धनु कोष्ठक - २२
धनु कोष्ठक - २२
लेखक: सिर्ग़ेइ नोसव ; भाषांतर: आ.
12.05
खालच्या मजल्याच्या टॉयलेटमधून निघून निळ्या चोग्यांत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट जडशीळ पावलांनी वर येतो आहे. कपितोनवला त्याची एकटक नजर बोचूं लागते, तो स्वतःसुद्धां ताठरतो, जणु त्याच्यांत आणि पाय-यांने वर येणा-याच्या मधे एखादी दोरी खेचली आहे. ईवेन्ट्स-आर्किटेक्टने जवळ येऊन म्हटलं:
“एड्स, भ्रष्ठाचार, आतंकवाद, ओळख विसरणं, युद्ध, आणि तुम्हांला, बघताय ना, कोण्या कटलेट्सच्या हरवण्याचं दुःख. मानवशास्त्र विषयक स्थिरांक धोक्यांत आहेत, आणि तुम्हीं कटलेट्सबद्दल काळजी करताय. तुमचा काही दृष्टिकोण आहे का? तुमचा काय दृष्टिकोण आहे, मला कळेल कां?”
तो वर येऊन धापा टाकू लागला.
“आत्ता तुम्हीं काहीतरी म्हणंत होते,” कपितोनवने फोन दूर केला. “पण तुम्हांला विश्वास आहे कां, की जे म्हटलं होतं, ते तुम्हांला समजतंय?”
एकमेकांच्या डोळ्यांत पाहतात.
“आणि तुम्हीं...तुम्हीं जे करतांहात, त्यांत तुमचा विश्वास आहे?” सूँ-सूँ करंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणतो.
“त्यांत एक नोटबुक होती,” कपितोनव नजर न काढतां म्हणतो, “एका माणसाची मैन्युस्क्रिप्ट, जो आतां ह्या जगांत नाहीये. तिची मला नाही, पण कोण्या दुस-या माणसाला गरंज आहे. ती त्याला फार प्रिय आहे. आणि अत्यंत विश्वासाने ती मला देण्यांत आली होती. आणि माझ्याकडून तिला कटलेट्समधे बदलून देण्यांत आलंय! पण ते तुम्हांला नाही कळणार, तुम्हीं फक्त ब्ला-ब्ला-ब्लाच करूं शकता! जरा सांगा तर, तुम्हीं कोणच्या ईवेन्ट्सचे आर्किटेक्ट आहांत?”
“तुम्हांला काय हे म्हणायचंय की ह्या भानगडीत माझा हात आहे?” कपितोनवपासून तोंड वळवंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणतो. “माझ्यासाठी हे क्षुल्लक आहे, अगदीच क्षुल्लक,” आणि जातां-जातां टोमणा मारून गेला: “विचार नका करू.”
12.12
पण कपितोनव विचार करतोच आहे. हॉलमधे आपल्या जुन्या जागेवर बसल्या-बसल्या, तो ह्याबद्दल विचार नाहीं करंत, की वक्ता काय बोलतोय, तो आपल्याच कोणच्यातरी गोष्टीबद्दल विचार करतोय, ज्याच्याबद्दल दुसरे लोक विचार करंत नाहीये. अध्यक्षाच्या डोक्यावर – छताला चिकटलेल्या फुग्ग्याकडे बघंत कपितोनव आपल्याच विचारांत मग्न आहे. फुग्गा प्रकट झाल्याने कोणालाच आश्चर्य झालेलं नाहीये. कपितोनवला सोडून कुणीच फुग्ग्याकडे लक्ष देत नाहीये, फुग्ग्याकडे बघायची कुणाची इच्छाच नाहीये, पण त्याला, कपितोनवला, कसं माहीत, की कु णीच नाही? हे खरं नाहीये की कपितोनव इतरांच्या कवट्यांच्या डब्यांमधे डोकावूं शकतो, - ह्या अवयवाच्या संदर्भात तो फक्त येवढंच करू शकतो, की मनांत धरलेली संख्या ओळखायची, आणि तीपण फक्त दोनंच अंकांची. आणि, तो निस्संदेह, कुणी डोक्यांत घुसणारा चोर नाहीये – तसंच, जसा तो खिडकींत घुसणारा, पोटमाळ्यांत घुसणारा चोर नाहीये; खिसेकापूसुद्धा नाहीये, घरांत घुसणारापण नाही आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे, ब्रीफकेसमधे घुसणारा चोरपण नाहीये. आणि आपल्या ब्रीफकेसप्रमाणेच, भले ही मग त्यांत काहीही कां नसो, तो कुणालाही आपल्या कवटीच्या डब्यांत घुसूं नाही देणार, त्याच्याबद्दल कुणी काहीही विचार केला तरी. म्हणून प्रस्तुत परिस्थितीत कपितोनव कसला विचार करतोय, तो त्याच्या स्वतःचा प्रश्न आहे, आणि दुस-या कुणी कपितोनवच्या विचारांबद्दल काहीही विचार केला तरी, तो, दुसरा, प्रस्तुत परिस्थितीत चूकंच असेल.
मध्यांतरांत वेण्टिलेटर्स उघडून ताजी हवा हॉलमधे येऊं दिली, आता टवटवीत आणि गार वाटूं लागलं. लोकांचे डोकेपण गार झाले, किंवा मुख्य वक्ता, निमेत्किनच्या भाषणाने त्यांना शांत केलं होतं?...(नेमेत्किन?...पद्मेत्किन?...अत्मेत्किन?...कपितोनव आता आपल्या आजूबाजूला होत असलेल्या घटनांपासून अलिप्त होता.) कपितोनवला हेसुद्धा नाही माहीत की हा मरगळलेला नामेत्किन, ह्याचं नाव गिल्डच्या प्रेसिडेण्टच्या पदासाठी कोणी प्रस्तावित केलं होतं – ज्युपितेर्स्कीच्या पार्टीने, की ‘श्याम-वन’च्या पार्टीने. कपितोनवला आश्चर्य होतंय (तसं, आश्चर्याने ह्याबद्दल विचार नाही करंत आहे), की ना तर ज्युपितेर्स्की, न ‘श्याम-वन’(पण तो ह्याबद्दल विचार नाही करंत आहे), ना अध्यक्ष मोर्शिन, आणि ना ‘तलाव’, प्रसिद्ध व्यक्तींपैकी कोणीच माहीत नाही कां प्रेसिडेण्टच्या पदाचा प्रत्याशी नाहीये. वेड्या-वाकड्या लोकांनाच पाठवतांत आहे. (आणि ह्याबद्दलही नाही.) ज़ामेत्किनच्या विरुद्ध उभं केलंय रेचूगिनला (...लाचूगिन?...पिचूगिन?...), त्याचं भाषण आता होणार आहे.
आश्चर्यकारकरीत्या कपितोनव दुस-याच कोणत्या गोष्टीबद्दल विचार करतो आहे.
“तुम्हीं झोपले आहांत कां?”
“नाही.”
काही वेळ शांत राहून:
“आणि जर ‘हो’ तर? उठवणं जरूरी आहे कां?”
“मी बस, असंच बघितलं, की तुम्हीं झोपलेले नाहीये.”
कपितोनवने स्वतःवर ताबा ठेवला, म्हणजे डावीकडच्या शेजा-याला अपमानास्पद उत्तर द्यायला नको. वयस्कर माणूस आहे आणि त्याला माहीत असायला हवं, की काही लोक उघड्या डोळ्यांनी झोपूं शकतात, असं बरेचदां होतं, विशेषकरून आजकाल. पण कपितोनव आपलं लक्ष वक्त्याकडे वळवतो: तो योग्यता-सूचकांकबद्दल बोलतोय. जादूच्या प्रभावांच्या योग्यता-सूचकांकची गणना करण्याच्या प्रभावहीन पद्धतिबद्दल. असं वाटतंय की ही आंतरिक समस्या तिथे उपस्थित लोकांना फार तापदायक आहे. गिल्ड-प्रेसिडेण्टशिपचा उमेदवार वचन देतो की जादुगारांना सर्टिफिकेट देण्यासाठी 100%पेक्षां जास्त वांछित योग्यता-सूचकांक पद्धति बंद करेल. प्रोग्रामच्या ह्या मुद्द्याचं हॉलमधे गरमजोशीने स्वागत करतात.
“बस, आता वेळ आलीये, आपलं कौशल्य मापण्याची स्केल बदलण्याची! वेळ आलीये संदिग्ध योग्यता-सूचकांकाच्या दुरुपयोगाला “नको” म्हणायची!
दोनदा बीप-बीप झालं.
कपितोनवला मैसेज आला:
{{{ती माझ्याकडे आहे}}}
कपितोनव प्रयत्नपूर्वक डोळ्यांची उघडझाप करतो, जणु ह्या टेक्स्टवर डोळे मिचकावले जाऊ शकतात. पहिल्यांदातर तो टेक्स्टच नाही वाटला, असं वाटलं की जबर्दस्ती घुसून आलेला एखादा फोटो आहे, आणि एक अप्रियशी गोष्ट होती त्या धनुकोष्ठकांमधे, जे ओढून-ताणून आणलेल्या मंद हास्यामुळे पसरलेल्या तोंडाच्या कोप-यांसारखे वाटंत होते. त्याने अक्षर ओळखले आणि आता भावहीन नजरेने ‘ती माझ्याजवळ आहे’कडे बघतोय, जे माहीत नाही कां दोन्हीं कडून स्मित करणा-या धनु-कोष्ठकांच्यामधे आहे.
एक भीतिदायक विचार मनांत येतो की त्याला मूखिनकडून मैसेज आलाय, पण हा मरीनाने पाठवला होता, आणि आता प्रश्न असा आहे – काय त्याला पाठवला आहे?
ही – “ती” – कोण आहे – तिच्याकडे?
कपितोनव लिहितो:
कोण?
पण पाठवंत नाही. काहीतरी त्याला लगेच विचारण्यापासून परावृत्त करते. तो संकोचतो, अस्पष्टतेने अनुभव करंत, की त्याला आणखीही काहीतरी करायचं आहे. हे करण्याआधी, तो मागे वळतो, कुठे लोक त्याच्याकडे बघंततर नाहीये. आणि जरी बघंत असले, तरी त्यांना काय पत्ता लागणार आहे? तो ते करतो आहे, जे स्वतःलापण समजावूं शकंत नाही: प्रश्नार्थक चिन्हानंतर धनु-कोष्ठक काढतो – पहिला, दुसरा आणि तिसरा. मग तो कर्सरला डावीकडे नेतो आणि सुरुवातीला तीन धनु-कोष्ठक बनवून टाकतो.
तो त्याच्याकडे बघतो, जे बनलंय, आणि त्याला वाटतं, की त्याने कोणचीतरी सीमा-रेषा पार केली आहे.
पाठवून दिला:
{{{कोण?}}}
उत्तर लगेच येतं:
{{{इन्नोकेन्ती पित्रोविच}}}
चला, गंमत सोडा (जर ही गंमत असती, तर सगळं काही समजलं असतं), पण मरीना गंमत नाही करणार. पण, काय ही मरीना आहे? नाहीतर, अचानक कळेल की मरीना नाहीये?
पण प्रेषक नक्कीच “मरीना”च आहे.
पण, असंही असूं शकतं, की तिच्या मोबाइलवरून त्याला ती लिहीत नसावी?
त्याला धनु-कोष्टकांबद्दल आणि नोटबुकबद्दल झालेला कालचा वार्तालाप आठवतो, जिच्याबद्दल, जर तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला, तर कोणालाच माहीत नव्हतं.
मरीना. फक्त मरीना.
आणि, तिचाच एक आणखी मैसेज:
{{{थैंक्यू}}}
तिला नक्की फोन केला पाहिजे. तो उठतो, आणि ब्रीफकेस घेऊन दाराकडे जातो.
“आता ‘माइक्रोमैजिशियन’ नावाबद्दल. माझ्या मते, ते चांगलं नाही वाटंत, मला माहितीये की ब-याच लोकांना हा विचित्रसा ‘माइक्रो’ अपमानजनक वाटतो, पण प्रिय मित्रांनो...” त्याला आपल्यामागे ऐकूं येतं.
कदाचित त्याच्या चेह-यावर काहीसा बावरल्याचा भाव आहे, कारण की फॉयरमधे टेबल्स स्वच्छ करणा-या दोन्हीं असिस्टेंट्स कप-प्लेट्स सोडून काहीशा भीतीने त्याच्याकडे बघतात. तो त्यांच्यासमोरून जिन्याच्या लैण्डिंगवर जातो, आणि तिथे, आधीसारखाच, खिडकीतून बाहेर बघंत मरीनाला फोन करतो. खाली एक कार येऊन थांबली, दोन लोक डिक्कीमधून बैलेट-बॉक्सेस काढतात, ते घाईंत आहे, इथे कार थांबवण्याची परवानगी नाहीये, बर्फाचे ढीग त्यांच्या कामांत अडथळा घालतात आहे. तो बराच वेळ वाट पाहतो – बीप्स, पुन्हां बीप्स, - कदाचित मरीनाला सिग्नल ऐकूं नसेल जात, तसं, हे कठीणंच वाटतं, आत्ताच तर तिने कोष्ठकांनी बांधलेलं “थैंक्यू” पाठवलं होतं. त्याच्याशी बोलायचं नाहीये कां?
तो पुन्हां फोन करतो, पण तिचा फोन स्विच-ऑफ आहे.
कपितोनव त्यांचे सगळे मैसेजेस बघतो, सुरुवातीपासून, आणि, जसं थोडं-थोडं कळंत जातं – कमीत कमी मैसेजेसच्या अर्थाच्या संदर्भात. “ती माझ्याकडे आहे” कोण्या व्यक्तीशी संबंधित नाहीये, जसा त्याने विचार केला होता, तर त्याच्या संबंध नोटबुकशी होता, त्यानेच तर ह्याच्याआधी नोटबुकबद्दल लिहिलं होतं – की नंतर परंत करेल. त्या परिस्थितीत त्याच्या प्रश्न “कोण”ला, ज्याचं सर्वनाम ‘ती’शी संबंध होता, मरीना असं समजली की “कोण परत करून गेलं?” आणि ती त्या माणसाचं नाव सांगतेय “इन्नोकेन्ती पित्रोविच”.
ह्याच्यापुढे कपितोनवचं डोकं ते समजण्यास नकार देतं, जे, असं वाटतं की समजायच्या पलिकडे आहे (पण, असं नाहीये कि कपितोनवने विचार करण्यास नकार दिला असेल).
12.55
तो बघतो की त्याच्याकडे हेरा-फेरीचा जादुगार किनीकिन येतो आहे (तोसुद्धां हॉलमधून बाहेर निघून आला होता).
“मी तुमच्या मागे-मागेच आलोय. तुम्हांला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो. फक्त, इथे आपण एकटे आहोत, मला सगळ्यांच्या समोर तुम्हांला भेटायचं नव्हतं.”
“काय झालंय?” कपितोनव विचारतो.
“मला आधीच कबूल करायला पाहिजे होतं,” किनीकिन म्हणतो. “पण, मी घाबरलो, की उपहासाचं पात्र होईन. आपला गुन्हा कबूल करायचाय.”
“तुम्हीं कशाबद्दल बोलतांय?” कपितोनव विचारतो.
“तेच, सगळं ह्या कटलेट्समुळेच झालंय. हे मांजरींसाठी आहे, पाळीव मांजरींसाठी. दचकूं नका, त्या कैबेजचेपण खातात. आपण तर जुन्या परंपरेनुसार चालतो, पण खास पीटरबुर्गमधे पाळीव मांजरींना कैबेजचे कटलेट्स खूप आवडतांत, ते पण मीट आणि फिशच्या कटलेट्सपेक्षा जास्त. ह्यावर खूप आधीच लोकांचं लक्ष गेलं होतं, ह्याबद्दल काही लेखसुद्धा प्रकाशित झालेले आहेत, मी ह्या विषयाकडे लक्ष ठेवतो. दुसरी गोष्ट, आता तर मांजरीपण जवळ जवळ नाहींच आहे. प्रत्येक ठिकाणी गोडाउन बंद करून टाकतात, थण्डी कडाक्याची, उंदरांचा शिकार...तुम्हीं मला माफ करा, पण मांजरी माझा ‘वीक-पॉइन्ट’ आहे, मी मांजरींचा फैन आहे...आणि इथे अंगणांत...बॉयलर रूमच्या मागे...फक्त, प्लीज़, ह्याचा गवगवा नका करू. मला, म्हणजे, काय म्हणायचंय? मी हेरा-फेरी करणारा, उठाईगीर जादुगार आहे, मला अंतर्राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. मी कटलेट्स मांजरींसाठी. तुम्हांला कोणीही लुबाडलेलं नाहीये. ब्रीफकेसच्या संदर्भात. आपण, बस, गडबडून गेलो. हॉटेलमधेच, हॉलमधे. तुमच्याकडे माझी आहे.”
“आणि काय तुमच्याकडे माझी आहे?” कपितोनवच्या जीवांत जीव आला.
“अगदीच तुमची नाही. तुम्हांला विश्वास नाही होणार, पण माझ्याकडे तुमची नाहीये. तुमची – माझ्याकडे नाहीये. डबल गडबड झाली आहे.”
“असं कसं? काय असंही होतं?”
“नक्की होतं! जसं, डबल मर्डरपण होतो, तर मग डबल गडबड कां नाही होऊं शकंत?”
“माझी – कोणाकडे आहे?”
“माझ्या जवळच्या ब्रीफकेसमधल्या वस्तू बघतां, जी, तुम्हांला कळतंय ना, की माझी नाहीये, तुमची ब्रीफकेस दाबून बसला आहे, महाशय नेक्रोमैन्सर.”
“आणि तुमच्याकडे – नेक्रोमैन्सरची आहे?”
“अगदी बरोब्बर बोललांत.”
“आणि नेक्रोमैन्सर स्वतः कुठे आहे?”
“हे कोण सांगू शकतं! जर इथे असता, तर मी लगेच त्याच्याशी बोललो असतो. आणि नंतर तुमच्याशी. पण तो इथे नाहीये. सकाळी बघितलं होतं, पण त्यानंतर तो कुठेतरी गायब झाला. तुम्हीं घाबरूं नका. घाबरण्यासारखं काही नाहीये. तो येईल.”
दोन माणसं जिन्याने वर जातांत, प्रत्येकाकडे एक-एक मतपेटी आहे.
“असं कसं ‘घाबरण्यासारखं काही नाहीये’? आणि जर माझ्या ब्रीफकेसमधे अशी एखादी वस्तू असेल, जी मला कुणालांच दाखवायची नसेल तर?”
“सगळं ठीक होईल, विश्वास ठेवा. तुम्हीं मला माझी परंत द्याल?”
“तुमचीवाली द्या. म्हणजे त्याची.”
“नाही देऊं शकंत.”
“कां नाही देऊं शकंत?” फॉयरमधे दोन्हीं मतपेट्या नेत असलेल्या ऑडिट-कमिटीच्या सदस्यांकडे बघंत कपितोनव आश्चर्याने विचारतो.
“नाही देऊं शकंत. ही परकी ब्रीफकेस आहे. तुमचीही नाही, आणि माझीही नाही.”
“ह्याने काय फरक पडणार आहे की ती कोणाकडे आहे – तुमच्याकडे किंवा माझ्याकडे?” कपितोनव उठाईगीर जादुगारावर दृष्टी रोखंत म्हणतो.
“आणि जर काही फरक नाही पडंत, तर मग प्रश्नंच काय आहे? चला, नेक्रोमैन्सर परंत येईपर्यंत सगळं असंच राहू देऊ. तो येईल, मी त्याच्याशी बोलेन. त्याला त्याची ब्रीफकेस देऊन देईन, तुमची घेऊन घेईन आणि लगेच तुमची ब्रीफकेस तुम्हांला सुरक्षित परंत करेन, आणि आपण गैरसमज दूर करून घेऊं. तुम्हीं फक्त मला माझीवाली देऊन टाका, कटलेट्सवाली, तुम्हींतर ते खाणार नाहीये?...”
“तुमच्याकडे दोन-दोन होतील, आणि माझ्याकडे एकही नाही,” कपितोनव कल्पना करतो. “खूप मजेदार तर्क आहे.”
“तुम्हांला माझ्यावर विश्वास नाहीये?”
“मला फक्त येवढं कळंत नाहीये, की आत्ता माझ्याशी ब्रीफकेसची अदला-बदली करण्यांत तुमचं काय जातंय. आणि खेळातून बाहेर होण्यांत. नेक्रोमैन्सरला तर मी तुमच्याशिवायसुद्धां बघून घेईन. तुमच्यासाठी ते जास्त सोपं राहील.”
“ठीक आहे, मी उत्तर देईन. हा अत्यंत नाजुक प्रश्न आहे. आत्ता, ह्या क्षणाला, नेक्रोमैन्सरच्या ब्रीफकेसमधे काय आहे, ह्याबद्दल खुद्द नेक्रोमैन्सर शिवाय, फक्त एका माणसाला माहीत आहे, तो आहे मी, आणि जर आपण ब्रीफकेसेसची अदला-बदल केली, तर दोन लोकांना माहीत होईल.”
“मी नेक्रोमैन्सरच्या ब्रीफकेसमधल्या वस्तूंवर थुंकतो! मला जाणूनसुद्धां घ्यायचं नाहीये, की त्यांत काय आहे.”
“अगदी बरोब्बर! पण तुम्हीं स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघा, मलातर माहितीये न, बस, हीच प्रॉब्लेम आहे! जर मला ह्या ब्रीफकेसमधल्या वस्तूंबद्दल माहीत नसतं तर मी काहीही विचार न करता, तुमच्या ब्रीफकेसशी ती बदलली असती. पण, आता, जेव्हां मला माहीत आहे की ह्यांत काय आहे – असं करूं शकंत नाही, मला नैतिक अधिकार नाहीये.”
“त्यांत असं आहे तरी काय? कोणाची हाडं आहेत कां?”
“नो कमेन्ट्स, प्लीज़.”
“फार छान,” कपितोनव म्हणाला, “तुमच्या मांजरींना उपाशी राहावं लागेल.”
कठोरतेने. क्रूरतेने. पण हाच एकमेव मार्ग आहे. कपितोनव स्वतःशीच म्हणतो.
13.07
घोडेस्वार. मॉनेस्ट्रीज़. नदीचं कोरडं ठणठणीत पात्र. लाकडी खांब, एकसारखे एकीकडे झुकलेले, स्तेपीवर अनंतापर्यंत विजेच्या तारांना खेचताहेत...
किनीकिनच्या मागे मागे हॉलमधे परंत जायला नको, म्हणून कपितोनव कॉरीडोरमधे प्रदर्शित चित्र बघतोय. कुणाच्यातरी मंगोलिया यात्रेचं वर्णन होतं ह्या चित्रांमधे. कपितोनवला पर्यटनाचा फारसा शौक नव्हता. तो अगदी खास घरकोंबडा आहे.
प्रत्येक पर्यटक दोन चाकांच्या गाडीवर सामान नेतो आहे – हे शिंग असलेले याक आहेत: मंगोल एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणावर जातो आहे. गुंडाळलेला तंबू, घरगुती सामान, गाठोडी, सोलर-बैटरीज़ आणि डिश एन्टेना.
त्याला माहीत होतं, की तिथे खूप तलाव आहेत, पण कल्पना नव्हती की ते इतके मोट्ठे-मोट्ठे असतील. जणु एखादा समुद्र असावा – लाटा खडकांवर आदळतात आहेत. कुठे तरी वाचलं होतं की मंगोल लोक मासे नाही खात. मासा – आपल्या जगाचा प्राणी नाहीये, दुस-या जगाचा आहे.
सकाळची इंटरव्यू-सुंदरी, “तीन अंकांची संख्या”, कपितोनवला विचारते की मैथेमेटिक्सच्या सगळ्या शाखांतून त्याने कॉन्फॉर्मल ट्रान्सफॉर्मेशन्सलाच कां निवडलं. येव्गेनी गेनादेविच, ते जादूची आठवण तर नाही ना देत? तुम्हीं वास्तविक वैल्यूज़शी संबंधित आमच्या क्षेत्राला काल्पनिक वैल्यूज़च्या दुस-या जगांत घेऊन जाता, कारण की लाप्लास ऑपरेटर अपरिवर्तनीय आहे, आणि तिथे ते सगळं सोडवतां, जे करण्याची येथे परवानगी नाहीये. ह्यांत कुठे शैमानिज़्मतर नाहीये?
“वीका (माहीत नाही कां, त्याने ठरवलं की तिचं नाव वीका आहे), तू प्रतिकूल सिद्धांतांचं प्रतिपादन करते आहेस.”
“एव्गेनी गेनादेविच, प्लीज़, लाप्लास ऑपरेटरबद्दल सांगा आणि हेपण सांगा, की त्या जागांवर असाधारण असं काय आहे...तिथे मासे असतात कां?”
“मी अगदीच घरकोंबडा आहे.”
तो एका पायावरून दुस-या पायावर उभा राहिला, पडता-पडता वाचला. डोळे विस्फारून बघितलं. नाही, पायांवर घट्ट उभा आहे.
हा आहे शमान आपल्या लाम्ब ढोलकीबरोबर. दुस-या चित्रांत – मुलं आणि एक मोट्ठा कुत्रा.
घरून, बाइ द वे, काहीच आलेलं नव्हतं – कपितोनवने बघितलं की एखादा मैसेज तर नाहीये. माफ करण्याची विनंतीची, नक्कीच, तो आशा नाही करंत, आणि त्याला क्षमा – याचनेच्या शब्दांची गरजसुद्धां नाहीये. पण जितकं तो आन्ना एव्गेनेव्नाला ओळखंत होता, मुलीचं कर्तव्य आहे की ह्या परिस्थितीत स्वतःची आठवण द्यावी. तठस्थपणे. कमीत कमी तटस्थपणेच. पण मक्ख बसलीये. कुठे काही झालं तर नाही?
येवढ्यांत आपल्या वेळेवर

