Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

4  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - १८

धनु कोष्ठक - १८

6 mins
377


लेखक: सिर्गेइ नोसव ; भाषांतर: आ. चारुमति रामदास 

09.31


“चला, मित्रांनो! वेळ झाली! तुतारी मार्चसाठी बोलावतेय!”

काही तुतारी-बितारी नव्हती, पण तुतारीशिवायंच – ऑर्गेनाइज़िंग कमिटीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार – माइक्रोमैजिशियन र्‍यूमिन लीडरचं कर्तव्य पार पाडायला समोर आला.

दाराजवळ उभा राहून तो जोराने घोषणा करतो:

“आपल्याला दुस-या बिल्डिंगमधे जायचंय, हे इथे जवळंच, ह्याच रस्त्यावर आहे. पण, सावधगिरीचा इशारा देतो, महाशय, विशेषकरून जे लोक बाहेरच्या शहरांतून आले आहेत: रस्ता खूप निसरडा आहे!”


जादुगार हालचाल करूं लागतात आणि एक-एक करून हॉटेल सोडूं लागतात.

“एक-एक करून, एक-एक करून! षडयंत्राबद्दल विसरू नका!”

ही गम्मत सगळ्यांना आवडते – काळ्या ब्रीफकेसेस हातांत असल्यामुळे ह्यांना कुणीही सीक्रेट ऑर्गेनाइज़ेशनचा मेम्बर समजू शकंत होता, जो काळोख्या रात्रीत जागत्या पहा-यानंतर बाहेर पडतांत (ह्या शहरांत श्वेत-रात्री असतात, पण हिवाळ्यांत नाही; आणि हिवाळ्यांततर इथे काळोख्या रात्री सारखंच असतं – सकाळी उशीरापर्यंतसुद्धा).

रस्त्यावर येऊन कपितोनव पहिलं ऋतुजैविकी अवलोकन करतो : बर्फ जमला होता. तो आपला स्कार्फ व्यवस्थित करतो आणि, डाव्या पायाने धक्का देऊन, तळपायांवर सुमारे दीड मीटर घसरतो. अश्या परिस्थितीत, नेहमीसारखं त्याला आठवतं, की त्याला आठवण आहे, की लहानपणी त्याला माहीत होतं – रस्त्याला झाकणा-या बर्फात आणि निसरड्या बर्फांत काय फरक असतो.

फुटपाथचा भाग, जिथे नरम आणि कडक बर्फ नव्हता, हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून दहा पावलांवर संपतो.

“संतुलन कायम ठेवण्यासाठी, प्लीज़ जोड्या बनवा!”

ह्यावेळेस माइक्रोमैजिशियन र्‍यूमिन गंमत करतोय का, समजणं कठीण आहे – असं वाटतं, की हो : जोडीने जाणं खूपंच कठीण आहे. फक्त – एकामागे एक, बर्फ स्वच्छ करायच्या फावड्याइतक्या चौडाईत आणि समोरून चालंत येणा-या लोकांच्या चांगुलपणावरंच चालावं लागेल.

सगळ्यांत आधी र्‍यूमिनंच पडतो, लीडर – त्याला उचलतात आणि अंगावरून बर्फ झटकतात, तो चकित होऊन चारीकडे बघतो : अचानक कसा पडला.

“तलाव’ मागून येऊन कपितोनवला पकडतो, “थैन्क्यू” कुजबुजंत, कारण की तो एकीकडे सरकून गेला होता. मग वळून म्हणतो:

“बाइ द वे! मला आत्तांच ‘श्याम-वन’ने फोन केला होता, ‘ऑडिट-कमिटी’चे बाइ-इलेक्शन्स होणार आहेत. आम्हीं – तुम्हांला.”

“मला?”

“तुम्हीं मैथेमेटिशियन आहांत, आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे. दुस-या कुणावर विश्वास नाही ठेवता येत. नाहीतर, तसले तर बोर्डांत भरमसाठ आहेत!...वाद तर घालूंच नका, कोणताही आक्षेप नको!”

आणि तो तीरासारखा पुढे धावला, आधी पोहोचण्यासाठी.

“काही हरकत नाही, काही हरकत नाही, लवकरंच हिवाळ्याचे दिवस संपताहेत,” कपितोनवच्यामागे कोणी भिणभिणलं, पण कपितोनवला कुणाशी बोलायची इच्छा नाहीये आणि तो असं दाखवतो, की त्याने काळ-भक्षकाचं बोलणं ऐकलंच नाही.

समोर आइसिकल्स तुटून पडतात आहेत – जाण्यासाठी रस्ताच नाहीये. सगळे लोक बर्फाचे जमलेले डोंगर सुखरूप पार करतात, ज्याने की रस्त्याच्या फेन्सिंग लावलेल्या भागांतून दूर होऊन वाहनांच्या रस्त्यावर जाता यावे. रस्त्याच्या दुस-या कडेला चीनी उभे आहे आणि बघताहेत की आइसिकल्स कसे पडताहेत. कपितोनव चीन्यांकडे बघतो, आणि तेव्हांच


09.37


त्याची पाळी येते – तो घसरून पडतो.

वाईट प्रकारे पडला – पाठीवर. डोकं बर्फावर आपटलं. विव्हळला. ब्रीफकेस एकीकडे जाऊन पडली, हे तर बरं झालं, की कारच्या खाली नाही आली.

आणि, लगेच उडी मारून उठलासुद्धा, एखाद्या बॉक्सर सारखा, ज्याला नॉकडाउन केलंय, आणि ज्याला असं दाखवायचंय की तो ठीक-ठाक आहे.

ओवरकोटच्या खिश्यांतून फोन काढतो, कारण की तेव्हांच कॉल आला होता.

“हो, मरीना?”

“तू ‘बिज़ी’तर नाहीयेस? बोलूं शकतोस कां?”

बहाद्दुरीने म्हणतो:

“हो, बिल्कुल बोलूं शकतो! (ह्याच वेळेस त्याला ब्रीफकेस देतात.)

“काही झालं तर नाहीं, नं?”

“ओह, नाही, काही नाही, फक्त इथे बर्फ आहे...निसरडा बर्फ...(डोकं वाकवून सहयोग्यांना धन्यवाद देतो आणि हसून ओठांना खेचंत OK व्यक्त करतो.)

“तर, तू त्याबद्दल मला काय सांगशील?”

“आठवण दे, कशाबद्दल...(कपितोनव पुढे जातो.)

“तुला असं वाटतं का, की ते, जे त्याने तिथे लिहिलं, त्याचा, जे झालं त्याच्याशी काही संबंध नाहीये?”

“त्याच्याशी, जे झालं?”

“त्याच्या मृत्युशी,” मरीनाने पुढे जोडलं.

तो पुन्हां वार्तालापासाठी तयार नाहीये. पण, जेव्हां वार्तालापांत भाग घेण्याची गरंज असते, तेव्हां कपितोनव सहसा भाग घेतो.

“मरीन, प्लीज़, समजण्याचा प्रयत्न कर,” कपितोनव पायांच्याखाली बघंत म्हणतो, “मी काही शेरलॉक होम्स नाहीये, मला माहीत नाहीये की काय विचार करायला हवा. आम्हीं इथे जवळच्याच क्लब ‘सी-9’कडे चाललोय, तिथेच मीटिंग होईल.”

“तर ऐक. तेव्हां – मुख्य मुद्दा. तुला असं नाही वाटलं का की ते सगळं, जे त्याने लिहिलं होतं, खरं आहे? की तो – तो नाहीये? आणि जर असं असेल, तर मग मी कुणाबरोबर राहात होते? आणि तो कुठेय, माझा वाला?”

मैजिशियन्स दोन बाहेर निघालेल्या खिडक्या असलेल्या बिल्डिंगजवळ आले, जुन्या काळांत ही बिल्डिंग दिवाळं निघालेल्या लोकांच्या वेल्फेयर-सोसाइटीची होती (कपितोनवला हे कसं ठाऊक आहे?), आणि आता सम्पूर्ण दुस-या मजल्यावर क्लब “सी-9” आहे, पहिल्या मजल्यावर (कपितोनवला अजून माहीत नाही) फोटो-गैलरी आणि वार्ड-रोब आहे.

“मरीनच्का, मी प्रत्यक्षवादी आहे.”

“तू कसा प्रत्यक्षवादी आहे!”

“कोणच्यातरी प्रकाराचा, पण माझं असं मत आहे, की प्रत्येका गोष्टीमागे काही न काही तर्क ज़रूर असतो. आणि तो अनुभवावर आधारित असला पाहिजे. तुझे प्रश्न मला समजंत नाहीये. हो, दुर्दैवी, दुःखद घटना आहे. पण, जर तसं नसतं आणि त्याने तुला नोटबुक दाखवली असती आणि म्हटलं असतं, मरीना, बघ, मी काहीतरी कल्पना केली आहे, वाच, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तुझं काय मत आहे, मी हे वैज्ञानिक फ़ैन्टेसीच्या प्रतियोगितेसाठी पाठवावं कां, तर तू त्याला काय उत्तर दिलं असतं?”

मरीना म्हणते:

“मला वाटतं, की फैन्टेसी-प्रतियोगितेसाठी रचना वेगळ्या प्रकारे लिहिल्या जातांत.”

“मला नाही माहीत, की कश्या लिहिल्या जातांत,” प्रवेशद्वाराजवळ गर्दीतून बाहेर होत कपितोनव उत्तर देतो (फक्त दारांच्या जवळंच आंत जाणा-यांची गर्दी वाढते). “आणि, काय तुला माहीत आहे? त्याला स्वतःलापण तर माहीत नव्हतं, तो कुणी लेखक थोडांच होता, फैन्टेसी-लेखक नव्हता, तो विचार करू शकंत होता, की अश्या प्रकारे लिहिणंसुद्धां शक्य आहे, बरोबर आहे न, मरीना?”

त्याला वाटतं, की तो तिला धीर देतोय.

मरीना विचारते:

“तू त्या तरुण गुन्हेगाराबद्दल काय म्हणशील? तोच, ज्याचा चेहरा तुमच्या ‘ब्यूस्टे’त कम्पासने मापला गेला होता?”

आत गेला. लॉबी. कपितोनव, एकीकडे सरकून, लोकांकडे पाठ करून उभा राहिला:

“मला असा कुणी आठवंत नाहीये. मी, कदाचित, आधीच निघून गेलो होतो.”

“तर असं आहे. मला स्वप्न पडलं. मला स्वप्न पडलं, की माझा मूखिन...अजूनही कन्स्ट्रक्शन-टीममधे आहे...आणि तू तर त्याच्याबरोबर कन्स्ट्रक्शन टीममधे होता नं?”

“ठीक आहे, होतो कधी, तर मग काय?”

“आणि, की मूखिन...तुलातर आठवतंय, त्याचं कोणाशी?...हे तर तुला माहिती असायला हवं होतं?”

“माहीत नाही, की तुला कसे-कसे स्वप्न पडतात,” तो रुक्षतेने म्हणतो.

“त्या स्टोअर कीपरशी. मला तिचं नावपण माहीत आहे. माहितीये, काय आहे?”

“नाही.”

“तिचं नाव होतं याना.”

“तू काय हे सगळं स्वप्नांत पाहिलं?” कपितोनव भिंतीकडे सरकतो (पाठीमागे आहे गर्दी, पायांचं पुसणं, क्लोक-रूम, रस्त्यावरून येत असलेली थंडी).

“हो, हे फार विचित्र स्वप्न होतं, कोणत्याही फैन्टेसीशिवाय, जास्तंच विचित्र अश्यासाठी, की त्यांत काहीही अजब गोष्ट नव्हती. तिचं नाव होतं याना. दारुडी होती, पीतंच असयाची. सगळ्यांना द्यायची. सगळ्यांना. तुला नाही दिली?”

“मरीना, मी असल्या कोणत्यांच यानांना ओळखंत नव्हतो, आणि जर मी तुझ्या स्वप्नांत आलो होतो, तर तो मी नाही, जो तुझ्या स्वप्नांत आला होता, तुला कळतंय कां?”

“नाही, तू माझ्या स्वप्नांत नाही आला. माझ्या मूखिनने झिंगलेल्या अवस्थेत तिच्याशी संभोग केला, जेव्हां तीपण झिंगलेली होती. स्टोअरमधे, चौथ्या सेक्शनमधे...”

“तू कोणत्या सेक्शन्सबद्दल बोलते आहेस? काही सेक्शन-बिक्शन नव्हते...”

“स्टोअरमधे, चौथ्या सेक्शनच्या मागे. पडद्यामागे, जायच्या दिवशी. गैसचा वास येत होता, ती पूर्णपणे झिंगलेली होती, जेव्हां तो जात होता. गैस लीक होत होती...तिथे खूप सारे कापसाचे जैकेट्स होते, कापसाच्या जैकेट्सचा मोट्ठा ढीग होता...आणि रेल्वे स्टेशनवर त्याने ऐकलं, कश्या उलट्या होत होत्या...तुम्हीं सगळे झिंगलेले होते, घाबरू नको...आणि मग, ती खरोखरंच चालली गेली, जाऊ शकली...आणि हा, तिचा मुलगा, मूखिनचा मुलगा मोठा झाला...सावत्र वडिलांना मारून टाकलं...आपल्या बापाचा पत्ता लावला...आणि त्याला पण मारायचा निश्चय केला...पण तोपर्यंत तो त्या विषयावर पोहोचला होता...तुम्हां लोकांच्या तपासाच्या क्षेत्रांत...त्याला शोधंत होते...आणि, हे, त्यालाच कम्पासने...”

“मरीना, लगेच गप्प बस! अशी स्वप्नं नसतात. तू म्हणतेस काय आहे! कुणी याना नव्हती, कोणचेच स्टोअर्स नव्हते. आम्ही ‘लैण्ड-रिक्लेमेशन’वर (भूमिसुधारणा) काम करंत होतो...त्या काळांत प्रत्येक ठिकाणी लैण्ड-रिक्लेमेशन चाललं होतं!...तुला झालं काय आहे? तू आहेस कुठे? आपल्या डोक्यांतून ही फालतू गोष्ट काढून फेक! तुला ह्या नोटबुकबद्दल विसरायलांच हवं!”

“नाही! जशीचं मी तुला ती नोटबुक दिली, असं वाटलं की माझ्या आतला एखादा भाग तुटून पडलाय. तिच्याशिवाय राहू नाही शकंत. मी तिला घ्यायला येतेय, ठीक आहे? ती तुझ्याजवळ आहे कां?”

“माझ्याजवळंच आहे. पण तुला तिच्यापासून लक्ष दूर करायलांच पाहिजे.”

“क्लब ‘सी-9’…मला माहीत आहे, तिथे मास्क्सचं प्रदर्शन भरलं होतं...आणि जेव्हां तू वाचंत होता, तर तुला असं नाही वाटलं का की मूखिन...”

ती गप्प झाली.मोबाइल एका हातांतून दुस-या हातांत घेत तो ओवरकोट काढतो.

“मूखिन काय?...”

“हे, की मूखिन तुझ्यासारखा आहे?”

“नाही, मरीना, आम्हां दोघांत किंचितही साम्य नव्हतं.”

“मी ख-या मूखिनबद्दल बोलतेय, मी त्याच्याबद्दल नाही सांगत आहे, ज्याने हे सगळं लिहिलं होतं.”

कपितोनव दीर्घ श्वास घेऊन जणु थिजून जातो.

“मी त्याच्यावर खूप प्रेम करायचे.”

आता तो गप्प राहतो.

“मी येऊन घेऊन घेईन.”

“ठीक आहे,” कपितोनव म्हणतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract