यशस्वी हो
यशस्वी हो
यशस्वी जीवन हवं म्हणून
का देवाला साकडं घालतो?
हात पाय न हलवता बस
आयतं पुढ्यात दे म्हणतो?
अरे जोमाने लढावं लागतं
जीवनाच्या या संग्रामात
जिद्द,परिश्रमा शिवाय मग
यश कसं पडेल पदरात
प्रत्येक प्रयत्नात कदाचित
यश मिळणारच असं नाही
पण प्रयत्नाशिवाय यश मिळवणं
याला दुसरा पर्याय आहे का काही
क्षणभंगूर ते सुख आनंद
त्याच्या शोधात का भटका
गुंतुवन ठेवावं स्वतःला कामात
मौल्यवान ती हर एक घटका
आपलच दुःख सर्वात मोठं
हा एक भ्रमच दुसरं काही नसतं
दुःखावर मात करत पुढे गेलं
की आयुष्यात समाधान मिळतं
का डोकवायचं दुसऱ्याच्या घरात
त्यांचं यश बघून स्वताला कोसायचं
नको तो मत्सर,नको ती घृणा
स्वतःच्या बुध्दी कष्टाने यश मिळवायचं
