STORYMIRROR

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - ४

धनु कोष्ठक - ४

6 mins
170


18.15 

 

आणि कसलीही डुलकी नाही, उलट विचाराची अनुपस्थिति, तसं, कदाचित, शॉवरच्या खाली उभ्या-उभ्या एक-दोन सेकंदासाठी तोगुलझाला असेल. विचाराच्या अनुपस्थितीचा विचार कपितोनवला वास्तविकतेंत परंत आणतो, त्याला आठवतं, की त्याला झोपायचं होतं, आणि तो पाणी बंद करतो.

कपितोनवच्या मनांत एक छोटीशी भीति आहे : हॉटेल्समधे तो कधीही टूथ ब्रशला सिंकच्या जवळच्या ग्लासमधे नाही सोडंत. हे असं सुरू झालं काही दिवसांपूर्वीच एका संवाददात्याची बिंग फोडणारी रिपोर्ट प्रकाशित झाल्यावर, जी स्कैण्डलसाठीच एका फाइव स्टार हॉटेलमधे सफाई-कर्मचारीम्हणून राहिली होती. तिने ठासून सांगितलं होतं, की सफाई करणा-या बाया जास्ती काम असल्यामुळे सिंकला वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छ नाही करंत, आणि काम लवकर-लवकर संपवण्यासाठी पाहुण्यांच्या टूथ ब्रशेज़चा उपयोग करून टाकतात. कपितोनव ह्यावर विश्वासापेक्षां अविश्वासंच करतो, पण प्लास्टिकच्या खोळीत कापडाचा तुकडा घालून ठेवलेला टूथ ब्रश आपल्या ट्रेवल-पर्समधे टाकून घेतो.


नीनाने एकदा त्याला म्हटलं होतं की तो अनेक प्रकारच्या भयगंडांचा पुतळा आहे. बरं आहे, की हे अकारण भय खाण्या-पिण्याच्या वस्तूंपर्यंत नाही पोहोचंत. आयुष्यभर तो सुरुवातीच्या कम्पार्टमेन्ट्सपासून दूर राहिला. काही काळापूर्वी(जे तो चांगल्याप्रकारे लपवतो, नीनाला ह्याबद्दल कळलंसुद्धा नाही), जेव्हां तो मोठा झाला होता, लहानग्या आन्काबरोबर झालेल्या घटनेनंतर, तो रक्त बघून घाबरायला लागला – नाही, रक्त बघून नाही, पण ह्या भीतीने, की असं केल्याने त्याचं नुक्सान होईल : जसं, कपितोनव अशा फिल्म्स बघायला घाबरतो ज्यांत केचप किंवा क्रेनबेरी जूसच्या उपयोगाची शक्यता असते. जरी तो शाळेत आणि विद्यापीठांत दादागिरी करण्यांसाठी प्रसिद्ध होता तरीही. पण शाळेंत असतानांच, जेव्हां पाचवींत इतिहासाच्या वर्गात, शिस्तप्रिय किरील सिर्गेयेविचने रोमन सेनेंत ‘डेसिमेशन’बद्दल (विद्रोही सैनिकांतील दहापैकी एकाला मारून टाकणं – अनु.) सांगितलं आणि बोलतां-बोलतां प्राचीन रोमन्सच्या, फार प्राचीन अश्या नसलेल्या, अनुकरणाबद्दलसुद्धां सांगितलं (त्यांच्या वर्गांत तिघांना गोळी मारली असती – तेपण शिल्लक उरलेल्या कॉम्रेड्सच्या प्रयत्नाने), काही महीने तो आपल्या जीवनांत 10च्या अंकाला महत्व देऊं लागला – जे, जर मेट्रिक प्रणालीच्या समर्थनांत काही सांगायचं झालं तर सम्पूर्ण पोज़िशनिंग प्रणालीचा आधार आहे. पण – दहा नंबरची बस, दातांच्या डॉक्टरच्या लाइनींत दहावा नंबर...कदाचित म्हणूनंचतर कपितोनवने मैथेमेटिक्सची निवड केली नसेल (कधी कधी तो ह्याबद्दल विचार करतो), म्हणजे नकळतंच आपल्या किशोरवयाच्या डेसिफोबियापासून मुक्त होता येईल?

ही खोली अत्यंत साधी असूनही, तिच्यांत विचित्रपणे आरश्यांचा सुळसुळाट आहे. प्रवेशदालनांत आणि बाथरूममधेतर ठीक आहे, पण खोलींत – आणि तिथे तीन-तीन आरसे कशासाठी? कपितोनवला स्वतःवर प्रेम करायचा शौक नाहीये आणि ह्या संभावनेनेपण तो बिल्कुल खूश नाहीये – पलंगावर पडल्या-पडल्यासुद्धां, डोकं वळवून, जो पलंगावर झोपलेल्या त्याचा स्वतःचाच अंश आहे, आपलाच चेहरा बघण्याची.

तर, आइडिया हा होता की झोप नाही आली, तर कमींत कमी डुलकी घेता यावी.

हे स्पष्ट झालं, की झोपूं शकणार नाही, आणि ह्याला जवाबदार टेलिविजन नाहीये (चैनल्स बदलतो), तर व्यक्तिगत अनुभव आहे हा अवजंड उत्साहीपणा सहन करण्याचा, जो बिछान्यांत पडतांच पूर्ण ताकदीनिशी जाणवूं लागतो. 

वरून साउण्ड-प्रूफिंग. आश्चर्य आहे.

आधी तर कपितोनवला असा भास झाला, की भिंतीच्या पलिकडे कोणीतरी घोरतंय. आत्ताशीच? कपितोनव कान लावून ऐकतो. हे घोरणं नाहीये. हे, कोणाचातरी गळा घोटतात आहेत. त्याने काहीतरी उपाय केला असता, पण स्वतःच्या कानांवर विश्वास करणे नाकारतो. आणि, हे बरोबरपण आहे. ओकारी करण्याचे प्रयत्न – भिंतीच्या पलिकडे हेंच चाललंय.

कपितोनवला आश्चर्य वाटतंय. तो टेलिविजनचं वॉल्यूम वाढवतो. एका प्रसिद्ध यूरोपियन ऑफिसरच्या प्रेमिकेबद्दल बातमी दाखवतांत आहेत, जिने एका प्रमुख समाचार पत्रिकेवर ‘केस’ केली आहे.

तेवढ्यांत दारावर टकटक होते.

“प्लीज़...वॉल्यूम!...” भिंतीच्या पलिकडून मोठ्या मुश्किलीने ओकारी थांबवंत शेजारी कर्कशपणे म्हणतो.

कपितोनवला आजारी माणसाशी वाद घालायचा नाहीये आणि तो टेलिविजन बंद करतो.

“थैन्क्यू...” 

कपितोनव अविश्वासाने स्तब्धता ऐकतोय : भिंतीच्या पलिकडला माणूस जिवन्त आहे का? जीवनाचे दुसरे कोणते लक्षणं ऐकूं येत नाहीये. (पण हे तरी काय जीवन आहे, जेव्हां आतड्या बाहेर निघताहेत?)

कपितोनवने ब्रीफकेस उघडली.

ब्रोश्यूर्स, प्रोग्रामशी संबंधित डॉक्यूमेन्ट्सच्या फाइल्स. चार्टरचा मसुदा. नोटपैड, बॉलपेन्स. ह्या शहराच्या स्मारकांच्या रहस्यमय जीवनासंबंधी एक पुस्तिका – सुवेनीर. आणखी एक सुवेनीर – जादूची छडी. कपितोनव स्वतःसुद्धां हे समजूं शकंत होता, कारण की प्लास्टिकच्या त्या पैकेटवर, ज्यात ही वस्तू ठेवली होती, एक स्लिप चिटकवलेली होती जिच्यावर लिहिलं होतं “जादूची छडी”.

खरं तर ही चाइनीज़ रेस्टॉरेन्टची एक चॉपस्टिक होती – विनोदाचा भाग हा होता, कि साधारणपणे पैकेटमधे अश्या दोन चॉपस्टिक्स असतात आणि त्या खाण्यासाठी असतात, आणि इथे आहे एक, आणि, म्हणूनंच कोण्या दुस-या कामासाठी आहे. कपितोनवला सुचवलं जातंय की त्याने स्वतःला हैरी पॉटर समजावे. त्याला असं वाटलं की त्याच्यावर नजर ठेवली जात आहे आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट बघताहेत – की तो हसेल किंवा नाही. कपितोनव नाही हसंत, त्याला हे आवडलं नाही. पण कोणत्यातरी वस्तूने त्याला चाइनीज़ रेस्टॉरेन्टची चॉपस्टिक फिरवायला भाग पाडलं, - इंटरेस्टिंग! कॉन्फ्रेन्सचे सगळेच डेलिगेट्स चॉपस्टिकशी असंच करतांत कां, जसं आत्ता कपितोनव करतोय, आणि असं करताना काही लोक ‘अब्रा-का-दब्रा’सारखं काही तरी म्हणतात कां? 

कपितोनव जादूच्या छडीला ब्रीफकेसमधे ठेवून देतो आणि मेम्बर्सच्या नावांची लिस्ट असलेलं ब्रोश्यूर काढतो. प्रत्येक मेम्बरसाठी एक-एक पान आहे. त्याचा फोटो आणि परिचयात्मक शब्द आहेत.

सगळ्यांत आधी परिचय दिलेला आहे चेखवच्या प्रसिद्ध नायकाचं आडनाव असलेल्या अस्त्रोवचा (कदाचित उपनाम असावे, कपितोनव विचार करतो). “अस्त्रोव, अलेक्सान्द्र अस्कोल्दविच. विस्तृत क्षेत्राचा सूक्ष्म मैजिशियन – माइक्रोमैग (इथे तात्पर्य आहे – माइक्रो मैजिशियनशी –अनु.) ‘गोल्डन-फनल’ने सम्मानित. माइक्रो मैजिशियन्स आणि मैजिशियन्सच्या अंतरराष्ट्रीय अकादेमीचे सदस्य”. कपितोनवला अस्त्रोवचं हास्य आवडंत नाही, धृष्ठ नजरेचा त्याच्याशी मेळ नाही बसंत. तो पान उलटतो आणि कॉन्फ्रेन्सच्या पुढच्या मेम्बरच्या फोटोच्या ऐवजी त्याचं सांकेतिक रूप पाहतो – एका फ्रेममधे डोकं आणि धड ह्यांची फक्त रूपरेशा. रिसेप्शन काउन्टरवर झालेल्या घटनेनंतर ह्यांत आश्चर्य करण्यासारखं काहीच नाहीये : “ईवेन्ट्स-आर्किटेक्ट”. आणि, पुढे फक्त एकंच शब्द : ‘रिमोटिस्ट’. ह्या शब्दाचा काय अर्थ असेल, हे जरी कपितोनवला समजलं नाहीये, तरीही तो किंचित अस्पष्टशी कल्पना तर करूंच शकतो : रिमोट कन्ट्रोल वाली एखादी वस्तू, नाहीं? – चला, जाऊ द्या, ह्यावर डोकं फोडायची काही गरज नाहीये, - त्याचबरोबर त्याने हे सुद्धां बघितलं, की वर्णक्रम तुटलाय: नियमाप्रमाणे ईवेन्ट्स आर्किटेक्टला अस्त्रोवच्या आधी असायला पाहिजे (इथे प्रश्न रशियन वर्णक्रमाशी संबंधित आहे – अनु.). असं वाटतं की ह्या संदर्भ-पत्रिकेच्या संकलनकर्त्यांना एका चेहराहीन चेह-यापासून सुरुवात करायची नव्हती, पण त्या चेहरेवाल्या चेह-यांत असं काय विशेष आहे...कदाचित, तेच, जे त्याच्या कुलनामांत आहे. 

मग कपितोनव लगेच ‘क’ अक्षराकडे जातो आणि ‘कपितोनव’ला शोधून काढतो. 

त्याच्या आंत सगळं संकुचित होऊं लागतं. हा फोटो दोन वर्षांपूर्वी बायकोने काढला होता, जेव्हां ते तुर्कीला गेले होते. हा ह्या ब्रोश्यूरमधे कसा आला? पण तेव्हांच त्याला आठवलं की त्याने स्वतःच डिसेम्बरमधे हा पाठवला होता, जेव्हां ऑर्गेनाइज़िंग कमिटीच्या लोकांनी त्याच्याशी संपर्क केला होता.

“कपितोनव, एव्गेनी गेनादेविच. मैथेमेटिशियन-मेंटलिस्ट. दोन अंकांच्या संख्या.”

तो हसला. ‘मैथेमेटिशियन-मेन्टलिस्ट’ – कदाचित असंच म्हणतात. आणि ‘दोन अंकांच्या संख्या’ वाचून सहयोग्यांना काय विचार करायला हवा?

पहिल्यांदाच तो त्यांच्याबद्दल ‘सहयोगी’ म्हणून विचार करतोय, आतापर्यंत ते एका अमूर्त समूहाचे तत्व होते. तो मजेत ब्रोश्यूरची पानं उलटतोय आणि “सहयोग्यां”बद्दल माहिती घेतोय.

त्यांच्यापैकी बहुतांश माइक्रो-मैजिशियन्स आहेत. कोणाकोणाचं स्पेशलाइज़ेशनसुद्धां दाखवलेलं आहे : ‘माइक्रोमैजिशियन-मैचस्टिक्स’, ‘माइक्रोमैजिशियन-स्लीव्ज़’… बरेचसे ‘मास्टर्स’ आहेत – फक्त ‘मास्टर्स’, आणि त्याचबरोबर ‘मास्टर्स ऑफ ड्राइंगरूम मैजिक’ आणि तसलेच. इतर काही लोकांना ‘एक्सपर्ट-चीटर्स’ म्हटलेलं आहे, तसे त्यांच्यांत दोन ‘मास्टर्स’पण आहेत. दोन ‘अत्यंतसूक्ष्मधारी’ आहेत. ईवेन्ट्स-आर्किटेक्ट शिवाय कपितोनवला आणखी दोन ‘रिमोटिस्ट्स’ दिसतात. हे आहेत कोणी महाशय नेक्रोमान्त5 (ओझा, मांत्रिक-अनु.) आणि काळ-भक्षक6. त्यांच्यापुढे माणसांसारखी नाव दिलेली नाहीत, पण ईवेन्ट्स-आर्किटेक्टपेक्षां वेगळं, म्हणजे दोघांचे फोटो दिलेले आहेत. काळ-भक्षक – आजा-यासारख्या अशक्त आहे, त्याचे गाल लटकलेले आहेत. महाशय नेक्रोमान्त, तो नेक्रोमान्त (मांत्रिक) सारखांच आहे.  . 

लैण्डलाइन फोनची घंटी कपितोनवला पलंगावरून उठायला भाग पाडते. 

“प्रवास कसा झाला, एव्गेनी गेनादेविच? मी ‘तलाव’, तुम्हांला त्रास देतोय. मी डिस्टर्बतर नाही केलं?”

“नमस्ते,” ‘तलाव’ला नाव आणि वडिलांचे नाव घेऊन संबोधित करण्याची जोखीम न उचलतां कपितोनव म्हणतो, (खात्री नव्हती की आठवतंय...) – “थैन्क्यू. सगळं ठीक आहे.”

“फाइटिंग मूडमधे आहेस ना?” ‘तलाव’ विचारतो.

“एकदम.” कपितोनव उत्तर देतो. “काय युद्धाची वेळ येणारेय?”

“एव्गेनी गेनादेविच, मी खाली रेस्टॉरेन्टमधे बसलोय. तुम्हांला एक कप कॉफी घ्यायला आवडेल कां? एकमेकांना थोडंफार समजतां येईल, अमोर-समोर बसून ओळख करूं या. नाहीतर आपण काय – फक्त, लिस्टप्रमाणेच आहोत कां?”

“ओह, नक्कीच, थैन्क्यू, येतो.”

खोलीतून निघण्यापूर्वी त्याने लिस्टवर नजर टाकली – ब्रोश्यूरमधे ‘तलाव’ला शोधलं: तोच आहे – वलेंतीन ल्वोविच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract