STORYMIRROR

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - १६

धनु कोष्ठक - १६

5 mins
216

हातांत प्लेट घेऊन बुफेच्या टेबलाकडे बघतोय. “प्रत्येक वस्तु थोडी-थोडी” ह्या सिद्धांताचं अनुसरण करतानापण तो चीज़च्या पैनकेक्सकडे दुर्लक्ष करतो, आणि फ्राइड-सॉसेजच्या ऐवजी कोबीचे कटलेट्स घेतो.

आतापर्यंत न पेटवलेल्या ‘फायरप्लेस’च्या जवळच्या टेबलाशी बसून आरामांत खायला सुरुवात करतो.

ब्रेकफास्टसाठी आलेल्या लोकांनी हॉल भरतोय. कपितोनव हे माहीत करायचा प्रयत्न करतो की आगंतुकांपैकी कोण-कोण कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स आहे, - पूर्ण हॉटेलतर त्यांच नाहीये.

हातांत प्लेट्स घेतलेले दोन माणसं त्याच्या टेबलाशी बसायची परवानगी मागतात (रिकाम्या खुर्च्या आता दिसंत नाहीये).

त्यांच्या बैजेस कडे बघून कळलं की त्यांच्यापैकी एक माइक्रोमैग (माइक्रोमैजिशियन – अनु.) अलेक्सांद्र सीज़र आहे, दुसरा – हेरा-फेरी करणारा सिर्गइ वराब्योव. टेबलवर ते आपल संभाषण सुरू ठेवतात.

“नाही, मला वाटतं की हे वास्तविक नाहीये,” – सीज़र म्हणतो. “प्रमाणित करण्यासाठी इतर काही मानदण्ड ठरवावे लागतील. दक्षता-गुणांक मोजण्याची कोणचीच पद्धत नाहीये. 

“विशेषकरून तेव्हां, जेव्हां दक्षता-गुणांक शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे,” वराब्योव सहमति दाखवतो. “मी म्हणतो, की माझा दोनशे आहे. आणि तुम्हीं सिद्ध करा, की दीडशे आहे.”

“दोनशे – जास्त नाहीये. मी खात्रीने सांगतो की माझा दोनशे वीस – दोनशे चाळीस आहे, ह्याच्यापेक्षा कमी नाही.”

“माफ़ करा, तुम्हीं दक्षता-गुणांकाबद्दल बोलता आहांत कां?” त्यांच्या गोष्टींने चकित होऊन कपितोनव आपलं नाक खुपसतो.

“बरोब्बर, दक्षता-गुणांकाबद्दलंच.”

“परिभाषेप्रमाणे दक्षता-गुणांक शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असूं शकत नाही.”

“कां?”

“’कां’ काय? कारण की दक्षता-गुणांक – उपयोगी काम आणि नष्ट झालेल्या कामाचा प्रतिशत अनुपात असतो. आणि उपयोगी काम नेहमी नष्ट झालेल्या कामापेक्षां कमी असतं.”

“सामान्य भौतिक शास्त्रांत – निसःन्देह असं आहे,” घसरणा-या ऑलिवमधे काटा घुसवायचा प्रयत्न करंत सीज़र उत्तर देतो, “पण जेव्हां आपण भौतिक जादूबद्दल बोलतो… जसं, हीच धारणा घ्या – चमत्कार. जर प्रेक्षकाला बघंत असलेल्या चमत्काराचा दक्षता-गुणांक मोजण्याच्या पद्धतीचं ज्ञान असेल, तर त्याला कसलीच शंका नाही होणार – चमत्काराचा दक्षता-गुणांक शंभर टक्क्यापेक्षां जास्त असेल. उपयोगी काम नष्ट झालेल्या कामापेक्षा जास्त आहे.”

“अगदी शंभर टक्के,” वराब्योव सहमति दाखवतो. “नष्ट झालेलं काम, कदाचित तेवढंच असेल, जे जादूचे मंत्र म्हणण्याशी, भविष्य सांगण्यासाठी फासे तैयार करण्याशी, आणि काही आरंभिक तयारीशी संबद्ध असेल. एमिल्या27 आठवतो कां? त्यालापण दर वेळेस म्हणावं लागायचं “मासोळीच्या आज्ञेने”, आपली शक्ति खर्च करावी लागायची, आणि हे विसरतां कामा नये की ह्या मासोळीला पकडण्यांत पण त्याची काही ना काही शक्ति खर्च झालीच होती. म्हणजेच, नष्ट झालेलं काम – हे कोणत्याही प्रकारच काम असू शकतं, असल्या टोकाच्या परिस्थितीतसुद्धा, पण उपयोगी काम त्यापेक्षां कितीतरी जास्त आहे.”

“तुमचा तर्क समजला,” कपितोनव हसून म्हणतो, “पण जर असं आहे, तर हा चमत्कार नाही, तर दुसरंच काहीतरी आहे. चमत्कारासाठी काम नष्ट व्हायची आवश्यकताच नाहीये, तो होत असतो बाहेरून, तुमचं परिश्रम नष्ट होण्याच्या पलीकडून.” त्याने चाकूने बन कापला, ज्याने त्यावर लोणी लावता येईल. “तुम्हीं ते म्हणताय, ज्याला म्हणतात...खरं म्हणजे, काय म्हणतात?…जादू, चमत्कार नाही. जादू फासे नसल्याशिवाय होत नाही, हे खरं आहे, म्हणजे नष्ट झालेल्या कामाशिवाय जादू होऊं शकंत नाही. पण चमत्कार तेव्हां होतो, जेव्हां नष्ट झालेलं काम ‘शून्य’ असतं. मी चूक म्हटलं कां?”

“तुम्हांला हे म्हणायचंय, की चमत्काराच्या दक्षता-गुणांकाची गणना करायला उपयोगी कामाला शून्याने भाग दिला पाहिजे?” चाकूच्या अचूक वाराने अंडे फोडंत वराब्योव विचारतो.

“तसं तर शून्याने भाग देण्याची परवानगी नाहीये. पण जर शून्याच्या ऐवजी डिनॉमिनेटरमधे (विभाजक) अत्यंत लहान संख्या ठेवली, जी जवळ-जवळ शून्याइतकी असेल, तरीसुद्धां परिणामस्वरूप तुम्हांला अशी संख्या प्राप्त होईल जी जवळ-जवळ इन्फिनिटीयेवढी(अनंत) असेल.”

“चमत्काराचा दक्षता-गुणांक – इन्फिनिट टक्के?”

“तसं, कदाचित, ‘इन्फिनिटी’ला प्रदर्शित करण्यांत काही अर्थ नसावा.”

“आणि, जोपर्यंत जादूचा प्रश्न आहे, तर त्याच्या दक्षता-गुणांकाला टक्केवारीने प्रदर्शित करणं, हे काय, तुमच्या मते, बरोबर आहे?” आपल्याच नावाच्या सैलेडकडे, जो त्याच्या बाजूने काळ-भक्षक नेतोय, बघंत सीज़र विचारतो.

कपितोनव जवळून जात असलेल्या शेजा-याकडून लगेच डोळे फिरवतो.

“हे मी नाही म्हटलंय. हे तुम्हीं म्हणताय,” कपितोनव सीज़रला उत्तर देतो.

“माफ करा, तुम्हीं कोण आहांत?”

“येव्गेनी कपितोनव. मेंटलिस्ट, जर पाहिजे तर तसंही म्हणतां येईल.”

“आणि जर नसेल तर? जर कोणता चमत्कारंच नाही झाला तर? जर, साधारणपणे, काहीच नसलं तर – म्हणजे, जसं की आत्ता, तर आपल्या निष्क्रियतेचा दक्षता-गुणांक काय असेल?” वराब्योव विचारतो.

“हे कशाबद्दल? 

“त्याबद्दल, की नष्ट झालेलं काम शून्य असेल आणि उपयोगी काम सुद्धां शून्य असेल तर. दक्षता-गुणांक – काय शून्याला शून्याने भाग द्यावा लागेल?”

“दक्षता-गुणांक कशाचा?”

“कशाचा नाहीं. काहीचं होत नसल्याचा.”

“जर उपयोगी काम होतंच नाहीये, तर दक्षता-गुणांक कसा काढाल?” कपितोनवला कळंत नाहीये.

“असं बघा – शून्य/शून्य. अश्या एखाद्या मशिनीची कल्पना करूं या, जिला मुद्दाम सैद्धांतिक निष्क्रियतेसाठी बनवण्यांत आलंय.”

कपितोनव उत्तर देतो.

“शून्य/शून्य होईल अनिश्चितता .”

“ही अनिश्चितता कुठून आली?” सीज़र बुचकळ्यांत पडतो. “कुठे अश्यासाठीतर नाही, की चमत्कारंच नाहीये?”

“नाही, अशासाठी, की डिनॉमिनेटरमधे नष्ट झालेलं काम अनुपस्थित आहे.”

“पण डिनोमिनेटरमधे शून्य नष्ट झालेल्या कामाच्या ऐवजी – चमत्काराच्या परिस्थितीत, जसं तुम्हीं आत्ता सांगितलं, आपल्याला न्यूमरेटरमधे काहीतरी परिणाम प्राप्त व्हायला पाहिजे, चमत्कारी परिणाम, एका शब्दांत, शून्य नाही. आणि तेव्हां आपला दक्षता-गुणांक – इन्फिनिटी (अनंत) होईल.”

“हो, पण हा आपला दक्षता-गुणांक नाहीये.”

“दक्षता-गुणांक चमत्काराचा.”

“स्टॉप,” वराब्योव म्हणतो, “तो कुठे आहे, चमत्कार? ह्याने हे सिद्ध झालं की आपण नेहमी अनिश्चिततेच्या स्थितीत असतो. आशेच्या स्थितीत आणि चमत्काराच्या आशेत? मी, जणु, ह्या क्षणी कोणतंच काम नष्ट नाही केलं, आणि मला काय प्राप्त झालं? शून्य/शून्य – अनिश्चितता . कळंत नाहीये. मला आपल्या निष्क्रियतेचा दक्षता-गुणांक माहीत करायचाय. तो शून्य कां नाहीये? जर तो – अनिश्चितता आहे, म्हणजे, मला निश्चिततेची आशा करण्याचा अधिकार आहे? म्हणजे, ह्या गोष्टीची, की चमत्कार होईल?”

थोडा वेळ शांत राहिले. काही विचार केला. कपितोनवला वाटलं की त्याची फिरकी घेताहेत. 

“तसं, इथे दक्षता-गुणांकाची गरज काय आहे?” कपितोनव विचारतो. “दक्षता-गुणांक – फक्त एक दुस-याच्या प्रतिशत संबंधाला दर्शवतो. दक्षता-गुणांक ना तर देव आहे, ना विश्वकर्मा, ना एखादी काळी किंवा पांढरी शक्ति. तो फक्त दक्षता-गुणांकच आहे.”

“पण सर्टिफिकेटसाठी आमच्याकडून तो मागण्यांत येतो.”

“आणि, ही अपेक्षा केली जाते की तो शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असावा. ह्याचा प्रभाव आमच्या पगारावर, आमच्या श्रेणीवर पडतो.”

“छान आहे,” कपितोनव म्हणतो.

“तुम्हीं काय अशाप्रकारे नाही कमवंत?” वराब्योव विचारतो.

“मी वेगळ्या प्रकारे कमावतो,” कपितोनव म्हणतो.

“लकी आहांत.”

“थांबा, पण तुमच्याकडे अधिकार आहे,” कपितोनव म्हणतो. “कोणाला ना कोणाला तुमची सुरक्षा करावीच लागेल. तुमची काही यूनियन आहे कां?”

“कपितोनव, हे सांगा की तुम्हीं पाच डबल रोट्यांनी पाच हजार माणसांचं पोट भरू शकता कां?” सीज़र विचारतो.

“हा काय प्रश्न झाला? नक्कीच, नाही.”

“मीसुद्धा.”

तो उठतो आणि जाऊ लागतो. वराब्योव म्हणतो:

“बिल्कुल तर्क करता नाही येत. सिद्धांतवादी आहे. विशेषकरून, जिथे मूलभूत सिद्धांतांचा प्रश्न येतो. अरे, इथे माझं कटलेट होतं, कुठे गेलं?”

“माझ्याकडेपण होतं – इथे प्लेटमधे.”

“मी नाही खाल्लं.”

“आणि मीसुद्धां नाही खाल्लं,” कपितोनवचा विश्वास नाही बसंत. “कुठेतरी गायब झालंय.”

“चला, चुलीत टाका कट्लेट्सला,” वराब्योव म्हणतो आणि, कपितोनवला चकित करंत, ह्या विचित्र परिस्थितीशी जुळतं घेऊन, जसं काही झालंच नाहीये, अंजीर खाऊ लागतो.

“असं कसं?” कपितोनव विचित्रसा प्रश्न विचारतो.

कपितोनव वैतागला. जेव्हां त्याच्यासोबत एखादी अविश्वसनीय गोष्ट होते, तेव्हां तो सगळ्यांत आधी स्वतःला समजण्याचा प्रयत्न करतो : त्याला वस्तुस्थिति खरोखर समजली आहे कां?”

“कदाचित...आपण विसरलो,” आणि आपल्या कथनाच्या सत्यतेवर स्वतःच अविश्वास करंत तो वळून इतरांकडे बघू लागतो, ते सगळे आपापल्या टेबलाशी बसून बुफ़े-टेबलवरून घेतलेल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा आनंद घेताहेत – कोणी ऑमलेट घेतंय, कोणी बॉइल्ड-सॉसेजेस, कोणी सैलेड आणि हैरिंग-मासा, कोणी केक्स, फक्त काळ-भक्षक, टेबलाच्याखाली हात ठेवून निराशेने प्लेटकडे बघतोय, ‘सीज़र-सैलेड’कडे. निराशेने बघतोय आणि खराब दिसतो आहे : काळ-भक्षकच्या चेह-याच्या रंगाला ‘सैलेडसारखा’ म्हणणं चांगल राहील. हिरवटपणा घेतलेल्या, वळ्या असलेला.

“माफ करा. विसरलो – काय?” (वराब्योव ला कळलं नाही की कपितोनवने काय म्हटलं होत.)

कपितोनव अर्धवट विचार केलेल्या गोष्टीकडे परतला:

“काय, खाल्ले, विसरलो...कटलेट्स.”

“आपण विसरलो? की खाऊन टाकले? नाही, मी नाही विसरलो, मी नाही खाल्ले.”

काळ-भक्षकला अंदाज येतो की ते दोघं त्याच्याकडे बघताहेत, त्याच्या रंग आणखी हिरवा होतो. त्याच्या चेह-यावर – जणु ओकारी थांबवतो आहे. तो उठून जातो, तळहाताने तोंड बंद करतो आणि दाराकडे जातो, काहीही न खाता.

“आला कां होता?” वराब्योव कपितोनवला विचारतो. “आपलं जेवण त्याला झेपंत नाही.”



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract