STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

यश...!

यश...!

1 min
1.1K



यश म्हंटल की

किती किती बरं वाटतं

स्वप्न साकार झाल्याचं

समाधान मिळतं


खरचं त्या यशाचं

स्वप्न आपण पहिलेलं असत का?

पाहिलेलं होत का?


मी थोडा विचार केला

स्वप्न पाहणं

हे आमच्या नशिबी आलंच नव्हतं

जे पदरात पडलं

तेच जीवनात स्वीकारलं

आणि सार जीवन सरलं


आता या वळणावर वाटतं

स्वप्नं पहिली पाहिजेत

ती साकारण्यासाठी

धडपडल पाहिजे

म्हणजे यश म्हणजे काय

हे नेमकं कळतं

आणि त्या यशाचं

सौख्य द्विगुणीत होऊन मिळतं


आणि

मी ठरवलं

आज उज्वल उन्नत

यश जीवनात मिळवायचं

ध्येय निश्चित करून

संकल्प सोडायचा

आणि

धडपडून ते मिळवायचं

कारण

मला ध्येय पूर्तीचा आनंद

मिळवायचा आहे

यशाचा आनंद

मनस्वी चाखायचा आहे.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational