Abhijeet Tekade

Drama Others

4  

Abhijeet Tekade

Drama Others

कुरूप (भाग ६) - एकटेपणा

कुरूप (भाग ६) - एकटेपणा

4 mins
174


मनुष्य कितीही एकांत प्रिय असला, तरी तो एक सामाजिक प्राणी आहे. त्याला त्याच्या भावना व्यक्त करायला, त्याच्यावर प्रेम करणारं, माया करणारं, त्याला प्रोत्सहन देणारं, त्याची स्तुती करणारं कोणीतरी लागत असतं. त्याला ऐकणारं, एकवणारं, कोणी मिळाले नाही, तर त्याला हा एकटेपणा खायला लागतो. कधी कधी सभोताली गर्दी असुनसुद्धा, हा एकटेपणा त्याला जाणवू शकतो. लावण्याच्या बाबतीतही काही तरी असच होणार होतं.


  कॉलेजच्या लॅब्स, लॅब्ररी, व इतर इमारतीला भेट देऊन झाल्यानंतर, सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये गेले. प्रथम लेक्चर होणार होते. क्लासमध्ये सर्वानी आप-आपल्या सोयीनुसार बसण्याची जागा निवडली. लावण्या, मागून काही बाक सोडून बसली. एका बाकावर दोन-तीन याप्रमाणे इतर सर्व विद्यार्थि बसले होते; मात्र लावण्याच्या शेजारी कोणीच बसले नाही. क्लासमध्ये तसे सर्वच विध्यार्थी एकमेकांना अपरिचित होते; पण त्यातल्यात्यात लावण्या आणि सौंदर्या ह्या दोघी बहिणीच एकमेकांना परिचयाच्या होत्या; त्यामुळे सौंदर्या लावण्याबरोबर बसेल, ही लावण्याला अपेक्षा. मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करीत सौंदर्या सर्वात समोरच्या बाकावर बसली. 

जागेवरून सर्व विध्यार्थी त्यांच्या मागे, पुढे, बाकावर बसलेल्यांना परिचय द्यायला लागले. सौंदर्या ही दिसायला आकर्षक आणि मुळात बोलकी असल्यामुळे, बरेच मैत्रीचे हात समोर आले. ‘हाय, मी मीनल’, ‘हाय, मी राहुल’, ‘हाय, मी पायल’, ‘मी योगेश’, ‘मी रागिणी’

“हाय! मी सौंदर्या, नाईस टू मीट यू ऑल!”, सौंदर्याने उत्सहाने स्वतःची ओळख करून दिली.

 जसजशी अनोळखी चेहऱ्यांना नावं मिळत गेली, तसतश्या त्यांच्यात गप्पा रंगत गेल्या, संपूर्ण क्लासमध्ये कलकलाट पसरला. मात्र एका कोपऱ्यात बसलेली लावण्या ही सर्वांना अपरिचित राहून गेली. कोणी ना तिला तिचे नाव विचारले, ना तिने स्वतःहून कोणाला परिचय दिला. 

सर्वांशी मनमोकळेपने गप्पा माराव्या, भरपूर मित्र-मैत्रिणी करावे असे तिलाही वाटत होते; पण तिला, त्याची सुरुवात स्वतःहून करता आली नाही. आपल्यात कमतरता असल्यामुळेच कोणीही आपल्याशी मैत्री करीत नाही, अशी तिची समजुत पक्की झाली होती. तिच्यातला न्युनगंडाने तिच्यातल्या आत्मविश्वावासाचा बळी घेतला होता. तिने कॉलेज जीवनासाठी कितीतरी स्वप्ने रंगवली होती; पण आज पहिल्याच दिवशी तिच्या पदरात निराशा पडली होती . शाळेत प्रथम क्रमांकात येऊन, चांगल्या कॉलेजात तिने प्रवेश मिळवला खरा, पण ती समाधानी नव्हती. तिने मेहनत करून, अभ्यास करून जे यश मिळवले, ते स्वतःसाठी नाही तर जगाला स्वतःचे अस्थित्व, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. तिला दुर्लक्षित राहायचे नव्हते. तिला वाटायचे कदाचित यशा सोबत ती सर्वांची मने जिंकू शकेल. आणि तिलाही तिच्या कर्तृत्वामुळे योग्य तो मान दिल्या जाईल. तो मान काही काळा करिता मिळतही होता. पण पुन्हा स्थिती पूर्ववत होत होती. समाजानी कुठलाही भेदभाव न करीता, तिचा इतर सामान्य लोकांप्रमाणे स्वीकार करावा, हीच तिची अपेक्षा. समाजात असलेली सुज्ञ, तिला तो बरोबरीचा दर्जा देत, पण सामान्य लोकांना मात्र प्रथम दृष्ट्या तिची कुरुपताच दिसे. मनुष्याचा स्मरणात नकारत्मता ही जास्त काळ राहते. तसेच लावण्याच्या बाबतीतही होते. तिच्याही स्मरणात समाजातील ही नाकारात्मताच जास्त होती.

ती प्रत्येक व्यक्तीगणिक अपेक्षा करायला लागली होती; आणि ती पूर्ण होत नसल्याचे दिसल्यास, निराशा तिच्या मनाला घेरून टाकी. या निराशेत एक मात्र आज गोष्ट तिला सुखावणारी होती, ती म्हणजे पराग बरोबरची तिची भेट. लावण्या विचार करायला लागली, कदाचित पराग तिच्या क्लास मध्ये असता, तर तो तिचा चांगला मित्र झाला असता.

 इकडे सौंदर्या जवळपास संपूर्ण क्लासच्या परिचयाची झाली होती. अजूनपर्यंत सौंदर्ऱ्या- लावण्या ह्या जुळ्या बहिणी आहेत, हे क्लासमध्ये कोणालाही कळले नव्हते. 

 सलग दोन लेक्चर नंतर ब्रेक झाला. सर्व विध्यार्थी कॅन्टीनकडे जायला निघाले. 

इमारतीच्या वऱ्हांढ्यात आधीच घात लावून बसलेला सिनिअर्सचा ग्रुप, जाण्याऱ्या-येणाऱ्या नवीन जुनिअर्सला न्ह्यायळतं होते, त्यांना थांबवून त्यांचा इंट्रो घेत होते.

 सिनिअर्सच्या ग्रुप मधून एक जण, मुला-मुलींच्या ग्रुपने घेरून येत असलेल्या सौंदर्याकडे बघीत, “अप्सरा आली...”, हळूच गायला लागला. 

“हो यार खरंच, अप्सरा! इंट्रो तो बनता है.”, दुसरा एक म्हणाला 

सौंदर्याचा ग्रुप जवळ येताच, एका जनाने मध्ये जाऊन त्यांचा रस्ता अडवला; आणि लगेच सर्व सिनिअर्सनी त्यांच्या ग्रुपला घेरले. दुसरा एकजण सौंदर्यकडे बघीत, प्रथम वर्ष्याच्या मुलांना उद्देशून म्हणाला, “अरे! नो ग्रीटिंग, नो इंट्रो, असं कस!..., चला एक एक इंट्रो द्या.”

आणि सौंदर्याकडे इशारा करीत म्हणाला, “ मॅडम आधी तुम्ही इंट्रो देणार.”

 सौंदर्या तशी फार धीट होती. ती लेगच रागाने, “रॅगींग घेणे कायद्याने गुन्हा आहे. हे माहित नाही वाटतं तुम्हाला.” सिनियर्स मधून पक्या म्हणाला, “मॅडम, यहा पर हमारा कानून चलता है…”

“मग मला प्रिंसिपलकडे कंप्लेंट करावीच लागेल.” सौंदर्या म्हणाली.

“वो मॅडम धमकी कोणाला देता, तुम्हाला माहित नाही आम्ही कोण ते..”, पक्या म्हणाला.

“ये पक्या, तुला मुलींशी कसं बोलावे कळत नाही का?”, अचानक एक आवाज सौंदर्यच्या ग्रुपच्या मागून आला.

तिने वळून बघितले तर एक उंचपुरा देखणा, रुबाबदार तरुण त्यांच्याकडे येताना दिसला. 

“मोहित तू बीचमे मत पड, अब हम सिनियर्स के इज्जत का सवाल है”, पक्या म्हणाला.

“ये गप्प बे…” 

“मॅडम तुम्ही निघा”, मोहित म्हणाला आणि सगळ्या सिनिअर्सला बाजूला सावरत, सौंदर्याच्या ग्रुपला जाण्यासाठी त्याने रस्ता करून दिला. त्यावर मग कोणीही काही बोलले नाही, सर्व शांत झाले. सौंदर्या तिच्या ग्रुप सोबत जायला निघाली, काही पावले पुढे जाऊन, ती मागे वळली, आणि स्मित हास्य करीत मोहित कडे बघीत म्हणाली. “आय एम सौंदर्या, कॉप्युटर ब्रांच. अँड नाईस टू मीट यू!” वळून सौंदर्या तिच्या ग्रुप बरोबर निघून गेली.

ते गेल्यावर, सर्व सिनिअर्स मोहित वर तुटून पडले. 

“काय यार मोहित, तू आमचीच इज्जत काढली, तुझी इज्जत राहावी म्हणून आम्ही काही उलटून बोललो नाही.” पक्या ओरडला. 

“अरे पक्या, जब सिधी उंगली से घी नही निकले, तो उंगली तेढी करणी पडती है. आणि तुला तिचे नाव माहित करून घायचे होते ना, मग सांगितले कि तिने.” 

“चल झुठा!... , चालू साले, तुझे हिरो बनना था…” पक्या म्हणाला.

“हा हा…” “मोहित हसाला आणि म्हणाला, “चल सॉरी यार, चला कॅन्टीन ला, आज माझ्यातर्फे नाष्टा सर्वाना.” 

इकडे कँटीगला लावण्या एकटी एका टेबलावर होती. इतर सर्वांना आपापल्या ग्रुप बरोबर मस्तीत बघून तिला आणखीनच एकटेपणा जाणवत होता. तिला रोहनची आठवण झाली. शाळेत नेहमी रोहन तिच्या बरोबर कँटिंग मध्ये असायचा. आज हा एकटेपणा तिला अपेक्षित नव्हता. 

क्रमशः 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama