Abhijeet Tekade

Drama Romance Others

4  

Abhijeet Tekade

Drama Romance Others

कुरूप (भाग ९) - पहिले प्रेम

कुरूप (भाग ९) - पहिले प्रेम

14 mins
324


परागबरोबरची नुकतीच झालेली भेट, लावण्याच्या मनात घर करून गेली होती. त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तिला सुखद अनुभूती देत होता. नुकत्याच झालेल्या भेटीमधील प्रत्येक गोष्ट:, जसा त्याक्षणीचा तो गार वारा, पावसामुळे दरवळणारा मातीचा सुगंध, भेट दिलेली ती जागा, तिला परागची आठवण करून देत होती. पुन्हा-पुन्हा ते क्षण स्मरणात आणून ती सुखावत होती. दिवस मोठा वाटायला लागला होता. कधी दुसरा दिवस उजाडतो आणि कधी ती परागला भेटेते, याची ती आतुरतेने वाट बघायला लागली. 


दुसऱ्या दिवशी कॉलेजला लेक्चरमध्ये लावण्याचे जराही लक्ष नव्हते. ती थोड्याथोड्या वेळाने घड्याळाकडे बघायला लागली; आणि रेसेसची वाट बघायला लागली होती. 

आज पुन्हा परागसोबत भेट होईल, या विचाराने ती गदगदून गेली होती. रेसेस झाली, ती घाईत बाहेर पडली, तिच्या पाठोपाठ रिद्धीपण निघाली. लावण्याला कँटीगच्या विरुद्ध दिशेने जात असल्याचे बघून, रिद्धीने तिला हाक दिली. लावण्याने वळून बघितले, रिद्धीने तिला विचारले, " अग कुठे निघालीस इतक्या घाईत, तुझा पाठलाग करून मला दम लागलाय. आणि तेही मला न सांगता निघालीस!"

"अग सॉरी मी लायब्ररीला निघाले, ते मला एक पुस्तक आणायचे आहे." लावण्या म्हणाली.

"ओह!.. आले लक्षात! कोणते पुस्तक तुला वाचायचे आहे ते!, तेच ना, जे काल तू त्या गार्डनमधील मनोऱ्याखाली वाचत होतीस." रिद्धी मस्करीने म्हणाली. 

"चल तुझं काहीही… " लावण्या लाजत म्हणाली. 

"ओह! तू माझ्या पासून लपवते, आणि मी तुला माझी खास मैत्रीण समजतेय", रिद्धी लावण्याची फिरकी घेत म्हणाली. 

"अग तसं काही नाही, आणि असलं तर सांगेल की तुला.", लावण्या म्हणाली. 

"अग तुझं पुस्तक लायब्ररीतच मिळेल कश्या हून, कँटीगला पण असू शकते, चल कँटीगला", रिद्धी म्हणाली. 

"नाही मी येते जाऊन लाइब्ररीला"

"अगं कॉल करून बघ तुझ्या पुस्तकाला", रिद्धी पुन्हा थटेत म्हणाली. 

"अम्… माझ्याकडे त्याचा नंबर नाही" लावण्या कचकत म्हणाली. 

"धन्य आहात तुम्ही... , ये तू जाऊन लाइब्ररीला... , आणि हं तो नाही भेटला तर सरळ ये कँटीगला" रिद्धी म्हणाली. 

"हो ठीक आहे" म्हणून लावण्या वळून लगबगीने निघाली. 

रिद्धी कँटिंगला पोहेचली तेव्हा समोरील गार्डनमध्ये योगेश आणि पायल प्रेमीयुगलांप्रमाणे बसलेले तिला दिसले. रिद्धी त्यांना हाक देत म्हणाली, "ये लव्हबर्डस चला आत! प्रेम मिळालं म्हणून काय मित्रांना विसरायचं!" 

"हाय रिद्धि! हा येतोच आम्ही, तू हो पुढे." योगेश म्हणाला. 

"ओके! लवकर या, सर्व येतील इतक्यात."

कँटीगमध्ये ग्रुपच्या टेबलवर मोहित आणि पक्या आधीपासूनच येऊन बसलेले होते, आणि इतर मेंबर अजून यायचे होते. रिद्धीला बघून पक्या उत्सहात "हे, हाय डिअर!"

"डिअर गियर काय हे?" त्यांच्या जवळच्या खुर्चीत जाऊन बसत रिद्धी मस्करीत, रागाचा आव आणून म्हणाली. 

"अरे क्या यार तुम तो बुरा मान गयी. मै तो ऐसेही... " पक्या म्हणाला. 

"हे जस्ट चील! मस्करी करतेय" रिद्धी हसत म्हणाली. पक्याही हसला. 

"हे बाकी लोकं कुठे आहेत?" मोहितने विचारले. 

"येतील थोड्या वेळात, जोशी सरानी उद्याला सरप्राइझ टेस्ट ठेवली आहे. आणि आता बाकी लोक नोट्स अपूर्ण असल्यामुळे एकमेकाडून त्याची जुळवाजुळव करताहेत." रिद्धी म्हणाली 

"आणि तू … " मोहितने विचारले. 

"आपले काम अपटुडेट आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायची सवय आहे त्यांना. माझ्याकडील नोट्स देणार होते त्यांना, पण म्हटले थोडे घेऊ दे कष्ट, कोणाकडे नाही मिळाले तर् येतील परत माझ्याकडे, आणि मग बदल्यात आज इथे आपल्याला ट्रीट मिळेल. हा.. हा.. " रिद्धी हसत पक्याला टाळी देत म्हणाली. 

"चलाख है यार तू!" पक्या म्हणाला. 

तेवढ्यात सौंदर्या, मीनल आणि बाहेर आधीच असलेले योगेश, पायल आत आलेत.

सर्वानी आपल्याला जागा धरल्या. 

"हे मोहित! बऱ्याच दिवसांनी इकडे दिसलास" योगेशने विचारले. 

"हा मी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होतो.", मोहित उतरला.

"सौंदर्या तू सांगितले ना पार्टी बद्दल सर्वाना." मोहित ने सौंदर्याला विचारले.

"म्हणजे काय, त्याच दिवशी"

"हे गाईज सर्वांनी यायचं ह!"

"मी तुला पार्टीच्या आधल्यादिवशी कळवते नक्की काय ते" रिद्धी म्हणाली.

"अग हे काय रिद्धी, तुला यावंच लागेल. घरी तुला परवानगीवगैरे नाही का, रात्री पार्टीसाठी?" सौंदर्याने विचारले.

"हो तसंच समज, पण मी प्रयत्न करेल."

"तेवढ्यात लावण्या तिथे पोहचली तिला बघून सौंदर्याचा चेहरा उतरला."

"हे लावण्या मिळालं का तझं पुस्तक?", रिद्धी मस्करीत म्हणाली. तसं ग्रुपमध्ये कोणाला ते कळलं नाही. पण लावण्याला कळलं, त्यावर ती निराशपणे उत्तरली" नाही!" 

"बरं ये इकडे तुझा मूड फ्रेश होईल. हे मोहित, पक्या, लावण्याची तुमची ओळख तेवढी राहिली होती.

त्यांनी तिला आपुलकीने अभिवादन केले. आणि पुढे मोहित म्हणाला " छान वेळेवर आपली ओळख झाली"

लावण्या आश्चर्याने विचारले "का काय विशेष"

"अग येत्या शुक्रवारी पार्टी करतोय आणि तुला यायचंय" लावण्या विचारात पडली. सौंदर्याला ते आवडणार नाही तिला ठाऊक होत. सौंदर्या यावर वैतागलेली होती. 

"हे कसला विचार करतेय येशील ना" मीनल म्हणाली

"अ... मी घरी विचारून सांगते" लवण्याने मुद्दाम परिस्थिती संभाळाण्याकरिता कारण सांगितले. 

"हा समजले तुझ्याही घरी रिद्धीच्या घरच्या सारखी बंधने असतील." मीनल म्हणाली.

मोहित दरवर्षी पार्टी देत असे. आणि त्याची जंगी पार्टी कॉलेजमध्ये फेमस होती. कॉलेजमधील सर्व मित्रांना तो आमंत्रित करीत असे, आणि मित्र त्याच्या पार्टीची आतुरतेने वाट बघायचे. सौंदर्या आणि तिचा ग्रुप प्रथमच ह्या पार्टी ला जाणार होते, त्यामुळे सर्व जाम उत्साहित होते. मोहित स्वतःसुद्धा यावर्षीच्या पार्टीबद्दल उत्साहित होता, कारण यावर्षी सौंदर्या या पार्टीला येणार होती. 

कँटिंगमध्ये पार्टीला कसे कधी जायचे, काय शॉपिंग करायची अश्या चर्चेला ऊत आला होता. पण लावण्या मात्र शांत ऐकत होती, तिने अजूनपर्यंत पार्टीला जाण्याचा निर्णय घेतलेला नव्हता, आणि तिच्याबरोबर रिद्धीसुद्धा शांत ऐकत होती. रेसेस संपल्यानंतर सर्व क्लासकडे जात असतांना, लावण्यांनी रिद्धीला विचारले " तू खरंच जाणार नाहीस का पार्टीला? घरून तुला खरंच परवानगी काढावी लागणार आहे?"

"अगं तसं काही नाही. मला माझ्या घरून पूर्ण स्वातंत्र आहे. मी न येण्याचे कारण, मला काही वैयत्तिक काम, आणि काही जबाबदारी आहे" रीद्धी नाईलाजपणे म्हणाली. 

रिद्धीच् असं काय लपवण्याचा प्रयत्न करते आहे, लावण्याला याची जिज्ञासा होती , मात्र तिने त्यावर जास्त काही विचारायचे त्यावेळेला टाळले. आणि तसही लावण्याला वेगळ्याच मनःस्थितीत होती. त्यादिवशी पराग न भेटल्यामुळे ती अस्वथ होती, आणि मोहितच्या पार्टीला कसे जायचे हाही प्रश्न तिच्यासमोर होता. लावण्या मोहितच्या पार्टीला आलेली सौंदर्याला खपणार नाही आणि पुन्हा त्यावर घरी काहीतरी भांडणं उदभवेल याची जाणीव लावण्याला होती. आणि त्या रात्री तसेच काहीतरी घडले. 

सौंदर्या दिवसेंदिवस फार जिद्दी होत चाललेली होती. लावण्या मात्र समजुतदारीने वागायला लागलेली होती. 

सौंदर्याला तिच्या मनाप्रमाणे काही घडले नाही, तर ती सारे घर डोक्यावर घेत असे. त्यादिवशी घरी जेवण्याच्या टेबलवर सौंदर्या नसल्याचे बघून बाबांनी लावण्याला इशारा करीत विचारले. लावण्या त्यावर हातने 'काळजी नका करु' असा इशारा करून रूमकडे सौंदर्याला बोलवयला गेली. सौंदर्या रुसून, कसलंतरी पुस्तक हातात घेऊन, वाचण्याचे सोंग करीत होती. लावण्या तिच्या परीने सौंदर्याशी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करीत असे, मात्र लावण्या तिच्याकडे न बघता उत्तर देऊन निघून जात असे. त्यांच्यातील संवाद हे हवेत व्हायचे. 

"मला ठाऊक आहे तुला मी मोहितच्या पार्टीत आलेले आवडणार नाही ते, मी नाही येणार. " लावण्या सौंदर्याला उद्देशून म्हणाली. 

"माझ्यावर हे उपकार का! आणि मला कशाला असे वाटेल" सौंदर्या पुस्तकात बघून उत्तरली. 

"अग तसं काही नाही, मला तसंही पार्टी बोरिंग वाटतात, आणि त्यामुळे मलाच नाही जायचे. आता चल जेवायला बाबा वाट बघता हेत तुझी. " लावण्या म्हणाली. 

"मी जाणारच होते जेवायला, तुझ्या या निर्णयामुळे मला काही फरक नाही पडलेला. तुला पार्टीला यायचे असेल तर ये" असे म्हणून सौंदर्या जागेवरून उठून लावण्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली. असे जरी सौंदऱ्या बोलून गेली, तरी तिला काय हवे होते, हे लावण्याला चांगलेच ठाऊक होते. आणि लावण्याला आता या सगळ्याची सवय होत चाललेली होती. 

************


लावण्या दुसऱ्या दिवशी पुन्हा रेसेसमध्ये लॅब्ररीकडे निघालेली रिद्धीला दिसली, तिला न टोकता रिद्धीने तिला तिकडे जाऊ दिले. काल परागची भेट न झाल्यामुळे लावण्या अस्वस्थ होती. जसजशी लॅब्ररी जवळ यायला लागली पावला गणिक तिच्या मनात अनेक विचार,प्रश्न यायला लागले, 'खरंच हे काय झाले मला, मी का परागकडे अशी खेचल्या जात आहे? एका भेटीत कोणी इतकं जवळचं कसं वाटू शकतं? का हे एक आकर्षण आहे?

 पराग हा, नम्र, देखणा, सर्वांची कदर करणारा. कोणतीही तरुणी त्याच्या प्रेमात पडेल असा आहे. 

मग काय मी त्याच्या प्रेमात पडले, तेही एका भेटीत!... नाही हे शक्य नाही. हे आकर्षण आहे फक्त. 

त्यालाही माझ्याबद्दल हीच जाणीव होत असेल काय? माझी आठवण येत असेल काय? पण माझ्यात असे काय आहे, मी अशी कुरूप! तो कशाला माझी आठवण काढेल, तो कशाला आकर्षित होणार, मी जास्तच जबरदस्तीची मैत्री करण्याचा प्रयत्न करते…' या विचारा सोबत तिची पावले अचानक थांबली. तोपर्यंत ती लायब्ररीच्या दारात उभी होती. तिने मनात परत जाण्याचा विचार केला, तेवढ्यात मागून तिला हाक ऐकायला आली. 

ती हाक परागची होती, लाब्ररी समोरच्या बागेतल्या त्याच मनोऱ्याखाली तो उभा होता, जिथे लावण्या त्याला भेटली होती. लावन्याने परागला हाय केले आणि त्याच्याकडे निघाली. नुकत्याच मनातील चाललेल्या नकारात्मक विचारामुळे तिची उत्सुकता कमी झालेली होती. पण ती त्याला न भेटता ती आता जाऊ शकणार नव्हती. तिचा पडलेला चेहरा बघून पराग म्हणाला, "काय ग काही स्ट्रेस आहे काय?, तू एवढी नाराज दिसते." 

"नाही तसं काही नाही, असच"

"मला वाटलं काल भेट झाली नाही म्हणून नाराज आहेस", पराग म्हणाला.

लावण्याने आश्चर्याने परागकडे बघितले. 

पराग पुढे म्हणाला, "नाही म्हणजे, मला तुला आज भेटायचे होते, कारण काल मी कॉलेजला आलो नाही. आणि काय कुणास ठाऊक, आज आल्यावर अचानक तुझी आठवण आली. मला वाटलं कदाचित तू येशील इकडे. आणि हे बघ तू आलीस."

हे ऐकून लावण्या पुन्हा हूरुपली आणि मनात लाजली. गोष्ट बदलत लावण्या परागला म्हणाली " तू कँटिंगला नसतो का जात?"

"का तू मला शोधायला तर नव्हती गेलीस?" परागने विचारले.

लावण्या बिचकून गेली आणि विचार करायला लागली 'परागने कसा असा अंदाज केला असेल. कदाचित त्याला माझे, त्याच्या बद्दलचे आकर्षण लक्ष्यात तर् नाही आले' आणि ती त्यावर काही बोलली नाही.

हे बघून पराग म्हणाला "अंग मस्करी करतोय, इतकी सिरीयस लुक काय देतेस!" आणि तो हसायला लागला. त्याबरोबर लावण्याही हसली. नंतर बराच वेळ दोघे गप्पा करीत बसले. परागचा क्लास नव्हाता पण लावण्याने मात्र क्लास बंक केला. दोघांच्या गप्पा पुन्हा रंगल्या, लावण्या पुन्हा त्यात वाहून गेली.

भेट संपल्यावर लावण्या परत पुढच्या क्लास करिता वर्गात आली, लावण्याच्या चेहऱ्यावर ती लाली परत आली होती, रिद्धी तिच्याकडे बघीत होती. लावण्या रिद्धीजवळ बसली तेव्हा, रिद्धी हळूच तिच्या कानात फुसफुसली, "काय मिळाले वाटते तुझे पुस्तक आज तुला लायब्ररीमध्ये!"

लावण्याने लाजून रिद्धीला हाताने ढकलले. 

"मग मोबाईल नंबर?" रिद्धीने हळूच विचारले.

लावण्याने लाजून मान हलवत होकार दिला. रिद्धीने उत्सुकतेने विचारले, "हे सांग ना काय बोलला तो अजून."

"नंतर क्लास झाल्यावर सांगते"

लावण्याला राहुल नंतर सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे रिद्धी. त्यामुळे लावण्याला तिच्या मनातील भावना रिधीजवळ व्यक्त कराव्याश्या वाटत होत्या. 

क्लास संपल्यावर लावण्या रिद्धीला म्हणाली "मला तुझ्या सोबत निवांत बोलायचे आहे. काही शेयर करायचे आहे. आणि कँटिंगमध्ये ते श्यक्य नाही, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात."


कॉलेजच्या पार्किंग जवळच्या गार्डन मध्ये दोघी गेल्या. लावण्याने पराग बद्दल तिचे असेलेले आकर्षण, तिच्या भावना सांगितल्या, त्याबरोबर तिने रिद्धीला तिचे मतही विचारले. 

"तुला काय वाटतं, त्यालाही माझ्याबद्दल ह्याच फीलिंगस असतील का? "

त्यावर रिद्धी उत्तरली "तुझ्या बरोबर झालेल्या परागच्या सवांदावरून मला हे कळले, तुला त्याच्या बद्दल असलेले आकर्षण, त्याला लक्षात आलेले आहे; आणि त्यामुळेच तो एवढ्या आत्मविश्वासाने तिथे तुझी वाट बघीत होता. त्याच्या बोलण्यावरूनतरी तो तुला सारखा संकेत देत होता, की तुही त्याला आवडतेस, पण… " रिद्धी पुढे काही बोलणार त्याआधीच लावण्या म्हणाली "मला विश्वास होता कोणीतरी माझ्या रूपा पेक्षा माझ्या गुणांची कदर करेल, खरचं तो मानाने फार चांगला आहे." हे सर्व बोलताना लावण्या पूर्णपणे हरवून गेलेली रिद्धीला दिसली. रिद्धीला आणखीनही काहीतरी बोलायचे होते, पण लावण्याच्या त्या क्षणाच्या आनंदात तिला विघ्न घालायची इच्छा झाली नाही. लावण्याला इतके आनंदी तिने कधी बघितले नव्हते.

****

 लावण्या आणि परागचे मोबाईलवर मेसेजचंची घेवाण देवाण सुरु झाली. कॉलेज मधून निघाल्यापासून, घरी बस मध्ये जाताना संपूर्ण रस्त्यात चॅटिंग सुरु झाली. घरी पोहचल्यावर, घरून निघताना, डिनर झाल्यावर, झोपताना मेसेजेस सुरु झाले. 

लावण्याला सारखी मोबाइलवर बघून घरच्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागले, परंतु तिला आनंदी बघून कोणी तिला टोकले नाही. सौंदर्या आणि लावण्या घरी एकच रूम शेअर करीत असल्यामुळे, सारख्या येणाऱ्या मेसेजचे टोन्स तिला ऐकायला यायचे, पण तरीही लावण्याच्या बाबतीत तरी काही अफेअर असण्याची श्यक्यता नाही याची तिला खात्री होती. 

 पराग किंवा लावण्या मधून अजूनपर्यंत तरी स्पष्ट्पणे कोणी प्रपोज केलेले नव्हते, परंतु दोघांमधील सवांद , भावना हेच दर्शवित होते की दोघेही प्रेमात आहेत. लावण्यातर पूर्णपणे पराग च्या प्रेमात वाहून गेलेली होती. पराग जेव्हापासून तिच्या आयुष्यात आला, तेव्हापासून तिच्यात एक नवा आत्मविश्वास दिसत होता. ती आनंदी राहयाला लागली होती. घरच्यांना त्याचे कारण ठाऊक नव्हते, पण तिला आनंदी बघून त्यांनाही बरे वाटत होते. लावण्याला हे दोन -तीन दिवसातील कोवळे प्रेम, मैत्री वर्षानुवर्षे चालत आल्यासारखे भासायला लागले होते. 

आणि तिलाही वाटायला लागले होते कि ती परागला सुद्धा आवडायला लागली, पण खरंच का तो तिच्यावर प्रेम करायला लागला होता? या प्रश्नाचे उत्तर भविष्यात लवकरच मिळणार होते. 

*****

मोहितची पार्टी उद्यावर येऊन ठेपली होती. सर्वजण फार उत्साहित होते, त्यातल्या त्यात प्रथमच जी लोकं या पार्टीला येणार होते, ते अधिकच उत्सुक होते; आणि मोहितपण यावेळी जरा जास्तच उत्सुक दिसत होता.

श्रीमंत बापाचा एकुलता एक, लाडका मुलगा, त्याला न पैशाची कमी होती, ना त्याच्यासाठी काम करणाऱ्यांची; पण नौकरांवर विसंबून न राहता, तो स्वतः जातीने लक्ष घालून पार्टीची सर्व तयारी बघत होता.

त्याच्या उत्सुकतेचे कारण ही सौंदर्या होती. तिच्या बद्दलच्या भावना त्यानी अजूनपर्यंत तरी कोणाकडे व्यक्त केलेल्या नव्हत्या. मात्र तो दोन दिवसापूर्वी ग्रुपमधील सौंदर्याची मैत्रीण मीनलकडे एकांतात सौंदर्याबद्दल भरपूर चौकशी करीत होता. तिला काय आवडते, काय नाही याबद्दल त्याने तिला विचारपूस केली, तेव्हा मीनलला शंका आली; आणि तिने मोहितला मस्करीत विचारले सुद्धा, की तो सौंदर्याला पसंद करतोय की काय? त्यावर त्याने 'वेळ आल्यावर कळेल' असे उत्तर दिले; आणि ही गोष्ट कोणाला शेअर नको करू म्हणून आश्वासन घेतले.

पार्टीचा दिवस उजाडला.

ग्रुपमधील रिद्धी आणि लावण्याने पार्टीला न जायचे ठरवल्यामुळे ते फक्त  क्लासमध्ये उपस्थित होते, बाकी सर्व ग्रुप क्लास बंक करून, संध्याकाळच्या पार्टीसाठी आपापल्या तयारीला लागले. कोणी गिफ्ट घेण्याकरिता , कोणी कपडे खरीदी करण्याकरिता गेले, तर तरुणी बयूटी पार्लर कडे वळल्या. 


संध्याकाळी सर्व आपापल्या सोयीनुसार पार्टीच्या स्थळी, म्हणजे मोहित च्या बंगल्यावर हळू हळू पोहचायला लागले. सौंदर्याच्या ग्रुप मधील योगेश, पायल आणि इतर आधीच पोहचले होते. मात्र सौंदर्या आणि मीनल अजूनही यायच्या होत्या. 

मोहित डार्क रेड शर्ट, त्यावर ग्रे रंगाचा ब्लेजर, आणि ग्रे रंगाची पॅन्ट असा पेहराव करून गेटवर येणाऱ्या पाहुण्यांनाचे स्वागतार्थ उभा होता. तो त्या पॆहराव्यात फारच देखणा दिसत होता. इतर वेळी पार्टी करिता तो तसा कॅज्युअल ड्रेस घालायचा; आणि आपल्या मित्रांबरोबर पार्टी मध्ये व्यस्त राहायचा. परंतु यावर्षी तो प्रथम अश्याप्रकारे येणाऱ्यांचे स्वतः स्वागत करीत होता. त्याचे खास कारण लवकरच सर्वांना कळणार होते. 

मोहितचे वडील त्यांच्या बिझनेसमुळे व्यस्त असायचे, ते मोहितला फार कमी वेळ देऊ शकत होते. पण वर्षभर ते जगाच्या पाठीवर कुठेही असो, मोहित च्या वाढदिवसाच्या वेळी मात्र त्याच्याबरोबर जातीने हजर असायचे. मोहित त्यांच्यासाठी जीव का प्राण होता. मोहितची आई गेल्यापासून तेच त्याच्या आई, बाबाचे कर्तव्य पार पाळत होते. स्वभावाने ते फार प्रेमळ, मैत्रीपूर्ण आणि फ्रँक होते. मोहितच्या मनाप्रमाणे त्यांनी त्याला स्वातंत्र दिले होते. 

दरवर्षी प्रमाणे त्याच्या वडीलांनी पार्टी मध्ये त्यांच्या वर्तुळातील नामवंत बिजनेसमेन , राज नेते यांना आमंत्रित केले होते. एकीकडे मोहित च्या वडिलांचे मित्र तर् दुसरीकडे मोहितचे कॉलेज फ्रेंडस, एकाच ठिकाणी पार्टी करणार होते. असे असून सुद्धा बंगल्याच्या परिसरात दोन वेग वेगळी अरेंजमेंट्स केलेली होती, आणि दोन्ही पार्टीचा एकांतपणा भंग होणार नाही, अशी ती व्यवस्था केलेली होती. बंगल्याच्या समोरील भागात वरिष्ठ मंडळींच्या पार्टीची व्यवस्था केलेली होती, तर बंगल्याचा पाठीमागे स्वामिंग पूल जवळ मोहितच्या मित्रमत्रिणीसाठी पार्टीची व्यवस्था केलीली होती. साधारणतः एखाद्या एकर भर बंगल्याचा परिसर होता आणि मधोमध आलिशान बांगला लाइटिंगनी झगमगत होता. मोहितच्या बंगल्यावर जे प्रथमतःच आले होते, ते मोहितचा बांगला, तेथील सजावट आणि त्याचे वैभव बघून अचंबित व्हायचे. 

बरीच वरिष्ठ मंडळी, वडिलांनी बोलावलेले व्हीआयपी पाहुणे, आणि मोहितचे जवळपास सर्वच मित्र पार्टीला पोहोचलेली होती. वेळ झालेला होता आणि मोहितचे वडील केक कापण्याकरिता मोहीतला शोधत होते. नंतर एका नोकराला सांगून बाहेर गेटवर असलेल्या मोहीतला बोलवायला धाडले. 

 मोहित एका खास व्यक्ती साठी मुख्य गेटवर वाट बघीत होता. नोकर येऊन मोहीतला म्हणाला "छोटे मालक, साहेब तुम्हाला बोलावत आहेत ,केक कापण्याकरिता. जवळपास सर्वच लोक हजर आहेत असे ते म्हणाले."

"नाही सर्व नाहीत. अजून एक खास व्यक्ती यायची बाकी आहे, तू जा सांग बाबांना, ती आली म्हणजे मी आत यतो.", मोहित त्या नोकराला म्हणाला. 

"अबे ,कोण रे ये खास साला!, जो मुझे पता नही" मोहित जवळ उभा असलेला पक्या म्हणाला. 

"तुला कळेल थोड्या वेळात."

तेवढ्यात समोरून एक ऑटो येऊन गेटजवळ थांबला. त्यातून सौंदर्या आणि मीनल उतरलेत, 

 गोऱ्या अंगावर लाल रंगाचा झगमगता शॉर्ट, लाल लिपस्टिक, हाय हिल सॅंडल, मोकळे सोडलेले खांद्यापर्यंतचे लांब केस खाली शेंड्यावर थोडे कुरळे केलेले, अश्या पेहरव्यात सौंदर्याला बघून मोहितच्या हृदयाचे ठोके चुकल्यासारखे झाले, ती एखाद्या स्वप्नातल्या सुंदर राजकुमारी प्रमाणे दिसत होती. मोहित एकटक तिच्याकडे बघीत होता. 

ती जशी जवळ आली, पक्याने मोहीतला हलवून "अबे क्या हुआ!" 

मोहित भानावर येत सौंदर्याला "ओह सॉरी, युअर वेलकम!"

सौंदर्या थोडी लाजून हसली, हात पुढे करीत हस्तांदोलन करीत "हॅपी बर्थडे ,बर्थडे बॉय!"

मोहित "थँक्स!" आणि पुन्हा तो एकटक तिच्याकडे बघीत राहिला. 

सौंदर्याने त्याला टोकत "चालायचे आत? का इथेच असे हात पकडून उभे राहणार!"

मोहित हात सोडून भानावर आला "अहं हो सॉरी!" 

तेव्हड्यात पक्या म्हणाला, "अरे सौंदर्या तुम लोग जावो अंदर, हम किसी इम्पॉर्टन्ट गेस्ट का इंतजार कर रहे है."

पक्याला थांबवत मोहित म्हणाला, "नाही सौंदर्या ,तसं काही नाही, चल मी पण येतोय आत!"

पक्या हळू आवाजात मोहीतच्या कानात पुटपुटला "साले, अब समझा तू किस विआईपी का इंतजार कर राहा था!"

बाहेरील गेटची सजावट बघण्यासारखी होती. लाल किल्याच्या गेट सारखी त्याची रचना केलेली होती. 

ते बघून सौंदर्या उद्गारली "वाव नाईस!" बंगल्याच्या परिसरात गेट मधून शिरताच, रेड कार्पेट सुरु झाले. परिसरातील सजावट बघण्यासारखी होती. 

 मोहित, सौंदर्या, मीनल आणि शेजारी पक्या काही अंतर चालत चालत बंगल्या समोरील मध्यभागी असलेल्या एका स्टेज जवळ पोहचले. स्टेज एकाद्या भल्या मोठ्या चौकोनी मार्बलसारखा भासत होता आणि त्याला नक्षिदार कठडे लावलेले होते. 

 मोहितचे वडील आधीच स्टेजवर इतर गेस्ट बरोबर उपस्थित होते, मोहितला बघून "हियर इज माय डिअर बर्थडे बॉय, कम ऑन दि स्टेज."

मोहितने सौंदर्या, मीनल आणि पक्यालाही सोबत स्टेजवर बरोबर घेतले. 

स्टेजच्या मधोमध भव्य केक ठेवलेला होता. हा भला मोठा केक संपूर्ण पांढरा, ताज महालची प्रतिकृती होता; आणि सौंदर्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक. ताजमहाल एका केक च्या रूपात बघून तिला राहवले गेले नाही. 

तो बघून सौंदर्या उद्गरली "वाव! किती सुंदर" मोहितने जाणीवपूर्वक ह्या केक च्या प्रतिकृतीची निवड केलेली होती. 

तेवढ्यात स्टेज वरून मोहितच्या वडिलांनी घोषणा केली, "माझ्या मुलानी ह्या केक ची निवड केली, कारण हे प्र्माचे प्रतीक आहे; आणि हे फक्त प्रेमीयुगलांना प्रेरणा देतं असं नाही, तर प्रत्येक नात्यातील असलेल्या प्रेमालाही प्रवृत्त करतो. माझ्या मुलाला माझ्याबद्दल असलेल्याला प्रेमाला आणि मलाही मुलाबद्दल असलेल्या प्रेमाला ते व्यक्त करण्याचे माध्यम बनू शकते." सर्वानी टाळ्या वाजविल्यात. 

मोहित शेजारी उभ्या असलेल्या पक्या हळूच मोहितला चिमटा काढीत म्हणाला, "बाप को अच्छा चुना लागाया बे, उन्हे लगता हे बेटे ने बाप के लिये ताज महल बनाया, जब कि वो तो उसने अपने माशूका के लिये बनाया. हि ही ही ... " तोंडावर हात ठेवून तो हळू आवाजात हसायला लागला. मोहितने पक्याचा हात दाबून त्याला चूप करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला हसू आवरत नव्हते. तेवढ्यात मोहीतला त्याच्या वडिलाने केक कटिंगसाठी जवळ बोलावले. मोहितने केक कट करून वडिलांना घास भरविला; पक्याने मुदाम सौंदर्याला मोहित शेजारी उभे केले होते. मोहितने लगेच त्याचा फायदा घेत सौंदर्याला घास भरवला. तो स्वीकारून सौंदर्यानेपण मोहीतला केक भरविला. तिच्या दृष्ट्या तिने हे मैत्रीच्या भावाने केले असले तरी, मोहितने त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या प्रेमाच्या पोटी त्याने हे केले होते. 

केक कटिंगनंतर मोहितने सौंदर्याची आणि इतर मित्रांची ओळख त्याच्या वडिलांशी करून दिली. त्यांनी सर्वांचे प्रेमाणे अभिवादन केले. वरिष्ठांबरोबर भेटीगाठी झाल्यानंतर, सर्व तरुणमंडळी पार्टीच्या दुसऱ्या भागात म्हणजे पूल जवळ पार्टीकरिता पोहचले. इथे फक्त तरुण वर्गाला प्रवेश होता, म्हणजेच मोहितचे मित्र मैत्रिणी. इथे शिरताच सर्वांचा हल्लागुल्ला सुरु झाला. डीजे सुरु होता, ड्रिंक्स, फूड, वेटरद्वारा दिल्या जात होते. तरुणांचा उत्साह जोमात होता. डान्स सुरु होता, सोबत अधून मधून फूड ,ड्रिंक्स सुरु होते. सौंदर्या, मीनल थोडा वेळ मोहीतबरोबर एका टेबलेवर खात होते. सौंदर्या मोहितला म्हणाली, "यार अमेझिंग फूड आणि मेनू मधील बरेच पदार्थ माझ्या आवडीचे आहेत." मोहितने मीनलकडे बघीतले मग लगेच "हा तुला आवडले ना मग झाले. "

मोहितने मुद्दाम सौंदर्याच्या पसंदिचे पदार्थ मेनू मध्ये ठेवले होते. आणि मीनलने त्याची ह्यात मदत केलेली होती. सजावटी पासून ते खाण्यापर्यंत सर्वकाही सौंदर्याच्या पसंदीचे होते. सौंदर्या फार इंप्रेस आणि आनंदी होती. पण त्यामागील उद्देशाबद्दल ती अनभिज्ञ होती. 

हळूहळू पार्टीला रंग चढत गेला डान्स, मस्ती भरपूर झाली होती; तेवढ्यात डीजेने ते एक रोमँटिक सोंग वाजवले. मोहित सौंदर्याजवळ जाऊन हात पुढे करून डान्स करिता तिला आमंत्रित केले, तिनेही त्याचा स्वीकार करीत त्यावर डान्स केला. तिथे दोघांची केमिस्ट्री सर्वांना दिसली. गाणे संपताच मोहितने डीजेला पुढचे गाणे वाजवण्यापासून थांबवले. 

सगळे शांत झाले, सर्वांचे लक्ष मोहित कडे आणि सौंदर्याकडे वळले, मोहितने सौंदर्याचा हात हातात धरला, आणि गुढघ्यांवर खाली वाकून त्याने तिला प्रोपोस केले. 

सौंदर्या चावरी बावरी झाली, तिला त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हते. मोहित असं काही करेल आणि इतक्या लोकांसोमर करेल असे तिला अपेक्षित नव्हते. 

मोहितला ती आवडते हे तिला ठाऊक होतं ,पण तिच्या तर्फे अजूनपर्यंत तरी तिने काही असे संकेत दिलेले नव्हते. तिच्यासाठी हे धक्कादायक होते. तीने इकडे तिकडे बघितले सर्वांची नजर आता त्यांच्यावर होती. 

तिने मोहितच्या हातातून हात सोडवत हळू आवाजात चिडून म्हणाली "व्हॉट नॉन्सेन्स! मला इथे सर्वांसमोर सीन क्रिएट करायचा नाही. पण तू हे करून मला दुखावले आहे." एवढे बोलून ती रागात पार्टीमधून निघून गेली. मोहित तसाच गुढघ्यांवर स्तब्धपणे बसला होता. थोड्यावेळानी भाणावर येत तो पार्टीतून निघून गेला. 

त्या घटनेनंतर कोणालाही पार्टीत रस उरला नव्हता, त्यामुळे सर्व तिथून काही वेळात निघून गेले. 

मोहित आपल्या हृदयावर घाव घेऊन बसला होता. एक प्रेमकथा उमलण्याआधीच कोमेजली होती.


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama