Charumati Ramdas

Abstract Crime Fantasy

3  

Charumati Ramdas

Abstract Crime Fantasy

धनु कोष्ठक - १७

धनु कोष्ठक - १७

7 mins
208


लेखक: सिर्गेइ नोसव ; भाषांतर : आ, चारुमति रामदास 

08.49


कपितोनव फायरप्लेस असलेल्या हॉलमधून निघून जातो. लिफ्टमधे तो एका रूम-अटेण्डर मुलीबरोबर चाललाय. तिची नजर कपितोनवला स्पर्श करंत ‘कॉल फॉर हेल्प’च्या बटनवर आहे, पण तो बघतो की तिचं स्मित त्याच्याचसाठी आहे. ह्या स्मितांत तो वाचतो, की मुलीला तो जादुगार असल्याची माहिती आहे, आणि जर त्याला एखादा जादू दाखवायचा असेल, तर त्याला साभार स्वीकार करण्याची तत्परतापण आहे.

पण त्याला आणखी एक मजला वर जायचं होतं.

आपल्या खोलींत (अजून वेळ आहे)


08.55


तो टी.वी. सुरू करतो आणि कपडे बदलतो.

तो गिफ्ट मिळालेली ब्रीफकेस उघडतो आणि विचार करतो, की कॉन्फ्रेन्समधे महत्वाचे कागदपत्र आणि ‘जादुची छडी’ घेऊन जावी, किंवा नाही. तो ठरवतो की ब्रीफकेसमधून काहीही बाहेर नाही काढणार आणि त्यांतच मूखिनची नोटबुक ठेऊन देईल – म्हणजे की कशी तरी मरीनाला परंत देता येईल.

तेवढ्यांत मरीनाचा फोन आला. लवकरंच आहे. त्याने विचार केला, की गोष्टी नंतर होतील. ह्यावेळेस तो बोलायला तयार नाहीये. म्हणून लगेच कनेक्ट नाही केला.

“वाचलं?”

“वाचलं.”

“काय म्हणशील?”

“काय म्हणेन... तुला काय ऐकायचंय?”

“हा संशोधक कोण आहे?”

“मरीनच्का, मला नाही माहीत. ते नोट्स बघतां, तुला, कदाचित माझ्यापेक्षां जास्त चांगलं माहीत आहे.”

“मला माहीत नाही, की संशोधक कोण आहे,” मरीनाने उत्तर दिलं. “पण हे सगळं भयानक होतं. मी खरंच दार तोडणार होते. सांग तर, मी बरोबर केलं ना? मला ह्यांत गोवण्यांत आलं, विचारपूस करण्यांत आली...माझी आइडेन्टिटी माहीत असूनसुद्धां. माझ्यावर शंका घेण्यांत आली. तू कल्पना करू शकतो कां? आणि मीपण नोटबुक नाही दाखवली. दाखवायला हवी होती कां? मी ठीक केलं ना, की नाही दाखवली?” 

“मरीन, तू त्यांना दाखवलं जरी असतंस, तरीही काही विशेष चांगल झालं नसतं. तू प्रत्येका गोष्टीचा नुसता गुंता करून ठेवला असता, त्यांत बरेचसे अंधारे कोपरे आहेत, ज्यांना समजावणं शक्यच नाहीये. तू अगदी बरोबर केलंस.”

“तू, तरीही, काय म्हणतो, त्याने हे सगळं कां लिहिलंय?”

“मरीनच्का, मला नाही माहीत.”

“तो काय वेडा झाला होता? तो वेडा नव्हता. की होता?”

“जर तू समजतेस, की नव्हता, म्हणजे नव्हता. ह्या प्रश्नाचं उत्तर ह्यावेळेस तुझ्याशिवाय कुणी दुसरं नाही देऊं शकंत. जसं तू समजतेस, तसंच आहे. जसं तू म्हणशील, तसंच होईल.” 

“आणि, नोटबुक प्रमाण नाहीये कां?”

“नोटबुक - नोटबुक आहे.” त्याला पुढे हेसुद्धां म्हणायचंय की तो एक वाईट शेरलॉक होम्स आहे, पण मरीनाने मधेंच म्हटलं:

“नंतर फोन करीन. गुड लक.”

कदाचित, नवरा आला होता. कपितोनवला सिग्नल्स ऐकू येतात.

तो नोटबुक ठेवलेली ब्रीफकेस बंद करतो.

कपितोनवचे डोळे लाल आहेत (तो आरशांत बघतो). जर दुस-या कोणाचं असं थोबाड असतं, तर कपितोनवला वाटलं असतं, की त्या माणसाची आत्ताच झिंग उतरली आहे. परिस्थिति विकट आहे. प्रत्येकाला तर तो समजावूं शकंत नाही, की अनिद्रेमुळे त्रस्त आहे.

हॉटेलमधे आग लागल्याची बातमी देताहेत – इण्डियात किंवा बांग्लादेशांत. 17 माणसं मेलेत. काय बांग्लादेशांत की इण्डियात?

आणि हे आहेत एक मुलगा आणि एक मुलगी, नवव्या वर्गाचे विद्यार्थी, एकमेकाचा हात धरून अकराव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर उडी मारली.

भिंतीच्या मागे काळ-भक्षक (कपितोनवचा शेजारी तोच आहे) गुरगुरतोय आणि ज़ोर लावतोय – तो ओकारी करण्याचा प्रयत्न करतोय.


09.12


कपितोनव खाली हॉलमधे आला. काळ्या ब्रीफकेसेस घेतलेले कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स येऊं लागले आहे – आतापर्यंत जवळ-जवळ दहा-पंधरा लोक आलेत: दीवानवर आणि खुर्च्यांवर बसले आहे. काही लोक हिंडताहेत. ब्रोश्यूरमधे पाहिलेल्या फोटोने तो लगेच महाशय नेक्रोमैन्सरला (ओझा, मांत्रिक - अनु. ) ओळखतो, ज्युपितेर्स्कीला ओळखतो, इतरांमधे ‘तलाव’ला बघतो...कालच्या घटनेनंतर हॉटेल प्रशासनने कॉन्फ्रेन्स हॉल मीटिंग्स आणि इतर कार्यक्रमांसाठी बंद करून टाकला होता, म्हणून आज दुस-या बिल्डिंगमधे मीटिंग होणार आहे, जी इथून फार दूर नाहीये. सगळे लोक जमले की त्यांना तिथे घेऊन जातील. कपितोनवच्या अंगावर आहे ओवरकोट आणि कैप.

त्याच्याजवळ हस्तांदोलन करण्यासाठी उत्सुक ‘तलाव’ येतो, - अभिनंदन करतांना कपितोनवला त्याच्या डोळ्यांमधे किंचित उत्सुकता दिसते आणि तो लगेच न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो:

“अनिद्रा.”

“ओह, तुम्हीं पण काय! इथेसुद्धां? इथे अशी कोणची वस्तु आहे, जी तुम्हांला आराम नाही करूं देत आहे?” ‘तलाव’ तक्रारीच्या सुरांत म्हणतो. “तसं, बाइ द वे,” तो कपितोनवला एका माणसाकडे आणतो, जो कंटाळल्यासारखा बाहुल्यांच्या शो-केस जवळ उभा होता. “ह्यांना भेटा – इथे फक्त तुम्हीं दोघंच ‘मेन्टलिस्ट्स’ आहांत.”

दुस-या मेन्टलिस्टचं नाव आहे मिखाइल श्राम, त्याचं स्पेशलाइज़ेशन आहे – लपवलेल्या वस्तूंना शोधून काढणं. शिवाय त्याला ‘सम्मोहन’ प्रक्रियेचंसुद्धां ज्ञान आहे, आणि ‘तलाव’ची इच्छा आहे, की एखादा मिनट काढून श्राम28ने कपितोनवला आपली झोप पूर्ण करण्यास, किंवा कमीत कमी डुलकी घेण्यांतच मदत करावी. 

दोघांच्या खांद्यावर आत्मीयतेने थाप मारतो. 

“आशा करतो, की तुमचं छान जमेल,” असं म्हणंत, रस्त्यावरून येणा-या टेलिविजन-टीम ला मित्रभावाने हाताने खूण करंत जाऊ लागतो. 

श्राम कपितोनवला विचारतो:

“संख्यांवर, कदाचित, दोन अंकांच्या? तर, मी एखादी संख्या मनांत धरूं?”

“इच्छा असेल तर,” कपितोनव म्हणतो. 

तो बेरीज, वजाबाकी करायला सांगतो, मनांत धरलेली संख्या सांगतो.

“समजलं,” श्रामला आश्चर्य नाही होत. “माझं सम्मोहन तुमच्यावर परिणाम नाही करणार.”

“मी सम्मोहनाच्या विरुद्ध आहे.”

“अस कशाला”? घाबरताय कां, की काहीतरी चोरून घेईन? मी मेंदू-चोर नाहीये.”

“ ‘कोण’ नाहीये?” 

“असं बघा, उठाईगीर असतात, खिसेकापू असतात, आणि मेंदू-चोरसुद्धा असतात. आशा आहे, की तुम्हीं मेंदू-चोर नाही.”

“नाही, हे काय म्हणताय, मी मेंदू-चोर नाहीये.”

“विकणार तर नाही? आम्ही विकतं घेतलं असतं. तुमचा ‘रेट’ काय आहे?”

“प्रोग्राम? मेंदू? कशाबद्दल बोलतांय?”

“स्पष्ट आहे, प्रोग्रामबद्दल.”

“हे व्यावसायिक सीक्रेट आहे,” कपितोनव उडवा-उडवी करतो. “तुम्हीं तर सांगणार नाही, की तुमच्यावाल्याचा ‘रेट’ काय आहे.”

“कां नाही सांगणार? माझी प्राइस-लिस्ट सगळ्यांना ठाऊक आहे. प्रोगाम्स बरेचसे आहेत – कोणचा पाहिजे? दाखवलेल्या प्रोग्राम्सपैकी सर्वांत स्वस्त आहे – “कागद शोधा”, पाच हज़ार डॉलर्स, “लपवलेला गोल” – पन्नास. सम्पूर्ण निर्देशन-पत्रिकेसहित, गोलांच्या सेटसकट, ट्रेनिंग क्लासेस सहित. तीन क्लासेस पुरेशे आहेत. तरी, तुमचावाला कितीचा आहे? भाव खाण्याची गरंज नाहीये.”

“माझा – फक्त डोक्याने.”

“नम्रपणे धन्यवाद देतो. एक्स्ट्रा लफडं नाही घेणार.”

हॉटेलमधे राहणा-या सगळ्या लोकांना माहीत नाहीये, की मीटिंग इथेच कुठे नाही होणार आणि बर्फावर चालंत जावं लागेल. ब्रीफकेसेस हॉलमधेच ठेवून, ते गरम कपडे घालायला आपापल्या खोल्यांमधे जातात. काळ्या ब्रीफकेसेस फरशीवर उभ्या आहेत, आणि रिसेप्शन-काउन्टरवाले त्यांच्याकडे अप्रसन्नतेने बघताहेत.

“कालच्या घटनांच्या संदर्भात हे खरोखरंच चिंताजनक वाटतंय...विपत्तीच लक्षण नाही म्हटलं तर,” श्रामने जणु डोळ्यांने ब्रीफकेसेसवर नेम धरंत म्हटलं.

“पण, जर काही असेल, तर तुम्हांला तर बाहेरूनच बघून कल्पना येईल.”

“बाहेरून बघून नाही, तर साधारणपणे.”

“काळजीचं कारण तर नाहीये ना?”

मिखाइल श्राम चूप राहिला. जणु तो कपितोनवच्या कौशल्याचं उत्तर आपल्या एखाद्या विशिष्ठ चमत्काराने द्यायच्या बेतात आहे. त्याची नजर ड्रैगनवाल्या चीनी मातीच्या फ्लॉवरपॉटजवळ ठेवलेल्या ब्रीफकेसवर थांबते.

“ही माझी आहे,” कपितोनवने सावध केलं, ज्याने चुकीचा समंज व्हायला नको.

“ह्यांत कोणची तरी बाहेरची वस्तू आहे.”

“एका माणसाची नोटबुक आहे,” कपितोनव आनंदाने स्वीकार करतो.

श्रामच्या चेह-यावर लिहिलंय, “ मी तर नव्हतं विचारलं”; कपितोनवच्या सहमतिने दुःखी होऊन तो ह्या टिप्पणीकडे लक्ष नाही देत:

“नाही, तिथे आणखी काहीतरी आहे.”

आणि तो शो-केसकडे वळतो, चेह-यावर असा भाव आहे, जसं जरा जास्तंच बोलून गेलाय.

आपलं हसू आवरण्यास असमर्थ कपितोनवपण शो-केसकडे सरकतो – दुस-या : हिच्यांत पीटरबुर्गशी संबंधित सगळ्या प्रकारचे स्मृति-चिन्ह ठेवले आहेत. त्याला खूप हास्यास्पद वाटतंय, तो खुर्चीवर बसून जातो. 

जास्तीत जास्त डेलिगेट्स येताहेत, आणि जवळ-जवळ सगळ्यांच्याच जवळ काळ्या ब्रीफकेसेस आहेत.

कपितोनवपासून तीन पावलांवर ‘तलाव’ टेलिविजनवाल्यांना इंटरव्यू देतो आहे.

09.25


“नॉनस्टेजर्स म्हणजे कोण?” कपितोनव रिपोर्टरचा खणखणीत आवाज ऐकतो (ज्या आत्मविश्वासाने ती कठीण शब्दांच उच्चारण करंत होती, त्यावरून कळंत होतं की मुलगी चांगली तयारी करून आली आहे).

“नॉनस्टेजर्स – आम्ही आहोत,” ‘तलाव’ गर्वाने म्हणतो. “जादुगार, जे प्रदर्शनासाठी प्रयुक्त केल्या जाणा-या जागांशी संबंधित नसतात, - मग तो सर्कसचा अरेना असो, रॉम्प असो, किंवा एखादा स्टेज असो, ह्या शब्दांत दडलेल्या सगळ्यांच अर्थांच्या संदर्भात. आम्ही आपल्या कलेचं प्रदर्शन जगाच्या कोणच्याही कोप-यांत, आणि कोणत्याही परिस्थितीत करू शकतो. ऑफिसमधे लहानशी पार्टी आहे? प्लीज़. कुणी कॉर्पोरेट आलाय? जितकं पाहिजे तितकं. ट्रेनचे रेस्टॉरेन्ट? कां नाही? जहाज-दुर्घटनेला सामोरे गेलेल्या लोकांची नाव? तिथेसुद्धां आम्ही तुमची मदत करू. कारण की आमचं काम आहे – लोकांचा ‘मूड’ चांगलं करणं, त्यांना आनंदित करणं, सगळ्यांत जास्त आवश्यक आहे, त्यांना चकित करणं, चकित करणं आणि अनेक वेळा चकित करणं!”

“आजच्या माणसाला तुम्हीं कसं चकित करूं शकता? जादूच्या साधारण खेळांनी?”

“कौशल्याने! नॉनस्टेजिंग – अत्यंत उच्चकोटीचं कौशल्य आहे. ते दर्शकापासून अत्यंत कमी अंतरावर प्रदर्शित केलं जातं, जेव्हां तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर फक्त वार्तालापाच्या माध्यमाने दर्शवलं जाऊं शकतं. आमच्या असोसिएशनमधे उगीचंच अत्यंत भिन्न-भिन्न प्रकारचे लोक नाहीत – माइक्रो मैजिशियन्स, हे आजकाल प्रचलित नाव आहे, पण तुम्हीं, कदाचित, त्यांच्याबद्दल ऐकलेलं नाहीये?...तुम्हीं म्हणता ‘जादूचे साधारण खेळ’. पण माइक्रो मैजिशियन तुम्हांला असे-असे जादू दाखवेल...आगपेटीने किंवा साधारण चश्म्याने...तुमची मतीचं गुंग होऊन जाईल! माइक्रो मैजिशियन – सुपर जादुगार आहे, साध्या-सरळ, ओळखीच्या वस्तूंनी चमत्कार करतो. तो, उदाहरणार्थ, तुमचा माइक्रोफोन घेऊन बघता-बघता त्याला काकडीत बदलू शकतो, किंवा, जसं, मी तुमची अंगठी बघतो आहे...”

“ओय, ओय, राहू द्या! इथे ‘पत्तेचोर’ आणि ‘ठग’सुद्धां आहेत...”

“मी विरोध करतो! हाइपर-पत्तेचोर आणि हाइपर-ठग. कृपा करून साधारण पत्तेचोर आणि ठगांशी ह्यांची तुलना नका करू. तसं तेसुद्धा काम करतातंच, अंगुश्तान आणि पत्त्यांने. पण आमचे, ते, जे हाइपर आहेत, असे आर्टिस्ट्स आहे, ज्यांचे साधारण पत्तेचोरांशी आणि ठगांशी अश्या प्रकारचे संबंध आहेत, जसे कायद्याचं पालन करणा-या ऑस्ट्रेलियन्सचे – आपल्या पूर्वजांशी, प्रत्येक प्रकारच्या गुन्हेगाराशी, ज्यांना जगाच्या दुस-या टोकावर निष्कासित केलेलं आहे. आमच्या पत्तेचोर आणि ठग उस्तादांसाठी अंगुश्तान आणि पत्ते – दर्शकांसाठी खेळाची महान सामग्री आहे, ह्या खेळांत जागरूक दर्शक हिरीरीने भाग घेऊं शकतो, चांगल्या प्रकारे कळंत असूनही की त्याला...कसं म्हणूं...हरवतांत आहे. पण त्याला कळतंच नाही – कश्या प्रकारे.”

“हाताची सफाई आणि कोणत्याही प्रकारचा घोटाळा न करता.”

“बरोबर, कोणताही घोटाळा न करता. आणि घोटाळा करायचा तरी कशाला? हे तर आर्ट आहे. जर हाताच्या सफाईचा प्रश्न आहे, तर त्याच्याशिवाय काम कसं चालणार, पण इथे न केवळ हाताच्या सफाईचा प्रश्न आहे, तर मनोविज्ञानाची जाणीव असणंसुद्धां आवश्यक आहे, विश्लेषणात्मक बुद्धीचीपण गरज आहे. अश्या घटनासुद्धा होतात, जेव्हां हातांचा उपयोगंच नाही होत. मेंटलिस्ट जादुगार, उदाहरणार्थ, हाताच्या सफाईचा प्रयोग नाही करंत, उलट ते असाधारण कौशल्याने, ह्या शब्दाच्या प्रयोगासाठी मला क्षमा करा, तुमच्या देहभानावर अधिकार करतात. आमच्यांत एक मेंटलिस्ट आहे, जो कोणतीही लपवलेली वस्तू शोधून काढतो, तुम्हांला एकही प्रश्न न विचारतां, भले ही त्याला स्वतःलापण माहीत नसो की तुम्हीं कोणची वस्तू लपवली आहे. म्हणजे, त्याला तर माहीत आहे, प्रेज़ेन्टेशनच्या वेळांत सगळं काही जाणून घेतो. हे आहेत आणखी एक मेंटलिस्ट. तुम्हीं एखादी संख्या मनांत धरा, ते ओळखतील. कपितोनव महाशय, प्लीज़...”

खुर्चीत खचलेला कपितोनव चेह-यावरून असं दाखवतो की हे आवश्यक नाहीये, पण मुलगी त्याच्याकडे न बघतांच ‘तलाव’ला म्हणते:

“गरंज नाहीये! मला प्रश्न विचारून-विचारून बेजार करून टाकतील, फ्रेममधे फक्त तुम्हीं बोलाल, एकटे, म्हणून मला काही मनांत धरायची गरज नाहीये, मी नंतर स्वतःच धरीन, चला, पुढे चलूं. आणखी, काय तुमच्याकडे अतिरिक्त-संवेदी आहेत?”

“अतिरिक्त-संवेदी – ही वेगळी गोष्ट आहे. आम्हीं, मी पुन्हां सांगतो, एक्टर्स आहोत.” 

“पण तुमच्याकडे ईवेन्ट्स-आर्किटेक्ट्स, स्थान आणि काळ-भक्षक तर आहेत...”

“त्यांच्यासाठी बहुवचनाची गरज नाहीये. त्यांच्यापैकी प्रत्येक अद्भुत आहे, अद्वितीय आहे. आमच्याकडे एक काळ-भक्षक आहे, तो स्थान भक्षण नाही करंत...एक ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे...: - त्याला पुढे म्हणायचं आहे “एक नेक्रोमैन्सर”, पण त्याला दाराजवळ उभा असलेला पाहून, त्याच्याकडे जास्त लक्ष आकर्षित न करण्याचे ठरवतो, नाहीतर रिपोर्टर लगेच त्याचा इंटरव्यू घ्यायला निघून जाईल, आणि गडबडून पुन्हां आपल्या विचारांची जुळवा-जुळव करूं लागतो. – “दुस-या शब्दांत,” ‘तलाव’ पुढे म्हणतो, “प्रकाराच्या दृष्टीने आम्ही आपल्या समूहात विविधता आणायचा प्रयत्न केला आहे, म्हणून आम्ही तथाकथित रिमोटिस्ट्सला, नवीन, पण प्राचीन परंपरेवर आधारित प्रणालीच्या प्रतिनिधींनासुद्धां आमंत्रित केलं आहे. ह्यांच्याबद्दल दर्शकांचं आणि विशेषज्ञांचं मत नेहमीच एकसारखं नसतं. पण ह्या विशिष्ट मास्टर्सशी सहयोग करण्यांत खूपंच मजा येते.”

“काय नेक्रोमैन्सरसुद्धां त्यांच्यापैकीच एक आहे? तो मृतकांसोबत काम करतो कां?”

“मी पुन्हां एकदा सांगतो, आम्ही आर्टिस्ट्स आहोत, आर्टिस्ट आपल्या पात्राबरोबर न्याय करंत असतो. आणि मग, स्वतःला बुल्गाकोवच्या नायकाच्या जागेवर ठेवण्याची माझी इच्छा नाहीये, जो पब्लिकला समजावतो की काळ्या जादूचं अस्तित्व नसतं.”

“पण त्याचं अस्तित्व असतं कां?”

“आधुनिक मायावादात एका सुरेख प्रणालीचं अस्तित्व आहे, जिचं प्रतिनिधित्व – आम्हीं, जादुगार-नॉनस्टेजर्स करतो, आणि मी विनंती करतो, की ह्याच स्वरूपांत आमच्यावर प्रेम करावं, आणि आमची मदत करावी.”



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract