Bhaskar Suresh Tekade

Drama Tragedy

4.0  

Bhaskar Suresh Tekade

Drama Tragedy

कुरूप - भाग-३ -श्राप की वरदान

कुरूप - भाग-३ -श्राप की वरदान

5 mins
352


दिवसामागून दिवस गेले.  मुली एक वर्षाच्या होणार होत्या. लावण्याच्या जन्मानंतर तिच्या आजारामुळे राजेश आणि रश्मीला बरेच दुःख सोसावं लागल होतं . म्हणायला नातेवाईक मानसिक आधार दयायला होते आणि त्यांनाही हे दुःख होते.  पण वास्तविकपने जे दुःख,वेदना एका छताखाली राहणाऱ्या त्या कुटूंबाला भोगावे लागते, त्याची तुलना करता येणार नाही. हा एक वर्ष बऱ्याच त्रासाचा जरी झाला असला तरी त्यामध्ये आता घसरण होत होती. राजेश आणि रश्मीने लावण्याला आतापर्यंत फार जपले होते. तिच्या प्रकृती मध्ये सुधार होत होता.  पण तिची प्रतिकार शक्ती म्हणावी तेवढी मजबूत नव्हती. अधूनमधून ती आजारी पडायची.आजार भयंकर नसला तरी आजाराबद्दलची आणि हॉस्पिटलची धास्ती राजेश आणि रश्मीला तीच असायची. त्यांच्या मनावरचा आघात हा तीव्र होता आणि तो कायमस्वरूपी एका धास्तीच्या सुप्त ज्वालामुखी प्रमाणे मनामध्ये घर करून होता.  जेव्हा कधी तिची थोडीही प्रकृती बिघडली कि तो ज्वालामुखी फुटायचा. 


असंच, एकदा लावण्या आजारी पडली. दोघींचा त्या आठवड्यात प्रथम वाढदिवस होता. आजार हा गंभीर स्वरूपाचा नव्हता पण तरीही राजेशने तिला डॉक्टरांकडे नेऊन योग्य तो उपचार सुरु केला होता. राजेश आणि रश्मीला मुलींचा प्रथम वाढदिवस साजरा करायचा होता, पण तिच्या प्रकृतीची चिंता त्यांना जास्त होती.

 नेहमी नेहमी आजार बघून ते सारखे चिंतेत असायचे. राजेशचा सकाळ ते संध्याकाळ ऑफिस मध्ये वेळ जात असे. पण  रश्मी घरी अस्वस्थ राही . रश्मी तिच्या आईला दिवसातून एखादा तरी कॉल करीत असे . रश्मीला तिच्या आईचा जास्त आधार वाटे. राजेशचे आई वडील त्याच्या लग्नाच्या आधी फार वर्ष्यापूर्वीच वारले होते. त्याच्या काकांनी त्याचा सांभाळ केला होता. त्यामुळे रश्मी कडील नातेवाईकांचाच त्यांना जास्त आधार वाटत होता . 


लावण्या आजारी असल्यामुळे रश्मीच्या आईचे सारखे कॉल रहायचे. ती रश्मीला ‘तू काही काळजी नको करू, सगळं नीट होईल’ असं सांगायची.  पण स्वतःच मात्र काळजीमुळे सारखी कॉल करी. त्या दिवशी रश्मीला संध्याकाळी चौथ्यांदा आईचा कॉल आला रश्मी आईचा कॉल उचलून म्हणाली . “हॅलो ! काग काय सर्वकाही ठीक आहे ना ? आज सारखे कॉल करतेय."

आई म्हणाली “अगं काही नाही ग, बस मला तुमचीच काळजी वाटतेय”

रश्मी आईला आधार देत म्हणाली “मला काळजी नको करू असं सांगतेस आणि स्वतः मात्र काळजीत राहते”

आई मुद्यावर येत म्हणाली “अग आज एकदम माझ्या ध्यानात आले लावण्याची तब्बेत अशी खाली वर का होतेय ती”

“का?” रश्मीने आश्चर्याने विचारले.

“अग जेव्हा लावण्याच्या जन्मानंतर ती गंभीर आजारी होती आणि इस्पितळात ऍडमिट होती. तेव्हा मी गुरुदत्तांकडे नवस बोलले होते कि, हिची तब्बेत ठीक झाली कि तुझ्या दर्शनाला आणेल. आणि नंतर घरी आल्यावर आपण गुंतून गेलो बाळांची काळजी घेण्यात. त्यामुळे तुला सांगायचे राहून गेले होते बघ. आणि आता एक वर्ष होत आहे .तर आपल्याला तिला न्यायला हवे गाणगापुरला.”

रश्मी म्हणाली “पण या तिच्या तब्बेतीमध्ये  तिथे तिला नेने योग्य होईल का ?”

रश्मीची आई म्हणाली “अग तब्बेत ठीक झाली म्हणजे लगेच जाऊ म्हटले. “

रश्मी विचार करीत म्हणाली “मी यांना विचारून सांगते”.


संध्याकाळी राजेश घरी आल्यानंतर रश्मीने राजेशला याबद्दल विचारले. राजेश आधी कधी देवावर आणि दैवावर विश्वास न ठेवणारा होता . पण लावण्याचा जीवावर बेतलेला धोका आणि त्यातून तिचे बचावणे हे दैवच. या दोघ्यांच्या आयुष्यात जो उलथापालथ सुरु होत्या कि त्यांना दैव आणि देव ह्यावर आता विश्वास बसायला लागला होता. आणि त्यात लावण्याचा जीव वाचणे हा तर डॉक्टरांच्या दृष्टीने पण चमत्कार होता.  पण डॉक्टर या गोष्टीला औपचारिक मान्यता देणार नाहीत. यावेळेस लावण्याची तब्बेत दोन दिवसातच ठीक झाली.


मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशी रश्मी, राजेश आणि रश्मीची आई यांचा गाणगापूरला जाण्याचा बेत ठरला. वाढदिवसाच्या आधल्यादिवशीच सकाळी पुण्याहून गंगापूरकरिता एका खाजगी वाहनाने सर्व निघाले. रात्री ते गंगापुरात पोहचले. तिथे त्यांनी रात्री मुक्काम केले. निर्गुणमठाला जाण्याच्या आधी भीमा अमरजा संगमावर स्नान करायचे विशेष महत्व असल्यामुळे त्यांनी सूर्योदया आधी तिथे स्नान केले. नंतर मुलींबरोबर दर्शन घेऊन ते औदुंबर वृक्षाखाली आले. तिथे बरेच भक्त गुरुचरित्राचे पारायण करीत होते. त्यांनी तिथे दर्शन घेतले. त्या झाडाखाली एक वृद्ध साधू जप करीत होते . रश्मीच्या आईचे लक्ष त्यांच्यावर जाताच त्या आश्चर्याने म्हणाले “अग रश्मी हे तर माझे गुरु आहेत. आधी हे आपल्या गावच्या मठामध्ये राहायचे. मठात यायच्या आधी म्हणे गावालगतच्या निर्मनुष्य जंगलात यांनी बारा वर्षे तप केले. कुण्या गुरे चरणाऱ्याला त्या जंगलात हे तापचर्या करिताना दिसले आणि त्यानी गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी त्यांना गावात आणून मठ बांधला. काही वर्ष ते तिथे राहिले पण एकदा गावकऱ्यांना न सांगता कायमचे ते मठ सोडून निघून गेले होते. गावकर्यांनी बरेच शोधले. पण, त्यांना नाही मिळाले कुठं ते आणि आता बघ किती योगायोग आपल्याला इथे भेटले. हे फार अंतर्यामी आहेत. ते काही केल्या लोकांसोबत बोलत नाहीत. पण जर त्यांना काही सांगायचे झाल्यास ते स्वतःहून बोलतात. चल दर्शन करू त्यांचे.”


राजेशला ह्यावर मात्र काही विश्वास नव्हता. पण आईची इच्छा दर्शन घ्यायची आणि त्यात काही हानी त्याला वाटत नव्हती. म्हणून ते त्या साधुजवळ गेले. तो वृद्ध साधू डोळे बंद करून फार मग्नपणे जप करीत होता. बरेच लोक त्यांच्या पाया पडत होते. पण तो ध्यानस्थ अवस्थेत होता. रश्मीच्या आईने त्यांच्या पायांना हात स्पर्शून नमस्कार केला. तसेच राजेश आणि रश्मीनेही केले. मग रश्मीच्या आईने दोघी मुलींना त्यांच्या पायाजवळ ठेवले. तर आचार्य त्या साधूने त्याचे ध्यान मोडीत डोळे उघडले. त्यांची नजर खाली मुलींवरती पडली आणि लवण्याला त्यांनी दोन्ही हातांचा पाळणा करीत उचलून छातीजवळ केले. तिच्याकडे एकटक बघायला लागले आणि लगेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.


राजेशला हे विचित्र वाटले. त्या साधूचे डोळे करुणेने भरलेले लावण्याला न्याहाळत होते. त्याचे अश्रू थांबत नव्हते. हे बघून रश्मीच्या आईने त्यांना काही विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांनी हाताने इशारा करून थांबवले व म्हणाले “नशीबवान आहे मुलगी. तरीही हिला आयुष्यात फार यातना सहन कराव्या लागणार आहेत. फार रोमांचक आयुष्य राहणार हिच्यासाठी. पण ह्या यातना तिच्यासाठी श्राप नसून वरदान आहेत.” एवढे  बोलून त्या साधूने तिला राजेशच्या हाती दिले आणि पुन्हा डोळे मिटून ध्यानस्थ झाले. राजेशला विश्वास नसूनसुद्धा ते ऐकल्यानंतर मात्र त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama