Bhaskar Suresh Tekade

Horror Thriller

4.7  

Bhaskar Suresh Tekade

Horror Thriller

प्रवास रातराणीचा

प्रवास रातराणीचा

25 mins
2.4K


सन १९९३ ची एक अमावशेची रात्र...

“डॉक्टर लय उपकार झाले बघा इतक्या रात्रि तुम्ही इथं आलात ते. आज जर तुमि आला नसता तर आमची भूरी रातभर दुःखान्यान कन्हत राहिली असती”  रावसाहेब कृतज्ञ पने बोलले. पण खर सांगायचे तर माझ्या मनात त्यावेळेला काळरात्रि तीथे येण्याची दुरबुदधी कशी सुचलि असचं येत होतं. पण मी डॉक्टर (जनावरांचा) या नात्याने आणि आमच्या सवइप्रमाणे माझ्या तोंडून आमचे पेटेंट असलेलं वाक्य निघाले “छे हो! उपकार कसले हे तर माझे कर्तव्य आहे.”


हे वाक्य फिल्मी जरी वाटत असलं तरी डॉक्टर, पुलिस अणि इतर समाजाची सेवा करणारे कर्मच्याऱ्यांनी  पेटेंट केल्यासारखे आहे. आता नक्की याचा उपयोग फिल्म मध्ये पहिल्यांदा केल्या गेला की लोक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वारसाहक्कात मिळाला हा संशोधनाचा विषय आहे.पण माझ्यावर मात्र फिल्मचाच प्रभाव होता. त्यामुळेच तर घरदारची पर्वा न करता या अमावस्येच्या रात्री या गावात आलो.


     रावसाहेब हे या ५०० लोकवस्ती असल्येया केचरी गावचे सरपंच. भूरी म्हणजे त्यांची म्हैस. दुपारी भूरी ही नदीतून बाहेर निघतांना तिच्या पायाचा खूर दगडावरील शेवाळावरुन घसरला अणि शेजारील असल्येल्या दुसऱ्या दगडानी तयार झालेल्या फटीमध्ये फसला.  तिथे असलेल्या रावसाहेबांच्या घरगड्यानी व जवळ असलेल्याला गावातील काही लोकांनी मिळून तो कसाबसा काढला. पण हे करीत असतांना तिच्या पायला गंभीर दुखापत झाली. रावसाहेबांनी साधारण सायं ४ला मला तालुक्याला येणाऱ्या एका गावकऱ्याकडे निरोप पठवला होता, पण तालुक्याहून निघता निघता मला उशीर झाला. त्यात माझी स्कूटर ख़राब असल्यामुळे मी सायं 6.30 च्या बसने इकडे गावच्या फाट्यावर पोहचलो. फाट्यावरून गाव हे ३ मैल आत असल्या कारणाने रावसाहेबांनी फाट्यावरुण त्यांच्या एमएटी (दुचाकी) वर मला गावामध्ये आणले होते. भुरीला तपासून, तिला मलमपट्टी करुन रात्री 9.00 ला मी रावसाहेबांच्या घरी चहा घेत बसलो होतो. खरंतर त्यांनी जेवण्याचा आग्रह केला होता पण रात्री 10. 30 ला  शेवटली रातराणी (एसटी बस) होती. तरी पुन्हा रावसाहेबांनी आग्रहाने “डॉक्टर थांबून जा आज इथे गावात.  इतक्या रात्री नका प्रवास करू. आज अमावस्या बी आहे. लागलं तर उदया पहाटेला पहिल्या गाडीवर  सोडतो फाट्यावर”


मी चेस्टनी रावसाहेबांना “घाबरता की काय रावसाहेब मला आता फाट्यावर सोडायला”. 

रावसाहेब थोडं कचकत बोलले “तसं  नाही पण तुम्हाला घरी पोहचायला उशीर होईन, म्हणून म्हटले.“

चहाचा कप खाली ठेवत मी लगबगीत  म्हणालो “नाही नाही, सकाळी निघालो तर उद्या मला दवाखान्यामध्ये जायला उशीर होईल. ” 

“चला निघू“

रावसाहेबांच्या गाडीवर बसून आम्ही एस्टी फट्याकडे निघालो. रावसाहेबांचे घर गावाच्या मध्यभागी असल्यामुळे गाव पार करून नंतर २ मैल कच्या रस्त्यानंतर फाटा लागणार होतो. थंडीचे दिवस आणि वरून अमावस्या, संपूर्ण गाव निजलेले होते. हातावर मोजता येणारे टिमटिमणारे लाइटबल्ब परिसरातल्या गडद अंधाराला चिरण्यात असमर्थ वाटत होते. गाडीवर मी आणि रावसाहेब दोघेही गप्प होतो. हळूहळू त्या भीतीदायक भयाण शांततेने माझ्या मनाला घेरले होते. गावातील रस्त्यावर तेवढे कुत्रे मात्र जागे होते आणि  ते “वुं…“ असा आवाज काढीत होते व गावातील दुसऱ्या कोपऱ्यात असलेले कुत्रे त्यांना “वुं ..” ने प्रतिसाद देत होते. एखाद्या भयावह फिल्मचे दृश्य मी प्रत्यक्षात अनुभवत होतो. 

गाडी गावाबाहेर कच्च्या रस्त्यावर लागली तेव्हा तिथे टिमटिमणारे बल्बसुद्धा  नव्हते. गाडीच्या हेडलाइटचाच तेवढा एकमात्र प्रकाश. शांतता असल्यामुळे अजूनही गावातील त्या कुत्रयांचा “वुं ..” आवाज कानावर पडत होता .मला माझ्या मागे पाठीवर कोणी एकदम हाथ मारेल कि काय , असा भास होत होता .मी सहज थोडे मागे वळून बघितले तेव्हा काळाकुट्ट अंधार . मी थोड घाबरून लगेच समोर रावसाहेबांच्या पाठीवर हात ठेवला. रावसाहेब गप्प होते. त्यांनी धरलेल्या मौनावरून नक्की तेसुद्धा घाबरले असावे. गाडीचा हेडलाइट रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या बाभळीच्या झाडावर पडत असल्यामुळे त्या झाडाच्या सावल्या आमच्या विरुद्ध दिशेने पळत होत्या . मला भुतांबीतावरती विश्वास नव्हता, पण ती भयाण रात्र मला, मी बघितलेल्या हॉरर फिल्म सीन्सची आठवण करून देत होती. रावसाहेबांचा भुतांवर विश्वास असावा म्हणूनच अमावसेच्या रात्री थांबण्याचा आग्र्ह त्यांनी धरला होता.

     थोड्याच वेळात आम्ही फाट्यावर मुख्य डांबरी रस्त्याला असलेल्या बस स्टॉपवर पोहचलो. बसस्टॉपवर आमच्या दोघांशिवाय कोणीच दिसत नव्हतं. रावसाहेबांनी गाडी बंद केल्यावर त्या गाडीच्या आवाजाचा आणि तिच्या हेडलाईटचा आधार सुटला. तसा बसस्टॉप शेजारी एक इलेट्रीक खांबावर ट्यूब लाईट होता, पण तोही त्यावेळेला चालू बंद होत होता. तिथे उभे राहून आम्ही बसची वाट बघायला लागलो. 

रावसाहेबांनी शांतता तोडत  विचारले “किती वाजलेत ?”

मी घड्याळात बघून  “10”

रावसाहेब “मग येईलच १५ मिनटात गाडी “

मी सहज उत्सुकतेने रावसाहेबाना विचारले “रस्त्यावर इतर वाहने दिसत नाहीत? मला वाटले चांगला वाहता रस्ता असेल. आणि आता तर फक्त १० वाजलेत “

रावसाहेब “रात्री ८ नंतर कोणी स्वतःच्या वाहनांनी प्रवास करीत नाही . आणि त्यात तर आज अमावस्या.“

मी विचारले “का नाही करीत प्रवास रात्री? “

रावसाहेब थोडं टाळण्याचा प्रयत्न करीत “नाही, काही नाही ,असच शेफ नाही वाटत म्हणून . कोणी म्हणते चोरी चपाती ,कोणी काय, अन् कोणी काय “

“आणखी काय म्हणतात?“

रावसाहेब वैतागून “जाऊ द्या वो ! काही नाही, लोकांच्या म्हणण्यावर कुठे विश्वास ठेवता “ रावसाहेब कदाचित स्वतःचा कमीपणा नको म्हणून बोलले. पण कदाचित काही तरी गावकऱ्यांनी कहाणी बनवली असेल आणि त्याच्यावर रावसेहब पण विश्वास ठेवत असतील असे मला वाटले.

आम्ही पुन्हा शांत झालो आणि शांतपणे गाडीची वाट बघायला लागलो. १०. १५ चे १०. ३० झाले 

मी घड्याळा कडे बघून “अजून नाही आली गाडी. काही वेळेवर येते का नाही ?“

रावसाहेब गराने सांगीत “काही खरं नाही बघा डॉक्टर कधी कधी दिवसालाही १-२ तास लेट होते. रात्रीच ठाऊक नाही . हे महामंडळ वाले बी इरसाल आहेत.“

थोडा वेळ गेला .रावसाहेबही आता थोडे अस्वस्थ दिसायला लागेल होते . जसे माझ्यापेक्षा त्यांनाच माझ्या  गाडीची वाट होती. सारखे समोर रस्त्याच्या मध्ये जाऊन दुरून कुठे बसचे लाईट दिसतायत का बघीत होते.

 बघता बघता थोडे रस्त्याच्या दुसऱ्या कडेला गेले आणि स्वतःच युरीन ब्लॅडर खाली केले . आणि तिथूनच आवाज देत “डॉक्टर या तुमि भी करा.  “

मी “नाही नको “

रावसाहेब “अहो या हो काय लाजताय .“

हि जशी जेवण्याची पंगत आहे आणि रावसाहेब मला जेवायचा आग्र्ह करताहेत. दो तीन वेळ आवाज दिल्यावर मीच कंटाळून काही तरी बोलायचं म्हणून “नाही घरी जाऊन मनसोक्तपणे करेल”

यावर रावसाहेबाना बोलायला काही नव्हते . परत आम्ही थोडा वेळ वाट बघितली आता रात्री ११ वाजून गेले. 

रावसाहेब पुन्हा आग्रह करीत “ डॉक्टर चला परत गावाकडे जाऊ, बस अजूनही नाही आली आणि असं किती वाट बघायचं. अन तुमी काही खाल्ले पण नाही.“

मी नकार देत "नाही हो खरच घरी पोहचलो की बर राहिल. आणि तशे तुम्ही पण नाही जेवलात. तुम्ही निघा, गाड़ी येईल कदाचित थोड्या वेळात.  असाहि एक तास झाला. निघा तुम्ही रावसाहेब"

रावसाहेब "छे हो में तुम्हाला इथ एकटा सोडून कसा जाऊ,मी बी थंबतो तुमच्या बरोबर.पण आता मला नाई वाटत गाडी येईल.  वेळ निघून गेला तिचा . ड्राइवर कंडकटर बी झोपले असतील डेपोत. कोण खड्यापाड्यांन असं प्रवास करत ते या वेळेला "

मला वाटलं रावसाहेब आता कंटाळले म्हणून काहीतरी सांगून मला ते  परत गावात नेतील . मग म्हणून मीच बोललो "नाही हो असं कस येणार नाही ते त्यांची ड्युटी आहे ती . माझी काळजी नका करू तुम्ही , निघा तुमी.  तसहि काय मी गाडीतच बसणार आहे. पण तुम्हाला तर फाट्यावरून एकट्याला त्या कच्च्या रस्त्यावरुन जायचे आहे."

रावसाहेबानी बराच आग्रह केला पण मी त्याना नकार देत त्यांना जायला सांगीतले . 

आता मी त्या फाट्यावर एकटाच होतो आणि सोबतीला होता तो लपलपता ट्यूबलाईट.


रावसाहेब जाऊन 15 मिनट झाली होती. हा निर्मनुष्य रस्ता, त्यात रातकिड्यांचा आवाज ,ट्यूब चालू बंद मुळे ‘किर्र..दुब” आवाज,  ह्यामुळे वातावरण आणखीनच भयावह भासत होते. तशी मला भूक पण लागली होती. पण विचार केला, ते जेवणाचं बघता येईल एकदा घरी पोहोचल्यावर .  ही रात्र एकदाची संपायला हवी. 

मी तसा भूत प्रेतावर विश्वास न ठेवणारा.  मजा आणि रोमांच म्हणून हॉरर फिल्म बघायचो. फिल्म मध्ये काही दृश्य फारच रोमांचित करीत मला, त्यामुळे मज्या वाटायची. मनुष्याचा विश्वास असो वा नसो,  पण जर ती गोष्ट मनुष्याच्या नेहमीच्या अनुभवापेक्षा पेक्षा वेगळा अनुभव देणारी असली तर नकळत असुरक्षेची भावना निर्माण करते. फिल्म संपल्यानंतर मला हे सगळं थोतांड वाटत असे . 

इथे अंधारात मला भुताचा अनुभव तर अजून आला नव्हता, पण जे काही सभोवतालील वातावरण मी अनुभवत होतो त्यात माझी कल्पनाशक्ती मी बघीतलेले फिल्मी दृश्य मनामध्ये आणीत होते. त्यामुळे मी आणखीनच अस्वस्थ होत होतो . जणू आता जमिनीतून एखादा रक्ताने माखलेला हात निघेल आणि माझा पाय पकडेल. कधी भास व्हायचा जसे माझ्या मागे कोणी उभे आहे. मी वारंवार मागे वळून बघीत होतो. मग स्वतःवर हसू यायचे.

तेवढ्यात सेकंदामध्ये  चालू बंद होणारा तो ट्यूब  बंद पडला. मी त्या ट्यूब कडे एकटक लावून सुरु होण्याची वाट बघितली, पण त्याच्या वेळेत तो सुरु झाला नाही . आता मला छातीत धस झालं. मी खाली बघितलं तर गडद अंधारामुळे मला माझे शरीरही दिसत नव्हते. मी हात वरती करून चेहऱ्या कडे नेत बघण्याचा प्रयन्त केला पण तोही दिसत नव्हता . हातातील फक्त घड्याळाचे रेडियम काटे तेवढे चमकत होते.  ती वेळ होती रात्री १२. ०० ची. आता मात्र माझ्या तोंडचे पाणी पळाले. नको ते विचार मनात यायला लागेल . मी आता स्वतःला शिव्या दयाला लागलो ‘काय गरज होती आज संध्यकाळी या गावात यायची , आलो तर आज गप रावसाहेबांच्या घरी थांबायला पाहिजे होते. आणि आता गावात सुद्धा पायी त्या भयाण कच्च्या रस्त्याने जाऊ शकत नाही’. 

या विचारत असताना अचानक हवेत जास्तच गारवा जाणवायला लागला. स्वतः मनाशी ‘आता हे काय! हि अचानक एवढी थंडी कशी वाजायला लागली. वरून लाईट पण बंद, नक्की काही गडबड आहे. ’’

तेवढ्यात उजवी कडून लांब रस्त्यावर मला गाडीचे दोन लाईट दिसले . हो ती रातराणीच होती. 

या बसला बघून जो आनंद मला झाला, तो मी सांगू शकत नाही.

थोडा समोर जाऊन लगेच मी हात पुढे करून हलवीत गाडीला थांबण्याचा इशारा केला. बस ब्रेकचा ”ची..ची” असा आवाज करीत माझ्या समोर येऊन थांबली. बस मधील आतले दिवे लागले आणि दार उघडले. मी बसमध्ये आत चढत दाराजवळ असलेल्या कंडक्टरला विचारले  “ काय आज रातराणीला जरा जास्तच उशीर झाला.” यावर मात्र कंडक्टर चे काही उत्तर नाही, तो एकटक डोळे फाडून रागाने माझ्याकडे बघीत होता. 

त्याचा चेहरा निर्जीव वाटत होता.त्याला असे बघून मला विचित्र अस्वस्थता झाली. माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती.मी खाली न बघता खिशातले पैसे काढीत “एक रामगढ.”

कंडक्टरणी आधीच हातातील असलेले एक तिकीट मला दिले.जसे ते तिकीट त्यानी माझ्यासाठीच ठेवलेले होते. हे मला थोडे विचित्रच वाटले.पण मी त्यावर जास्त विचार न करता माझ्या वरील शर्टाच्या खिश्यात ठेवले. 

मी वळून पुढे गाडी मध्ये बघितले, तर गाडीत एकही प्रवासी नव्हता. रावसाहेब बोलले ते खरंच,कदाचित वेळ निघून गेल्यावर कोणी प्रवासी नसेल. पण गाडी लेट का होईना आली ते महत्वाचं . पुढे जात मी एका सीटवर बसलो. आतापर्यंतच्या त्या भयाण एकटेपणानंतर गाडीत मला बरे वाटत होते. गाडीचे दिवे बंद झाले. रात्रीचे १२वाजून गेलेले होते आणि मला एवढे जागण्याची सवय नसल्यामुळे मला लगेच झोप लागली.


थोड्या वेळानंतर झोपेत मला अचानक जरा जास्तच थंडी वाजायला लागली. मी डोळे उघडले अणि  बघतो तर काय, मी बाहेर एका झाडाखाली माझ्या बागेवरती डोके ठेऊन झोपलेला.

मी खाडकन उठून उभा झालॊ.  इकडे तिकडे बघितले तर एक कच्चा रस्ता आणि मी एका चिंचेच्या झाडाखाली. माझ्या डोक्यात असंख्य प्रश्न फिरायला लागले ‘मी तर बस मध्ये होतो आणि इथे कसा? आणि बस कुठे दिसत नाही. त्या विचित्र कंडक्टरनी मला इथे टाकून तर दिले नाही ?’  

मला हेही ठाऊक नव्हते कि मी कुठे होतो ते. त्या कच्च्या रस्त्याच्या पलीकडे एक लाकडी खांब आणि त्यावर एक अँटिक असा बल्ब होता. त्याचा प्रकाश फारसा नव्हता . पण कमीत कमी तो सुरु बंद होत नव्हता. त्याच्या उजेडात मी थोडा फार बघू शकत होतो. माझ्या मागे जे चिंचेची घनदाट झाडी होती आणि  ती त्या अंधारात भयावह भासत होती. त्या झाडांपलीकडे अंधार अधिकच गडद होता, त्यामुळे तिकडे काही मुख्य रास्ता असण्याची शक्यता फार कमी होती. कदाचित आत जंगल वगैरे होते. मला आता आधी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दिव्या खाली जाणेच योग्य वाटत होते. 

मी खाली पडलेली बॅग उचलली आणि पुढे पाय उचलणार तेवढ्यात अचानक माझ्या पाठीवर आणि डोक्याच्या मागील केसावर थंड हवेची झुळूक जाणवली. जसे कोणी अचानक माझ्या मागे येऊन थांबले व त्याचा श्वास उश्वास माझ्या शरीराला स्पर्श करीत आहे . माझ्या छातीत धस झाले. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती.   


अचानक  मला मागच्या चिंचेच्या जंगलातून विचित्र शक्ती हळूहळू मागे ओढायला लागली. माझी पावले इच्छा नसतांनाही मागे उलट्या दिशेने मला चालायला भाग पाडत होती. मी आता थरथर कापायला लागलो . कशी बशी हिम्मत करीत ताकदीने पाय समोरच्या दिशेने उचलण्याचा प्रयन्त केला ,तेवढ्यात मला त्या शक्तीने ताकदीने मागे ओढले आणि मी धाडकन पाठीवर पडून मागे फरफटल्या जायला लागलो . माझी हातातली बॅग निसटली. आता ती शक्ती मला आणखी जोरात त्या चिंचेच्या झाडाकडे माझ्या मागून कॉलरला पकडून फेरफटायला लागली. मी जीवाचा अकांत करून एकटक रस्त्याच्या पलीकडे असलेल्या लाईट कडे बघीत त्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करीत होतो, पण तेवढ्याच शक्तीनिशी ती अदृश्य शक्ती मला फरफट त्या जंगलाकडे नेत होती. मी जसा त्या जंगलाच्या तोंडावर पोहचलो, मला असंख्य लोकांच्या किंचाळण्याचा आवाज यायला लागला. माझ्या तोंडून कसाबसा जोरात “वाचावा “असा आवाज निघाला. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या लाईटकडून अचानक कोणीतरी माझ्या दिशेने बंदुकीची गोळी झाडली.  ती मला मागून फरफटत असलेल्याला लागल्याचा मला भास झाला आणि त्याने जोरात माझ्या कानात विचित्र किंचाळी फोडली व त्याक्षणी माझे फरफटणे थांबले. 

मी स्वतःला सांभाळत उठून उभा झालो. आता मला त्या ऐकाला येणाऱ्या इतर किंचाळ्या पण थांबल्या होत्या. मी हळूच मागे वळून बघितलं , तर तिथे कोणीच असं नव्हतं ज्याला गोळी लागली असेल . मी बॅग उचलून रस्त्या पलीकडे असलेल्या लाईट कडे चालायला लागलो. थोडं पुढे गेलो तर लाईटच्या मागे एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन उभी होती. त्याचा चेहऱ्यावर अंधार असल्यामुळे लांबून नीट दिसत नव्हतं. मी हळुहळू त्या दिशेने चालायला लागलो. जेव्हा मी लाईट जवळ पोहचलो तेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा दिसला. तो वयाने कदाचित २५-३० वर्ष, उंचपुरा , अंगकाठी पीळदार असलेला तरुण पहीलवानाप्रमाणे होता. त्याने पांढरा कुर्ता आणि धोतर नेसलेले होते.माझे शरीर अजूनही भीतीने थर कापीत होते . मी हात जोडून त्याला अभिवादन केले . त्याने बंदूक खाली घेतली आणि मान हलवून माझे अभिवादन स्वीकारले. 

आणि जाड आवाजात “या पाहुणे, आमच्या गावात तुमचे स्वागत आहे. “

मी त्याला विचारले  “हे काय होते त्या जंगलात ? आणि  हे गाव नक्की कोणते ते”

तो अर्धवट उत्तर देत “दिग्गर ,हे आमच्या गावचे नाव”

मी आश्चर्याने “दिग्गर ! या गावाचे नाव मी कधी ऐकले नाही आणि  मी तर रामगढच्या बस मध्ये बसलो होतो.”


त्याने माझे बोलणे कापीत “हो पण आता तुम्ही दिग्गर ला आहात तुमच्या रामगढपासून १०मैल  दूर”


मी पुन्हा त्याला विचारीत  “पण हे काय होते ? मला काय अशी शक्ती तिकडे जंगलात ओढीत होती ?आणि तूम्ही बंदूकिची गोळी कोणाकडे झाडली नक्की  ? मी बस मधून खाली कसा ? बस कुठे? ”


तो माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता तो जंगलाच्याविरुद्ध असलेल्या त्या दिग्गर गावाकडे चालायला लागला. मला तिथे फाट्यावर थांबणे योग्य वाटले नाही.  मला भीती वाटत होती कि पुन्हा कदाचित ती अदृश्य शक्ती माझ्यावर ह्ल्ला चढवेल. आणखी विचार न करीता मी त्याच्या बरोबर चालायला लागलो.

त्याला परिचय देत “माझे नाव गणेश ,मी रामगढला जनावराचा डॉक्टर आहे.” 

त्याने स्वतःचा परिचय दिला “मी माधव “ बस एवढं बोलून तो शांत झाला. थोड चालल्यानंतर आम्ही गावात शिरलो आणि गावात बघतो तर काय चक्क संपूर्ण गाव जागी होते . मला फार नवल वाटलं, कारण साधारण रात्रीचे १-१.३० वाजले होते.  गावाच्या चौकातल्या वडाच्या झाडाखाली काही लोक बसून गप्पा मारीत होते . रस्त्यात भेटणारा प्रत्येक जण माधवला फार आदराने अभिवादन करीत होता आणि माझ्याकडे विचत्र शंकेच्या नजरेने बघीत होते. 

आम्ही चालत गावाच्या दुसऱ्या टोकावर पोहचलो तिथून एका बोळीमध्ये शिरलो. बोळ संपताच सामोर एक भले मोठे अंगण होते.  तिथे मध्ये एक शेकोटी पेटलेली आणि त्याच्या सभोवताली वर्तुळाकार काही खाटा टाकलेल्या व त्यावरती काही गावकरी बसलेले. त्यामधील बरेच गावकरी हत्यारबंद होते. एका खाटेवरती माधवप्रमानेच उंच बलाढ्य तरुण एकटा बसलेला होता. तो हि साधारण २५-३० वर्ष वयोगटातला . त्याचा चेहरा रुबाबदार आणि त्यावर त्याच्या जाड पीळ मारलेल्या मिश्या. तो त्यावेळी एका लीडर प्रमाणे भासत होता.सर्व गावकरी त्याला फार लक्षपूर्वक ऐकत होते. 

आम्ही जसे जवळ गेलो तसे त्याने त्याचे बोलणे थांबविले. सर्व गावकरी मला विचत्र नजरेने एखाद्या परग्रहावरून आलेल्याला बघितल्याप्रमाणे बघत होते. 

माधव त्या व्यक्तीचा परिचय देत “हे रणजित आमचे लीडर“

तेवढ्यात रणजित खाटेवरून उठून माझ्या जवळ आला आणि माझ्या भोवती फिरत वरून खाली मला त्याने न्याहाळले व भारदस्त आवाजात “स्वागत आहे या गावात तुमचे. चला आमच्या वाड्यावर“


ह्या अंगणाच्या शेवटच्या टोकाला एक भला मोठा वाडा होता आणि त्याला मोठे लाकडी दार होते. 

बाकी गावकर्यांना तिथे खाटेवरती सोडून रणजित ,माधव आणि इतर दोघे गावकरी मला घेऊन त्या वाड्यात शिरलो .वाड्याच्या  व्हरांड्यातच चार खुर्च्या एका खुर्चीला घेरून होती. मला त्या मधल्या खुर्चीवर त्यांनी बसवले आणि माझी विचारपूस सुरु केली. 

रणजित शंकेने  “तुम्ही इथे या गावात कशे ? आणि तेही इतक्या रात्री?”

मी थोड घाबरत “ मी केचरी ला फाट्यावरून रामगढकरिता बसलो होतो आणि मला गाडीत झोप लागली. डोळे उघडले तर मी गाडीत नसून तुमच्या गावच्या फाट्यावर होतो. मलाच ठाऊक नाही की मी गाडी खाली कसा ते.“

माधव मला विचारीत “तुम्हाला कोणी काही सांगून तर इथे नाही धाडले ? “

मी “ नाही मला कोणी काही सांगीतलेले नाही. आणि माधव तुम्हीच तर फाट्यावरती होता. तुम्हाला तर ठाऊक असेल कि मी खाली कसा ते.  “


 माधव सांगायला लागला “त्या बसच्या ड्राइवर कंन्डक्टरनी तुम्हाला गावाच्या फाट्यावरती सोडलं आणि पिशाच्यांच्या हवाली केले.”

मी भीतीने “पिशाच बापरे!”

माधव “हो पिशाच, त्या जंगलात पिशाच राहतात. आणि रात्री तिसऱ्या प्रहरात गावात शिरतात.”

रणजित पुढे सांगायला लागला “आमचे आणि त्या पिशाच्यांचे गेल्या काही दशकांपासूनचे वैर आहे .आणि आमचा नेहमी त्यांच्याशी संघर्ष होत असतो.”

हे आता माझ्या कल्पनेपलीकडील आणि मी बघितलेल्या फिल्मी सीन पेक्षा काहीतरी वेगळेच होते . 

एक पिशाचांची टोळी आणि त्याना हे बंदुकीने मारणारी विचित्र गावकरी.  

रणजित पुढे म्हणाला “आम्हाला पण ह्यातुन निघायचंय आणि ते तेव्हा शक्य होईल जेव्हा आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. तुम्ही आता या गावात आलाच आहात तर तुम्हाला आता आमचा निरोप घेऊन जावं लागणार”

मी आचार्याने “निरोप कसला आणि  कुणाकरिता ?”

रणजित बोलणे थांबवून उठून उभा झाला “सांगतो चला माझ्याबरोबर”

त्यानी कोपऱ्यात असलेला एक कंदील उचलला आणि मग मला घेऊन वाडाच्या मागील भागात गेले. वाडयाच्या मागे एक उंच भिंतीनी वेढलेल अंगण होते . तिथेहि दाट झाडी होती तेही या अंधारात फार भयाण जाणवत होते.  ही लोक मला कश्यासाठी इथे घेऊन आलीत मला कळत नव्हतं . पण मला यांचे ऐकन्यावातिरिक्त काही इलाज नव्हता. 

त्या अंगणाच्या एका कोपऱ्यात वाडाल्या लागून छोटी खोली होती आम्ही तिथे गेलो. ती खोली दिसायला अडगडीची होती आणि त्यात बरच तुटलेलं फर्निचर व इतर अडगडीच्या वस्तू होत्या. माधवनी रूमच्या आतील एक तुटलेला टेबल सरकाविला आणि त्या खाली असलेली फरशी काढली.  तर तिथे एक भुयारी मार्ग होता. रणजितने  मला खुणावले  आम्ही त्या कंदिलाच्या साह्याने त्या भुयारी मार्गाने खाली उतरलो . बघतो तर काय आत भली मोठी खोली होती तिथे एका कोपऱ्यात मोठ्या ट्रंका ठेवल्या होत्या. त्यातील रणजित ने एक ट्रंक उघडली तर ते बघून माझे डोळेच विस्फारले गेले  त्यामध्ये सोन्याचे दागिने, शिक्के खच्च भरून होते.


मग माझ्या मनात विचार आला कि नक्की हे डाकूंचे गाव असणार, म्हणूनच ही हत्यारबंद रात्री जगणारी गावकरी इथे आहेत आणि मी आता त्यांच्या तावडीत सापडलो. पण त्या पिशाच्यांची नक्की भानगड काय ते कळत नव्हते. मला आता त्यांना जास्त प्रश्न करायला पण भीती वाटत होती. पण तरीही थोडा घाबरत विचारले “तुम्ही बोललं कि तुमचा आणि पिशाचाचा संघर्ष आहे. तो या धनामुळे आहे का? आणि त्यांना हे हवंय?”

रणजित पुढे  सांगायला लागला “हो धनामुळेच आहे आणि त्यांना बदला पण हवाय. जो कोणी हे धन इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल त्याला हे ठार करण्याचा प्रयत्न जरूर करतील.“ 

रणजित म्हणाला, “रामगढला आमचा एक सोबती आहे, राघव शास्त्री त्याला तुम्ही ह्याबद्दल कळवा. आम्हाला हे त्याला सुपूर्द करायचे होते.“

मी म्हटले “मग तुम्हीच का रामगढला जाऊन निरोप का नाही देत?”

यावर ते सर्व गप्प झाले. माधव पुढे सांगायला लागला “आम्ही एका सीमेत बांधल्या गेलोय आणि आम्हाला नाही आता जाता येणार तिथे.“

मला काही कळत नव्हते. मी त्यांना निरोप देण्याचे आश्वासन देण्याव्यतीरिक्त काही पर्यायही नव्हता.

आम्ही पुन्हा परत वाड्याचा वर्ह्यांड्यात आलो. तेवढ्यात वाडयाचे मोठे दार कोणी तरी ठोकले.  माधवनी दार उघडले तर एक गावकरी निरोप घेऊन आला “ते गावात शिरले”.

मी घाबरत विचारले “ते म्हणजे पिशाच?”

माधव मान हलवीत ”हो, तिसरा प्रहर सुरु झालाय.“ 

चौघेही  सतर्क झाले सर्वांनी वाडयाच्या वऱ्हांड्यात ठेवलेल्या आपल्या बंदुकी घेतल्या. 

रणजित मला म्हणाला “आता तुम्हाला इथे थांबता येणार नाही.  तुम्ही माधवबरोबर फाट्यावर दुसऱ्या रस्त्याने निघा आणि पुन्हा या गावाकडे येऊ नका, कदाचित तेव्हा आम्ही तुम्हाला वाचवू शकणार नाही.”


रणजित आणि इतर काही गावकऱ्याबरोबर त्या बोळीतुन गावाच्या दिशेने गडप झाले. 


माधवनी त्याची बंदूक खांद्याला टांगली आणि माझ्या एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात माझी बॅग घेऊन आम्ही घाईत निघालो . 


मी आणि माधव वाड्याच्या उजव्या बाजूनी शेतामधून एका पायवाटेने फाट्याकडे पायी निघालो. गावाच्या बाहेर बाहेरून जात असताना माझी नजर गावाकडे होती. गावातून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकू यायला लागले,काही ठिकाणातून उंच हवेत आग दिसायला लागली , लोकांच्या किंचाळण्याचा आवाज यायला लागला होता.  माझे इकडे तोंडचे पाणी पळाले मी सपाट्यानी पावले टाकायला लागलो. 

चालता चालता  मी माधवला विचारले “ माधव फाट्यावर पण ते असतीलच ना मग ? आणि आता मी नक्की जाणार कश्यानी. बस तर नाहीये या वेळेला . “

माधव म्हणाला “आपण फाट्याच्या अलीकडे सकाळ पर्यंत दडून बसू आणि मग सकाळ होताच हि पिच्छाच नसणार तिथे.” 

तसेही आता रात्रीचे ३ वाजले होते . पहाट व्हायला तसाही वेळ कमी होता. 

आम्ही काही वेळ त्या अंधारात चालत राहल्या नंतर फाटयाच्या जवळ पोहचलो . रस्त्याच्या अलीकडे एका झाडीमध्ये आम्ही दडून बसलो आणि पहाट होण्याची वाट बघायला लागलो . तेवढ्यात कानावर घोड्यांची टापांचा आवाज यायला लागला आणि त्यात लोकांच्या किंचाळण्याचा. हा आवाज गावाच्या मुख्य रस्त्याकडून त्या चिंचेच्या झाडाकडे जात असतानाचा होता. मी अर्धवट उठून गावाच्या त्या रस्त्याकडे बघितलं तर माझा थरकाप उडाला. एक अदृश्य शक्ती काही गावकर्यांना फरफटत त्या चिंचेच्या झाडाकडे नेत होती . पण घोडे मला कुठे दिसत नव्हते. माझे पाय भीतीने लटलटायला लागले. हृदयाची स्पंदने तीव्र झाली . 

मी माधव कडे बघितले तर माधवचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. नंतर अचानक उठून त्याने त्या दिशेने बंदूकिने गोळी  झाडली . घोड्याचा आणि एका विचित्र किंचाळीचा आवाज आला, फरफटत असलेला व्यक्ती तिथेच जंगलाच्या आधी पडला. माधव ने त्याला तर वाचवले होते पण इतर काही गावकऱ्यांना त्याशक्तीने जंगलात नेले होते.

तो वाचलेला व्यक्ती उठून पळत आमच्या दिशेने यायला लागला. अचानक ती अदृश्य शक्ती घोड्यावरून त्या पाळणाऱ्या व्यक्तीच्या मागे आमच्या दिशेने यायला लागली . कदाचित त्या पिशाच्यांची संख्या एकापेक्षा जास्त होती कारण माधव वेगवेगळ्या दिशेने त्यांच्याकडे  बंदूक झाडायला लागला .जणू त्याला ते पिशाच दिसत होते. तो पळत येणारा व्यक्ती आमच्यापर्यंत पोहचणार त्याआधी परत त्याला त्या पिशाचाने पकडून विरुद्ध दिशेने ओढले. तो पाठीवर पडला आणि त्याला क्षणार्धात त्या पिशाचने फ़रफ़टून त्यालाही जंगलात नेले.

तेवढ्यात इतर पिशाच आमच्यापर्यंत पोहोचले कदाचित ते दोन होते किंवा जास्त. त्यातील एकानी  माधवच्या हातातली बंदूक खेचून त्याला खाली पाडले आणि एका शक्तीने मला मागून खेचले मी धाडकन पाठीवर पडलो आणि ते मला फरफटत न्यायला लागले. माझी नजर तिकडे माधवकडेच टिकली होती. माधवने कंदील उचलून हवेत त्या अदृश्य पिशाच्याकडे भिरकावला आणि आगेचा लोंढा निघाला त्यात मला चक्क मानवी आकृती दिसली. त्या पिशाच्यावर माधवने मात केली होती. 

 मी इकडे फरफटत लवकरच जंगलात पोहचणार होतो. माझा जीव आता घस्यापर्यंत येऊन पोहचला. माधवने जमिनीवरील बंदूक उचलली. तो धावत त्या रस्त्यापलीकडील लाकडी खांबाकडे गेला, जिथे मला तो सुरवातीला दिसला होता त्या ठिकाणी. मी आता त्या जंगलाच्या तोंडावर पोहचलो होतो मला असंख्य किंचाळन्याचा आवाज यायला लागला. माझा जीव कंठातून डोळ्यात आला होता. हृदयाचे ठोके स्वतःला जोरात जाणवू लागले, इतके की कानावर त्याचे दडपण जाणवत होते. माझी नजर आशेने रस्त्याच्या पलीकडे खंबाजवळ असलेल्या माधव कड़े होती. अणि मी जीवाचा अकांत करुन “वाचवा!” असा आवाज केला. अचानक समोरून माधवने बन्दुकीची गोळी माझ्या दिशेने झाड़ली अणि ती मला फरफटत असलेल्याला लागल्याचे मला जाणवले . त्याने माझ्या कानात विचित्र किंचाळी  फोडली. माझे फरफटने थांबले मग मी तिथेच बेशुद पडलो.


काही वेळानी मला जाग आली. डोळे उघडले तेव्हा पहाट झालेली होती. आताही मी तिथेच चिंचेच्या जंगला जवळ पडलेला होतो.घड्याळात बघितले तेव्हा सकाळचे ८.०० वाजलेले. मी उठून उभा झालॊ. तो कच्चा रस्ता तसाच होता ,पण रस्त्याच्या पलीकडे असलेला तो लाकडी खांब तिथे नव्हता . तिथे भरपूर झाडी आणि गवत वाढलेले होते. रस्त्याच्या पलीकडे गावात जाणारा रस्ता नसून घनदाट झाडी होती.  मी विचार केला हे माझे स्वप्न तर नसेल. कारण दूर पर्यंत गाव कुठे दिसत नव्हते. मग मी इथे कसा? याचा अर्थ बस मध्ये तर मी नक्की होतो. मी वरील खिश्यात हात टाकून बघितले तर बसचे तिकीट पण नव्हते. मला काही कळत नव्हते ते स्वप्न अगदी वास्तविक घडल्यासारखे भासत होते . 

मी नंतर तिथे मागे पुढे कुठून मुख्य रस्ता दिसतो का बघत होतो .पण मागील दाट झाडी मधून काहीच असं दिसत नव्हत. तेवढ्यात कोणीतरी गाणे गुणगणण्याचा आवाज आला . रस्त्याच्या मध्ये जाऊन मी उजवीकडे वळणावर आवाजाच्या दिशेने बघितले, तेव्हा एक मध्यम वय असलेली व्यक्ती बैलगाडी घेऊन दिसली. तो थोडा पुढे आल्यावर त्याने मला बघितले आणि जवळ येऊन त्याने बैलगाडी थांबवत मला विचारले “काय पाहूण इकडे कुठं आड़ रस्त्यानं.“ त्याला काय सांगावं कळत नव्हतं. म्हणून त्याला म्हटले “मी रामगढला निघालो होतो. मागील एका गावाच्या फाट्यावरून गाडी भेटत नव्हती , म्हणून दुसऱ्या कोण्या फाट्यावर गाडी भेटते काय हे पाहायला थोड चालत निघालो आणि भटकलो.” मला इशारा करीत तो म्हणाला “चला मी सोडतो मेन रोडवर. तिथून पुढे एखाद्याक  मैलावर फाटा आहे. तिथे तुम्हाला गाडी मिळेल.“

मी बैलगाडीत बसलो आणि निघालो.  


मी थोड कचकतच त्या बैलगाडीवाल्याला विचारले “का हो, इथे कुठे दिग्गर नावाचे गाव आहे का?“

तो आचर्याने बोलला “दिग्गर! नाही बुआ, अस कोणतं गाव इथे नाही. पण तुम्ही त्या झाडाखाली का थांबला होता“

मी टाळत “तुम्हाला मघाशी सांगितले ना, मी रस्ता भरकटलो ते “

तेव्हा तो बैलगाडीवाला म्हणाला “नाही कारण काही महिन्यापूर्वी या जंगलात तीन लोकांनी गळफास लावला होता.“

मी भीतीने “गळफास! “

तो पुढे सांगीत “हो त्यामध्ये एक प्रवासी आणि एका बसचे ड्राइवर कंडक्टर होते. बस त्या झाडाखाली उभी मिळाली.“

हे एकूण माझ्या पायाखालून जशी जमीन सरकली. मी काही विचारात असताना आम्ही मेन रस्त्यावर दुसऱ्या गावाच्या फाट्यावर पोहोचलो. थोड्या वेळात मला तिथून रामगढकरीता बस मिळाली. 

मी रामगढला घरी पोहचलो आणि लगेच तयार होऊन दवाखान्याला निघताना रस्त्यात नाश्ता केला. दवाखान्यात काही जानवरांना तपासले. दुपारी जेवणाची वेळ झाली.  पण माझ्या डोक्यात अजूनही ती रात्रीची घटना घुमत होती. रामगढ़ला माझा मित्र रमेश जाधव पुलिस सब इंस्पेक्टर होता. माझ्या मनात त्याला भेटायचा विचार आला. मी लगेच त्याला दवाखान्याच्या फोन वरुन पोलिस स्टेशनला कॉल केला आणि त्याला भेटायला गेलो.

मला उत्सुकता लागून होती कि त्या जंगलात झालेल्या ३ हत्यांचा आणि  मी अनुभवलेल्या घटनेचा काही संबंध आहे का ते. योगायोगाने रमेशच त्या केसचे इन्वेस्टीगेशन करीत होता. मी त्याला त्या केस बद्दल विचारले असता

रमेश मला सांगायला लागला “फार विचित्र केस होती ती. काही महिन्यापूर्वी त्या मेन रस्त्याचे काम सुरु असल्या कारणाने तत्पुरता मेन रस्ता त्या कच्च्या रस्त्याने वळवला होता. त्या रस्त्याने रात्रि कधी वर्दळ नसते तशी.  ही बस एका रात्री त्या रस्ताने गेली .आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळले कि हे तिघे तिथे हे मारल्या गेले .इन्वेस्टीगेशन मध्ये लूटेची काहीच चिन्ह सापडली नाही . आणि आत्महत्या कोणी तिथे जाऊन झाडाच्या वेलींना गळ्याशी बांधून कस करू शकेल. मग नीट बघितलेले त्यांच्या पाठीवर काही व्रण होते. जणू कोणी त्यांना त्या जंगलात फरफटत नेऊन निर्दयीपने मारले . “

हे एकूण मला ती रात्र आठवली आणि भीतीने अंगावर शहारे आले.

रमेश पुढे सांगायला लागला “ आम्हाला मग खुनाचच कारण वाटले. मी जेव्हा त्त्यांच्या घरी चौकशीला गेलो तर विचित्र काही ऐकले.  कंडक्टरच्या मुलीने सांगितले कि तो कंडक्टर एक महिन्याआधी बसने रात्री येत असताना त्याच कच्च्या रस्त्यानी जंगलाजवळ त्यांची बस पंक्चर झाली होती आणि मग ते बस ठीक करून दुसऱ्या दिवशी ते घरी परतले होते. त्या दिवसापासून तो रात्री झोपेत विचित्र बडबड करायचा धन, खजिना असं काही तरी आणि लोकांना सांगायचा तो लवकरच श्रीमंत होणार ते. “  

“त्या तिच्या बयाणावरून इन्व्हिसिटगेशन मध्ये लक्षात आले कि ड्राइवर कंडक्टर बरोबर असलेला  प्रवाशी हा एक तांत्रिक होता. कदाचित तांत्रिकाला तिथे त्यांनी काही धनाच्या लालसेने बरोबर नेले असावे आणि त्यांच्या मागावर असेलेल्याने त्यांचे धन हस्तगत करण्याच्या लालसेने ठार केले असेल.“

रमेशने मला त्या केस बद्दल सर्व काही सांगितले. ती केस अजूनही बंद झाली नव्हती . पुढे मी रमेशला विचारले “त्या रस्त्याने आणखी काही अश्या हत्या झाल्यात का. “

रमेश बोलला “नाही ती पहिलीच घटना. तेही त्या दरम्यान घडली ज्या वेळी त्या रस्त्याचे काम सुरु होते. “

मी पुढे विचारले “तुझ्याकडे त्या ड्राइवर कंडक्टरचा फोटो तर असेल . मला दाखवशील ? “

रमेशनी मला त्यांचे फोटो दाखवले आणि ते बघून मलाआणखीनच खात्री पटली. तो तोच चेहरा होता कंडक्टरचा जो मला रात्री रातराणीत भेटला. 

रमेशने मला आचार्यांनी विचारले “पण तू का आता चौकशी करतोय.“

 मी रमेशला रात्री घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. रमेश ते एकूण बोलला “हं! मला तुझ्यावर विश्वास बसला नसता पण मला ठाऊक आहे तुझा सुद्धा भुतांवर विश्वास नाही ते. आणि आच्चर्य  म्हणजे तू केचरी फाट्यावरून १० मैलावर कसा पोहचला. तू म्हटल्या प्रमाणे कदाचित ड्राइवर कंडक्टर यांनाही त्यांच्या मरण्याच्या महिन्याभरआधी हा अनुभव आला असावा आणि त्यांना खजिन्याचा पत्ता लागला होता. त्यांनी राघव शास्त्रीला निरोप न देता तो त्यांना स्वतः गडप करायचा होता व त्यामुळेच ते त्या तांत्रिकाला घेऊन गेले असावे . पण आपल्याकडे काही असा पुरावा नाही कि तिथे धन होते ते. आणि या भुताची कहाणी सांगितली तर सगळे हसतील माझ्यावर . तू बोलला ते गाव कोणते?”

मी म्हणालो “दिग्गर !“

रमेश म्हणाला “आपल्या जिल्ह्यात तरी या नावाचे गाव नाही आणि शंका आहे कधी असेल ते. आणि राघव शास्त्री बद्दल आपल्याला नावा व्यतिरिक्त काहीच ठाऊक नाही. “

थोडं थांबत रमेश जागेवरून उठला आणि बोलला “चल माझ्याबरोबर एक व्यक्ती आहे जो आपल्याला या बद्दल काही सांगू शकेल. ”

रमेश मला घेऊन प्रताप पाटीलांकडे गेला. प्रताप पाटील हे एक इतिहासकार , ते काही वर्ष आर्क्यालॉजि डिपार्टमेंट मध्ये होते आणि सध्या ते सोडून एका कॉलेजमध्ये  प्रोफेसर होते.”

आम्ही त्यांच्या कॉलेजला गेलो. त्यांनी आम्हाला येण्याचे कारण विचारले असता रमेश त्यांना म्हणाला “आम्हाला तुमची काही मदत हवी आहे, एका केस संदर्भात. काही नाही एक ऐतिहासिक माहिती हवी आहे. कदाचित ती महत्वपूर्ण ठरेल.“

प्रताप पाटील  “ठीक आहे बोला”

रमेश पुढे चौकशी करीत “तुम्हाला आपल्या तालुक्यात कोणते दिग्गर नावाचे गाव आठवते का ? केचरी रस्त्याने  इथून १० मैल अंतरावर. चिंचेच्या जंगलाजवळ असलेले. जे आता सध्या अस्तित्वात नाही असे.“

प्रताप आश्चर्याने “गाव! तुम्हाला कसे ठाऊक एखादे गाव असे गडप झाले असेल ते? कमाल आहे माझ्यानंतर तुम्हीच आहात फक्त जे तिथे एक गाव होते म्हणणारे.“

रमेश मी सांगितलेल्या घटनेचा उल्लेख न करता म्हणाला “नाही आम्हाला इतर गावातील काही म्हाताऱ्या लोकांनी सांगितलं, तुमच्याकडे अधिक माहिती घावी म्हणून आलो.” 

प्रताप पाटील पुढे सांगायला लागले “मी मूळचा याच रामगढचा.  हि गोष्ट साधारण १० वर्ष्याआधीची जेव्हा मी आर्क्यालॉजि डिपार्टमेंटला कार्यरत होतो आणि मी पुण्याला होतो. अधून मधून मी रामगढला यायचो. इकडे गावाकडची ओढ मला इथे आणायची . त्यावेळेस मी त्या रस्त्यानी शेती घेतली होती. आणि माझ्या शेतीपासून ते गाव आणि ती चिंचेची जंगल साधारण मैल भर अंतरावर असेल. हिवाळ्यात मी इथल्याच एका म्हाताऱ्याला पिकाची रखवाली म्हणून माझ्या शेतावर ठेवला होता. तो एक दिवस मी रामगढला असताना आला आणि त्याने शेतावर रात्री थांबण्यास नकार दिला. त्याला कारण विचारले तेव्हा तो बोलला कि शेतातून एका मैलांवरून त्याला त्या जंगलात विचत्र गोष्टी दिसतात दिवे सुरु असलेले,आग लागलेली वगैरे. तो म्हणाला दर अमावस्येला त्या तिथे  गाव वसते , त्या गावातून आणि त्या चिंचाच्या जंगलातून मध्यरात्रीनंतर किंचाळ्या ऐकला येतात. मला आधी वाटले कि त्याला कदाचित दारूच्या नशेत वगैरे काही भास झाला असेल. मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकाला तयार नव्हता. मग मी एका सकाळी त्याला घेऊन शेतावर गेलो. तिथे आमच्या शेजारील काही शेतावर काम करणार्यांना आणि आजूबाजूच्या गावात चौकशी केली. पण मला एकसारखी कहाणी ऐकाला मिळाली. बरेच गावकर्यांनी तिथे दुरून लाईट बघितले आणि किंचाळ्या ऐकल्या होत्या. माझी जिज्ञासा वाढली होती. मी माझ्या अर्र्क्यालॉजि डिपार्टमेंट मधल्या सहाय्यकाला बोलावून घेतले.अनऑफिशिअली आणि एक दिवशी सकाळी आम्ही त्या जागेवर गेलो. प्रथम दर्शनी ते जंगलच होते.  मग आम्ही रस्त्यापसून जरा आत गेलो तर आत काही ठिकाणी ओबड ढोबळ जमीन आढळली . जमिनीखाली काही तरी असेल असं आम्हाला आमच्या अनुभवावरून जाणवले. काही ठिकाणी मार्क करून आम्ही दोघांनीच थोडे खोदकाम केले , तर आच्चर्य मला काही बांधकामाचे अवशेष सापडले. पण हे फार कमी होते. कदाचित बरेच घरे इथे मातीची असतील मोजकेच दगडाची होती. त्यामुळे किती मोठे गाव असेल खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आणि आम्ही आणखी खोल त्या अवशेषांचा अभ्यास केला तर साधारण ते गाव इस १९३५ पर्यंत तरी तिथे असेल . “


प्रताप पाटील पुढे संगीत “ नंतर मी आजूबाजूच्या गावातील अगदी म्हतारे झालेले जे त्या दरम्यान असतील अश्या लोकांना शोधले. त्यांच्याशी बोलून मला त्या गावाबद्दल कळले. त्यांनी मला सांगितलं कि त्या संपूर्ण गावातील लोकांनी स्वतःला देश्याच्या स्वतंत्र लढ्यात झोकून दिले होते . लहान मोठे वृद्ध सर्वच स्वतंत्र लढ्यात सामील होते. ती गावकरी फार आक्रमक होती. आणि ब्रिटिशांचे शिपाही नेहमी तिथे येऊन कोणाला न कुणाला अटक करून न्यायची. त्याकाळी फार गाजलेले गाव होते ते. पण दुर्दैव त्या गावातील कोणीच जिवंत राहल नाही “


रमेशनी विचारल “का? असं काय घडले “


प्रतापराव पुढे सांगत “तिथे अशी कथा आहे एक रात्री तिथे ब्रिटिशांची अक्खी फौज आली होती. गावकरी आणि त्यांच्या मोठे द्वंद्व झाले. ब्रिटिशांनी त्या गावातल्या लहान वृद्ध महिला सर्वांचा बळी घेतला. पण त्या गावकऱयांनीहि  बऱ्याच ब्रिटिशांचा तिथे बळी पाडला असं म्हणतात. आता मी इतिहासकार आहे पण या घटनेचे मला काही पुरावे किंवा उल्लेख कोठे नाही मिळाला. “


रमेशनी मी सांगितलेल्या घटनेचा आधार घेऊन आणि त्या ड्राइवर कंडक्टर च्या इन्वेस्टीगेशन मध्ये असलेल्या धनाचा अँगल लक्ष्यात घेऊन प्रतापरावांना विचारले “मग या आक्रमक गावकर्यांनी ब्रिटिशांचे धन वगैरे लुटल्याची काही शक्यता असू शकते का ?”


प्रतापराव पुढे म्हणाले “हे गाव १९३५ पर्यंत अस्तित्वात होते. त्याच्या आधीचा १० वर्ष्याच्या स्वतंत्र लढा आक्रमक होता. तो काळ १९२५ साली हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी काकोरी ट्रेन लुटली. तो पैसा देशाचा होता, जो ब्रिटाशांनी आधी लुटला आणि क्रांतिकारकानी परत मिळविण्याचा प्रयत्न केला. नंतर दुर्देवाने ते पकडल्या गेले. चंद्रशेखर आझादांनी १९२८ ते १९३१ मध्ये संघटनेचे काम पुढे नेले. त्या काळातील हे गाव. देशातील असे बरेच युवक या मोठ्या क्रांतिकारकापासून प्रेरणा घेत होते. ब्रिटीश या अश्या क्रांतिकारकापासून फार वैतागले होते. त्यामुळे गावांवर छापे मारून संशियिताची धरपकड सारखी चालायची. कदाचित त्या गावात त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि त्यांनी ते गाव उध्वस्त केले असावे.” 


रमेश प्रतापला विचारीत “पण सर या गावाचा उल्लेख इतिहासात नसावा हे कमाल आहे.”

प्रतापराव बोलले “इन्स्पेक्टर अश्या इतिहासात असंख्य घटना असतील, असंख्य पात्र असतील ज्यांची नोंद कधी झाली नाही.आर्क्यालॉजी डिपार्टमेंंट देशातील अश्या अनेक साईट सरकारला सूचित करीत असते. जिथे देशाचा महत्वपूर्ण इतिहास दडला असण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला तर ठाऊक आहे सरकारकडे फंड हा सीमित असतो. बऱ्याच अश्या साईट आहेत, जिथे जमिनीखाली अख्खी शहरे असल्याचे पुरावे आहेत.  ते सुद्धा सरकार शोधायला तयार नाही. हे तर छोटे एक गाव आहे आणि पुरावे म्हणून गावकर्यांच्या गोष्टीवर सरकार कसे विश्वास ठेवणार.“

प्रतापरावंचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो.


मला पटले होते, तिथे कोणे एके काळी गाव असेल ते. काही दिवस मी रमेश बरोबर राघव शास्त्री नावाच्या बरेच लोकांना भेटलो.  पण ते त्या सालातील नव्हते. त्या घटनेला ५०वर्षे होऊन गेली होती कदाचित ती व्यक्ती आता हयात नव्हती किंवा गाव सोडून दुसरी कडे स्थलांतरारीत झाली असेल.

 

इन्स्पेक्टर रमेशसाठी ती केस अनसॉल्व्हड होती. काही महिन्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी दोघांचे त्याच पद्धतीने प्रेत मिळाले. इन्स्पेक्टर रमेशवर भरपूर प्रेशर टाकण्यात आले त्या केसकरीता. रमेशनी एक थेअरी प्रेझेंट करून त्या जागेवर भूतच बळी घेत आहेत, हे सिद्ध करण्याचा प्रयन्त केला. पण कायदा कसा हे मान्य करेल. रमेशची त्यानतंर ट्रान्स्फर करण्यात झाली. त्यानंतर येणाऱ्या इन्स्पेक्टरला पण केस सॉल्व करण्यात अपयश आले. शेवटी वनविभागाच्या मदतीने पाटी लावून त्या भागात सायंकाळनंतर प्रवेश निषिद्ध करण्यात आला. त्या रस्त्यावरील रातराणी पण बंद करण्यात आली. ज्यामुळे लोक रात्री प्रवास टाळतील. 


त्या परिसराच्या मैलापर्यंतच्या अंतरात असल्याला शेतावर कोणी चुकून रात्री गेले, तर त्यांना अजूनही अमावस्येला त्या गावात दिवे दिसतात. आजही तिथे गाव वसते, त्या गावातील तरुण अजूनही प्रतीक्षा करताहेत कोणी त्यांची मदत करेल याची. आजही त्या पिशाच्यांचा आणि भूत झालेल्या गावकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे व एका रातराणीचा नवीन प्रवाशाच्या शोधात निरंतर प्रवास सुरुच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror