुणाला नाही – त्यांच्या सारख्या असलेल्या अगणित सेल्समधून!...आणि जर त्या गोष्टीवर विचार करायचा झाला, जी तू सांगितली होती...हे सगळे जीवनाशी संबंधित ‘केसेज़’...तर काय परिणाम निघतो?...कोणची तरी अगदीच फालतू गोष्ट!...हे सगळे युद्धं, महामा-या, एबॉर्शन्स, दुर्घटना...असफल जन्मदात्यांचे अकाल मृत्यु – हे सगळं आपल्या विरुद्ध आहे, सगळं आपल्या विरुद्ध आहे, माणसांच्या विरुद्ध – खरोखरंच अवतीर्ण झालेल्या लोकांविरुद्ध!..आपण स्वतःहून कोणचाही अवतार धारण करण्यास असमर्थ आहोत!...कळतंय कां एंजेलीनूश्का? तुला शक्य नाहीये. आणि मला सुद्धां शक्य नाहीये.”

“पण आपण तर जन्म घेतलाय. आणि, सगळेंच जन्म घेतात.”

“लोक जन्म घेतात, ही एक सामान्य गोष्ट आहे, ह्यांत विचित्र असं काहीच नाही. आश्चर्याची गोष्ट दुसरीच आहे : ती अशी की ह्या जन्म घेणा-यांत तू आहेस, मी आहे, उदाहरणार्थ, आस्या आहे, जी ह्या वेळेस आपल्या स्कीज़ घालून पहाडावरून खाली उतरतेय, ग्रीशा आहे, ज्याच्या खुर्चीची पाठ तिने तोडली आणि ज्याला संगीतकार बागेत फिरवतोय...एखाद्या फ्रिजसाठी खिडकीतून बाहेर उडी घेणं सोपं आहे, माझ्या आणि तुझ्या पृथ्वीवर जन्म घेण्यापेक्षां! आपल्या जन्म घेण्याची संभावना – अगदी शून्य आहे! हे आश्चर्य आहे, प्राकृतिक आश्चर्य!”

“आणि आपण एक दुस-याला भेटायचं शहाणपण दाखवलं!” ती उद्गारते.

कपितोनवचा फोन साइलेन्ट मोडवर कसमसतोय. आता, स्टेजवर अचानक म्यूज़िक आणि काही झगमगाट होतोय. बाहेर जायचं दार बाजूलाच आहे : कपितोनव पट्कन उठतो – आणि बाहेर लॉबीत निघून जातो.

मरीनाचा फोन आहे. 


मरीनाचा फोन आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract