धनु कोष्ठक - १४
धनु कोष्ठक - १४
लेखक: सिर्गेइ नोसव ; भाषांतर: आ, चारुमति रामदास
मरीना हुंदके देत-देत रडंत होती, हातात हैमर पकडला होता.
“चोरटी-गोरटी” (मी आवाजांत शक्यतितका नाजुकपणा आणंत म्हटलं).
तिच्याकडे गेलो, तिला आपल्या बाहुपाशांत घेऊन गालांचा मुका घेतला.
तिचा गाल खूप गरम होता, जणु जळंत होता. कदाचित, मी विचार केला, की माझे हात भयंकर गार आहेत.}}}
{{{आज मला खूप वाईट स्वप्न पडलं, ज्याचा संबंध माझ्याशी तेवढा नसून, मूखिनशी होता. ही फार अप्रिय गोष्ट आहे – अशी स्वप्न पाहणे, जे प्रकृतीने तुमची नाहीत, आणि विशेषकरून, ज्यांचा संबंध तुमच्या स्वतःच्या भूतकाळाशी नसतो.
मी हे स्वप्न सांगणार नाही, फक्त त्याच्या प्रकृतिबद्दल सांगतो - - : किंवा असं, की त्याच्या प्रकाराबद्दल. जणु मूखिनच्या जीवनातील एका घटनेशी संबंधित परिकल्पनेशी माझा साक्षात्कार झाला.
तिथे - - : स्वप्नांत - - : ती परिकल्पना मला अत्यंत विश्वसनीय वाटली, अशी, जिच्याशी मी कधीच सहमत नसतो झालो, जेव्हां जाग आली, सौभाग्याने, मी जागांच झालो. तर, सकाळी ‘ब्यूस्टे’त पोहोचून, काही विशिष्ठ प्रमाण शोधताना, भाग्य माझ्यावर मेहेरबान झालंच - - : प्रश्न हा आहे, कोणाचं भाग्य - - : माझं की मूखिनचं?
हे असं झालं. लंच-ब्रेक मधे, जेव्हां नेहमीसारखे आमचे सगळे लोक जवळच्या फास्ट-फूड सेन्टरमधे गेले, तेव्हां मी अलीनाच्या टेबलचा चक्कर मारला आणि खिडकीच्या जवळच्या तिच्या अलमारीत ठेवलेल्या फाइल्सचं निरीक्षण केलं. ज्या फाइल्सवर अलीना काम करंत होती, त्यांच्यावर असं लिहिलं होतं - - : “अट्टल गुन्हेगार”, “लैंगिक अपराधी”, “तीक्ष्ण-बुद्धि”, “बापाचे हत्यारे” इत्यादि. ह्या वर्गीकरणाने, सौम्य शब्दांत सांगायचं तर, मला चकित केलं - - : एकंच चेहरा, एकसारख्याच सफलतेने एकदम कित्येक फाइल्समधे असण्याची शक्यता असूं शकते. मला माहीत होतं, की हे शीर्षक अलीनाने नाही लिहिले आणि हेसुद्धां की त्या अशाच अवतारात संशोधन करणा-या क्लायन्टकडून आमच्या ‘ब्यूस्टे’मधे आलेल्या होत्या, ह्या फालतू गोष्टींच्या वर्गीकरणाबद्दल असलं प्रेम समजणं माझ्यासाठी बरंच कठीण होतं. बरं, ठीक आहे. मला “मायावी” शीर्षकाच्या फाइलने आकर्षित केलं. मी पट्कन फाइल उघडली आणि, पानं उलटंत ‘त्याला’ शोधू लागलो. ‘त्याचाच फोटो’. जो माझ्यासारखा आहे. माझ्या सारखा - - : तरुणपणी.
तोचतर ह्या रात्री माझ्या स्वप्नांत आला होता, नाहीतर मी त्या फाइलमधे नसतो घुसलो.
अलीनाने चेह-याच्या मापदण्डांना, अंशतः, लांबी मापण्यासाठी कम्पासचा उपयोग केलेला होता, म्हणून चेह-याच्या विशिष्ठ बिंदूंवर खुपसल्याच्या खुणा होत्या, आणि डोळ्यांबद्दलतर चक्क सांगता येईल, की त्यांना काढून टाकलं होतं. मला हे आवडलं नाही.
मी लवकरंच त्याचा फोटो शोधला.
हासुद्धां डोळे काढून टाकलेला होता.
काढून टाकलेले डोळे असलेला, तरुणपणी माझ्यासारखा, त्याच्याबद्दल विचार करणं खूपंच अप्रिय वाटंत होतं.
पण तो काय माझ्यासारखा होता, हासुद्धां एक प्रश्न आहे. ह्याचंच उत्तर देणार आहे. हीच मुख्य गोष्ट होती.
जोपर्यंत टोचल्याच्या खुणा आणि डोळे बाहेर काढण्याचा संबंध आहे, तर हा शेवटी एक टेक्निकल प्रश्न आहे, हा सरळ-सरळ मोज-माप केल्याचा परिणाम आहे, ही गोष्ट मी समजंत होतो.
मी त्याच्याकडे पाहिलं - - : जवळ-जवळ माझ्यासारखा, पण, तो मी नव्हतो. मी असा नव्हतो. पण काहीतरी साम्यसुद्धां होतं.
फोटोला उलटून बघितलं (प्रत्येका फोटोमागे लिहिलं होतं, की कोण आहे, काय आहे) - - : पेन्सिलीने - - : “ईगर अलेक्सेयेविच झीलिन”, जन्म तारीख, जन्म स्थान - - : “अत्यंत क्रूरतेने आपल्या सावत्र बापाला मारून टाकलं. वान्टेड.”
मी बराच वेळ ह्या नोंदीकडे बघंत होतो, माझे विचार, जसं की ह्यावेळेस म्हणू शकतो, खूप गुंतागुंतीचे झाले होते; माझ्या बोटांच्या थरथरण्यामुळे त्या ओळी एका तालांत थरथरंत होत्या.
मी झेरोक्स मशीनकडे गेलो आणि दोन्हीं कडून प्रत काढली.
फोटो परंत फाइलमधे ठेवला. फाइलला परंत जागेवर ठेवून दिलं. टेबलाशी बसलो - - : आपल्या टेबलाशी. माझं टेबल काचेने झाकलेलं आहे, जिच्याखाली बरेच फोटो आहेत, ज्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, जो सध्या मला त्रस्त करतोय, शिवाय, श्रमाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टेबलावर ठेवलेल्या काचेच्या धोक्याची मला पूर्ण जाणीव आहे - - : बोटंच वाकडे-तिकडे व्हायचे.
मी, निश्चितंच, काचेच्या खाली त्याला नाही ढकललं. काचेबद्दल मला स्वतःलाच माहिती नाहीये, कशाला. मी टेबलाच्या खणांत ठेवून दिलं - - : माझ्या.
पण त्या आधी मी बराच वेळ लक्ष देऊन त्याच्याकडे पाहिलं.
माझ्या सारखा आहे - - : माझ्यासारखा नाहीये?
साम्य आहे, साम्य आहे! - - :
सर्वप्रथम - - : जन्म तारीख आणि जन्म-स्थान.
पण त्याचं आडनाव माझ्या लक्षांत नाही राहिलं. फक्त येवढंच आठवतंय की ते दुर्मिळ होतं.
मला असं वाटलं, की स्वप्नांत मला आठवलं होतं (की मला स्वप्नांत काहीतरी तर आठवलं होतं), पण ह्या वेळेस आठवंत नाहीये. किंवा, फक्त, आठवायची भीति वाटत होती.
तर, परिस्थिति अशी होती - - : मी घडी-घडी फोटो टेबलाच्या खणांतून काढंत होतो आणि लक्षपूर्वक बघंत होतो, आणि त्याला पुन्हां परंत ठेवून देत होतो. पुन्हां काढायचा आणि पुन्हां लक्षपूर्वक पहायचा. आणि पुन्हां परंत ठेवून द्यायचा.
शेवटी मी विचार केला - - : स्टॉप! ह्या सगळ्याचा संबंध मूखिनशी आहे! मी – मूखिन नाहीये!
त्याच्यामुळे घाबरायची गरंज नाहीये. मूखिनला, जेवढं मला माहीत आहे, स्वतःलासुद्धां त्या परिस्थितीची आठवण नाहीये, आणि, परिणामस्वरूप, ही संभावनापण नाकारता येत नाही की तो त्यांना विसरून गेला असेल - - : मी कां म्हणून मूखिनपेक्षा जास्त लक्षांत ठेवूं?”
खरोखरंच, जेव्हां काही दिवसांपूर्वी अलीनाने त्याला फोटो दाखवला होता आणि म्हटलं होतं, की साम्य स्पष्ट आहे ( हा-हा : चेह-यांत?...), त्यावेळेसपण त्याच्या
03.30
डोक्यांत ही गोष्ट नाही आली, जी आत्ता माझ्या डोक्यांत आली आहे - - : आणि, हा काय पूर्वाभास होता किंवा आणखी काही आणि, काय-काय नाही होत? - - : तो त्याच वेळेस अदृश्य झाला, आणि मी प्रकट झालो! ...मला काय त्याच्या समस्यांचं समाधान शोधायचं आहे?
मी मूखिन नाहीये, आणि ह्या गोष्टीने मला किंचित धीर आला, पण थोड्याचं वेळासाठी.
लवकरंच सगळे लोक परंत आले. माझ्यासमोर बसून अलीनाने विचारलं - - :
“तुझी तब्येततर बरी आहे ना? काही झालंय कां?”
“मी बिल्कुल ठीक आहे. काहीही झालेलं नाहीये. हे काय प्रश्न आहेत, अलीना?”
तिने म्हटलं की माझ्या चेह-याचा रंग उडालाय.
मी म्हटलं की मी जेवलेलो नाहीये.
धनु-कोष्ठकांना उघडण्याच्या दोन प्रयत्नांची नोंद करण्यांत आलीये. हल्ल्याचं स्त्रोत अजून स्पष्ट झालं नाहीये. बुधवारपर्यंत शांत राहीन. कदाचित, बुधवारी एका एब्स्ट्रेक्ट थीमवर लेक्चर देईन.
तुम्हीं विचारतांय की विसंगत्यांवर काबू करणं कठीण आहे का. तुम्हांला कसं सांगू. अंशतः, हो, पण अंशतः, नाहीसुद्धा आहे; जर सगळ्या गोष्टींना त्यांच्या समग्रतेत घेतलं, तर अंतिम परिणाम, नक्कीच, पूर्णांशच असेल. बरंच काही सहयोग्यांवर अवलंबून असतं; आणखीही जास्त - - : त्यांच्या बायकांवर, आणि स्थूल प्रमाणांत बायकांवर, मग त्या कुणाच्याही असोत, कारण की पुरुषांपेक्षा बायकांना बरंच काही जास्त दिलेलं आहे, पण, हा एक नाजुक आणि बराच वादग्रस्त प्रश्न आहे. बोटांवर समजावणं कठीण आहे, पण ह्याहीपेक्षा जास्त कठीण आहे दुस-यांच्या विचारांचं केंद्र असणं. वरून, प्रत्येक विचार तर साकार नाही करता येत. प्रत्येक विचार नाही!
काल मी असंभाव्य घटनांच्या संभावनांना सशक्त करण्यासंबंधी एका डॉक्यूमेन्टवर हस्ताक्षर केले. नोंदणी सुरू झालेली आहे, पण सध्या अनौपचारिक रीत्याच होते आहे. जेव्हां फळं पिकतील, तेव्हां त्यांना तोडू. फळा-फळांतही अंतर असतं, नाहीतर तेसुद्धां होऊन जातं, जे कधीच होऊं शकंत नाही.}}}
03.32
हस्तलिखित संपलं. कपितोनवने नोटबुक बंद केली.
बाहेर बर्फाचा हल्ला होत आहे, तो खडखड करंत पाण्याच्या पाइपमधून खाली जात आहे. जणु बर्फ वितळतोय. हेच आहे पीटरबुर्ग: दिवसा माइनस अकरा डिग्री, रात्री – उष्णता, तपमान प्लसमधे. सकाळी पुन्हां बर्फ पडेल, आणि स्केटिंग रिंग(रिंक) तयार होऊन जाईल.
गच्चीवर थेंबांचा कानांना बधिर करणारा आवाज होतोय.
हॉटेलमधे सगळं केव्हांच शांत झालंय. एक्स्पर्ट-चीटर्स आणि अत्यंत सूक्ष्मधारीसुद्धा शांत झाले होते. भिंतीच्यामागे काळ-भक्षक शांत झाला होता. काळ थांबलाय कां?
