Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - ५

धनु कोष्ठक - ५

7 mins
226


18.57 

   

"नाही, फक्त, कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी – प्लीज़".

"झोप डिस्टर्ब झालीये?" 'तलाव'ने लगेच ओळखलं.

हॉटेलच्या रेस्टॉरेन्टमधे एका लहानश्या टेबलाशी बसतात.

आपल्या अनिद्रेबद्दल विस्ताराने सांगायची कपितोनवची इच्छा नाहीये.

"तुम्हीं, मी आशा करतोय, की आरामशीर खोलीतून बाहेर खेचून आणल्यामुळे माझ्यावर रागावणार नाहीं? कदाचित, तुम्हांला ऑपेरा ऐकायचा असेल? दुस-या अंकात पोहोचून जाल, पहिला तर समजून घ्या, की गेला."

"नाही, नाही, मला ऑपेराची आवड नाहीये."

वेट्रेस चहाची किटली घेऊन आली.

कपितोनव लक्ष देऊन पाहतोय की जर किटलीला उलटून झाकण खाली केलं, ज्याने त्याचं तळ वर होईल आणि तोटी आपल्याकडे केली, तर ती बरीचशी 'तलाव'च्या चेह-यासारखी दिसूं लागेल. सुस्तावलेलं नाक, गोल-गोल गाल, एकदम संपत आलेलं कपाळ, जणु 'तलाव' चोवीस तास शीर्षासनाच्या मुद्रेत उभा होता. डोक्यावर केसांची पट्टी फक्त समकोण बनवंत असलेल्या मिशांसारखी होती, जणु काही 'तलाव'च्या नाकाच्या खाली एखादा टेप चिकटवलांय. पण त्याचे डोळे खूप प्रसन्न होते आणि नजर – तीक्ष्ण. 

कदाचित, बाथ-हाउसमधे नंगा 'तलाव' विदूषक म्हणून चालला असता, पण इथे काळ्या कडक सूट मधे, गडद लाल वास्कटमधे, ज्याच्या खालून जांभळा टाय डोकावतोय, तो अगदी लॉर्डसारखा दिसतोय.

"तर, एव्गेनी गेनादेविच, काय म्हणतां?" 'तलाव' उत्सुकतेने विचारतो. "काय प्रगति आहे, एव्गेनी?"

"प्रगतीचा काही वांधा नाहीये, वलेन्तीन ल्वोविच. सगळं ठीक आहे."

"कळलं. इथे आमन्त्रित केल्यामुळे तुम्हांला आश्चर्यतर नाही ना झालं, एव्गेनी गेनादेविच?"

"आश्चर्यतर झालंच."

" 'श्याम-वन'7 स्वतः तुम्हांला बोलावण्याच्या मताचा होता. त्याने जोर दिला, पण प्रस्ताव मी मांडला. कारण की तुमच्या 'आइटम'बद्दल मला क्रूप्नोवने सांगितलं होतं. क्रूप्नोव आठवतोय?"  

"हो, त्याने टूरिस्ट-सेन्टरमधे प्रोग्राम केला होता, आम्हीं ऑक्टोबरमधे भेटलो होतो."

"तो तर – ठीक-ठाक आहे, तो लूप्सचे चमत्कार दाखवतो. हातचलाखी, जसं म्हणतात, पण तुम्हीं, म्हणजे, अगदी डोक्याने, बुद्धीने, हो ना? तो खूप प्रभावशाली होता, पण आपल्या दर्शकाला आश्चर्यचकित करणं कठीण आहे."

"ते, तिथे एक कॉमन टेबल होतं," कपितोनव मागच्या वर्षीचा प्रसंग आठवंत सांगतो, "तुमचा क्रूप्नोव आराम करंत असलेल्या लोकांच्या जवळ बसून गेला, मी पण ट्रिक दाखवली. असंच, उत्सुकतेपोटी."

"म्हणजे, व्यावसायिक प्रदर्शन नाहीं करंत?"

"बिल्कुल नाही. असंच कधी-कधी टेबलाशी बसून, ग्रुपमधे." 

"पण टेबलाशी बसूनपण व्यावसायिक रूपांत करता येतं. आजकाल तर हेच जास्त चालतं. कॉर्पोरेट्स माइक्रोमैजिशियन्सला असंच बोलावतात. टेबलाशीच, ग्रुपमधे बसल्या-बसल्या."

"ओह, तर हेच आहेत 'माइक्रोमैजिशियन्स'? आधी काही दुसरं नाव होतं..."

"प्रेस्टिडिजिटेटर्स...पण, असं वाटतं की हे नाव आवडंत नव्हतं. पण 'माइक्रोमैजिशियन्स' आपणहून जिभेवरून उडी मारतं. तरुणांना, माहितीये, प्रेस्टिडिजिटेटर्स म्हटलेलं आवडंत नाही, त्यांत काही प्रेस्टीज नाहीये, त्यांनातर हा शब्द उच्चारतांसुद्धां येत नाही, बघा, तुम्हींसुद्धां विसरलात...पण, माइक्रोमैजिशियन्स, सगळ्यांना आवडतं. हे केव्हांचंच प्रचलित झालेल आहे. ब-याच दिवसांपासून. पण आम्ही, तसे नाही आहोत, म्हणजे – माइक्रोमैजिशियन्स, प्रेस्टिडिजिटेटर्स, आम्हीं – बरेंच विस्तृत, विस्तृत आहोत...तर तुम्हीं, म्हणजे की, मनांत विचार केलेली संख्या ओळखून घेता?"

"दोन अंकांची."

"तुम्हीं तर मैथेमेटिशियन आहांत ना?"

"हो, मानविकीच्या विद्यार्थांना लेक्चर्स देतो...आणि ह्या ट्रिकबद्दल म्हणाल, तर ह्यांत काही विशेष मैथेमेटिक्सची गरंज नाहीये."

"अशी कशी नाहीये, जर संख्या मैथेमेटिकल आहे तर? किंवा, कसं? तुम्हीं मला दाखवा, डेमो दाखवा. आत्ता शक्य आहे कां?"

"सोपं आहे. मनांत एक संख्या धरा, दोन अंकांची."

"तीन अंकांची नाही चालणार?"

"दोन अंकांची. तीन अंकांच्या संख्येने नाही होत. दहा पर्यंतची संख्यापण घेऊ शकता, पण तेव्हां त्या संख्येचा टेलोफोन नंबर सारखा विचार करावा लागेल, जसं – 07, 09…दोन अंकांची सोपी असते, लवकर समजते."

"ठीकाय, धरली."

"त्यांत नऊ जोडा."

"एक सेकण्ड, जोडले."

"सात वजा करा."

"केले."

"तुमची संख्या होती 36."

"नॉट बैड. नॉट एट ऑल बैड. पण हे जोडणं आणि वजा करणं कशाला? पण, मी हे कां विचारतोय. हे तर तुमचं सीक्रेट आहे."

"ओह, नाही, काही सीक्रेट-बीक्रेट नाहीये, फक्त ह्याच्याशिवाय हे होत नाहीं."

"कदाचित, कारण की मी पत्त्यांवर काम करतो. तुम्हांला तर माहितीये की माझी स्पेशलिटी – प्लेयिंग कार्ड्स आहे? म्हणूनंच, हँ?"

"काय – म्हणूनंच?"

"36. कारण की एका साधारण पैकमधे 36 पत्ते असतांत. मी नाही विचार केला, ते आपणहूनचं डोक्यांत आलं."

"मला कुणी नाही सांगितलं, की तुम्हीं पत्त्यांवर काम करतां. मला कसं कळणार, की तुम्हीं पत्त्यांवर काम करता, की हैटमधून निघालेल्या सस्यावर काम करता."

"प्रमुखतेने पत्त्यांवर. ससा – एकदम वेगळा प्रकार आहे. तसं, माहितीये, मी उंदरांवरसुद्धां काम करतो. माझी ज़ूज़्या सगळे पत्ते ओळखते. एक-एक पत्ता! कधी बघा ज़ूज़्याला. चला. आणखी एकदा. मी संख्या धरली."

"आठ जोडा."

"आहा, आता आठ झाले."

"दोन वजा करा."

"केले."

"54."

"कारण की हा आहे पत्त्यांचा पूर्ण पैक, दोन्हीं जोकरांना धरून. मी तर पुन्हां गडबडलो."

"तुम्हीं प्रत्येक संख्या पत्त्यांशीच जोडून घेता."

"सैतान! ही आहे ट्रिक! आइडियोमोटोरिक्स, सगळं समजलं."

"नाही, इथे आणखी काही आहे."

"हो, माझ्या चेह-यावर सगळं लिहिलंय. तुम्हांला, बस, ते वाचतां येतं. मी जर पार्टीशनच्यामागे असलो, तर काही होणार नाही."

"होईल." 

"ठीक आहे, आपण बघू...ठरलं? पण...कामाबद्दल, मित्रा. माझी अशी इच्छा आहे, की तुम्हीं आमच्याबरोबर असावे, ना की त्या फुकट्या बदमाशांबरोबर, जे गिल्डमधे सत्तेच्या मागे धावतांत. लक्षांत ठेवा " 'श्याम-वन'. इतर कोणीही नाही. त्याला धरून राहा. तो – आमच्या पार्टीचा आहे. आणि आम्हांला काहीही करून आपल्या माणसाला प्रेसिडेन्ट म्हणून निवडायचंय. जर ज्युपिटेर्स्कीचा माणूस सत्तेवर आला, तर आपण सगळे संपून जाऊ. हे गिल्डसाठी घातक ठरेल. बघा, कोणा-कोणाला त्यांनी बोलावलंय. तुम्हीं बघितलंय?" – त्याने ब्रीफकेसमधून कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेट्सची लिस्ट असलेलं ब्रोश्यूर काढलं – "हे सगळे 'अत्यंतसूक्ष्मधारी' आहेत! कम्पार्टमेन्ट-चीटर्स! वाचा : पत्त्यांना कशाही प्रकारे ठेवा, मास्टरंच जिंकेल'! हे तुम्हांला कसं वाटतंय? 'मास्टर'. मी स्वतःसुद्धा पत्त्यांवर काम करतो, आणि मी बनवाबनवी करणा-यांना आणि जादुगारांना ओळखू शकतो. इतर गोष्टींबद्दलसुद्धां असंच आहे! खिसेकापू स्वतःला माइक्रोमैजिशियन्स- मेनिप्युलेटर्स म्हणवून घेतांत. आणि ते असंपण दाखवतांत की आमच्या संगठनेंत त्यांचा एक विशेष वर्ग आहे! माहीत आहे, जहाजाला पाण्यांत जसं सोडाल, तसंच ते तरंगेल. जसा आधार असेल, तसंच जीवन मिळेल. इथे प्रत्येक वोट महत्वपूर्ण आहे. म्हणूनंच मी तुमच्याबरोबर बसलोय. मी तुमच्यावर विश्वास ठेवूं शकतो कां?" 

"तुमच्याकडेतर सगळंच खूप गुंतागुंतीचं आहे...मी विचारंच नव्हता केला."

"विचार करूसुद्धां नका. तुमचा आवडता विषय आहे – मेन्टल मैजिक. फुकटच्या गोष्टींबद्दल तुम्हांला विचारपण करायला नको. तुमच्याबद्दल सगळं ठरवून झालंय. तुम्हीं फक्त मला धरून राहा आणि कुणावरही विश्वास नका ठेवूं. फक्त माझ्यावर, म्हणजे, माझ्या माध्यमाने – 'श्याम-वन'वर."

"तुम्हीं मेन्टल मैजिक म्हणतांय? त्याला काय ह्याच नावाने ओळखतांत?"

"नाहींतर, आणखी कसं? मेन्टल मैजिक. आणि, जर तुमच्याकडे लोक आले आणि त्यांनी तुम्हांला पटवायचा प्रयत्न केला, की कोणाबरोबर मैत्री ठेवायला पाहिजे, कोणाच्या विरुद्ध 'मत' द्यायला पाहिजे, तर माझी गोष्ट लक्षांत ठेवा : इथे कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये, फक्त माझ्यावर, आणि माझ्या माध्यमाने - 'श्याम-वन'वर."

"मी डेलिगेट्सची लिस्ट बघितलीय. असाधारण लोक आहेत...जर सौम्यपणे सांगायचं तर."

"साधारणंच जास्त आहेत. आणि, असाधारण कोण आहेत?"

"कोणी नेक्रोमान्त..."

"महाशय नेक्रोमान्त," 'तलाव' दुरुस्त करतो. "हा आमचा माणूस आहे, तो बरोबर 'मत' देईल..."

"काळ-भक्षक..."

"अरे, तुम्हीं तर रिमोटिस्ट्सबद्दल सांगताय," 'तलाव' तोंड वाकडं करंत म्हणतो. "एक तिसरापण आहे, तोसुद्धां आजंच आलाय."

"हो, मी त्याला बघितलंय. त्याने रिसेप्शनवर रजिस्ट्रेशन करण्यास नकार दिला होता."

"तुम्हीं बघितलं का, की तो कुणीकडे गेला?"

"बाहेर रस्त्यावर."

"रस्त्यावर कुणीकडे? आमच्या हातून तो निसटला."

"माहीत नाही, बस, चालला गेला."

"मी त्याला घडवलंय. ब-याच लोकांना आवडलेलं नाहीये, की मी त्यांना बोलावलंय. तुम्हांला तो कसा वाटला?"

"मला वाटतं, की तो वेडा आहे."

"सगळेच रिमोटिस्ट्स झुरळांसारखे आहेत..."

"माइक्रोमैजिशियन्सपण?"

"उलंट, माक्रो आहेत. पण आपण सगळे...तोपण, आणि तुम्हींपण, आणि मी, आणि आमचे इतर भाऊ-बंध...आपण सगळे नॉनस्टेजर्स आहोत...तुम्हांला, कदाचित, माहीतंच असेल, की नॉनस्टेजर्स कोण असतांत?..."

"कोण?" 

"नाही माहीत?... नॉनस्टेजर्सच्या कॉन्फ्रेन्समधे आले आहांत आणि माहीत नाही? स्वतः नॉनस्टेजर आहांत आणि माहीत नाही?"

"ओह, तर मी नॉन्स...नॉन्सेन्स...टे?..."

"नॉनस्टेजर. म्हणजे, ज्याला कमीत कमी सामानाची गरंज असते किंवा कोणत्याही सामानाची गरंज नसते – ते नॉनस्टेजर्स असतात. मग ते माइक्रो आहेत किंवा माक्रोमैजिशियन्स आहे, हे महत्वपूर्ण नाहीये. मेन्टलिस्ट्ससुद्धां तसेच असतात. तुम्हांलापण कोणच्या विशेष सामानाची गरज नाहीये ना? हो, जर कवटीवाल्या डब्ब्याबद्दल सांगायचं सोडलं तर?..."

"मला नाही वाटंत की कवटीवाल्या डब्ब्याचीपण गरज आहे."

"चला, ह्याबद्दल आपण आणखी बोलूं. बिल, प्लीज़," त्याने वेट्रेसला बोलावलं.

"आणि तुमच्याकडे ही बॉम्बची काय भानगड होती?" कपितोनव विचारतो.

"बॉम्ब तर नव्हता, पण अवैधानिक प्रकाराने कॉन्फ्रेन्समधे व्यत्यय आणायचा प्रयत्न केला होता. पण आम्हीं हे असंच नाही सोडणार. तसं, ऑपेरानंतर डिनर आहे – न जाण्यापेक्षां उशीरा गेलेलं बरं आहे. तर, तुम्हीं दुस-या अंकापर्यंत पोहोचून जाल. प्रोग्राम हॉटेलमधेच होतो आहे. कदाचित गाणं सुरूसुद्धां झालंय."

"काही ऐकूंतर नाही येत आहे."

"प्रोग्राम कॉन्फ्रेन्स हॉलमधे होतोय. दुसरा मजला."

"मला थोडं झोपायला पाहिजे."

"तिथेपण डोळा लागेल."

"बरं होईल. आणि तुम्हीं जातांय कां?"

"नाही, मी थियेटरमधे नाही जात. सर्कसलापण नाही जात." 

"ऑपेराचं नाव काय आहे?"

"केलिओस्त्रो."

"मला अश्या कोणच्याही ऑपेराबद्दल माहीत नाहीये."

"इन-हाउस आहे. काँग्रेसच्या डेलिगेट्ससाठी."

"तर, ही काँग्रेस आहे, की कॉन्फ्रेन्स?" 

"काय फरक आहे? तुमच्यासाठी सगळं एकंच नाहीये कां?"

"हा काय त्याच केलिओस्त्रोबद्दल आहे कां?" 

"कदाचित. आणि, तुम्हाला दुस-यांबद्दल माहीत आहे कां? सांस्कृतिक कार्यक्रमाची जवाबदारी माझी नाहीये. कोणचातरी विषय घेऊन बनवलांय. तरीही – आमचांच माणूस आहे." 

येणा-या वेट्रेसने अजून फोल्डर टेबलवर ठेवलंसुद्धां नव्हतं – 'तलाव' लगेच तिच्या हातातून फोल्डर हिसकावून घेतो आणि, बिल बाहेर न काढतां, हळूच कवरखाली काहीतरी घुसवतो आणि लगेच फोल्डर परंत करतो.

इतक्या चपळतेने स्तब्ध झालेली वेट्रेस काही क्षण तिच्यापासून तोंड फिरवणा-या 'तलाव'समोर पुतळ्यासारखी उभी राहते – मग शुद्धीवर येऊन वळते आणि काउन्टरकडे जाते.

"ऐका तरं," आरशांत दूर जात असलेल्या वेट्रेसकडे बघंत कपितोनव म्हणतो, "हे इथे इतके आरसे कां आहेत? माझ्या खोलींत नको तितके आहेत."

"हॉटेलच्या पार्टनर्सपैकी एक – 'नेव्स्की मिरर्स' कम्पनी आहे."

"आह, तर असं आहे...पण, तरीही, मला कळंत नाहीये, की माझ्या एका वोटांत येवढं काय आहे? की तुम्हीं सगळ्यांनाच असंच...पटवतां?"

"पटवतोय फक्त तुम्हांला, कारण की तुम्हीं शेवटचे आहांत. बाकीच्यांना, ज्यांची गरज आहे, सगळ्यांना पटवून झालंय."

वेट्रेस पुन्हां फोल्डर घेऊन आली, चेह-यावर त्रासल्याचा भाव दिसतोय.

"माफ करा," ती 'तलाव'ला म्हणते, जो तिच्याकडे बघतंच नाहीये, "पण ह्यांत पैसेच नाहीयेत..."

"मग काय आहे?" तोंड न वळवतां 'तलाव' विचारतो.

"कार्ड8 (इथे नकाशाशी तात्पर्य आहे – अनु.)..."

"आफ्रिकेचा?"

"नाही..." 

"यूरोपचा?"

"नाही...खेळायचं कार्ड...पत्ता..."

"इस्पीकचा?...किलवरचा?...चौकटचा?..."

"बदामाची छक्की..." वेट्रेस पुटपुटते आणि कपितोनवला उघडलेलं फोल्डर दाखवते, कारण 'तलाव' आधीसारखंच दुसरीकडे बघतोय. 

कपितोनवला खरोखरंच बदामाची छक्की दिसते.

"बंद करा," 'तलाव' अनिच्छेने म्हणतो. "इकडे द्या. हे काय आहे?"

फोल्डरला हातांवर सांभाळंत तो, न उघडतांच त्याला टेबलावर ठेवून देतो. 

"तुम्हीं मला मूर्ख कां बनवताय," 'तलाव' म्हणतो, "सगळं अगदी तस्संच आहे, जसं असायला पाहिजे."

वेट्रेस फोल्डर उघडते आणि त्यांत बदामाच्या छक्कीच्या ऐवजी हजार रूबल्सची नोट बघते. कपितोनव सुद्धां, ज्याला साक्षीदार बनवलं होतं, हेंच बघतो.

"नो चेंज," 'तलाव' उठतो. "चल जाऊं या, मित्रा."

"असं कसं?" उत्तेजनेने वेट्रेस विचारते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract