धनु कोष्ठक - १०
धनु कोष्ठक - १०
लेखक: सिर्गेइ नोसव ; भाषांतर : आ, चारुमति रामदास
01.08
शॉवर. टॉयलेट. झोप नाही येणार. तो वाचंत बसेल.
01.20
लोळला. नोटबुक उघडली.
पहिला पैरेग्राफ.
01.21
आणि पुन्हां – सुरुवातीपासून. कारण की समजायला कठीण आहे.
01.22
आणि पुन्हां – कारण की खरोखरंच कठीण आहे:
{{{ हा तिसरा आठवडा आहे, जेव्हांपासून मी - - : कन्स्तान्तीन अन्द्रेयेविच मूखिन आहे, वय एकोणचाळीस वर्ष, कोणच्यातरी वस्तूंचा स्पेशलिस्ट, लग्न झालेलं आहे, मनमिळाऊ, आवडतं खाद्य पदार्थ - - : फ्राइड वेजिटेबल कबाब; एक्स्ट्रा वजन 8 किलोग्राम, अपरिहार्य प्रश्न - - : तर मग मूखिनचं काय? त्याला माहीत आहे कां, की मूखिन तो नाही, परंतु मी आहे? उत्तर नकारार्थी आहे - - : नाही. मूखिनला माहीत नाहीये आणि तो माहीत होण्यास अयोग्य आहे, जसा न माहीत होण्यासपण अयोग्य आहे, आपल्या स्वतःच्या अनुपस्थितीमुळे, मी झाल्यामुळे. जेव्हां मूखिनच्या जागेवर मी आहे, तेव्हां तो नाहीये. मूखिन तेव्हांच मूखिन होईल, जेव्हां मी मूखिन होणं बंद करेन. आशा आहे, की कधीतरी मूखिन होणं समाप्त करेन, कारण मूखिन होणं भाग्याचा खेळ आहे. - - : प्रश्न - - : मी मूखिन होणं केव्हां थांबवेन? - - : उत्तर नाही देणार; ते माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. }}}
कपितोनव इलेक्ट्रिक केटल चालू करतो. बाथरूममधे जाऊन पुन्हां एकदा तोंड धुतो – आधीच्या शॉवर व्यतिरिक्त.
कपितोनव शांत आहे. तो स्वस्थ्य आहे आणि पूर्णपणे शुद्धीवर आहे. तो नोट्सला ग्रहण करण्याच्या आणि त्यांची मीमांसा करण्यासाठी तैयार आहे.
01.28
{{{आधीचं ‘नोट’ चाचणीसाठी लिहिलं होतं. मला धनु-कोष्ठकांची विश्वसनीयता तपासायची होती. चाचणी यशस्वी झाली. कोणतीही संदेहास्पदवस्तू आढळली नाही. दोन तासांच्या ‘मैन्टेनेन्स-ब्रेक’नंतर पुन्हां लिहिणं चालू करतो.
सध्यां मला, ठळकपणे, जे झालेलं आहे, आणि जे होतं आहे, त्याचा सार प्रस्तुत करायचा आहे. सोपी गोष्ट नाहीये. पण असं कुणी म्हटलं होतं, की सोपं असेल? प्रयत्न करीन. जर जमलं, तर पुढे अगदी सोपं होईल; माझा ह्यावर विश्वास आहे.
तर गोष्ट अशी आहे.
बुधवारी मी स्वतःला मूखिन अनुभवंत होतो, पण गुरुवारी वाटलं, की हा माझा भास होता. हे प्रतिस्थापन तर फार पूर्वीच झालेलं होतं. पण केव्हां? जसं की आज, लक्षणं आठवतांना, मला समजलं, की प्रतिस्थापन मागच्याच्या मागच्या आठवड्यांत झालं होतं, आणि जर आजपासून उलट मोजणं सुरूं केलं तर - - : अठरा दिवसांपूर्वी, त्या दिवसाला धरलं तर. विचित्र गोष्ट ही आहे, की ह्या गुरुवारपर्यंत मी खरंच स्वतःला, मूखिन सारखा, खरा मूखिन समजंत होतो, जणु प्रतिस्थापन झालेलंच नव्हतं. हा मध्यंतरीचा काळ जरा जास्तंच लांबला, पण आता सगळं मागे राहिलंय.
पुन्हां एकदा ‘पॉइन्ट्स’ प्रमाणे.
1. अडीच आठवड्यांपूर्वी प्रतिस्थापन झालं. बाह्य नियंत्रक शक्तीच्या माध्यमाने ‘ऑब्जेक्ट’ मूखिनचं मूखिन होणं थांबलं, आणि तो ‘सब्जेक्ट’ ‘मी’ झाला, ज्याला तोपर्यंत समजंत नव्हतं, की मी मूखिन नाहीये, आणि त्याच मूखिन द्वारे स्वतःला प्रतिस्थापित करून बसलो आहे. रूपांतरणाची प्रक्रिया पंधरा दिवस चालली, ह्या गुरुवारपर्यंत, आणि ह्या पंधरा दिवसांत, सगळ्यांत महत्वपूर्ण राहून, तसा अनेक स्तरांच्या स्कैनिंग सिस्टमचा निष्क्रिय अवयव असूनही, मी नकळतंच रिवर्स ट्रेंचिंगचा उद्देश्य पूर्ण करंत राहिलो.
2. गुरुवारी मला ह्या गोष्टीचा अर्थ कळला, की मागच्याच्या मागच्या आठवड्यांत काय झालं होतं - - : मला कळंल, की वास्तवांत मी कोण आहे. जास्त बरोबर होईल हे सांगणं, मी ह्या गोष्टीला जास्त चांगल्या प्रकारे समजून चुकलो की सगळ्यांत आधी मी कोण नाहीये - - : सैद्धांतिक रूपाने मूखिन नाहीये. उत्तर देणं कठिण वाटतंय, या तर ते सगळ्यांच्या हितासाठी असो, किंवा माझ्या स्वतःसाठी हानिकारक असो, मी हेच समजलो आहे. मला मान्य आहे, की प्रोजेक्टच्या उद्देश्यांच्या दृष्टीने, ज्यांना मीसुद्धां ब-याच प्रमाणांत समजलेलो नाहीये, मूखिनहून भिन्न ‘सब्जेक्ट’च्या रूपांत स्वतःबद्दल माझे अनुमान, न केवळ काही शक्यतांचा आविष्कार करतील, तर ते कोणाच्यातरी समस्यांनीपण ग्रस्त आहेत, आणि खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. काहीही असो, मला विश्वास आहे - - : माझ्या द्वारे, ज्याने मूखिनला प्रतिस्थापित केलेलं आहे, स्वतःला मूखिनहून भिन्न समजणं, माझ्या स्वतःच्या प्राकृतिक विकासाचं कृत्य नाहीये, तर ते नियंत्रक शक्तीद्वारा माझ्यावर करण्यांत आलंय.
3. त्याच क्षणी मला सामान्य उद्देश्याच्या जवळ-जवळ सम्पूर्ण आकाराची कल्पना देण्यांत आली आणि सगळ्या संभावित क्षेत्रांच्या सदस्याच्या जवाबदारीची जाणीव करून देण्यांत आली. गोष्ट चाललीये आकाराची, न की खुद्द उद्देश्याची, ज्याचं सार जाणण्याची, स्पष्ट आहे, मला परवानगी नाहीये. त्याचबरोबर मला काही प्रमुख अवधारणा समजून घेण्याचं काम दिलं गेलं, ज्यांच्याशिवाय मी ह्याचा अर्थ समजूंच शकलो नसतो; ह्या अवधारणा आहेत - - : प्रोजेक्ट, नियंत्रक शक्ति, रिवर्स ट्रेन्चिंग, स्कैनिंग सिस्टम, संशोधक. त्याचबरोबर मला प्रतिबंधांची, सीमांची, परवानग्यांची कल्पना देण्यांत आली. सगळ्यांत आधी मला माझ्याद्वारे अवगत झालेला हा अर्थ लपवावा लागेल आणि कोणत्याही परिस्थितींत हे प्रकट होऊं द्यायचं नाहीये, की मी मूखिन नाहीये - - : ना तर मौखिक रूपांत, ना लिखित रूपांत. मला जाणीव आहे की मी ह्या प्रतिबंधांच उल्लंघन करतोय - - : आत्ता, स्वतःला तो सार प्रदर्शित करण्याची अनुमति देऊन, जो मला सुद्धा पूर्णपणे समजलेला नाहीये.
4. आत्ता, वर निर्दिष्ट केलेलं समजण्याच्या तिस-या दिवशी, मी, स्वतःला तो सार प्रकट करण्याची अनुमति देऊन, जो मलासुद्धा पूर्णपणे कळलेला नाहीये, प्रतिबंधाचं उल्लंघन करतो आहे. मी प्रतिबंधाचं उल्लंघन करतोय, हे आपलाच विनीत पाठक असल्यामुळे मला स्पष्टपणे कळलेलं आहे. पण मी न घाबरतां प्रतिबंधाचं उल्लंघन करतो आहे, निःसंकोचपणे, बेधडकपणे, कारण की मला त्या क्षेत्राबद्दल समजलंय, जे कोणत्याही नियंत्रक शक्तीच्या अधीन नाहीये आणि जे संशोधकाच्या नजरेपासून सुद्धां मुक्त आहे. हा आहे माझा आविष्कार - - : तिहेरी धनु-कोष्ठकांचा ऑपरेटर - - : {{{- - - - - }}}. अविश्वसनीय वाटतंय, पण हे असंच आहे - - : जर मजकूर तिहेरी धनु-कोष्ठकांच्यामधे ठेवला, तर नियंत्रक शक्तिला कळणारसुद्धां नाही! सोपं आणि कल्पक! मी जवळ-जवळ भाग्यशाली आहे. हे नाही सांगणार की मला नियंत्रक शक्तीच्या ह्या अंधा-या कोप-याचा पत्ता कसा लागला; अनेक महान आविष्कारांप्रमाणे, माझा आविष्कारसुद्धां संयोगानेच (Incidental Case) प्रतीत झालेला वाटतो. मी पुनरुक्तिचा प्रयोगतर नाही केला - - : “Incidental Case”? तसं म्हटलं तर, ‘केस’म्हणजेच घटना (Incident) असते ना? पण मी पुनरुक्तिला नाही घाबरंत. भलेही काहीही घटित झालं असलं, तरी एक घटना जरूर उत्पन्न होत असते. घटनेची नियतीच आहे घटित होणं, म्हणूनंच ती घटना आहे! ‘केस’ प्रतीत होत असते - - : ‘केस’ प्रतीत होते - - : विश्वसनीयतेसकट, न की आवश्यकतेसहित. ‘केस’ आणि घटनेंत अंतर हे आहे - - : घटना प्रतीत नसते होत, पण ‘केस’ घटित होऊं शकते. ‘केस’ जास्त गतिमान आणि लवचिक असते. म्हणून मी ह्या गोष्टीशी सहमत आहे, की ह्याला ‘केस’ म्हणूं, वाद नाही घालणार, वरून वादपण स्वतःशीच. ‘केस’ घटित झाली. धनु-कोष्ठक - - : संयोगवश! - - : विस्मयकारक गुण असलेले. मी अदृश्य व्हायचा उपाय शोधून काढला - - : लिखाणांत. ह्या आविष्काराने मला काही प्राप्त होईल कां? हो, पण थोडंसं. मुक्ततेचं स्तर, पण तरीही - - : मला! आणखी कुणाला नाही, तर मला. मूखिनला नाही - - : मला! मी समजण्याचा प्रयत्न करूं शकतो, की मी कोण आहे, कां मी मूखिन नाहीये, आणि कां नेमकं मूखिनला मी मागच्याच्या मागच्या आठवड्यांत प्रतिस्थापित केलं, आणि प्रतिस्थापनाच्या भविष्याबद्दल माझे अंदाज विश्वसनीय आहेत कां, ज्यांच्याबद्दल इतक्यांत सांगायची माझी जरासुद्धां इच्छा नाहीये - - : शब्दांशी खेळण्याची माझी जबरदस्त आणि आनन्ददायक योग्यता असूनही, जी, मला वाटतं, की समजायला अगदी सोपी आहे (ओह, ती मला फार, फार कळते, तसं, स्वतःला कसं नाही समजणार?). आता, तीन धनु-कोष्ठकांच्या आत, मी काहीही लिहिलं तर त्यांत कोणी संशोधन नाही करू शकणार. मी अदृश्य आहे. माझा उल्हासोन्माद बाह्य शक्तींना अप्राप्य आहे, त्यांनी आपल्या काळांत माझ्या डोक्यांत कितीही शाखा उघडल्या असल्या तरीही! पण आपल्या आविष्काराचा दुरुपयोग मी नाही करणार. खरं तर त्याने काहीही बदलणार नाही. मी विश्वासघाती नाहीये, मी देशद्रोही नाहीये; मी एका विशिष्ठ उद्देश्याला समर्पित आहे, मग मला हेसुद्धां माहीत नसलं तरी चालेल की कोणत्या उद्देश्याला.
बस - - :... धनु-कोष्ठक, तिहेरी - - :... किती छान आहे हे! - - : ... विशेष गोष्ट - - : त्यांना बंद करायला विसरायचं नाही - - :...कल्पना करतानापण भीति वाटते, की जर विसरलो तर - - : ... सगळंच संपेल! सुरुवातीसाठी पुष्कळ आहे. मी बंद करतो.}}}
01.33
कपितोनव चहा बनवतो (कप, उकळलेलं पाणी आणि पैकेट). तो खात्री करून घेतो की दाराचं कुलूप बंद केलंय. कप स्टूलवर ठेवून बिस्त-यावर पडतो आणि बेड-लैम्प ठीक करतो.
01.36
{{{धनु-कोष्ठक बंद केल्यानंतर चोवीस तास झाले आहेत - - : कोणताही प्रतिबंध नाहीये! - - : मस्त! - - : पुन्हां उघडतो! - - : उघडले!
आता तपशील. धनुषावृत मजकूराच्या क्रमांक 2पासून सुरू करतो (खूप सांकेतिक शब्द आहे, अपेक्षा करतो की पुढेसुद्धां ह्याचा उपयोग करेन).
ह्या गुरुवारी मला ज्याची परवानगी दिली होती, त्याच्या विश्लेषणाने सुरू करतो. इथे तात्पर्य आहे, माझ्या परिस्थितीचं माझ्या द्वारे केलेल्या विश्लेषणाशी.
परिस्थिती अशी आहे.
पाऊस पडंत होता. मनांत काहीही शंका न आणता, की मी मूखिन आहे, मी काळी इंग्रजी छत्री घेऊन मूखिनच्या धिम्या चालीने घरी चाललो होतो. मूखिनच्या सवयीनुसार मी आकाशांत होतो, प्रत्येका गोष्टीबद्दल विचार करंत होतो - - : परक्यांच्या गोष्टींबद्दल, पण फक्त बाह्य प्रतिक्रियांच्या स्त्रोतांबद्दल विचार नव्हतो करंत, ज्यांच्या अस्तित्वामुळे स्वतःच्या विचारांना उत्तेजित करायचं माझ्याकडे येवढही कारण नव्हतं. हे पण जोडतो - - : स्वच्छ, मूखिनसारख्या स्पष्ट, शुद्ध विचारांना.
तर, त्यावेळेस जी गोष्ट मला त्रास देत होती, तिचं वर्णन मी प्रोटोकोलसारख्या सटीकतेने करू शकतो. सगळ्यांत आधी, एका वैताग आणणा-या जडत्वामुळे मी आपल्या मेहनती डोक्याला कामाशी संबंधित विचारांनी त्रस्त करून बसलो, आणि तेपण तेव्हां, जेव्हां मी कामावरून घरी परंत येत होतो. त्याला डोक्यातूंन पूर्णपणे काढून टाकणं जास्त चांगल झालं असतं. उपभोक्त्यांच्या प्राथमिकतांशी संबंधित सैद्धांतिक प्रश्न स्वतःत मजेदार आहे, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, वरून दुनियादारीच्या दृष्टीने तो माझ्यासाठी जरूरी नव्हता, कारण की त्या उदास दिवसांत मला जीवनाच्या आवश्यक साधनांपासून वंचित केलेलं होतं (आपणहूनंच स्वतःला वंचित केलं होतं). स्वाभाविकपणे माझे विचार देशवासियांच्या हिताकडे वळले, जशी शासनाला कल्पना करायला हवी. म्हणजे, मी कल्पना करंत होतो की कल्पना कशी असली पाहिजे. शासन प्रमुखाद्वारा भ्रष्टाचाराविरुद्ध घोषित केलेल्या युद्धाकडे माझं लक्ष नव्हतं जात, मला दुसरंच काहीतरी त्रास देत होतं - - : प्रेसिडेन्टने जुगार-व्यवसाय सुव्यवस्थित करण्यासंबंधी दिलेलं वचन, जे माझ्या घरापासून शंभर पावलांवर असलेल्या ‘तुमचं सुख’ ह्या मनोरंजन केंद्राला बंद करण्याचं धोक्याचं सिग्नल होतं - - : हे नुकसान सहन करण्याची ताकत माझ्याकडे आहे कां?
शिवाय मी त्या हिरव्या पावडरबद्दलपण विचार करंत होतो, जी मला आज माझ्या ब्रीफकेसमधे सापडली होती. माझ्याकडे एक मोठी, जुनी ब्रीफकेस आहे, जिचा मी गरजेसाठी नाही, तर स्टाइलसाठी उपयोग करतो, म्हणून सावधपणाने तिचा उपयोग करण्यांत काही वांधा नाहीये. तर, आज आपल्या ब्रीफकेसमधून मैच-टेबल्स काढताना मी बघितलं की त्यांच्या किनारींवर किंचित हिरवा रंग लागलाय. ब्रीफकेसच्या तळाशी एक अज्ञात प्रकाराची पावडर होती. मी तिला अंगणांत, घाण पाण्याच्या टाकींत झटकून टाकलं, जी आमच्या ऑफिसच्या प्रवेशद्वारापासून थोडींच दूर आहे. एक आवारा हपापलेल्या नजरेने माझ्याकडे बघंत होता. कदाचित विचार करंत असावा की जर मी जुनी ब्रीफकेस फेकून दिली तर - - :
हाच सगळा विचार करंत होतो मी, कामावरून घरी परंत येताना, सगळं काही स्पष्टपणे समजण्याच्या तासभर आधी.
जिना चढून वर गेलो, घण्टी वाजवली; बायकोने दार उघडलं आणि एकही शब्द न बोलता टी.वी. बघायला खोलींत धावली. माझ्या स्लिप्पर्सवर, जर समोरून कोणत्या तिस-या डोळ्याने बघितलं तर, मोट्ठं अक्षर W आहे, माहीत नाही निर्मात्याला ह्यांतून काय प्रकट करायचं होतं - - : सान्ताक्लाज़ला फार मजेदार आणि ज्ञानवर्धक वाटलं असतं, की ह्या स्लिप्पर्सवर मी ते नाही बघणार, जे इतर लोक बघतात - - : माझं अक्षर M, उलंट दोन अक्षरं. मी ओली छतरी उघडून, वाळण्यासाठी प्रवेशकक्षांत ठेवली. जर मला टी.वी.मुळे बायकोचा हेवा वाटला असता, तर फारंच हास्यास्पद वाटलं असतं, पण तरीही, कामावरून आलेला नवरा, माझ्या मते, थोडंसं लक्ष द्यायच्या लायकीचा तर असतोच. आमचं किचन बरंच मोठं आहे आणि त्यांत प्रकाशपण भरपूर असतो, कुंडीत एलोवेरा लागलाय, हो, हे स्वीकार करावं लागेल, की पाणी टपकण्याच्या डागांमुळे छत खूप ओंगळवाणी झालीये. गैसच्या शेगडीवर एका भांड्यांत मला सॉसेज दिसलं, बघावं लागेल, गार आहे. डिनरसारखं तर ते कुठूनही वाटंत नव्हतं, तरीही गैसपासून न हलता मी त्याचे तीन तुकडे खाऊन टाकले - - : भूक शांत करायला नव्हे, तर माझ्या हुशार बायकोला टोमणा देत, जी नव-याशी बोलण्याच्या ऐवजी टी.वी.ला जास्त महत्व देत होती. माझे हाव-भाव जरी दुर्लक्षित राहिले; नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं, पण त्यांच विश्लेषण माझ्याप्रमाणे नाही केलं गेलं. भांड्यावर झाकण आदळल्याचा आवाज ऐकून बायको ओरडली - - :
“कदाचित, घरी येताना तू काहीतरी आणलं आहेस? कदाचित, तू कमीत कमी समोसे तरी आणले असशील?”
हे बायकोचे वाग्बाण होते. तिला चांगलंच माहीत होतं - - : मी काहीही आणलेलं नाहीये, कारण की आणूंच नव्हतो शकंत.
जेव्हां मी बायकोबद्दल बोलतोय, तर माझं तात्पर्य, स्वाभाविकपणे, मूखिनच्या बायकोशी आहे; आशा आहे, की पुढे हे स्पष्ट करायची गरज नाही पडणार.
मी चूप राहिलो; खोलीत गेलो; टी.वी.बॉक्सवर सीरियल येत होतं. मला टी.वी.बॉक्समधे काहीतरी शंकास्पद जाणवलं. थोडा वेळ विचार करून, मी, चकित होऊन, उद्गारलो - - :
“ह्यालातर मारून टाकलं होतं!”
“कोणीच त्याला मारल नाहीये” (माझ्या बायकोने उत्तर दिलं).
“मला काय, दिसंत नाही? काही एपिसोड्स आधी मारून टाकलं होतं!”
“तू सीरियल्स बघंत नाहीस, मूर्खासारखा बोलू नकोस” (बायको म्हणाली).
मला बेचैनी वाटू लागली - - : काहीतरी गडबड आहे.
“पुन्हां जिवन्त झाला कां?”
“हा दुसरा आहे.”
“कोणी दुसरा-बिसरा नाहीये, मला नक्की आठवतं, तोच आहे!”
हा दुसरा आहे, एकंच एक्टर ह्याचा ‘रोल’ करतोय!”
बरोबर तर आहे - - : हा खरंच ‘तो’ नव्हता, ज्याला मी मागच्या आठवड्यांत स्क्रीनवर बघितलं होतं, त्यालातर मारून टाकलं होतं, तेपण माझ्याच डोळ्यांसमोर, आणि हा - - : दुसरा आहे, जरी एक्टर एकंच असला तरी. एकंच एक्टर, जणु काही झालंच नव्हतं, दुस-याला प्रदर्शित करतोय, जसं की असंच असायला पाहिजे; मला धक्कांच बसला.
“त्यांच्याकडे काय एक्टर्स नाहीत?”
मी हा प्रश्न पुन्हां विचारला असता, पण बायकोचा मान ठेवंत चुपचाप तिच्या शांततेशी सहमत झालो - - : चला, माझ्या प्रश्नाला अत्युक्ति समजूं या, ज्याला उत्तराची अपेक्षा नसते.
तेव्हां, जेव्हां बायको शांततेचा खेळ आणखी काही वेळ चालू ठेवणार होती, अप्रत्याशितपणे माझ्या तोंडून निघालं - - :
“बॉक्स खरोखरंच ईडियट्ससाठीच आहे!”
“बॉक्स ईडियट्ससाठी आहे? (क्षणभरांत बायको रागाने लाल झाली). ब्रेव्हो, कोस्त्या, सुपर! एका हाताचा दरोडेखोर18 – हा बॉक्स ईडियट्ससाठी नाहीये, हा बॉक्स विद्वानांसाठी आहे!”
तिला टोमणा मारायचा मौकाच मिळाला - - : एका हाताचा डाकू; कालंच तर मी हरलो होतो.
हार कबूल करावीच लागली - - :
“माफ़ कर. माझा अर्थ होता - - : ईडियट्स बॉक्सच्या आंत आहेत, बाहेर नाही. मला तुझा अपमान करायचा नव्हता. एक हुशार, सुरेख बाई ईडियट्सकडे टक लावून बघते आहे.”
आणि मी खोलीतून निघून गेलो, जेपण सापडेल तेच खायला - - : आता पोट भरून खाईन.
“आपलं तोंड बघून घे!” (मागून आवाज ऐकू आला).
मी फ्रिज उघडलं. आणि मला माशीची19 आठवण आली. ही राहिली. माशी - - : दाराच्या आंतल्या बाजूला, अण्ड्यांच्या शेल्फच्या वरती. आमच्या फ्रिजमधे माशी राहते. काही दिवसांपासून; कदाचित कालपासून. काल संध्याकाळी मी पहिल्यांदा तिला बघितलं होतं. काल संध्याकाळी मी फ्रिज उघडलं आणि पाहिलं की कशी एक पेंगुळलेली माशी त्याच्या आंत उडते आहे. ती उडून बाहेर नाही आली, तसं मी बराच वेळ फ्रिज उघडं ठेवलं होतं, आणि मी तिला हाकललं नाही. आज ती बेशुद्धावस्थेत होती. तिला स्वप्न पडतंय कां? माशांना स्वप्न पडतांत कां? जर माशांना दोन दिवस फ्रिजमधे बंद ठेवलं तर त्यांना स्वप्न पडतांत कां? मला ह्यांत शंकाच नव्हती की माशी जिवन्त आहे. जर माशी मेलेली असती, तर ती दाराच्या भिंतीवर बसलेली नसती, तर खाली पडली असती. ती इथे करते काय आहे? आमचं फ्रिजतर रिकामं आहे. ती इथे आली कशी? ती फ्रिजमधे घुसलीच कशी?
माशीबद्दल आणि काहीतरी खाण्याच्या इच्छेबद्दल विसरून मी फ्रिजचं दार बंद करून टाकलं, कारण की विजेच्या लखलखाटाप्रमाणे माझे विचार अगदी स्पष्ट झाले होते - - : डोक्यांत अचानक विचार आला - - : आणि मी? - - : आणि मी कोण आहे? - - : मी मूखिन आहे कां?
मी अचानक स्पष्टपणे समजलो की मी काही मूखिन-बीखिन नाहीये; मूखिनचं आपलं स्वतःचं अस्तित्व आहे, आणि माझं आपलं; आणि हे, की ना तर मी मूखिनचा भाऊ आहे, ना यार; आणि मूखिन आहे मी - - : फक्त तात्पुरता मूखिन आहे, पूर्णपणे मूखिन नाही - - : फक्त रंगा-रूपाने मूखिन, रूपाने.
ह्या शोधाने विस्मित होऊन मी आ वासला - - : अगदी असांच ह्यावेळेस मी आहे.
मूखिनची प्रत्येक गोष्ट माझ्याकडे होती - - : सगळ्यांत आधी, त्याची स्मरणशक्ति, मला अनुभव झाला, की मूखिनची कोणतीच गोष्ट मी विसरलो नाहीये, आणि विसरणारसुद्धां नाही, अगदी तसंच, जसं मूखिनशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट आत्मसात् नाही करणार. माझ्याकडे पुरेश्या मात्रेंत मूखिन होता, जरा जास्तीच होता, पण हे सगळं माझं नव्हतं. तर मी आहे कोण? (मी स्वतःला विचारलं). कोण आहे मी? पण मला माहीत नाहीये, की मी कोण आहे.
मी कुणीही होतो, तरी मूखिन झालोय, सम्पूर्णपणे मूखिन नसूनही.
मी मूखिन होतो, पण मूखिन नव्हतो, आणि मूखिन नव्हता.
पण सगळ्यांत महत्वपूर्ण गोष्ट मला आता स्पष्टपणे समजलीये, की मूखिन आत्ता, ह्याक्षणी गायब नव्हता झाला आणि मी मूखिनमधे आत्ता, ह्या क्षणी परिवर्तित नव्हतो झालो.
हे आधीच झालं होतं, बरंच आधी, माझ्या फ्रिज उघडण्याच्या बरंच आधी.
केव्हां? काल? मागच्या आठवड्यांत? काही वर्षांपूर्वी?
मला काय झालंय? मला कां ऐकू येतंय आणि एक एक अक्षर दिसतंय :
प्रॉजेक्ट, नियंत्रक शक्ति, स्कैनिंग सिस्टम?
मला कां हे समजतंय, की मला आत्म्याला थिजवून टाकणा-या रहस्यमय नियमांच पालन करावं लागणार आहे, जे शब्दांच्या माध्यमाने प्रदर्शित होत नसतात, पण पूर्णपणे आकलनीय आहेत?
मला समजलंय की माझ्याकडून काय अपेक्षा आहेत - - : गुप्त राहा आणि लपवंत राहा की तू खरोखरंच मूखिन नाहीये.
मला भीति वाटू लागली; आणि अंगावर शहारेपण आले - - : मी स्वतःला माशी समजूं लागलो, जी तिथे बंद होती.
तिला बाहेर काढायला हवं; मी फ्रिज उघडलं. माशी दारावर नव्हती. कुठेतरी पडलीतर नाही? ती ,काय, मरून गेली आणि पडली? माझ्या आत्मज्ञानाच्या एका मिनिटाच्या अवधीत एक माशी मरू शकते कां?
मी दाराचे सगळे शेल्फ्स शोधले - - : माशी कुठेही नव्हती, मी सम्पूर्ण फ्रिज पाहिलं, भाज्यांची ट्रेपण बाहेर काढली - - : रिकाम्या फ्रिजसमोर गुडघ्यांवर बसून मी प्लास्टिकच्या डब्यांच्याखालीसुद्धां बघितलं, जिथे भाज्यांना चांगल्या दिवसांत सुरक्षित ठेवतात - - : माशी कुठेच नव्हती.
“काय अगदीच डोकं फिरलंय?(माझ्यावरून ऐकू आलं). ‘चीज़’चा चुरा शोधतोय कां?”
गुडघ्यांवरून न उठता मी खांद्यांच्या मधे डोकं आखडून घेतलं. हिला काय पाहिजे? मूखिनची बायको इथे कां आलीये?
“शेजारिणीकडे जाऊन दोन अंडे मागून आणते, कमीत कमी स्क्रैम्बल्ड अण्डे करीन, किंवा त्यांना उकडीन - - : काय दिवस आलेयंत, लाजिरवाणे!”
ती निघून गेली, आणि मी, गुडघ्यांवरून न उठता, फ्रिजमधे हात ठेवूनंच राहिलो. जे झालंय, त्यानंतर मला मूखिनच्या बायकोशी कसं वागायला पाहिजे? तिच्याबरोबर कसा राहूं?
बौद्धिकरीत्या आत्मसात् केलेले नियमं, शांतपणे म्हणंत होते - - : हिम्मत ठेव, टिकून रहा, असं काहीही करू नकोस, ज्याने तुझं बिंग फुटेल (की तू मूखिन नाहीये), कोणत्याही परिस्थितीत, कोणालाही आपल्या रहस्यांत सामिल नको करू.
आपल्या रहस्यांत - - : त्यांच्या आणि माझ्या!
आणि आता - - : थरथरंत (माझे हात थरथरूं लागले, ओय-ओय!) - - : मी, नियमांचा उल्लंघनकर्ता, सध्या ह्या उद्वेगाला दूर करण्यास समर्थ आहे, ज्याने अचानक मला घट्ट दाबून ठेवलं होतं, मदतीसाठी तिहेरी धनु-कोष्ठकांना, जसं राक्षसांना, बोलावतो - - : टाइम झालाय. टाइम झालाय, आणि तसं मीसुद्धां स्वतःला बरंच स्वातंत्र्य दिलं होतं!}}}
{{{ पुन्हां उघडलेल्या आणि आधी बंद केलेल्या धनु कोष्ठकांच्यामधे सुमारे अडीच तासांच अंतर आहे. वरवर बघतां काही प्रतिक्रिया नाही दिसली. मी निश्चिंत आहे; परिस्थितीवर माझं नियंत्रण आहे; आशा वाटतेय. लिहीत आहे.
दयाळु शेजारिणीने अण्ड्यांसोबत बायकोला दोन कैबेज-रोल्स आणि ब्रेडचा चूरापण दिला. मला वाटतं की डिनर मस्त झालंय - - : ह्यापेक्षांही वाईट होत असायचं. कैबेज-रोल खाऊन मी बाल्कनींत चाललो गेलो - - : अस्पष्ट गोष्टींबद्दल विचार करायला. हवेंत उष्णता होती; जुलैचा महिना होता. तो अजूनही चाललाय - - : जुलैचा महिना - - : ह्या जुलैचा आनन्द घ्यायला अजून बराच वेळ आहे. डास उडंत होते; अंधार होत होता.
पॉइन्ट नं. 2पासून पॉइन्ट नं.1वर येतो (माझ्या आरंभिक ‘धनुष्यांत’ दिलेले पॉइन्ट्स बघा). सध्या मला प्रतिस्थापनाच्या प्रक्रियेत स्वारस्य आहे.
तर, बाल्कनींत मी ह्याबद्दल विचार करंत होतो - - : हे झालं केव्हां होतं?...
मला मूखिनचं जीवन आठवलं - - : लहानपण, किशोरावस्था, त्याचे विद्यापीठ, सुरुवातीचं प्रौढत्व. मी त्याच्या जीवनाचं ते धोकादायक वळण शोधायचा प्रयत्न करंत होतो, जेव्हां माझ्या द्वारे मूखिनला प्रतिस्थापित केलं गेलं होतं.
मला आठवलं – अगदी लहान कोस्त्या, उन्हाळ्याच्या, जुलैच्याच संध्याकाळी कामेन्का नदीच्या काठावर, वय वर्षे सहा, तो आत्तांच ‘हुक’ला कीडा अडकवणं शिकलाय; वडील, ज्यांच्याकडेपण मासेमारीची काठी होती, कोस्त्याच्या नावेवर सतर्क नजर ठेवून होते. तोंड मारल्याचा भास झाला. वेताची लांब काठी मूखिनच्या समोर वाकते. त्याने जीवनात आपली पहिली मासळी बाहेर काढली.
मी मूखिनला आपल्या तरुण मित्रांबरोबर वनस्पति आणि प्राणिमित्रांच्या सोसाइटीत प्रवेश करताना बघितलं होतं. ती रात्र, जेव्हां तो वयस्क झाला होता, जेव्हां त्याने मूर्खपणाने ट्रेन थांबवली होती. एका धुन्द सकाळी त्याला आपलं कौमार्यत्व गमावताना पाहिलं होतं. बघितलं होतं की मूखिन कसा शिळेवर रांगंत होता. कसा तो पू वाहत असलेल्या एपेंडिक्समुळे तडफडंत दवाखान्यांत पडला होता.
पू निघंत असलेलं एपेंडिक्स सगळ्यांत अप्रिय आठवण नाहीये. माझ्या बौद्धिक नजरेला दिसतोय एका दोनमजली बैरेकमधे जात असलेला मूखिन; चरमरंत असलेल्या पाय-या, रेल्वे-कर्मचा-यांचा दिवस, रिकामा कॉरीडोर, सगळे लोक बाहेर आहेत, त्याने दार उघडलं, ज्याच्यावर चाकूने एक फालतू शब्द ‘शलगम’ कोरलेला होता. लवकर-लवकर परंत चालला जातो. तासभरानंतर तो रेस्टॉरेन्ट-कारमधे वोद्का पिताना दिसेल, विसरण्यासाठी. स्वतःला विसरण्यासाठी. अंशतः तो ह्यांत सफलपण होतो.
मूखिन मूखिनंच होता.
मला मूखिनबद्दल ते सगळं नाही आठवायचंय, जे त्याला कधीही आठवावंसं नव्हतं वाटंत.
खाली लॉनवर राख झटकंत मी दुस-या टोकाने विचार करायला सुरुवात केली, किंवा सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर - - : शेवटपासून, न की सुरुवातीपासून. काही तरी मला सांगंत होतं की हे इतक्यांतच झालंय.
मला एक ‘शॉकिंग’ घटना आठवली, कारण की ती मला ‘शॉक’सहित आठवली होती - - : चक्क, स्पष्ट, विरोधाभासासकट, जणु ती आत्ताच घटित होत आहे - - : माझ्या डोक्यांत नाही, तर मूखिनच्या किचनमधे (तेव्हां, जेव्हां मी अजून बाल्कनींतच होतो). आमच्या - - : माझ्या? त्याच्या - - : बायकोशी गोष्टी चालल्या होत्या - -: पुन्हां - - : काय त्याच्या? काय माझ्या बायकोशी? - - : हे निर्भर करतं.
मूखिन शून्यांत बघंत होता.
गोष्ट मागच्याच्या मागच्या आठवड्याची आहे, पण मागच्याच्या मागच्या बुधवारची नाही, तर तिस-या बुधवारच्या आधीची. मी नंतर मोजलं होतं - - : पंधरा दिवसांपूर्वी, म्हणजे ह्या गुरुवारपासून, किंवा एकोणीस दिवस आधी, जर आजपासून मोजलं तर, आणि आज, जेव्हां मी हे लिहितोय, रविवार आहे.

