STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Inspirational

3  

गोविंद ठोंबरे

Inspirational

यंदा कर्तव्य आहे

यंदा कर्तव्य आहे

1 min
27.9K


यंदा कर्तव्य आहे

जातीच्या झेंड्याचं अन् धर्मांध झालेल्या माणसाचं.

लचके घेतलेल्या शरीराचं अन्,

भडाग्निने पेटलेल्या अंत:करणाचं

हव्यासाने झपाटलेल्या हाथाचं अन्

तुटलेल्या नात्यांचं...


यंदा कर्तव्य आहे

राजकारणाच्या पापाचं अन्

दम भरलेल्या समाजाचं

विळखा घेतलेल्या फासाचं अन् उपाशी झोपलेल्या पोटाचं

गरीबीच्या झोळीचं अन्

लाचार झालेल्या पदराचं.....


यंदा कर्तव्य आहे

जाहिरातीच्या दुनियेचं अन्

रंगवलेल्या खबरांच

अपंग झालेल्या श्रध्येचं अन्

बाळांत झालेल्या अंधश्रध्येचं

झोपलेल्या विकासाचं अन्

आश्वासनांच्या भूल थापांचं....


यंदा कर्तव्य आहे

विसर पडलेल्या मातीचं अन्

गावाकडच्या घराचं

म्हातार्या झालेल्या डोळ्यांच अन्

पोरक्या मनाच्या पोरांच

काळोख पडलेल्या माणुसकीचं अन्

मुठमाती दिलेल्या कर्तव्याचं

यंदा कर्तव्य आहे .....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational