धनु कोष्ठक - १२
धनु कोष्ठक - १२
लेखक: सिर्गेइ नोसव ; भाषांतर: आ. चारुमति रामदास
{{{ मूखिनच्या बायकोचं स्पष्ट मत आहे, की हात बाथरूममधे धुवायला हवेत, आणि भांडे किचनमधे. भांडे किचनमधे धुवायला हवेत, ह्यावर मूखिनला काहीच आपत्ति नव्हती, पण हात धुण्यावर लागलेल्या प्रतिबंधांचा तो आपल्या सम्पूर्ण ताकदीने विरोध करायचा. त्याने किचनमधे हात न धुण्यास फक्त नकारंच नाही दिला, वरून भांडे धुवायच्या साधनांनी हात धुण्यावर लावलेल्या प्रतिबंधालापण समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला, विशेषकरून जेव्हां साधारण साबण सिद्धांतवश किचनमधे दिसायचा नाही. मी बरेचदां विचार करतो, की सारखे नियम मोडून त्याला सिद्ध तरी काय करायचं होतं – त्याला फळ मिळालंच.
मूखिनच्या बायकोने नव-याला सुधारण्याची आशा नाही सोडली.
अकरा वर्ष ही “रीमेकिंग”ची, “रीफिनिशिंग”ची, “रीशेविंग”ची, “रीफोर्जिंग”ची प्रक्रिया चालू राहिली - - : आणि परिणाम स्वरूप, आमचा परिणाम झाला - - : अगदी जीरो.
मूखिन असताना मी आपल्या सवयी नाही बदलंत. स्वतःवर आग झेलतो.
हरकत नाही, सहन करूं!
शेवटी, मी स्वतःला आठवण देतो, की बायको ती माझी नाहीये, तर बायको, ठळकपणे, कन्स्तान्तीन मूखिनची आहे, आणि मला सहन करायची काही गरज नाहीये, किंवा, खरं सांगायचं तर, गरज आहे, नक्कीच, मूखिन सारखी - - : सहन करणं, पण तसं नाही, जसं मूखिनने केलं असतं, जर तो मी नसता तर, पण मूखिनने हे सहन कसं केलं - - : अकरा वर्ष? - - : डोकं गरगरू लागलंय.
मी हात धुतले, आणि तेसुद्धां बाथरूममधे नाही - - : किचनमधे. शिवाय मी त्या सगळ्याचा वापर केला, जे सिंकवर होतं - - : भाण्डे धुवायच्या केमिकलने - - : न की त्या साबणाने जो बाथरूममधे होता! त्याहीपेक्षां वाईट काम हे केलं, की हातपण मी भांड्यांच्याच टॉवेलने पुसून टाकले - - : आणि तेसुद्धां मूखिनच्या बायकोच्या डोळ्यांसमोर!
“कोस्त्या”, (कडक आवाजांत बायकोने म्हटलं, जसं की असंच व्हायला पाहिजे, म्हणजे, न व्हायला पाहिजे, कारण की मी तीन-तीन गुन्हे केले होते).
तिच्या आवाजांत मला निर्भर्त्सनेची झाक जाणवली; आणि मग माझ्याच्याने सहन नाही झालं - - :
“कोस्त्या? तुला काय येवढा विश्वास आहे, की मी तुझा कोस्त्या आहे?”
स्तब्धता जास्त वेळ नाही टिकली.
“तर मग कोण आहेस?”
“कदाचित, आज मी कोस्त्या आहे, वाद नाही घालणार, आणि उद्या मी - - : प्रेसिडेन्ट! किंवा - - : शेजारी, जो आपल्या खाली राहतो! किंवा बूगोर्का स्टेशनवरची बार-गर्ल ओल्या! तू कल्पना नाही करूं शकंत कां?”
बेकार. सांगायला नको होतं. प्रतिबन्ध लागलेला आहे.
बायको हातांत प्लेट घेऊन जणु थिजून गेली.
“ही कसली गंमत आहे?”(आणि मी बघितलं, की ती घाबरली आहे).
मी चूपंच राहिलो - - : जास्तंच बोलून गेलो होतो. बोलायला नको होतं.
“कोणची ओल्या – बार-गर्ल, कोणचा प्रेसिडेन्ट” (बायको बडबडली).
“ज्याब्लिक22 (मूखिन नेहमी तिला ज्याब्लिक म्हणायचा) - - : ज्याब्लिक, माझ्या लाडके, मला कधीही डिवचूं नको
02.30
वेगळ्या प्रकारचं सत्य सांगायला” (आणि मी बोटाने वर खूण केली, सत्याच्या स्तराकडे खूण करंत, उच्चतम स्तराकडे).
टेबलावरून उठून, हाताने खूण करंत आज्ञा दिली, की कोणताही प्रश्न विचारू नको; आपल्या खोलींत चाललो गेलो.
आपल्या खोलींत दीवाणवर लोळलो; वर्तमानपत्र घेतलं, केलिफोर्नियांत एका भूतपूर्व जजला साक्षीच्या दरम्यान सार्वजनिक रूपाने हस्तमैथुन करण्याच्या आरोपांत एक वर्षाचा कारावास आणि दहा हजाराचा दण्ड भरण्याची शिक्षा सुनावण्यांत आली. त्याने टेबलाच्याखाली एका विशेष उपकरणाचा प्रयोग केला होता. त्याच्या विशिष्ठ आवाजाने आरोपीचं बिंग फोडलं.
विचार करण्याचा प्रयत्न करतोय; कल्पनाशक्ति कमी पडतेय.
ती माझ्याजवळ आली.
“मला घाबरवूं नको, कोस्तेन्का, मी बघतेय, की तुझ्याबरोबर काहीतरी ठीक नाहीये. जणु की तू स्वतःचा नाहीयेस”.
खोटं बोलतेय.
मी स्वतःचा नाहीये, हे ती बघू शकंत नाही - - : कारण की मी, निर्विवादपणे, स्वतःचा आहे - - : आणि मूखिनसारखा आहे.
“हा तूंच आहेस कां?”
ओह, तिची दृष्टी खूपंच तीक्ष्ण आहे. पण, मी स्वतःच तर तिच्यासमोर स्वीकार केलं होतं. तिला समजलंय का?
आणि ह्याने मला काय प्राप्त झालं? काहीही प्राप्त नाही झालं.
मी सारवा सारव केली - - :
“सगळं ठीक आहे” (चेह-यावर हसू आणंत हळूच म्हटलं).
केसांत हात फिरवंत, तिने माझं डोकं कुरवाळलं. मी डोळे बंद केले; मी घुरघुर करू लागलो - - : घुर्र घुर्र घुर्र. मूखिनवर दया येतेय. अगदी मूर्ख आहे.}}}
{{{ तर, वर्तमानपत्र ठेवून मी दीवाणवर लोळलो, बाजूला बायको बसली होती; माझं कपाळ, ज्याला ती आपल्या ऊबदार तळहातांनी कुरवाळंत होती, सरळ होऊ लागलं, कदाचित आठ्या असाव्यात. मी तिच्या चेह-याकडे पाहिलं - - : तिच्या डोळ्यांत भीति होती. तिला घाबरवून मीसुद्धां खूप घाबरून गेलो होतो; हे खूप भयानक आहे - - : फालतू गोष्टी बरळणं, विशेषकरून माझ्या परिस्थितीत. मला आशंका आहे, की ह्याचा जाब द्यावा लागेल - - : तिच्यासमोर नाही - - : आणि तिलापण नाही - - : आणि ह्याक्षणीसुद्धां नाही.
लक्ष दिलं पाहिजे, की मूखिनची बायको - - : आकर्षक बाई आहे.
हे वाक्य समजण्याचा प्रयत्न करूं या. त्याचं विश्लेषण करायल हंवय.
दुस-या भागापासून सुरुवात करू. मूखिनची बायको - - : आकर्षक आहे. ठीक, असंच आहे. तिला सुंदर म्हणताना मी कचरलो असतो. मी कलाकार नाहीये, पण मला माहीत आहे की सौन्दर्याचं मापदण्ड काय असतं - - : कानांचे कोपरे डोळ्यांच्या कोप-याच्या ओळींत असले पाहिजे, आणि कानांच्यापाळी नाकाच्या खालच्या भागाच्या अनुरूप असल्या पाहिजे. मूखिनच्या बायकोचे एक तर कान तरी आवश्यकतेपेक्षा जास्त उंच आहेत, किंवा नाक जरा जास्तंच खाली आहे. कदाचित, म्हणूनंच ती लटकणारे ईयर रिंग्स घालते. ते तिच्यावर उठून दिसतात. मला असंपण वाटतं, की तिचं कपाळ नाकाच्या हाडापर्यंत अत्यंत सौम्यपणे उतरतं, ज्याने, जर तिच्या चेह-याकडे एका बाजूने बघितलं तर तो पुढे आलेला वाटतो. जर मूखिनने आपल्या बायकोचं अत्यंत रिअरिलिस्टिक पद्धतीने बनवलेलं पोर्ट्रेट बघितलं असतं, आणि जर त्याला माहीत नसतं, की ही त्याची बायको आहे, तर त्यानेच निर्णय घेतला असता - - : दुस-या एखाद्या दर्शकासारखाच - - : की - - : जो कोणीपण कलाकार आहे - - : तो, पहिली गोष्ट, मॉडेलच्या प्रति उदासीन नाहीये, कारण की निर्जीव-थंड नाकाबरोबरंच तिच्यातल्या अप्रत्याशित सेक्स-अपीलला प्रदर्शित करणं अशक्य झालं असतं, आणि दुसरी गोष्ट, रियलिस्ट-कलाकाराकडून ह्या गोष्टीची न्यूनतम अपेक्षा आहे, कारण तो स्वतःला किंचितश्या विलक्षणपणाची मुभा देऊन एक सनकीपणाचा भाव प्रकट करतो. सामान्य अनुपातांपासून झालेले हे साधारण विचलन मूखिनच्या बायकोला एक विशिष्ठ मोहकपणा देतात : तिला, जसं मी सांगितलंय, आकर्षक बनवतात. अगदी बरोब्बर शब्द आहे. ती आकर्षित करते, आणि कोणचीतरी गोष्ट तिच्याकडे आकर्षित करते, तिच्याबद्दल आकर्षणाची भावना असणं अगदी सोपं आहे. म्हणजे, मला म्हणायचंय - - : तिच्याबद्दल आकर्षण.
आता ते, जे त्या वाक्याच्या पहिल्या भागाशी संबंधित आहे. मी म्हटलं - - : लक्ष दिलं पाहिजे. पहिल्या शब्दावर जोर देतोय. लक्ष देणं. आकर्षण, ज्याच्याबद्दल इतक्यांत बोलत होतो, तिच्या आकर्षणाकडे माझ्याद्वारे लक्ष देणं बंद झालंय, जास्तंच स्पष्ट सांगायचं तर, खरोखरंच, मूखिनद्वारे आधीच लक्ष देणं बंद झालं होतं, मी तर, तसं, ही गोष्ट नाहीये, की लक्ष देणं बंद केलंय, उलट मला तर तो सुवर्णावसर मिळालांच नाही की ह्या गोष्टीवर लक्ष देऊं, ज्यावर, मूखिन असल्यामुळे, केव्हांपासूनंच मूखिनने लक्ष देणं बंद केलेलं होतं - - : त्याच्या पत्नीचं आकर्षण. दुस-या शब्दांत, मूखिनच्या बायकोच्या आकर्षकपणावर मूखिनसाठी नकळतंच त्याच्या द्वारे लक्ष देणं बंद झालं होतं, ज्याबद्दल माझ्या द्वारे आत्ताच लक्ष दिलं गेलं आहे, हा अंश लिहिता लिहिता. मूखिनला समजू शकता येतं, अकरा वर्ष बरोबर राहिल्यामुळे ब-याच काहीवर, कदाचित, प्रत्यक्षावरसुद्धां लक्ष देणं बंद होत असतं; आणि माझ्यासाठीपण, जो मूखिन झालेला आहे, जर माझ्या मूखिनपणाच्या (हा शब्द काही काळानंतर माझ्या संशोधकाकडून ऐकला आणि ज्याच्या आश्चर्यजनक सटीकतेमुळे मी त्याच्या उपयोग केल्याशिवाय नाही राहू शकंत) अल्पावधिकडे लक्ष दिलं तर, हे समजणं कठिण नाहीये. त्यांच्या असहज वैवाहिक जीवनाचा अनुभव माझ्याद्वारे चुपचाप स्वीकारला गेला होता. त्यांच सहजीवन चांगलं असो की वाईट असो, गतायुष्यतर मी बदलू शकंत नाही, ते सुद्धा दुस-यांच गतायुष्य.
तर हा अर्थ आहे “लक्ष दिलं पाहिजे”चा. आणि मी लक्ष दिलं, मी त्याच्यावर लक्ष दिलं, ज्याच्यावर मूखिनने केव्हांतरी लक्ष देणं बंद केलं होतं - - : तिचा मौन मोहकपणा, तिच्या वाकड्या-तिकड्या दातांचं आकर्षण, हृदयाला भिडणारी तिच्या नाकाची तीक्ष्णता, तिच्या तळहातांची कोमलता, लाडिकता. तिने, नक्कीच, ठरवलं होतं, की मी वेडा झालोय, आणि, आता दीवाणवर लोळलेल्या माझ्यावर दया करंत, अचानक उसळून आलेल्या कोमलतेने माझं कपाळ कुरवाळते आहे, आणि मी, ज्याचं कपाळ ती कुरवाळतेय, मीपण प्रत्युत्तराखातर तिच्यावर अधिकाधिक दया करंत होतो, क्रमशः वाढंत असलेल्या तीव्रतेने, कारण की हा विचार करणंच कसं वाटतं, की तुमचा नवरा पूर्णपणे वेडा झाला आहे? मी तिच्याकडे बघून स्मित केलं, जणु, सगळं ठीक होईल, आणि ती डोळ्यांच्या कोप-यातून माझ्याकडे बघंत हसली. कदाचित, तिने मूखिनसाठी मला क्षमा केलं? मूखिनला क्षमा केलं - - : माझ्यांत? माझ्यांत आपल्या मूखिनला निरोप देऊन टाकला? सगळं शक्य आहे. मी चुपचाप मूखिनशी घृणा करत होतो. अधिकाधिक. मूखिन मूर्ख होता, ईडियट होता. मला मूखिनवर दया नव्हती येत; मला स्वतःवर दया येत होती, जो मूखिन झाला होता. मूखिनच्या बायकोबद्दल माझी दया, जी तिच्या माझ्याबद्दल दयेंत परावर्तित होत होती, पुन्हां माझ्यांत माझ्यांचबद्दल दयेच्या रूपांत प्रतिबिंबित होत होती, पण ह्याचा मूखिनशी काही संबंध नव्हता.
त्या वेळेपासून, जेव्हांपासून माझ्या द्वारे मूखिन प्रस्थापित केला गेला होता, मी एकदाही त्याच्या बायकोकडे ‘सेक्स-ऑब्जेक्ट’ म्हणून नव्हतं पाहिलं. मूखिनला काही काळापासून - - : महिन्या, दीड-दोन महिन्यांपासून - - : बायकोबरोबर प्रॉब्लेम्स होत्या. आणि बायकोशी असलेल्या ह्या प्रॉब्लेम्सला मी मूखिनकडून वारसा हक्काने मिळवले होते! त्यांच्यात काहीसा बेबनाव होता. ही वेळ नाहीये त्याबद्दल वाद घालण्याची. कारण की आत्ता, म्हणजे, तेव्हां, दीवाणवर पडल्या-पडल्या एक आश्चर्यजनक विचार माझ्या डोक्यांत आला - - : ह्या मूखिनवर बायकोच्या बदफैलीचा ठप्पा कां न लावावा? - - : अगदी तिथेच आणि अगदी तेव्हांच! म्हणजे इथे आणि आत्ता.
म्हणजे - - : तरीही - - : तेव्हां.
तिच्या अंगावर निळा गाउन होता, ज्यांत ती दीवाणवर लोळंत असलेल्या माझ्याकडे आली; कोणच्यातरी विचित्र साबणाच्या सुगंधीत मी अगदी स्पष्ट संदेश ऐकला:
“सलोखा आणि तत्परता”.
मी उशीर कां करतोय? मूखिनवर बायकोच्या व्यभिचाराचा ठपका - - : ह्या विचारानेच मी क्षणभरांत पेटून उठलो. माझ्यांत वासना उसळी मारंत होती. तिच्या बाजूला बसून, क्षणभरांत मी तिला आपल्या बाहुपाशांत घेतलं आणि ओठांच्या ताकदीने तिच्या ओठांवर हल्ला केला. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट ही होती, की तिच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट नव्हती, तसं, कदाचित, तिच्यासाठीपण माझी ही आकस्मिकता आश्चर्याची गोष्ट होती. पण आश्चर्य मला फक्त क्षणभरंच झालं, जेव्हां मला जाणवलं की ती किती आवेगाने मला प्रतिसाद देत आहे - - : जसा कधीही मूखिनला दिला नसेल! समोरून - - : ह्या शब्दांत ऐकूं येतं “तोंड” - - : आमचे तोंड एकमेकांत मिसळले, जिव्हा संघर्षरत झाल्यात, आणि, जर त्यांच्याकडे, आमच्या जिव्हांकडे, कोणते जननांग असते, तर शंकेला जागाच नाही, की आमच्या आधी जिव्हा एक झाल्या असत्या - - : आम्हांला एकमेकाची इतकी इच्छा होत होती. आम्ही स्वतःला स्प्रिंग-बॉक्सवर नाही, तर फरशीवर झोकून दिलं - - : मूखिनबरोबर असं नव्हतं होत. हे मी तिला खाली पाडलं होतं. तसेच फरशीवर गडगडंत आम्ही अनावृत झालो - - : उत्तेजित खेचाताणीत, हे कळल्याशिवाय की कोण कोणाचे कपडे खेचतोय - - : आपले, की दुस-याचे, तरीही - - : तिच्या अंगावर फक्त गाउन होता; कपडेतर मी घातले होते.
मला ते सगळं माहीत होतं, जे मूखिनला माहीत होतं, मूखिनच्या बायकोबद्दल. ते सगळं जे मूखिनच्या बायकोबद्दल मूखिनला माहीत होतं, मूखिनच्या बायकोबद्दल मला माहीत होतं. ही दुसरी गोष्ट आहे, की मूखिनला कितपत माहीत होतं. त्याला वाटायचं की त्याला बरंच माहीत आहे. विशेषतः शरीराबद्दल - - : तिच्या. आम्ही दोघंही म्हणू शकत होतो, पण मी फक्त स्वतःबद्दल सांगेन - - : मी, न की आम्हीं, मी तिच्या शरीराला आपल्या स्वतःच्या शरीरापेक्षा जास्त चांगलं ओळखंत होतो, आणि हे अगदी खरं आहे. जसं की, अवलोकनाच्या अभावांत मी ह्या गोष्टीची फक्त अस्पष्टशीच कल्पना करू शकतो, की माझी पाठ कशी दिसते, माझ्या खांद्याची हाडं कशी दिसतात, आहेतर ती मागची बाजू, पण, मी काही नार्सिसिस्ट23 नाहीये आणि दुहेरी आरश्यांचा प्रयोग नाही करंत, पण आता समोर दिसंत असलेली तिची लवचिक पाठ, पाठीचा स्पष्ट कणा, तिच्या खांद्याची टोकदार हाडं आणि सामान्यतः एखाद्या चित्राच्या विशेषतेसारख्या ह्या सगळ्या गोष्टी, मागून, बाजूने, समोरून - - : स्मृतीत स्पष्ट आणि नेहमीसाठी अंकित झाल्यांत, सूक्ष्म विवरणांसहित. मागच्या काही वर्षांत, जेव्हां मूखिन जास्त उत्सुक होता, आणि ती जरा जास्तंच मेहेरबान, आणि, कदाचित आत्मविश्वासाने भरपूर, ती त्याला काही विशिष्ठ परिस्थितीत आपल्या बाह्य स्वरूपाच्या काही सजीव आणि संवेदनशील अंगांना बघायची परवानगी द्यायची. तशी मैग्निफायिंग-ग्लासपर्यंत मजल नव्हती जात, पण त्याला सूक्ष्म विवरणातंच रस होता - - : नाभिच्या जवळ एखादा तीळ, एखादा पातळ केस, एखादं डिम्पल, एखादा खळगा. हे मी अश्यासाठी सांगतोय, की आपल्या ज्ञानाची मात्रा प्रदर्शित करता यावी. पण ह्या वेळी, मूखिनच्या बायकोच्या नग्नतेला मला तिच्या नव-याच्या नजरेने नव्हतं बघायचं. आणि बघण्याची फुर्सतपण नव्हती! जे बघितलं, ते बघितलं - - : परक्या, आणि आपल्या परकेपणाची जाणीव नसलेल्या, बायकोला. तुझी हीच शिक्षा आहे, मूखिन, चांगली अद्दल घडवली! अत्यंत आवेगाने आम्ही एक झालो. मला मूखिनसारखं नव्हतं करायचं, कोणत्याच गोष्टीत मला तिला मूखिनची आठवण नव्हती द्यायची, आणि, माझ्या मते, ती मूखिनबद्दल विसरून गेली, हो, हो, मला पूर्ण विश्वास आहे! जर कधी कुणाला, कुठेतरी ह्याची फिल्म बनवावीशी वाटली, तर तो ह्या फालतू पोर्नोग्राफीची शूटींग करूं शकतो. मी, बस, घुरघुरलो नाही. आणि, तिच्याजवळ, ओरडण्यासाठी आवाजंच नव्हता! मूखिन बरोबर होता, जेव्हां मागच्या काही वर्षांत त्याला बायकोची शंका यायची, की ती ओरडून कामोत्तेजनेचं ढोंग करते. ही आहे खरी कामोत्तेजना! मूक, बिनआवाजाची!
जेव्हां डोळे उघडले, तेव्हां माझ्याकडे असं बघितलं, जणु पहिल्यांदा बघतेय.
“आणि मला वाटंत होतं, की आता हे नाही होणार - - :”
पण मी म्हटलं - - :
“बेइमान”.
“म्हणजे?” (तिने विचारलं).
अर्थ मी नाही समजावला. }}}
{{{इच्छा होती की मी चूक असावं, पण, असं वाटतंय की कुणाच्यातरीद्वारे धनु-कोष्ठकांना उघडायचा प्रयत्न केला गेला होता. कोणत्या ठोस पुराव्यांच्या आधारावर नाही सांगत आहे, पण मला - - : जाणीव करून दिली गेली आहे.
कदाचित ह्याच संबंधात, पण मी कपितोन24 आणि रेज़ोनेन्ट एक्सेसेज़ (अनुनादी प्रचुरते) बद्दल विचार करूं लागलो. नेहमीच्या जीवनांत अश्या प्रकारच्या घटनेला म्हणू शकतात “हद्द पार करणं”, पण प्रस्तुत घटनेच्या संदर्भांत जास्त चांगलं राहील - - : पुन्हां नेहमीच्या जीवनांच्या संदर्भात - - : मला सुचतोय शब्द – “बाउन्स”.
कपितोनव आणि मूखिन बराच काळ मित्र होते; पण पहिल्याचं मरीना रमानोव्नाशी, मूखिनच्या भावी बायकोशी, बराच आधी परिचय झालेला होता, दुस-याच्या तुलनेत - - : बस, ह्याच संदर्भात तो पहिला होता. माहीत नाही, की मूखिनपण असाच विचार करंत होता का, पण व्यक्तिगत रूपाने मी, ज्याने मूखिनला प्रतिस्थापित केलंय, कपितोनला एक साधारण सुमार व्यक्ति समजतो, तसं, वाद नाही घालणार, मी मूखिनच्या तुलनेंत कपितोनला कमी ओळखतो. दोन अंकांच्या संख्यांच्या स्तरावर ‘अनुनादी प्रचुरता’, माहीत नाही डोक्याची कोणची उपलब्धि आहे - - : म्हणजे, डोकं - - : सुमार दर्जाचं कां नाही असू शकंत? पण तरीही, आश्चर्याची गोष्ट आहे - - : कपितोन आपल्याचं बाउन्सेसबद्दल प्रतिक्रिया व्यक्त नाही करूं शकंत! हे बाउन्सेस कधी कधी प्रत्यक्षदर्शी लोकांवर ज्याप्रकारचा प्रभाव टाकतात, त्याला त्यांच्या प्रदर्शनाने त्या सीमेपर्यंत नाही समजावता येणार, जेवढं, माझ्या मते, कपितोनच्या सहजतेने.
म्हणतात - - : उदाल्त्सोवकडून समजलं - - : कपितोनमधे प्रचण्ड मानसिक ताणामुळे ह्याचा पत्ता लागला, जेव्हां त्याची सहा वर्षाची मुलगी नदींत जवळ-जवळ बुडालीच होती - - : वैयक्तिक रूपांत मूखिनला विवरणांत काही रस नाहीये; पण मला, जर हे एखादं मिथक नसेल तर, तर, तरीही ह्या मिथकाचा तोच-तोपणा त्रास देतो - - : मानसिक ताण, वीज पडणे आणि असं बरंचसं.
स्वतःला कपितोनच्या जागेवर ठेवतो - - : दोन अंकांच्या संख्यांच्या पातळीवर उत्पन्न होणा-या आपल्या ‘रिए’चं (इथे रिज़ोनेन्ट एक्सेसेस – अनुनादी प्रचुरतेशी तात्पर्य आहे – अनु.) मी काय केलं असतं? काय ह्याला आकस्मिक पुरस्कार समजलो असतो सर्वोच्च शक्तींचा, ज्या माझ्या आकलनापलिकडे आहेत? की ह्याला एखाद्या आजाराचं लक्षण समजलो असतो, ज्याचं गूढ आणि विनाशक स्वरूप अजूनपर्यंत प्रकट झालेलं नाहीये? की ह्यांत अस्तित्वाच्या विफलतेला पाहिलं असतं - - : वैचारिक विस्ताराला पाहिलं असतं? की ह्याला अत्यंत जटिल आणि माझ्यापासून लपलेल्या उपकरणांच्या प्रस्तुतिकरणाचं एक तत्व समजलो असतो, ज्याबद्दल मला कोणताच निर्देश, किंवा टेक्निकल माहिती, किंवा कोणच्यातरी संबंधित उद्देश्याची रूपरेषा दिलेली नाहीये? स्वतःपासून काही लपवणार नाही - - : मला ह्या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीये.
हा विचार करणं धोकादायक आहे की मी कपितोनवचा हेवा करतो. मला माहितीये की कोणीही असा विचार नाही करंत, पण असा विचार करणं धोकादायक आहे.
दुर्दैवाने, कपितोनवच्या मॉस्कोला जाण्याने अस्पष्टतेचं धुकं आणखी दाट होऊन जाईल.
आणखी एक गोष्ट - - : ज्याच्याबद्दल आत्ता विचार करंत होतो - - : आणि खरंच - - : मूखिनंच कां? मला मूखिनलाच प्रस्थापित करायला कशाला सांगण्यांत आलं, आणखी कुणाला कां नाही, उदाहरणार्थ, त्याच कपितोनवला कां नाही?
हा फक्त प्रश्न आहे; पण अत्यंत रोचक प्रश्न.}}}
ज्याची भीति होती, तेच झालं - - : संशोधकाने मूर्त रूप धारण केलं.
हे तर चांगलं होतं, की तो मला ‘दयाळु रूपांत’ दिसला - - : दृश्य रूपांत नाही - : शब्द रूपांत. बस, तेवढंच.

