यशोदेचा कान्हा
यशोदेचा कान्हा
देवकीचा कान्हा
तुरुंगात जन्मला
सुरक्षा उपायी
गोकुळी वाढला
यशोदा मायही
विशाल मनाची
कृष्ण वाचण्यासी
पोटची पोर देई
देवकी होणे सोपे
यशोदा अवघड
अपत्य आपले
मानणे अवघड
सावळा कान्हा
गोकुळी रमला
गंध मोरपिसाने
यशोदेने नटवला
कृष्णाच्या लीलात
यशोदा रमली
ब्रम्हानंदी विश्वे
आनंदे रंगली
