Abhijeet Tekade

Drama Others

4  

Abhijeet Tekade

Drama Others

कु-रूप (भाग १०) - बदल

कु-रूप (भाग १०) - बदल

13 mins
328


सातत्याने बदल हा प्रकृतीचा नियम आहे. आज जे जसे आहे, ते उद्या तसे राहणार नाही. जे आता मित्र आहेत, ते कदचित उद्या मित्र राहणार नाही, किंवा आणखी घट्ट मित्र होणार. ज्यांच्याबद्दल प्रेम आहे, कदाचित त्याच्याबद्दल घृणा निर्माण होणार; आणि याविरुद्ध ज्याच्याबद्दल घृणा वाटते, कदाचित त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. राग, प्रेम, मोह, मत्सर, भय ,वासना, दुःख ,आनंद हे सर्व विविध भाव मनुष्य वेळोवेळी प्रकट करीत असतो. भावनिक पातळीवर झालेल्या या बदलांचा परिणाम त्याच्या नात्यांवर, सामाजिक अस्तित्वावर होत असतो.

मोहितच्या पार्टीमध्ये घडलेलया घटनेमुळे सौंदर्या बरीच अस्वथ होती. खरं तर मोहितबद्दल तिच्या मनात मैत्रीपलीकडे कुठल्याही अश्या भावना नव्हत्या.

तिने तिच्या कडून त्याला कुठलेही असे संकेत दिलेले नव्हते; तरीही त्याने सर्वांसमोर तिला प्रोपोस करून तिला दुखावले होते. खरं तर मोहितला नापसंद करण्यासारखे कोणतेच कारण नव्हते. दिसायला सुंदर, श्रीमंत, मनमिळावू ; आणि कुठेतरी त्याला तो अति आत्मविश्वास होता, कि त्याला सौंदर्या पसंद करेल.

सौंदर्याला तिच्या सुंदरतेमुळे असले बरेच प्रपोजल यायचे, तिला त्यात काही नवीन नव्हते; परंतु मोहितवर तिचा मित्र म्हणून विश्वास होता, की तो मनात काही असेलतर प्रथम तिला एकांतात सांगेल, असं चारचौघात तिची बादनामी करणार नाही.


सोमवार पार्टीनंतर कॉलेजचा पहिला दिवस, क्लास संपला, रेसेस झाला, तरी सौंदर्या कलासमध्येच थांबली होती. इतर सर्व कॅन्टीगला गेले, लावण्या आणि रिद्धी सोडून सर्वंना तिचे कलासमध्ये असण्याचे कारण ठाऊक असल्यामुळे, तिला कोणी कारण विचारले नाही. मीनल फक्त त्यावेळेला तिच्याबरोबर कलासमध्ये थांबली.


"अंग किती काळ असं तू लपवणार स्वतःला? जे झालं त्यात तुझा काय दोष! चल कँटिंगला." मीनल सौंदर्याची समजूत काढीत म्हणाली.

सौंदर्या त्यावर म्हणाली, "हो गं कळतं मला, आणि मला असले प्रोपोसलं खूप येतात; पण ती लोकं माझ्या ओळखीचे सुद्धा नसतात, त्यामुळे मी त्यांना सहज दुर्लक्षित करू शकते; मात्र मोहिततर मित्र आहे, त्यानी जरासुद्धा विचार केला नाही, मला काय वाटेल त्याचे. मी त्याला आता सामना करू शकत नाही. "


"अगं आतापर्यंत मोहीतलासुद्धा जाणीव झाली असेल त्याची. कदाचित तो सुद्धा कँटीगला नसणार आज. चल तू माझ्याबरोबर", मीनल हट्ट करीत म्हणाली.

"नाही! तू जा, मी नाही येणार, काही काळ मला एकटीला राहू दे. "

मीनलला जास्त त्यावर आग्र्ह करणे योग्य वाटले नाही, त्यामुळे ती तिथून निघून गेली. सौंदर्या काही काळ एकटीच क्लास मध्ये बसून होती, परंतु तिची अस्वस्थता जात नव्हती.

बरेच वेळेला भरपूर मित्रमैत्रिणी , नातेवाईक , शेजारी असून सुद्धा त्यांच्याबरोबर हवे तसे मन मोकळे करिता येत नाही. दुःखातली बेचैनी, अस्वस्थता काही केल्या जात नाही. काही लोकांशी आपले मनापासूनचे एक विशिष्ट्य नाते असते, ज्याची जाणीव आपल्याला नसते. त्या लोकांबरोबर आपली रोज भेट जरी होत नसली तरी ज्यासमयी आपण दुःखात, वेदनेत , नैराश्येत, असतो, त्या समयी त्यांची आठवण येते. त्यासमयी त्यांच्याशी बोलून आपलया दुःखाचा आपल्याला काही काळ का होईना विसर पडतो. असाच सौंदर्यासाठीचा व्यक्ती म्हणजे रोहन जो सौंदर्या आणि लावण्याचा बालपणीपासून त्यांच्याबरोबर त्यांच्या शाळेत होता . आज तो त्यांच्याबरोबर कॉलेजला नव्हता, आणि इतक्यात त्याच्याबरोबर दोघींची भेट सुद्धा झालेली नव्हती. हे सर्व आपापल्या जीवनात व्यस्थ होते. पण आज अचानक सौंदर्याला रोहनची आठवण झाली. त्याच्याबरोबर तिला गप्पा मारव्याश्या वाटल्या. तिने लगेच त्याला कॉल करून कॉलेज बाहेरील टपरीवर बोलावून घेतले आणि त्याला भेटायला गेली.

"हे हाय! बऱ्याच दिवसानंतर, आणि लावण्या नाही आली आज. ती पण बरीच दिवस भेटली नाही मला. ना तिचा फोन आला, तुम्ही दोघी विसरलात वाटतं आपल्या जुन्या मित्राला ", रोहन सौंदर्याला म्हणाला.


"हे प्लीज ! नको विचारू तिच्याबद्दल, आणि मला तुला आज एकटीला भेटायचे होते. तुला मी जवळची नाही का वाटत! सारखा लावण्याबद्दल विचारतोस. " सौंदर्या थोडं नाराजीने म्हणाली.


सौंदर्याला भावुक बघून रोहन म्हणाला "अरे हे काय! मी तुला प्रथमच असं काही बोलताना ऐकतोय. इतकं इमोशनल व्हयला काय झालं. चील कर! आणि हा चहा घे. आणिखी सांग कशी आहेस तू ? आणि कस सुरु आहे कॉलेज"


दोघांनी बऱ्याच इतर गोष्टी केल्या, मात्र रोहनला सौंदर्या थोडी अस्वथ असल्याचे जाणवले . त्याने विचारल्यावर सौंदर्याने पार्टीमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला.

ते एकूण रोहन म्हणाला., "तुला काय वाटतं? तुला तो तुझ्या मनाविरुद्ध जबरदस्ती प्रेम करायला लावणार का ?"


"नाही, तो तसला नाही. तो मनाणे आणि संस्काराने फार चांगला आहे. तो इतरांना कधी दुखावणार नाही याची काळजी घेतो. कॉलेज च्या पहिल्या दिवशी रॅगिंग होण्यापासून त्यानी मला वाचवले. त्यांनी खूप मदत केली व तो सर्वांचा तसा आवडता मित्र. परंतु त्यामुळेच मी दुखावले गेले , की हा असं कसं वागू शकतो. त्यानी जरासुद्धा पर्वा केली नाही, मला काय वाटेल याची. त्याने जे केलं, तो त्याचा खरा स्वभाव, कि आतापर्यंत जो जे तो दाखवत आला तो त्याचा स्वभाव? "


रोहन सौंदर्याची समजूत काढीत म्हणाला, "मी मानतो त्याने चुकी केली, त्याने असं करायला नको होते; पण त्याने हे का केले, त्याची बाजू तू त्याच्या तोंडून एकूण घ्यायला हवी एकदा. बरेच वेळा भावनेच्या भरात मनुष्य चुका करून जातो. त्याला तू आणखी एक संधी द्यायला हवी. आणि त्यानी पुन्हा काही असा प्रयन्त केला कि तुला समजेलच तो कसा ते."

सौंदर्याला रोहन बरोबर गप्पा करून फार मोकळे वाटले.

"हे चल जाऊ मिसळ पाव खायला. एक मस्त फेमस हॉटेल आहे जवळच. हे असल्या छोट्या छोट्या भांगडीचे टेन्शन आमच्या गल्लीतल्या गुंडी कशी घायला लागली. " रोहन मस्करीत म्हणाला.

सौंदर्याने मस्करीत त्याला जोरदार घुसा मारला.

"आउच! हे बघ लगेच तू सिद्ध केले, तू गुंडी आहे ते" रोहन मस्करीत म्हणला.

"चल!" बाईकवर बसत मोहित म्हणला.

सौंदर्याला पण बदल हवा होता, त्यामुळे ती क्लास बंक करून त्याच्याबरोबर गेली.

*****

कँटिंगमध्ये पार्टीत झालेला प्रकारावर ग्रुप मध्ये मी पुनः चर्चा झाली, तेव्हा सौंदर्या आणि मोहित दोघेही उपस्थित नव्हते; त्यामुळे सर्वांनी त्यावर खुलून चर्चा केली. लावण्या सौंदर्याची बहीण आहे, हे कोणाला ठाऊक नसल्यामुळे तिच्या उपस्थितीत हि चर्चा सुरु होती. तिच्या बहिणेनीने घरी कोणालाही ह्याबद्दल सांगितलं नव्हतं . झालेला प्रकार एकल्यापासून तिला तिच्या बहिणीकरिता वाईट वाटले. रिद्धी सुद्धा मोहितने केलेल्या प्रकारामुळे ऐकून सुन्न झाली. मोहितने असं नव्हते करायचे, त्याने तिला विश्वासात घेऊन, एकांतात तिला त्याच्या मनाच्या भावना प्रकट करायला हव्या होत्या, असे सर्वांचे मत पडले.


इकडे मोहित दुःखी होता त्यामुळे तो कॉलेजला आलेला नव्हता. त्याला त्याच्या कृत्यावर पच्छाताप होत होता. सौंदर्याला कसे सामोरे जाणार या द्विधामनस्थितीत तो होता. मात्र त्याचा उद्देश तिला दुखववण्याचा नव्हता. तो मनापासून तिच्यावर प्रेम करीत होता. सौंदर्याची त्याच्याबरोबरच्या मैत्रीला तो प्रेम समजण्याची चुकी करून बसला होता. मोहितने ठरवले, दुसऱ्यादिवशी जाऊन तो तिला झालेल्याप्रकारबद्दल क्षमा मागेल.


त्यादिवशी घरी रात्री लावण्याने सौंदर्याला त्याबद्दल विचारले असता, 'तू त्यामध्ये पडू नको," रागात सौंदर्या बोलली. लावण्याने तिच्या बहिणीचे दुःख वाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता, पण तिलाच बोलणे ऐकावे लागले.


दुसऱ्या दिवशी मोहितने एकांतात हिम्मत करून सौंदर्याला झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली, व तिनेही त्याला क्षमा केले, आणि समजावून सांगितले, "मोहित मला तुला दुःखवायचे नाही, परंतु माझ्या मनात तुझ्याबद्दल फक्त मैत्रीच्या भावना आहेत; तू कोण्याही मुलीला आवडावा असा आहेस, तसा मलाही तू आवडतोस ,मात्र मला त्या तसल्या दुसऱ्या कोणत्या भानगडीत पडायचे नाही."


सौंदर्याचे हे दोन वाक्य विरोधाभास निर्माण करणारे होते. कदाचित सौंदर्याच्या मनातही काही काळ का होणीना त्याच्याबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या होत्या; परंतु ती त्याला नाकारत आहे, असे मोहीतला वाटले; आणि कुठेतरी भविष्यात हे सगळं जुडून येईल अशी त्याला आशा लागली. कालांतराने दोघांमध्ये पुन्हा चांगली मैत्री सुरु झाली. पुन्हा तो त्यांच्या ग्रुपचा भाग झाला.


इकडे लावण्या आणि पराग चे संबंध एका वेगळ्या वळणावर येऊन थांबले होते. दोघेही एकमेकांबरोबर भरपूर वेळ घालवीत, तासंतास गप्पा करीत , मात्र पराग स्पष्ट काही सांगित नव्हता, जे लावण्या ऐकण्याकरिता आतुरली होती. तिच्या मनात पराग बद्दलचे प्रेम स्पष्टच होते, पण ती त्याच्या बोलण्याची वाट बघीत होती.


ज्याप्रमाणे वाहणाऱ्या नदीच्या पाण्याला बांध घालून रोखावे, त्याप्रमाणे ती तिच्यामानातील परागबद्दलचे प्रेम रोखून होती. त्याने त्या बांधाचे दरवाजे खोलावे; आणि ती तो प्रेमाचा प्रवाह त्याच्यावर उधळायला आतुर झाली होती.


"मला कळत नाही तो स्पष्ट सांगत का नाही. आता मला नाही राहावल्या जात, मीच त्याला प्रपोस करू का? " लावण्या रिद्धीला स्वतःच्या भावना व्यक्त करीत म्हणाली.

"तुला माहित आहे ना मोहितबरोबर सौंदर्याबद्दल काय झाले ते? तुला त्याच्याबरोबर मैत्री तोडायची का? वाट बघ, आणखी भरपूर वेळ आहे. स्वतःच्या भावनांना आवर घाल", रिद्धी लावण्याला म्हणाली.


रिद्धीची ही सल्ला लावण्याला थोडी विचित्रच वाटली. कारण मोहित आणि सौंदर्या मध्ये स्पष्ट होते, की ते फक्त मित्र होते. ना सौंदर्या त्याच्याबरोबर तासंतास गप्पा करायची, ना कधी तिने तशे त्याला संकेत दिले; पण लावण्याच्या बाबतीत परागकडून तिला काही संकेत मिळाले, आणि म्हणूनच ती अशी त्याच्यात गुंतली.


तिने यावर रिद्धीला विचारले असता. रिद्धीने लावण्याला समजावले, "अग प्रत्येक व्यक्तीच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत असते. कधीकधी जरी वरवर प्रेम दिसत नसलं तरी ते असतं, आणि कधीकधी ती फक्त एक आपुलकी असते. धीर धर वेळ जाऊ दे"

*****

दिवस गेले , महिने गेले, मोहित सौंदर्याची मैत्री पूर्ववत झाली. लावण्याची परागची मैत्री आणखीन घट्ट झाली.

लावण्याची रिद्धीबरोबरचे मैत्रीचे बंधन मजबूत झाले , रिद्धी लावण्यासाठी फक्त एक मैत्रीणच नव्हे, तर ती तिच्यासाठी एक मार्गदर्शक होती. लावण्याने तिच्या कुरुपतेमुळे लहानपानपासून खूप अवहेलना सहन कराव्या लागल्या होत्या. तिच्या मनात समाजाप्रती एक नाकारात्मकता निर्माण झाली होती. तिच्या दृष्टीकोनामध्ये जो काही बदल घडला होता तो रिद्धीमुळे. लावण्यात सकारात्मकता आणण्याचे काम रिद्धीने केले होते. तिच्यामुळेच आज कॉलेजमध्ये लावण्याचे बरेच मित्र मैत्रिणी बनू शकले. ती लावण्याला तिच्या प्रत्येक पावलावर योग्य ते मार्गदर्शन करायची.

परागबाबत लावण्याला जे काही आकर्षण होते, ते लावण्याच्या मते त्याच्याबद्दल निर्माण झालेले प्रेम होते. लावण्या व्यक्त होण्याकरिता अधीर झाली होती. परंतु रिद्धीने लावण्याला परागसमोर हे व्यक्त करण्यापासून आतापर्यंत का थांबवले? हे तिला कळत नव्हते. त्यामुळे लावण्याने, रिद्धीला त्यावर स्पष्टीकरण विचारले असता. रिद्धी म्हणाली,

"तुझ्यातील झालेला बदल, तुझ्यातील हा नवीन आत्मविश्स्वास बघून खरंच मला फार आनंद वाटतो. जेव्हा आपली प्रथम भेट झाली होती, तेव्हा मला जाणवले की तुझ्यातला न्यूनगंड, नाकारत्मकता तुझ्यासाठी घातक होत चाललेला होता;आणि तू स्वतःला निराशेच्या खाईत ढकलत होती. तु लहानपणापासून स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेने बघत असतांना, ते तुझी अवहेलना तुझ्या कुरुपतेमुळेच करतात, हे तुझे मत तू पक्के करून होतीस; आणि त्याच चष्म्याने तू सर्वांना बघायला लागली होतीस. तुला पुन्हा-पुन्हा त्या अवहेलनांना सामोरे जायचे नव्हते, त्यामुळे तू सर्वांपासून एक विशिष्ट अंतर ठेऊ लागली, नवीन लोकांसोबत परिचय करायचे टाळायला लागली होतीस. पण आता ते बदलत चालले. तू स्वतःहून खुलून बोलायला लागली, व्यक्त व्हयला लागलीस. हे सर्व चांगले जरी असले तरी मला तुझ्याबद्दल काळजी वाटतेय"


रिद्धीचे हे बोलणे ऐकून लावण्याने आश्चर्याने विचारले,"काळजी! कसली काळजी? आणि तूच तर मला नवीन दृष्टिकोन दिला जगाला बघण्याचा, इतरांना समजण्याचा, त्यांच्या बरोबर आनंदी राहण्याचा. मग आता तूच मला व्यक्त होण्यापासून रोखते आहेस. का?"


रिद्धी पुढे म्हणाली, "तुझ्यातील हा बदल सकारात्मक जरीअसला, तरी तुला हे लक्षात घ्यायला हवे, की नवीन नात्यांबरोबर अपेक्षाही जन्म घेत असतात; आणि अपेक्षांची पूर्ती झाली नाही की, वेदना ही होतेच. लोकांपासून, समाजापासून अलिप्त असल्यास व्यक्तीस दुःख असते, मात्र लोकांबरोबर असतांना पुन्हा अलिप्त पडण्याची भीती सुद्धा असतेच. तू नवीन दृष्टीकोन घेऊन जग बघायला लागलीस, लोकांनीही तुझा स्वीकार केला. परंतु चांगुलपणा हा वागण्यात आणि असण्यात पण विसंगती असू शकते, हे लक्षात ठेव; आणि त्याची प्रचिती काळाबरोबर होत असते. परंतु आपल्यालाही त्याची पारख असायला हवी. अनुभवाबरोबर लोकांची योग्य ती पारख करता येते. "

रिद्धीचे हे बोलणे लावण्या लक्षपूर्वक ऐकत होती; आणि तिला काय म्हणायचे हे तिला थोडे थोडे समजायला लागले होते. हे ऐकताना लावण्याच्या चेहऱ्यावर एक भीती ,चिंता रिद्धीला दिसली.

त्यावर रिद्धी म्हणाली "मी तुला घाबरून देत नाही. मी तुला कदाचित येणाऱ्या वादळाला सामोरे जाण्याकरिता तयार राहायला सांगते आहे. यावर बरेच काही बोलण्यासारखं आहे; परंतु मी तुला एवढेच सांगू इच्छिते आनंदी रहा, स्वतःबरोबर आणि स्वतःसाठी, हेच तुझ्या हातात आहे. तूला व्यक्त होण्यापासून मी तुला थांबवत नाही, तर तुला अपेक्षांचे गाठोडे करण्यापासून तुला सचेत करते आहे. मोहितबरोबर जे झाले ते तुझ्याबरोबर होऊ नये हीच अपेक्षा करते."


लावण्या हे सर्व एकूण खिन्न झाली. तिचे आज कोणाबरोबर बोलण्याची इच्छा होत नव्हती. आकाशात उडणाऱ्या पतंगीचा धागा तुटल्यावर जशी ती हेलकावे खात जमिनीकडे जाते, तशी स्थिती लावण्याची झाली होती. तेवढ्यात परागचा फोन वाजला, लावण्याने रिद्धीकडे बघितले, आणि त्याचा फोन कापला.

"अग उचलला का नाही फोन त्याचा? मी तुला त्याच्यापासून मैत्री तोडण्याची सल्ला दिलेला नाही" रिद्धी लावण्याला म्हणाली.

"मला समजले तुला काय म्हणायचे ते. पण आज मला कोणाशी बोलण्याची इच्छा नाही."

"लावण्या तू पुन्हा स्वतःला एकटी करून घेऊ नकोस, मी फक्त तुला अपॆक्षा करू नको एवढेच बोलले. नाते संपवायला सांगितलेले नाही. " रिद्धी लावण्याला समजावत म्हणाली.

"पण कठीण आहे ग , नात्यात गुंतायचं आणि अपेक्षा करायची नाही. हे फक्त पुस्तकी वाटत मला," लावण्या रिद्धीला म्हणाली.

"पुस्तकी जरी असलं, तरी तोच जीवन आनंदी जगण्याचा खरा मंत्र आहे."

*****

लावण्याला त्या दिवशी परगने बरेच कॉल केले; परंतु लावण्याने ना त्याचा कॉल रिसिव्ह केला, ना त्याच्या मेसेजेसला उत्तर दिले. ती रिद्धीच्या बोलण्याने प्रभावित झाली होती; आणि तिच्या बोलण्यावर विचार करू लागली. 'परागच्याच्याही वागण्यात आणि असण्यात फरक असू शकतो का? मला जे त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसतं ते खरंच असेल? का तो माझा भ्रम आहे' राञभर तिला झोप आली नाही.


दुसऱ्यादिवशी सुद्धा जेव्हा ती परागला भेटायला गेली नाही, आणि त्याचा फोन उचलला नाही, तेव्हा पराग मात्र अस्वस्थ झाला. काही लेक्चर्सनंतर दुसऱ्या रेसेसमध्ये जेव्हा रिद्धी आणि लावण्या वर्गाच्या बाहेर कँटिंगकडे जायला निघाल्या, तेव्हा पराग वर्गाच्या बाहेर व्हरांड्यात लावण्याची वाट बघीत उभा होता. त्याला बघून लावण्या रिद्धीला आश्चर्य झाले.

त्याच्याकडे चालता चालता रिद्धीने हळूच लावण्याला विचारले "हा इकडे काय करतोय? तू त्याचे कॉल रिसिव्ह केले नाहीस का ? "


दोघी त्याच्या जवळ जाऊन थांबल्या. लावण्याने रिद्धीची ओळख करून दिली. लावण्याला आणि परागला एकांतात बोलता यावे, म्हणून रिद्धी मुद्दाम काहीतरी कारण काढून लावण्याला म्हणाली "मला थोडे काम आहे, मी पुढे जाते, तू ये झालं की कँटिंगला " लावण्याने मान हलवून रिद्धीला निरोप दिला.


पराग लावण्याबरोबर बोलण्यासाठी बैचैन झाला होता, "तू मला काल भेटली नाहीस, किती वाट बघितली तुझी; आणि तू माझे कॉल्स का रिसिव्ह करीत नाहीय? "

त्याच्या बोलण्यातली बैचेनता बघून लावण्याला परागचे तिच्या बद्दल असलेले आकर्षण तिला स्पष्ट दिसत होते, मात्र रिद्धीने सांगीतलेल्या गोष्टी मनामध्ये येऊन एक असमंजसाची स्थिती उत्पन्न होत होती. तिने परागला शांत केले आणि कारण देत म्हणाली, "मी थोडी अस्वथ होती, बर वाटत नव्हते म्हणून मुद्दाम नाही भेटले."

"अंग पण मग कॉल तर उचलायचा!"

लावण्याकडे त्यावर काही उत्तर नव्हते. लावण्याने, पुन्हा असं होणार नाही, असे आश्वासन परागला दिले.

त्या दोघांना वहारांड्यात बोलतांना, शेजारून जात असलेल्या सौंदर्या आणि मीनलने बघितले. त्यावर मीनल म्हणाली "अंग हा कोण नवीन हॅंडसम? आणि लावण्यासोबत कसा इथे?"

सौंदर्या मनात म्हणाली 'लावण्याचे मोबाईलवर रात्रं न दिवस असण्याचे कारण हे आहे तर. आश्चर्य आहे! इतका हँडसम मुलगा हिच्या जाळ्यात कसा काय अडकलाय.'

परंतु सौंदर्या मीनलला म्हणाली "जाऊ दे आपल्याला काय करायचे, तू चल कँटिंगला, आपल्याला उशीर होतोय. "


लावण्याने समजूत काढल्यानंतर पराग शांत झाला. काही काळ त्याच्याबरोबर इतर गोष्टी केल्यानंतर त्याचा निरोप घेऊन लावण्यासुद्धा कँटिंगला पोहोचली"

तिथे सर्व ग्रुप आधीच हजर होता: सौंदर्या,मीनल,रिद्धी,योगेश, पायल व इतर.


मीनलने मस्करी करीत लावण्याला विचारले "काय ग काय चाललंय? कळलंय आम्हाला"

लावण्या भांबावून म्हणाली "काय कुठे काय?"


"कोण होता तो हँडसम? ज्याच्याबरोबर तू व्हरांड्यात बोलत होतीस"


लावण्याला हा प्रश्न सौंदर्यासमोर विचारल्यामुळे ती जरा जास्तच चावरी बावरी झाली.


रिद्धी तिची बाजू सांभाळत म्हणाली, “अंग आमचा कॉमन फ्रेंड आहे. आणि तो इलेक्ट्रॉनिक्स ला आहे."


"मग तू का नव्हती तिथे!" मधेच योगेश बोलला.


"अरे मला भूक लागली होती, त्यामुळे मी घाई गडबडीत आले इकडे. "


रिद्धीने जरी सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला असला, तरी सर्वांना शंका आली की भानगड काही वेगळी आहे. मात्र पुढे विषय न लांबवता सर्वानी त्याकडे दुर्लक्ष केले.


कँटीग कडून क्लासकडे लावण्या व रिद्धी सर्वांच्या पाठीमागून एकट्याच जात असतांना लावण्यानी पुन्हा परागचा विषय काढला "बघितलं! त्याला माझ्याबद्दल किती ओढ आहे ती ! एक दिवस मी त्याला नाही भेटली , तर तो अस्वथ झाला; आणि तू म्हणतेस त्याला माझ्याबद्दल त्या फीलिंग्स नाहीत. "


त्यावर रिद्धी म्हणाली, "अस्वस्थ होण्याचे सामन्यतः बरेच कारणं असू शकतात, त्यासाठी प्रेम असणे गरजेचे नाही. व्यक्तीला बऱ्याचवेळा स्वतःला आणि बघणाऱ्यांनाही हा भ्रम असतो, की आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय, आणि त्याव्यावाचून जगू शकत नाही, त्याची ओढ लागते. बरेच वेळा समोर असलेली व्यक्ती त्याला कारणीभूत नसून स्वतः व्यक्ती असतो. त्याचा अहंकार असतो, त्याला कोणी त्याची उपेक्षा केलेली सहन होत नाही आणि तो अस्वथ होतो."


"तूझ्या प्रत्येक गोष्टी मला तत्वज्ञानासारख्या वाटतात. मात्र माझ्या मते तो माझ्यावर प्रेम करायला लागलाय." लावण्या म्हणाली


त्यावर रिद्धीने प्रश्न केला, "मग इतके महिने झालेत तुमच्या मैत्रीला, रात्रंदिवस सारखे एकमेकांसोबत बोलता, तर त्यानी तुला आतापर्यंत प्रपोस का नाही केले?"


ह्याचे उत्तर लावण्याकडे न्हवते, ती विचारात पडली. त्यावर रिद्धी थोडं वातावरण शांत करीत म्हणाली, "चल आता जास्त विचार करू नकोस, वेळ आल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, धीर धर."


*****

रिद्धीने सांगितल्याप्रमाणे लावण्याने स्वतःच्या भावना स्वतःपर्यंतच ठेवल्या. दिवसा मागून दिवस, महिन्यांमागून महिने गेले, वर्ष संपत आले होते.

तारुण्याचा उत्साह दिवसानुदिवस वाढत चालला होता. मैत्री मुरलेल्या लोणच्यासारखी चवदार झाली होती. तारुण्यातील प्रतिस्पर्धा इभ्रतीसाठी व्हायला लागल्या होत्या. काहींना प्रेम मिळाले, काहींना जिवलग मित्र, तर काहींचे हृदय तुटले. बरंच काही ह्या एका वर्षात घडले. कॉलेज गॅदरिंगची भव्यता आणि मज्या तर काही औरच होती; परंतु प्रथम वर्ष असल्यामुळे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून लावण्या सौंदर्याने गॅदरिंगमध्ये भाग घेतला नाही. त्या दोघींची एकमेकींबरोबरची प्रतिस्पर्धा अजूनही सुरूच होती. प्रथम वर्षी लावण्याने नेहमी प्रमाणे टॉप केलं. सौंदर्याला तिची ईर्षा तर होतीच; पण आश्चर्यसुद्धा वाटत होते, की लावण्या परागबरोबर संबंधात असूनसुद्धा, हे ध्येय ती कसं प्राप्त करू शकली. रिद्धी ही दुसरी टॉपर आणि सौंदर्य तिसऱ्या स्थानावर गेली होती.


निकालानंतर दुसऱ्या वर्षाला चित्र बदलेलं होतं, सौंदर्या आता लावण्याबरोबर रिद्धीच्या यशाबद्दल सुद्धा ईर्षा करायला लागली होती. ईर्षा कधी घृणेमध्ये आणि शत्रुत्वात बदलली कळलेच नाही.

एका ग्रुपचे दोन ग्रुप झाले. रिद्धी, लावण्या, मोहित, पक्या, आणि दुसरा ग्रुप म्हणजे सौंदर्य, योगेश, पायल, मीनल, राहुल.


मोहितचे लावण्याच्या रिद्धीच्या ग्रुपमध्ये असणे सौंदर्यासाठी आश्चर्याचे कारण होते.

मोहित सौंदर्यावर अजूनही प्रेम करीत होता, परंतु फक्त मैत्रीचे नाटक करून करून तो थकला होता. त्याच्यात ती सहजता राहिली नव्हती. त्यामुळे तो स्वतःहून तिच्यापासून दूर झाला होता, आणि लावण्याच्या ग्रुप बरोबर राहायला लागला.


एखादी व्यक्ती जवळ असली, आणि सारखी ती तुमच्या मागेपुढे करीत असली कि त्याची कदर नसते आणि दूर गेली कि त्रास होतो. तसेच काही सौंदर्याच्या बाबतीत घडले. मोहित जेव्हा लावण्याच्या ग्रुपबरोबर राहायला लागला तेव्हा सौंदर्याचा पारा फार चढला, एकांतात ती मोहित बरोबर फार भांडली.

मोहित मात्र एका शब्दानेही तिला उलट बोलला नाही, त्याला तिला दुखवायचे नव्हते.

आता कॉलेग्जमध्ये दोन गॅंग झाल्यात, नकळत सौंदर्याच्या ग्रुप मधील योगेश, मीनल, आणि इतर लोक, लावण्याचा आणि तिच्या गृपमधील लोकांचा राग करायला लागली. ग्रुप लीडर सौंदर्याची नकारात्मकता सर्वांवर हावी होती.


क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama