Abhijeet Tekade

Drama Others

4  

Abhijeet Tekade

Drama Others

कुरूप (भाग ४ ) - खरा मित्र

कुरूप (भाग ४ ) - खरा मित्र

10 mins
319


राजेशला, लावण्याच्या जन्मानंतरचा हा सारा घटनाक्रम अजूनही स्पष्ट आठवत होता; ते आठवून त्याच्या अंगावर शहारे आले. लावण्यासोबत शाळेत जो भेदभाव आज झाला होता, तो कदाचित तिच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर होईल, आणि तिला त्याला सामोरे जावे लागनार होते. लावण्याबद्दल राजेशला काळजी होती; पण, कुठेतरी तो साधू आशा लावून गेला; की लावण्यासुद्धा इतर मुलीप्रमाणे सामान्य जीवन जगू शकेल, आणि  तिच्याही जीवनात कधीतरी निक्खळ आनंदाचे क्षण येतील; याच विचारात राजेशला झोप लागली . 


दुसऱ्या दिवशी लावण्या ,सौंदर्या, नेहमी प्रमाणे सकाळी ८. ३० ला शाळेला गेल्या. वार्षिक संमेलन परवावर येऊन ठेपल्यामुळे, शाळेमध्ये हे दोन दिवस मोजकेच वर्गाचे तास होणार होते.  इतर वेळामध्ये संमेलनानिमित्त सराव होणार होता. आदल्या दिवशी, लावण्याला तिच्या बाबाने समजावून सांगितल्यामुळे, ती सामान्य झाली होती; परंतु आज पुन्हा तिच्या मनात विचार रेंगाळू लागले; कारण त्यादिवशी पुन्हा सराव होणार होता; आणि तिला मागच्या रांगेत परफॉर्म करायचे होते.  तिच्या मते, तिचा कदाचित परफॉर्मन्स ठीक नसल्यामुळेच, तिला संपदा मॅडमने मागच्या रांगेत शिफ्ट केले होते.  तिच्या मनात धास्ती होती की,  जर आज पण तिचा परफॉर्मन्स संपदा मॅडमला आवडला नाही, तर त्या तिला नृत्यसमूहातून काढून टाकतील.  

याच विचारात ती एकटक खिडकीच्या बाहेर बघीत होती. गणिताच्या टिचरच्या हे लक्षात आले आणि त्या ओरडल्या, “लावण्या, कुठे लक्ष आहे तुझे ?”  लावण्याने  गोंधळून समोर बघितलं. 

ब्लॅकबोर्ड कडे, टीचरनी  दाखवित विचारले, “So as I explained, What will be the place value of underlined digit?”

लावण्या भांबावल्या प्रमाणे बोर्डकडे बघायला लागली. टिचरणी जे काही आज शिकलेलं, त्यात तिचं जराही लक्ष नव्हतं. ती गप्प उभी राहिली. टिचरने शिक्षा म्हणून तिला वर्गा बाहेर उभे राहायला सांगितले. हे तिच्या बाबतीत असं पहिल्यांदाच होत होते.  ती तशी हुशार असल्यामुळे, तिच्यावर कधी असा प्रसंग ओढवला नव्हता. तीला हे आणखीनच दुखावणारी गोष्ट होती.  ती लाजेने मान खाली घालून, जड पावलाने वर्गाबाहेर गेली; आणि वर्गाबाहेर दारा शेजारी मान खाली घालून उभी झाली. तेवढ्यात, तिला उजवी कडून  “शी .. शी .. “ असा आवाज आला.  तिने त्या दिशेने बघितले तर, बाजूच्या वर्गाबाहेर रोहन उभा होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हरवलेले हास्य परत आले.  

रोहन दिसायला गुबगुबीत आणि फार गोंडस मुलगा; तो सुद्धा ५ व्याच वर्गात, पण दुसऱ्या कक्षेत होता. तो लावण्या आणि सौंदर्याचा बालपणापासूनचा मित्र; आणि राहायला त्यांच्याच सोसायटी मध्ये होता . ह्या दोघी नेहमी त्याच्या बरोबर खेळायच्या. तो फार मनमौजी, नेहमी हसणारा आणि हसवणारा होता. 

रोहन करीता क्लास बाहेर उभे राहणे हे नेहमीच चालायचे. तो लावण्याचा बेस्ट फ्रेंड होता. लावण्याच्या कमी बोलणाऱ्या स्वभावामुळे, तिला दुसरे कोणीच असे जवळचे मित्र मत्रिणी नव्हते. पण रोहन बरोबर ती लहानपणा पासून खेळायची; अगदी २ वर्षाची असताना पासून. रोहन तसा सौंदर्याचा पण चांगला मित्र होता. यांचे त्रिकुट खेळताना सोसायटी मध्ये इतर मुलांच्या ग्रुपवर भारी पडायचे. लावण्या कुणा बरोबर एवढी सहजतेने नाही खेळायची ,ना मनमोकळे बोलायची, जेवढी ती रोहन बरोबर असे. 

रोहनला बघून लावण्याने हाय केले.  रोहन जागेवरून एखादया कांगारू सारखा उड्या मारीत लावण्याजवळ आला. लावण्या त्याला म्हणाली, “अरे वेडा झाला का?  तू इकडे आलास ते, टिचरणी बघितले, तर पुन्हा पनिष करतील आपल्याला. 

रोहन,“कॅख्य..! , त्या कश्याला आता बाहेर येऊन बघतील; त्या झाल्या मग्न, त्यांच्या त्या बोरिंग क्लास मध्ये.”

लावण्या आश्चर्यऱ्यानी म्हणाली, “अरे तुला काहीच कसे वाटत नाही! त्यांनी असं पनिष केले ते तुला.”

रोहन म्हणाला, “त्यात काय वाटायचं!  मी तर बऱ्याच वेळा बाहेर असतो असा.”

लावण्या म्हणाली, “काय हे , मला आज पाहिलनद्याच टिचरणी असं पनिष केले तर,  मला फार वाईट वाटले”

रोहन म्हणाला,  “वाईट काय ह्याच्यात!”  गॅलरीतून बाहेर दिशेला बोट दाखवीत म्हणाला, “ते बघ, येथून शाळेचे पटांगण आणि सोबतचे गार्डन किती सुंदर दिसते ते;  तिथे तो शाळेचा पिउन, खाली पक्ष्यांसाठी दाणे टाकतोय; आणि बरेच पक्षी ते खायला उतरताहेत.” दोघेही गॅलरीच्या रेलिंग जवळ जाऊन बघायला लागले.


रोहन म्हणाला, “आहे किणी बाहेर येण्याची मज्जा. खरं तर आपल्याला पनिशमेन्ट ही नाहीच मुळी. आत जे त्या बोरिंग टीचरच्या क्लास मधे बसलेत, ते पनिश होतायत.  हा हा हा ..” दोघेही हसायला लागले. 

रोहनचा, हा कोणत्याही परिस्थिती कडे बघण्याचा दृष्टीकोन असाच असायचा. कधीच कोण्या गोष्टीवर तो गंभीर होत नव्हता. तो स्वतः आनंदी असायचा आणि दुसर्यांनाही आनंदी करायचा. म्हणूनच लावण्या त्याच्याबरोबर असताना, काही क्षण सगळं विसरून मनमोकळेपनाने हसायची. 

तेवढ्यात घंटी वाजली, क्लास संपला होता.  टीचर बाहेर येण्याच्याआत दोघेही परत पळत जाऊन आपापल्या जागेवरती उभे झालीत. टीचर बाहेर आल्या, आणि दोघांना आत परत वर्गात जायला सांगितले. हा वेळ लंच टाइमचा होता. लावण्या ,सौंदर्या  आणि रोहन, टिफिन घेऊन नेहमी प्रमाणे शाळेच्या कँटीनमध्ये एकत्र टिफिन खायला गेले.  रोहन त्यांना शाळेच्या सर्व रिसेस मध्ये भेटायचा; ते फार धमाल करायचे. 

लंचनंतर त्या दिवशी काही क्लास नसून थोडा जास्त वेळ रिसेस होता. जेवण झाल्यानंतर मुले शाळेच्या पटांगणात खेळले. नंतर लावण्या आणि सौंदर्या डान्स प्रॅक्टिस साठी प्रॅक्टिस हॉल कडे गेल्या. 

संपदा मॅडम आणि सहायक शिक्षिका आशा, ह्या आधीपासूनच हॉलमध्ये होत्या. सर्व मुलींचा समूह आल्यावर, त्यांनी मुलींना आपआपल्या पॊसिशन्स घ्यायला लावल्या, आणि प्रॅक्टिस सुरु झाली. लावण्याचा आत्मविश्वास आज हरवल्यासारखा होता. संपदा मॅडम ठेक्यात कॉऊंटिंग करीत होत्या. त्यांच्या लक्षात आले की लावण्या आज फार चुका करते आहे. त्या मध्येच मुलींना थांबवीत ओरडल्या,  “ लावण्या काय हे! लक्ष कुठे आहे तुझे? आता इतके महिने सराव करूनसुद्धा केवढ्या चुका करतेस. नीट कर....चला  पुन्हा करू.” 

मॅडम लावण्याला रागावल्यामुळे आता ती अधिकच घाबरलेली होती; आणि त्यात ती आणखीनच चुका करायला लागली. संपदा मॅडम आशाला सांगीत,  “आशा हि मुलगी किती चुका करते आहे...! आता फक्त दोन दिवस आहेत प्रॅक्टिसेला. तू जरा जाऊन नीट सांग तिला.” 

पुन्हा मॅडमने प्रॅक्टिस थांबवली.  आशा लावण्याजवळ गेली व तिला हळू आवाजात म्हणाली,  “काय झाले बेटा ? आज तुझे लक्ष का नाही?  कधी रागावले का तुला संपदा मॅडमनि…,नाही ना.  मग आज नीट लक्ष देऊन कर जरा.”

पुन्हा प्रॅक्टिस सुरू झाली. आता लावण्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ध्वस्त झाल्यासारखा होता . तिला वाटायला लागले, आता हा परफॉर्मन्स ती नाही करू शकणार; आणि यामुळे पुन्हा जास्त चुका करायला लागली. आता संपदा मॅडमचा पारा फार चढला होता आणि त्या ओरडल्या, “Everybody stop!” आता सर्वच मुली घाबरल्या. संपदा मॅडम आशाला  इशारा करीत म्हणाल्या,  “Just take out that girl.”  आशा ही, काही क्षण स्तब्द होऊन संपदा मॅडमच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. संपदा मॅडम पुन्हा रागात, “आशा लावण्याला ग्रुप च्या बाहेर काढ!”

आशा समूहाकडे गेली. इच्छा नसतानाही तिने लावण्याचा हात धरून बाहेर काढले. लावण्याच्या डोळ्यात अश्रू होते. आशाला हे बघवल्या जात नव्हते. लावण्या हॉलमध्ये असलेल्या ऑडियन्स सेक्शन मध्ये एका सीटवर जाऊन बसली. तिथे काही इतर मुले प्रॅक्टिस बघायला बसलेली होती. त्यांच्यासमोर तिला आणखीनच लाज वाटली.  दोन्ही हातची घडी करून घुडघ्यावर ठेवत , डोके खाली हातावर खुपसून, चेहरा लपवत फुंसूफुंसू रडायला लागली. तिला कळून चुकले की आता, तिला संपदा मॅडम कधीच नृत्यात सहभागी होऊ देणार नाही. ती पूर्णपणे तुटली होती.  त्यादिवसाचा सराव संपला. शाळा सुटली, मुली घरी परतल्या.  

लावण्याच्या आईने हे भापले की, पुन्हा आज काहीतरी शाळेमध्ये घडले.  लावण्या काही न बोलता रूममध्ये जाऊन झोपून गेली, तिने काहीही खाल्ले नाही.  रश्मीला  (आई ) वाटले की कदाचित राजेश आल्यावर ती नीट होईल, त्यामुळे तिने तिला झोपू दिले.  सौंदर्यानी आईला शाळेत घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. संध्याकाळी राजेश घरी आल्यावर, रश्मीने राजेशला,  लावण्याला समजावून सांगान्यासाठी सांगितले. राजेशने लावण्याला उठवत प्रमाणे कुशीत घेतले. रश्मी आणि राजेश, दोघे मिळून लावण्याला  समजावयाला लागले. 

राजेश “बेटा इट्स ओके! काय झाले तू डान्समध्ये नाही म्हणून. पुढल्यावर्षी आणखी प्रॅक्टिसकरू आणि बेटर परफॉर्म करशील तू. आणि तू इतर स्पर्धा मध्येही भाग घेतला आहे ना.”

लावण्या रडत म्हणाली, “मला नाही जमत काहीच. आणि  मी डान्स पण फार घाण करते. “ती आणखी जोरात रडायला लागली.” 

रश्मी “अग डान्स म्हणजे सर्व काही का ग?  दरवर्षी निबंध लिखाण आणि क्विझ कॉमपीटिशनमध्ये तू नेहमी अव्वल असतेस.  तू तर फार हुशार आहेस; त्यामुळेच क्लासमध्ये टॉप पण करतेस ना.”

लावण्या “हो पण मला डान्स कारयाला फार आवडतं ग.”

राजेश, रश्मीने कसेबसे तिला समजून सांगितले. राजेशला वाटले एकदा शाळेत जाऊन टिचरसोबत बोलून बघावे आणि विचारावे कि नेमके काय झाले ते , तिला असे काढले. कदाचित रीक्वेस्ट करून तिला घायला लावू. त्याबद्दल त्याने रश्मीला विचारले असता. 

रश्मीने नकार देत,  “काही नको. मला सौंदर्याने सांगितले की लावण्या नीट नव्हती करीत डान्स. टिचरणी तिला बराच चान्स दिला. आता तुम्ही जाऊन कशी शिफारस कराल, डान्स नसून येत घ्या माझ्या मुलीला म्हणून. योग्य आहे का ते?”

राजेश,  “तुला नाही वाटत काही दुसरं कारण असेल म्हणून?”

रश्मी,  “आता परवावर आहे संमेलन. तुम्हाला वाटत का टीचर तिला ऐन वेळेवर चान्स देतील म्हणून. काळजी नका करू होईल नीट सगळं. या वर्षी नाही पुढल्यावर्षीसाठी आपण बोलू टीचरला.”


लावण्याचे  खराब परफॉर्म करण्याचे कारण,  तिचा कमी झालेला आत्मविश्वास आणि तिच्या मनात घर करून बसलेली भीती होती; पण हे  तिच्या आई,वडिलांना मात्र कळू शकले नाही. त्यांनी तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी,  तिला कॉम्प्रमाईस करून पुढल्या वर्षी जास्त सराव कर, तर तुला चान्स मिळेल असे सांगितले. कदाचित इतर आईवडीलांनीसुद्धा हेच केलं असत. पण लहान वयात मुलांना स्वतःचे गुण,अवगुण ओळखण्याची क्षमता नसते. अश्यावेळी पालकांनी स्वतःच्या मुलांचे गुण ओळखून त्यांना पोषक वातावरण देणे,त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे कर्तव्य आहे. जर यावर दुर्लक्ष केले तर हळूहळू मुलांच्या वाढीबरोबर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये घट होते; आणि काही वर्ष्यात त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. त्यामुळे योग्य वयात उचित मार्गदर्शन करण्याची गरज असते. 

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे लंचटाइमपर्यंत शाळेमध्ये क्लासेस झालेत. लंचब्रेकमध्ये रोहन, सौंदर्या, लावण्या नेहमी प्रमाणे भेटले. जेवताना रोहनने विचारले, “काय आज लावण्या का शांत शांत आहे?”

सौंदर्या म्हणाली, “अरे काल संपदा मॅडम नी हिला डान्स मधून काढले.”

हे एकूण लावण्याला फार वाईट वाटले, ती अर्धवट खात टिफिन बंद केला; आणि काही न बोलता निघून गेली. 

लंचनंतर मुले शाळेंच्या पटांगणात खेळायला लागले. लावण्या मात्र पटांगणाशेजारी असलेल्या गार्डनमध्ये, एका बाकडयावर गप बसून होती. रोहन,सौंदर्याने तिला खेळायला फार आवाज दिले.  पण ती नाही आली.

खेळता खेळता अचानक सौंदर्याचा पाय मुरगडला.  ती पडली सर्व मुले तिच्या अवतीभवती जमा झाली. 

काही मुले आणि रोहन धावत जाऊन स्पोर्ट टीचरला बोलावून घेतले. गोळा झालेली मुले बाजूला झाली, तेव्हा लावण्याला कळले की सौंदर्या पडली ते. ती धावत तिच्या बहिणी कडे गेली. स्पोर्ट टिचरनी तिला उचलून शाळेत असल्येला छोट्या क्लिनिकला नेऊन, तिथे स्प्रे लावून बँडेज रॅप केले. तिच्या पायावर स्वेल्लिंग असल्यामुळे वेदना होत होती; पण कोणते फॅक्चर नव्हते. नंतर टीचरनी सौंदर्याच्या आईला (रश्मीला) कॉल करून, बोलावून,  घरी न्यायला सांगितले. रश्मी शाळेत येऊन सौंदर्याला घेऊन गेली. लावण्याला शाळा सुरु असल्यामुळे शाळेतच थांबायचे होते. 

थोड्या वेळात संपदा मॅडमला कळले की सौंदर्या पडली ते. त्यांना हे  ऐकून तिच्या पडण्यापेक्षा दुःख म्हणजे त्यांच्या नृत्याची मुख्य परफॉर्मर इन्जुर होती. संपदा मॅडम प्रिंसिपलच्या केबिन मध्ये त्याना हे सांगायला गेली की, संमेलनामध्ये नृत्याचा कार्यक्रम प्रदर्शित करता येणार नाही. आणि त्यांना ह्यामध्ये काही कॉम्प्रमाइज करायचा नाही; पण प्रिंसिपल मॅडम म्हणाल्या प्रोग्राम कॅन्सल करीता येणार नाही, कारण संमेलनाचे मुख्य अतिथी ह्या सुप्रसिद्ध भरतनाट्यमच्या नृत्यांगना प्रभादेवी  येणार होत्या. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील एक तरी कार्यक्रम आपल्याला प्रदर्शित करणे भाग आहे. त्या जर प्रभावित झाल्या तर, शाळेला काही डोनेशन आणि सोबत या कलेसाठी मार्गर्दर्शन लाभणार होते. परंतु संपदा मॅडमला वाटत होते  की नृत्य समूहातील इतर मुली तेवढ्या ट्रेन नाहीत; आणि त्या उत्तम प्रदर्शन करू शकणार  नाही.  समूहातील मुली सामन्यतः जेव्हा कधी त्यांच्या स्टेप्स विसरायाच्या, तर त्या  सौंदर्याल आणि लावण्याला बघून करीत असत. परंतु आता दोघीही या समूहामध्ये नव्हत्या.  त्यामुळे अतिथी इंप्रेस होण्याऐवजी त्यांच्यासमोर शाळेची फजिती नको व्हायला. पण प्रिंसिपल मॅडमच्या मते, काही न केल्यापेक्षा काहीतरी प्रदर्शित करा, जेणेकरून शाळेने केलेली मेहनत दिसून येईल.

संपदा मॅडमचा नाईलाज झाला. रिहर्सल हॉलमध्ये सर्व एकत्रित झाले. लावण्या आधीच बाहेर निघालेली होती. ती इतर ग्रुपचा सुरु असलेला ड्रामा प्रॅक्टिस बघायला ऑडीटोरियम मध्ये बसलेली होती. इकडे डान्सची प्रॅक्टिस सुरु झाली; पण संपदा मॅडमच्या अपेक्षेप्रमाणे त्यात काही कमतरता भासत होती. तेवढ्यात आशा मॅडमने सल्ला दिला, “मॅडम, जर लावण्याला आपण पुन्हा लीड परफॉर्मर केले तर प्रश्न सुटेल.”

त्यावर संपदा मॅडम म्हणाल्या, “पण तू बघितलेले न ,काल किती चुका करीत होती ती. साध्यासाध्या स्टेप्सपण पण करू शकत नव्हती.”

आशा, “हो पण मॅडम,  त्याआधी तर ती कधी चुकली नाही. उलट सर्वात उत्तम करीत होती.”

आशा मॅडमच्या सल्ल्यामुळे संपदा मॅडम ने तिला बोलावून घेतले, डान्स प्रॅक्टिस सुरु होती. ती येऊन हॉलमध्ये ऑडियन्स सेक्शनच्या एका खुर्चीत बसली होती. तिला पुन्हा डान्सकरिता टिचरणी बोलावून घेतले याचा आनंद होता; पण त्याबरोबर भीती होती कीआजपण तिला नाही जमले तर? आणि पुन्हा टीचरनी काढले तर. अशा विचारात असताना, तिच्या शेजारील खुर्चीवर कोणी येऊन बसल्याचे तिला जाणवले. तिने बघितले तर रोहन. 

ती आश्चर्याने, “तू काय करतोय इथे ?”

रोहन, “मी डान्स बघायला अधून मधून येत असतो इकडॆ. “

लावण्या , “पण तू काल तर दिसला नाही. आणि तू कश्यात पार्टीसिपेट नाही केले का? “

रोहन, “मी आहे ना.  फ़ुटबॉल मध्ये आहे , ड्राम्यामध्ये  आहे “

लावण्या, “पण मी ड्रामा बघायला आली तेव्हा तू स्टेज वर नव्हता “

रोहन “अग तुझ लक्ष नसेल, मी कोपऱ्यात एक झाड बनून उभा होतो. “

लावण्या इतक्या तणावात असून सुद्धा थट्टेने “झाड!” आणि दोघेही हसायला लागले. 

लावण्या, “मग आता तू फुटबॉल खेळायला नाही गेला ?”

रोहन, “अग मी एक्सट्रा प्लेअर आहे. तिथे बसून बसून बोर होत होते. कलटी मारून इकडे आलॊ .”

लावण्या, “ग्रेट आहेस तू.”

रोहन, “पण तू का अशी उदास आहेस? तुला काढले याचे एवढं का मनावर घेतेस. मला बघ, सगळ्यात पार्टीसिपेट केले; पण त्यात मी एक्सट्रा. इट्स ओके चलता है.”

रोहन हळूच हसत म्हणाला ,“तुला काय वाटले संपदा मॅडमला डान्स येत असेल? हा हा  हा...” दोघेही हसले. 

रोहन पुढे म्हणाला, “पण हे कसं  शक्य आहे. मी बरेच वेळा तुमचा डान्स बघितला, आणि तू तर सर्वांमध्ये छान डान्स करतेस. सौंदऱ्यापेक्षाही  छान तुझा डान्स असतो.” 

हे ऐकून लावण्याला आश्चर्य वाटले, कारण तिला हे कोणी मोठ्यांनी हे कधी सांगितले नाही.

लावण्या, “खरंच!”

रोहन, “हो खरंच. आणि का म्हणून त्यांच ऐकतेस, चांगले का वाईट करते ते . तू ते करताना आनंदित असतेस ना ? जसा मी पैंटिंग करताना असतो. मी ते माझ्यासाठी करतो. कोणी माझ्या ड्रॉइंग्सला खराब म्हणो किंवा वाईट. मी ते करीत राहील”

लावण्या, “हो, मलाही फार आवडते डान्स करायला. मी सगळं विसरून जाते; जेव्हा मी डान्स करते तेव्हा.”

रोहन, “तुला आता पुन्हा घेत आहेत का मग ?”

लावण्या, “हो त्याकरिताच मला बोलावले . “

रोहन, “बघ मी तुला बोललो ना, तू सर्वात छान करतेस. म्हणूनच तुला इथे बोलावले परत.”

हे एकूण लावण्याला फारच बरे वाटले. तिचा हरवलेला आत्मविश्वास परतला. तेवढ्यात डान्स प्रक्टिसचा चालू असलेला एक राऊंड संपला. आशामॅडमने लावण्याला हाक मारली. लावण्या ग्रुपकडे गेली. यावेळी आशा मॅडमनी लावण्याचा हात धरून सर्वात समोर उभे केले. लावण्याची आणि आशा मॅडमची नजरानजर झाली . आशा मॅडमनी स्मित हास्य केले, जसे नजरेने त्या म्हणाल्या ‘You deserve this!’ 

लावण्याने, एकही चूक न करिता, एका नवीन आत्मविश्वासाने त्या दिवशी परफॉर्म केले. सर्वानी टाळ्या वाजवल्यात. हा आत्मविश्वास तिला कोणी मोठ्यांनी नाही, तर त्या तिच्या चिमुकल्या मित्राने दिला होता.


क्रमशः 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama