STORYMIRROR

Sayli Kamble

Inspirational Others

3  

Sayli Kamble

Inspirational Others

यशाची झेप

यशाची झेप

1 min
12K

महत्त्वाकांक्षा उरी बाळगून घे तू झेप उंच आकाशी

न डगमगता पुढे जा , द्रूढ निश्चय कर हा मनाशी


घेऊ दे स्वप्नांना उंच भरारी पुर्नत्वाच्या दिशेने

दे प्रयत्नांची साथ त्यांना मग यशाच्या आशेने


जरी नसेल पुरेसे बळ पंखांत, जिद्द कधी कमी न होवो

कष्ट करूनी योग्य दिशेने आकाशी विमान हे उडत राहो


पाऊस नि वारा येईल समोर संकटांच्या रूपाने

त्यातूनही वाट काढत जिंकून ये तू हिम्मतीने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational