Abhijeet Tekade

Thriller Others

2.8  

Abhijeet Tekade

Thriller Others

अदृश्य संवेदना

अदृश्य संवेदना

14 mins
1.2Kचिमूकली अदिती ही प्रकाश आणि सीमा च्या आयुष्याचा नवीन अध्याय. लग्नाच्या तब्बल २ वर्ष्यानंतर त्यांचे हे पहिले आपत्य.

सीमा आणि प्रकाश चा प्रेमविवाह. लग्नाच्या आधीच सीमाने प्रकाशला तयार केले कि लग्नानंतर कमीत कमी ३ वर्ष्यापर्यंत तरी मूलं नको. कारण सीमाला तिचे कॅरिअर करायचे होते आणि त्यावेळी प्रकाशनेही तशी हामी भरली होती.


प्रकाश हा मुळात मनाने फार हळवा, तर सीमा तेव्हडीच व्यवहारी होती. लग्नानंतर दोघेही नौकरी करायांचे , फार धावपड व्हायची त्यांची .

पण प्रकाश सीमाला घराच्या कामामध्ये हातभार लावयचा.त्यांचा छान संसार चालला होता.ज्या दिवशी घरकामाचा कंटाळा आला तर त्या रात्री ऑफिस मधून परत आल्यावर छान बाहेर लॉन्गड्राइव्हला जायचे ,कुठेतरी बसून मनमोकळ्या गोष्टी कराच्या आणि बाहेरच जेवण कराचये.

बरेचवेळा वेळा कामाचा कंटाळा म्हणून नाहीतर एकमेकांना वेळ देता यावा म्हणून प्रकाश मुद्दमच प्लान करायाचा.

अश्याप्रकारे एकमेकांना समजवून घेत त्यांच छान चाललं होत.


दिवसामागून दिवस गेले आता प्रकाश आणि सीमाच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले होते.

एकेदिवशी प्रकशाच्या ऑफिसमधील मित्राला मुलं झाले आणि त्याला बघन्यासाठी म्हणून प्रकाश व सीमा दवाखान्यात गेले होते .

त्या रात्री त्यांना घरी परत येताना उशीर झाला त्यामुळे बाहेरच जेवण करून ते कार मधून येत होते.

आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता.छान हवहावंसा गारवा हवेमध्ये होता.

सीमाने गाडीच्या काचा खाली घेतल्या आणि अधून मधून बाहेरच्या दिशेला वाकून ती वारं अंगावर घेत होती.


गाडीमध्ये मंद आवाजात दोघांचे आवाडीचे अभिमान मधील ‘तेरे मेरे मिलन की ये रैना ... ‘ हे गाणे सुरु होते.

त्यारात्री सीमाचा मूड फारच छान होता.

प्रकाश उजवा हात स्टेरिंगवर गाडी चालवत आणि दुसऱ्या हाताने सीमाचा हात पकडत म्हणाला

“खरंच नाही, आई बाबा होन्यात काही वेगळाच आनंद असतो"

सीमा स्मितहास्य करीत आणि बाहेर बघत “हम्म”

प्रकाश थोडा दबकत

“तुला नाही वाटत आई व्हावयास”

“वाटत कोणाला नाही?”

“मग तुला नाही वाटत,आपण उगाच उशीर करतोय म्हणून?”

सीमा हातातला हात काढीत

“उशीर!” “जेमतेम एकच वर्ष झालाय लग्नाला” सीमा खिडकीबाहेर बघायला लागली.

प्रकाश थोडी हिम्मत करीत “का नाही आपण आताच प्लान करीत?”

सीमा त्याच्याकडे बघत “मोठी जबाबदारी आहे पालक बनणे”

“पण आपलं छान चाललय आता.”

“मलाही आता प्रोमोशन मिळणार आणि तुला पण काहीकाळ ब्रेक घेता येणार “

“अरे पण तेवढंच आहे का?” “मनाने पण आपण तयार व्हायला नको का

आणि लग्नाआधी आपण हे ठरवले होते कि ३ वर्ष तरी मूलं नको म्हणून

आणि आता हा विषयहि नको”

सीमाने गाडीच्या काचा वरती घेतल्या आणि डोके सीटला टेकवत डोळे मिटून बसली .

प्रकाश सीमाचा बिघडलेला मूड बघून गप्पपणे गाडी चालवायला लागला.


त्या दिवसानंतर प्रकाशने सीमाकडे हा विषय पुन्हा काढला नाही. त्यावर काही दिवस उलटले. प्रकाश जरी पुन्हा हे कधी बोलला नाही तरी त्याच्या अंतर्मनात काय चाललंय हे सीमा जाणून होती . प्रकाशला लहानमुलं आवडायची. त्यांच्याबरोबर खेळायला, त्यांच्याशी बोलायला फार आवडायचे आणि हे सीमाला ठाऊक होत. तिने हे पण भापले होते कि प्रकाशला स्वतःच मुलं हव होत. प्रकाशचा तो शांतपना तिला नाही बघवल्या गेला . नेहमीप्रमाणे तिचा व्यावहारिकपनाने तिच्या प्रकाशबद्दल च्या प्रेमापुढे हार मानली.


पुढे एका वर्ष्यानंतर प्रकाशची ‘परी’ म्हणजे ‘अदिती’ जन्मायला आली .

होय प्रकाश तिला परी म्हणायचा . अदितीचे आजोबा जे कोकणातील फार प्रसिद्ध असे जोतिषी होते , त्यांनी अदिती हे नाव सुचवले होते. पण प्रकाश तिला ‘परी’ म्हणूनच हाक द्यायचा. सारख आपलं ‘माझी परी, माझी परी ‘ करायचा.


डिलिव्हरीच्या काही महिन्याआधीच सीमाने जॉब सोडला होता. डिलिव्हरीकीकरीता सीमाच्या आईला प्रकाशने आग्रहाणे बोलावून घेतले होते. सीमाची डिलिव्हरी माहेरी न करता इथेच करायची अशी प्रकाशची इच्छा होती. प्रकाश सीमाला म्हणायाचा "मला एकहि क्षण आयुष्यातल्या या आनंदा पासून मुकायाचा नाही". अदिती पोटात असताना देखील ती जणू आपल्याशी सवांद करते आहे अस प्रकाशला वाटायचे. तो सीमाच्या पोटावर हात ठेवून प्रेमाने पोटातल्या बाळाशी हसत बोबडे बोल बोलायचा "काय करतेय छकुली माझी" सीमा हसत म्हणायची "छकुली कि छकुला कुणास ठाऊक" प्रकाश म्हणायचा "बघ मुलगीच होणार" "हो नं ग छकुली ?" अश्याप्रकारे महिन्यांमागून महिने निघून गेले . आता तो क्षण आला होता ज्याची प्रकाश आतुरतेने वाट बघत होता . डिलिव्हरी च्या एक रात्री आधी सीमा ऍडमिट झाली. दुसऱ्यादिवशी सकाळी ८ ला ओपरेशन थिएटर बाहेर सीमाची आई आणि प्रकाश त्या बातमीच्या प्रतीक्षेत होते. आतुन बाळाच्या रडण्याचा आवाज एकाला आला. तो ऐकताच प्रकाश रोमांचित झाला. नर्स बाहेर येऊन "अभिनंदन मुलगी झालीय " हे एकूण प्रकाशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अदितीचे प्रकाश आणि सीमाच्या सुंदर विश्वात प्रदार्पण झाले होते . ३ दिवसानंतर बाळाबरोबर सीमा घरी परतली.


अदिती आल्यापासून तोसारखा जितका जास्त वेळ मिळेल तिच्या अवतीभवती असायचा.

कितीतरी वेळ ‘परीकडे’ (अदितीकडे ) टक लावून बघत बसायचा.

तिच्या डोळ्यात बघताना प्रकाशाच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक असायची. एक वेगळंच समाधान दिसायचं, बरेचदा त्याचे डोळे प्रेमाने भरून पाणावून जायचे.


अदिती ३ महिन्याची झाली तेव्हा , सीमाची आई गावाला निघून गेल्या.

आता अदिती आणि सीमाची संपूर्ण जबाबदारी प्रकाशावर आली होती आणि त्याने ती आनंदाने स्वीकारली होती. सीमाचा नौकरी करन्याचा सध्या तरी काही विचार नव्हता.

अदिती आल्यापासून सीमाही फार बदलली होती, कारण तिच्यातलं मातृत्व तिच्या व्यवहारिकपणावरती हावी झाली होतं. सीमा फार खुश होती प्रकाशचा आनंद बघून आणि त्याचे अदितीवरील असलेले प्रेम बघून.


प्रकाश अदितीचा फार छान सांभाळ करीत असे .

अदिती रात्री बेरात्री रडत उठली कि सीमाच्या आधी प्रकाश उठून तिला कुशीत घेत असे, तिच्याबरोबर बोबडे बोल बोले, तिला कडेवारती घेऊन घरामध्ये घिरट्या घालत असे. ती झोपी आली कि तिला छातीवरती ठेऊन झोपे .

हळू हळू परीला पण प्रकाशची फार सवय झाली .

सीमापेक्षा प्रकाशकडेच ती जास्त असायची. कितीही रडत असली आणि प्रकाशचा आवाज एकला तर शांत होई.

प्रकाश ऑफिसला जातांना त्याला घरातून निघणायची इच्छा सुद्धा होत नसे. प्रकाश घरी नसताना अदितीचे निरागस डोळे प्रकाशला घरी शोधायचे.

प्रकाश ऑफिसमधून पण सारखे सिमला फोनकॉल करून विचाराचा ‘काय करते माझी परी’ .

सायंकाळ झाली की सारखी त्याला घरी येणाची ओढ लागायची.

अदिती पण प्रकाश घरी आला कि त्याला जाऊन बिलगायची, ती आता ९ महिन्याची झाली होती.

प्रकाशचे अदितीवरती प्रेम बघून सीमालापण ईर्ष्या व्हायची आणि ती प्रकाशला विचारायची

“तुझा जास्त जीव माझ्यामध्ये आहे का अदितीमध्ये?”

तेव्हा प्रकाश तिला हसून म्हणायचा “अग तुझाच अंश ना तो आणि माझा दोघांमध्ये पण फार जीव आहे .“

पण सीमाला सारखं वाटायचं की हि बापलेकी ची जोडी झाली आणि ती एकटी झाली.

पण सीमाला त्याचा गर्वही वाटायचा कि प्रकाश नवरा म्हणून तर चांगला होताच आणि आता वडील म्हणून पण उत्तम ठरला.

चांगला गुण्यागोविंदचा तिघांचा संसार सुरू होता अदितीं कलेकलेने मोठी होत गेली.

अदिती १३ डिसेम्बरला २०१५ ,५ वर्षाची होणार होती. तिचा वाढदिवस १ आठवड्यावरती होता.

प्रकाशला अदितीचा ५ वा वाढदिवस फार मोठा साजरा करायचा होता आणि त्याकरिता तयारी सुरु होती .

बऱ्याच जवळच्या,दूरच्या नातेवाईकांना ,मित्राना आमंत्रण दिले होते.

वाढदिवसाकरिता कोकाकणातले अदितीचे आजोबा म्हणजे प्रकाशचे वडील आले होते.

ते एकदा जेव्हा अदिती चा जन्म झाला तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी आले होते.

पण तेव्हा २ दिवस थांबून निघून गेले आणि मध्ये २-३ वेळा कधीतरी आले होते.

प्रकाशची आई तर त्याच्या लहानपणीच वारली होती. प्रकाशचे वडील विष्णुशास्त्री यांनीच त्याला मोठा केला . विष्णूशास्त्री फार नावाजलेले असे जोतिषी होते.

ते इथे आल्यापासून थोडे चिंतेत दिसत होते.

प्रकाशने आणि सीमाने कारण विचारण्याचा प्रयन्त केला ,पण ते काही बोलले नाही.

अदितीचा वाढदिवस एका आठवड्या वरती होता. त्याकरिता घरापासून ५ कीमी अंतरावर एक छान गार्डन lawn बुक केले होते.

बरीच तयारी प्रकाश आणि सीमाने गेल्या पंधरादिवसापासून केली होती. आणि तरीही काही तयारी बाकी होती त्यासाठी प्रकाश धावपड करीत होता.

वाढदिवसाच्या ४ दिवसा आधी रात्री सीमा किचन मध्ये स्वयंपाक करीत असताना, प्रकाशचे बाबा आणि प्रकाश गॅलरी मध्ये बसून गप्पा मारीत होते. अदिती टीव्ही वरती कार्टून बघत होती. प्रकाश आणि बाबांच्या गप्पा सुरु असताना अचानक प्रकाशचा आवाजाचा सूर वाढला

“काय ? कस श्यक्य आहे हे ?" "आणि बाबा माझा यावर बिलकुल विश्वास नाही आहे ” “यानंतर मला या विषयावर नाही बोलायचेही नाही”.

तो आवाज सीमाच्या कानावर पडला ती समोरच्या हॉल मध्ये गॅलरी कडे काय झाले हे बघण्याकरिता गेली.

तेव्हा तिने बघितले प्रकाशला फार घाम सुटला होता आणि तो हाफत होता. प्रकाशचे बाबा डोक्यावरती हात ठेऊन बसले होते. सीमा गॅलरीकडे येत्यांना बघून दोघांनी बोलणे थांबवले आणि प्रकाश आत येत बेडरूम कडे निघून गेला.

सीमाने बाबाला विचारने योग्य वाटले नाही.आणि त्यावेळेला प्रकाशलाही तिने नाही विचारले .

प्रकाश आणि त्याचा बाबाला सीमाने जेवण वाढले दोघेही फार कमी जेवून उठून गेले. त्या रात्री झोपताना सीमाने प्रकाशला विचारले तेव्हा त्याने ‘काही नाही गावातील शेती आहे त्याबद्दल काही वाद झाला’ असं सांगितले.

मग सीमानेही जास्त विचारणे योग्य वाटले नाही. त्या रात्री प्रकाश फार अस्वस्थ वाटत होता भानगड ती वाटत नव्हती जी तो बोलला.

दुसऱ्या दिवशी प्रकाशने बरं वाटत नाही असं सांगून ऑफिसमधून सिक लिव्ह घेतली .

त्याचा अदितीच्या वाढदिवसाचा उत्साह कमी दिसत होता . प्रकाश त्याच्या बाबा बरोबर पण बोलायला तयार नव्हता . त्याच्या चेहऱ्यावर चिंता सारखी दिसत होती. चिमुकली अदिती पण तिचे बाबा का शांत आहे म्हणून सारखी प्रकाशला बिलगून राहत होती आणि प्रकाश पण फक्त अदितीला सारखा घेऊन राहत होता.

आता वाढदिवस एक दिवसावरती होता.मागल्या दोन रात्री प्रकाश व्यवस्थित झोपला नाही. वाढदिवसाच्या आधल्या रात्री प्रकाशला झोप लागली. अचानक मध्यरात्री प्रकाश झोपेतून ओरडत उठला . सीमा पण दचकून उठली. तिने बघितले प्रकाशला घाम फुटला होता, त्याचे डोळे विस्फरलेले होते आणि तो ताठ समोर बघत होता. सीमाने त्याला हलवले तेव्हा तो जागा झाला आणि रडायला लागला ते बघून सीमा घाबरली आणि त्याच्या जवळ जात त्याला मिठीत घेतले . तिने विचारल्यावर त्यानी फार वाईट स्वप्न बघितल्याचे सांगितले .

पण स्वप्नामध्ये काय पहिलं हे त्याने तिला सांगितले नाही.

वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण घरात शांतता होती सकाळी सीमाने तयारी करून अदितीला अक्षवाण केले.

सीमा आणि प्रकाशाने परीसाठी आणलेले गिफ्ट दिले

हे सगळं सुरु असताना प्रकाश स्तब्ध होता .

सीमाने त्याला फोटो काढायला सांगितले ते हि त्यानी निरसपणे काढली .

राहून राहून तो अदितीला बीलगायचा तिच्या पाप्या घायचा . हे तो तसा नेहमी कराचा पण आज हे करताना त्याचा डोळ्यामध्ये अश्रू होते . सीमाला त्याचे नेमके कारण ठाऊक नव्हते .

त्या दिवशी सायंकाळी वादिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करीत इतर तयारीसाठी कामाला लागली.

त्या दुपारी प्रकाश सीमाला अचानक म्हणाला अगं आपण “कार्यक्रम कॅन्सल करू” .

सीमा त्याच्याकडे बघतचं राहिली. थोड थांबून ती म्हणाली

“तुला बरं वाटत नाहीये का ? आणि अस अचानक काय झाले ?” “डॉक्टरकडे जायचा का?”

प्रकाश इकडे तिकडे बघत “नाही थोड अस्वस्थ वाटतंय”

सीमा त्याला म्हणाली

“अरे सर्व तयारी झाली सर्व लोकांना आमंत्रण दिले आहे. आणि आजचाच दिवस फक्त, उद्या तू सुट्टी घेऊन आराम कर”

त्यावर तो काही बोलला नाही.

सीमाच्या खूप समजून सांगितल्या नंतर सायंकाळी प्रकाश,अदिती ,सीमा ,प्रकाशचे वडीलं तयार झाले.

सिमाला प्रकाशच्या मनात काय चालले काळत नव्हते.

चौघेही जण बिल्डिंगच्याखाली उतरले चालत पार्क केलेल्या स्वतःच्या गाडी जवळ पोहचले .

प्रकाशने गाडी अनलॉक न करता तिघांना थांबवले. आणि तो सिमला म्हणाला “अगं आज कार नी नको जायला"

सीमा ने विचारले “का ?” प्रकाश थोडा अडखत पण जोराने “मी म्हणतो म्हणून”.

सीमाने प्रकाशला असे बोलताना कधीही बघितले नाही, तीला थोडे आश्चर्यच वाटले.

प्रकाशचे वडील पण त्याला काही बोलले नाही ते तसेही त्या दिवसापासून जास्त बोलत नव्हते ,थोडे शांत शांतच होते.

सीमाने ऐनवेळेवर वाद नको म्हणून प्रकाशच्या म्हणयांनुसार ऑटोने जायचे ठरले. प्रकाशने सामानाबरोबर बाबा आणि सीमाला एका ऑटोने समोर जायला सांगितले.

तो स्वतः आणि अदिती दुसऱ्या ऑटोने निघाले. प्रकाश फार अस्वथ होता तो अदितीला घट्ट पकडून ऑटोमध्ये बसला होता आणि अधूनमधून ऑटोचालकाला हळू चालवायच्या सूचना देत होता.

हॉलपासून काही अंतरावर डावीकळे ऑटो वळण घेत असतांना समोरून भरधाव ट्रकने प्रकाशच्या ऑटोला धडक मारली. ऑटोचालकसह दोघेही त्यामधून बाहेर फेकल्या गेले. प्रकाश पाठीवरती एका पुठपाथ वर फेकल्या गेला . त्याने अदितीला मांडीवर सामोर घट्ट पकडून ठेवले असल्यामुळे ती प्रकाशच्या अंगावर अलगत होती. मात्र प्रकाशला डोकायच्या मागील भागाला जोरात मार बसल्यामुळे तो जागेवरच मरण पावला. आजूबाजूला गर्दी झाली. थोड्या वेळात पोलीस आले .

अदिती सुखरूप होती पण शेजारी वडिलांना बघून जोर जोरात रडत होती. लोकांनी तिला सांभाळले.

सीमा,बाबा आणि सर्वांना हे कळल्यावर त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले. सीमा,अदिती ,प्रकाश चे छोटेशे सुंदर विश्व क्षणार्धांत संपले.

त्यादिवसानंतर कितीतरी दिवस प्रकाश आपल्यातून निघून गेला या वर सीमाचा विश्वासच बसत नव्हता.

मरण म्हणजे काय हे समजण्यासाठी अदितीचे वय कमी होते. तिला वाटाचये तिच्या बाबाला कुठेतरी नेले आहे आणि ते परत तिच्या कडे येतील.

पण तरीही प्रकाशची आठवण काढून ती सारखी जोर जोरात रडायची तिच्या आईला आणि आजीला विचारायची "बाबा कधी येणार " आणि याचे उत्तर सीमा आणि आईकडे नसायचे.

सीमा फार खचून गेली होती. कधी कधी ती कुणाशी बोलता बोलता प्रकाश नसल्याची जाणीव होऊन शांत व्हायची आणि शून्यात बघत राहायची. राहून राहून रडायला लागायची.

सीमाचे यामध्ये अदितीकडे पण दुर्लक्ष व्हायचे. सीमाच्या आईने सीमाला समजावले कि अदिती करीता तिच्या भविष्या करीता तिला स्वतःला सांभाळावे लागेल. आणि सीमाला पण हे पटत होते.


सीमाला या दुःखातून निघायला वेळ लागला.

हा अपघात होऊन एक वर्षे उलटून गेले होते. सीमाने स्वतःचा आणि मुलीचा सम्भाळ करण्या करीता नौकरी सुरु केली होती. घरामध्ये अदितिला सांभाळायला सीमाने तिच्या आईला बोलावून घेतले होते. चिमुकल्या सहा वर्ष्याच्या परीला (अदितीला) अधून मधून बाबांची फार आठवण यायची आणि आजी ,आई कडून तिला बाबा कधी येणार याचे उत्तर मिळत नसल्यामुळे तिने पण ते विचारणे बंद केले होते. मात्र आठवणीमुळे भावुक होऊन तिचे डोळे पानवायचे आणि ती काही न बोलता आजी च्या कुशीत शिरून तिचा चेहरा लपवायची. आजीने काय झाले असे विचारले कि अचानक अदिती हुंदके देत रडायला लागायची.हे बघून अदितीच्या आजीचे पण डोळे पानवाचे पण ती कशीबशी अदितीला समजावयाची.


दिवसामागून दिवस निघत गेले हळू हळू त्यांचे आयुष्य सामान्य व्हायला लागले होते. अदिती पण तिच्या शाळेच्या मत्रिणीमध्ये थोडी रमायला लागली होती.

अदिती ७ वर्षाची असताना एके दिवशी सीमाला अदितीच्या मैत्रिणीच्या घरून मैत्रिणीच्या आईने कॉल केला आणि अदिती टेरेस वर खेळता खेळाता पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागल्याचे कळवले. तिला बँडेज मत्रिणीच्या आईने केल्याचे पण सांगितले.

सीमा लगेच तिथे पोहोचली मैत्रिणीच्या घरी तिच्या टेरेस वरती रेलिंग तुटलेली तिला आढळली पण सुदैवाने अदिती टेरेस वरून खाली न पडता समोर टेरेसवारीतच पडली होती आणि दुखापत किरकोळ होती.

सीमा अदितीला घरी घेऊन आली.

त्यादिवशी रात्री झोपताना अदिती सीमाला म्हणाली “आई मला बाबा दिसले”

सीमा आश्चर्याने बघत “बाबा!” “कुठे?”

अदिती निरागसपने म्हणाली “नेहाच्या टेरेस वरती”

सीमाने लगेच अदितीच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला कुशीसी घेतले .

ह्या तिच्या भासाला कसा विरोध करावा हे सीमाला नव्हते कळेल. पण याबरोबर तिच्या सामोर काही प्रश्नही निर्माण झाले. अदितीला काही मानसिक आजारांनी तर नाही ग्रासले कारण ती अजूनही तिच्या वडिलांना पूर्णपणे विसरली नव्हती.


त्याघटनेनंतर अदितीने बऱ्याच वेळा तिला तिचे बाबा दिसण्याचा दावा केला. कधी रोड क्रॉस करताना. कधी शाळेच्या आवारात.

हे सीमाला जेव्हा ती सांगायची तेव्हा सीमा तिला विरोध न करीता फक्त एकूण घायची. आता हळू हळू सीमाचा विश्वास झाला कि अदितीला काही मानसिक विकारा मुळे हे भास होतायेत. सीमाने मनोचिकित्सकाची सल्ला घ्येण्याचे ठरवले.

मनोचिकित्सकाच्या म्हण्यानुसार अदितीच्या लहान वयात ती एका मोठ्या मानसिक ट्रॉमामधून गेली होती ती म्हणजे तिच्या वडिलांचा तिच्या डोळ्यासमोर झालेला अपघात. आणि कदाचित अदिती अजूनही मनाने तिचे वडील मरण पावले हे मानू शकत नाही.

काही दिवस मनोचिकित्सकाबरोबर अदितीची कोन्सल्लिंग चालली. हळूहळू अदिती पण प्रतिसाद देत होती. आता तीच्या पण असल्या गोष्टी करणे कमी झाले आणि नंतर कधीही तिने असा काही दिसल्याचा उल्लेख केला नाही.अदितीमधील बदल बघून काही दिवसांनी सीमा पूर्ववत सामान्य झाली.


दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष निघून गेले. अदिती आता १३ वर्षाची झाली होती.अदिती अभ्यासात फार हुशार होती आणि फार गुणी होती. तिची शिक्षिका अबोली यांची ती लाडकी स्टुडन्ट होती. पॅरेण्ट मीटिंगला त्या फार अदितीची स्तुती करायाच्या.

एका मीटिंगला त्या म्हणाल्या कि "अदिती तशी फार खुश राहणारी आणि गुणी मुलगी आहे पण कधी कधी ती फार शांत होऊन जाते आणि कसला तरी विचारात असते".

हे एकूण सीमाला अदितीची आता पुन्हा जास्त काळजी वाटायला लागली होती. काय चाललय हे तिला कळत नव्हते.

सीमाला एक दिवस टीचर्स नोटमधून शाळेची सहल जाणार असं कळलं . तशी दरवर्षीच सहल जायची पण सीमा अदितीला काळजीमुळे नाही पाठवायची. पण या वर्षी अदितीला सहलीला पठावाचे सीमाने ठरवले .

त्या निमित्याने का होनींना अदितीला आनंद होईल आणि तिला तिच्या वडिलांच्या आठवणी पुसट होण्यास मदत होईल असं तिला वाटले. सीमा ने अबोली टिचरला तिची विशेष काळजी घेण्याचे सांगितले .

१२ जानेवारीला सहल शिमल्या करीता निघाली. मुंबई एअरपोर्ट वरून दिल्लीला प्लेननि नंतर बस नी चंदीगड आणि सिमला असा प्रवास होता . शाळेच्या टीचर्स ,स्टुडन्ट आणि अन्य स्टाफ निघाला. सीमाने त्यांना निरोप दिला.


दुसऱ्या दिवशी सीमाला एक फोनकॉल आला, त्यावरुन तिला शाळेच्या बसचा सिमला ला जाताना अपघात झाला हे कळले .

क्षणार्धात सीमाच्या मनात नको नको ते प्रश्न मनात आले होते .ती तिच्या आईला घेऊन सिमल्याला निघाली .

हॉस्पिटलला जिथे सर्व बसमधील मुलांना आणि शाळेच्या स्टाफला ऍडमिट केले होते तिथे पोहचली .

भरपूर मुले जखमी झाले होते.त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश बघून सीमाच्या मनामध्ये नाही नाही ते विचार येत होते.

ती एकेक पाउल रडत रडत टाकत होती. सीमाची आई तिला आधार देत होती. थोड्या अंतरावर आतल्या रूममध्ये पोहोचल्यावर एका बेडवरती अदिती होती.

तिचे पायाचे हाड मोडले म्हणून फॅक्चर बांधले होते,पण ती सुरक्षित होती हे बघून सीमाच्या जीवात जीव आला.

तिला बघून सीमा अबोली मॅडमला बघायला म्हणून दुसऱ्या रूममध्ये गेली. त्यांना थोडी दुखापत होती पण त्याही सुरक्षित होत्या आणि कुणाशीतरी बोलत होत्या. सीमाला बघितयालावर त्या बेडवर उठून बसल्या आणि म्हणाल्या “अदिती सुरक्षित आहे “

सीमा म्हणाली “हो मी भेटली तिला “

अबोली टीचरनि सीमाचा हात पकडला आणि सांगायला लागली

“तुम्हाला मला काही सांगायचे आहे. “

पुढे सांगत त्या म्हणाल्या

“आम्ही शिमल्याच्या आधी एक हॉटेल वरती मुक्कामाला होतो. तिथे मला एक व्यक्ती भेटला. त्याचे हावभाव थोडे विचित्रच होते. तो म्हणाला मॅडम तुम्ही पुढे घाटाकडे नको जायला इथे दरड कोसळनार, रस्ता दरीमध्ये कोसळणार.त्याला विचारले तुला हे कसे माहित आहे? तर तो म्हटला जास्त प्रश्न नका करू जे सांगतो ते करा परत निघून जा “

“आणि मला वाटले कि तो थोडा वेडा वगैरे असेल म्हणून दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी बस घाटामधुन जात असताना सामोरं दरी कोसळली आणि समोरचा रस्ता दरीमध्ये खचला. बस भरधाव असताना सुद्धा बस ड्राइवरच्या सतर्कतेमुळे आम्ही वाचलो”

सीमा हे सगळे आचार्यपुर्वक ऐकत होती. ती लगेच नंतर तिथून उठून त्या बस च्या ड्रायव्हरकडे गेली आणि तू कस लोकांना वाचवू शकला ते विचारले. त्याने झालेला प्रकार सांगितला आणि ते एकूण सीमा स्तब्धच झाली.

त्यानी सांगितले कि दरड जिथे कोसळली तिथे बस समोर अचानक कोणी तरी उभे आहे असे दिसले आणि त्याला वाचवण्या करीता स्टेरिंग घाटाचा विरुद्ध वळवले आणि बस बाजूला पहाडाला लागून थांबली .


हे ऐकून सीमाला काही कळायला मार्गाच नव्हता.

सर्व ठीक झाल्यानंतर सीमा,आई,अदिती घरी मुंबईला परतल्या.

नंतर काही दिवस सीमा सारख्या या विचारात होती.

अदितीला जो नेहमी भास होत होता तो भास नसून सत्य तर नसेल? खरंच प्रकाश अदितीला दिसत असेल का ?

पण अदितीला प्रकाश कोण्या कारणामुळे भेटत होता.

जो व्यक्ती अबोली मॅडम आणि ड्रायव्हरला दिसला, तो प्रकाश तर नव्हता ?

पण हे कस शक्य आहे ?

असे असंख्य प्रश्न तिच्या मनात फिरत होते. तिला या सर्व प्रश्नांची उत्तर हवी होती.


सीमाला आठवले की प्रकाश नेहमी एक पर्सनल डायरी लिहायाचा. जी तो कुणाला वाचू देत नसे.

तो गेल्यानंतरही सीमाने ती वाचली नव्हती.

तिच्या मनात असंख्य प्रश्न होते. त्या दिवशी बाबा आणि प्रकाशामध्ये असे काय बोलणे झाले की नंतर प्रकाश असा अस्वस्थ झाला .

आणि बाबाने सीमाला का नाही सांगितलं त्या रात्री प्रकाशबरोबर बोलणे झाले ते.


तिने डायरी वाचायचे ठरवले.

ती वाचल्यानंतर तिला मोठा धक्का बसला.

त्या डायरीमध्ये प्रकाशच्या वडिलाने सांगितलेल्या भविष्या चा उल्लेख होता त्यानुसार अदिती दुर्घटनेमुळे अल्पायुष्यामध्ये मारण पावणार होती. आणि याच भविष्याला प्रकाश नकारत होता. वाढदिवसाच्या आधल्या रात्री त्याला जे स्वप्न पडले त्याचा उल्लेख पण त्या डायरीत होता. त्यारात्री त्याला स्वप्नामध्ये कार अपघात झाला आणि अदिती मरण पावली असे दिसले.

ही डायरी वाचून सीमाला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाले होते .

प्रकाशने बाबाला सीमाला या भविष्याबद्दल न सांगायला सांगितले होते.

त्या स्वप्नांमुळे वाढदिवसाच्या त्या दिवशी त्याने कार ने न जाता ऑटोने जायचे ठरवले आणि अदिती चे मरण स्वतःवरती ओढून घेतले.

मरणानंतरही त्याला त्या भविष्याच्या कारणाने आणि अदितिबद्दल च्या प्रेमाने रोकुन ठेवले होते.

अदितीला नेहाच्या टेरेसवरती प्रकाशच दिसला आणि त्यानेच अदितीचा त्या दिवशी अपघात टाळला अशी सीमाला खात्री पटली. 

आणि नंतरही तो अदितीला असल्याचं कारणांमुळे वारंवार भेटत होता.

अजूनही तो अदितीच्या अवतीभवती राहून अदितीचे रक्षण करीत होता.

त्याच्या संवेदना अदृश्य होत्या.


मित्रांनो हि कथा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा म्हणजे मला आणखी लिहिण्या करीता प्रोत्साहन मिळेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller